तात्पर्यात गडबड? नेहमीच्या कथा..
लहानपणापासून (किंवा लहानपणीच !!) नेहमी ऐकलेल्या काही कथा. त्यातली एकदोन सँपल उदाहरणं उचलून दाखवतो. यातल्या काही कथा तर उदाहरण / चांगले विचार / बोध याकरता सांगितल्या जातात..अजूनही सांगितल्या जातात का माहीत नाही. पण बर्याच कथा त्या त्या वेळी शाळेतल्या बाई किंवा आजूबा आज्जींकडून ऐकून घेतल्या. आता त्याविषयी उलट विचारही मनात येतात :
१) द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्रहरण करणार्याच्या मनात शरम उत्पन्न करणं किंवा त्याचे हात लुळे पाडणं किंवा त्याचं डोकं कलम करणं अशा प्रकारे मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवला..? हाही उपाय जादुई शक्तिवाला आणि तो ही..
ही कथा काल्पनिक आहेच पण तरी ती सांगितली जाते एक शील / लज्जा वाचवणार्या नायकाची महती ठसवण्यासाठी. लज्जारक्षणाचा कोणता मार्ग शिकायचा यातून ?
२) युद्धात कन्फ्यूज झालेल्या "सीदन्ति मम गात्राणि" म्हणणार्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी उपदेश केला, त्याविषयी मागे तेंडुलकरांनी (बहुधा) एक मुद्दा मांडला होता.. त्यांनी मांडला असो नसो..मला असं वाटतं.. की अर्जुनाचं म्हणणं फार इन्व्हॅलिड नव्हतं असं म्हणून विचार केला तर..?
त्याचं म्हणणं युद्धाच्या विरोधात जात होतं.. त्याला समोर ज्येष्ठ लोक दिसत होते.. आता त्याने कच खाल्ली तर सगळा बनाबनाया डाव किंवा सीन उलटणार होता…एकूण (पांडवांचं) नुकसान खूप होणार होतं..
सैन्याची हानी आणि युद्धाचे दुष्परिणाम कदाचित टळले असते.. पण वाईट लोकांचा फायदा होण्याची जास्त शक्यता होती..
तेव्हा अशा काँटेक्स्ट मधे केलेला उपदेश आणि त्याचं मन वळवणं यात तत्वज्ञान जास्त की manipulation आणि brainwash जास्त ??
मी संपूर्ण गीतेविषयी म्हणत नाहीये.. प्लीज गैरसमज करून घेऊ नका.. (नाहीतर "तुम्ही गीता नीट पूर्ण वाचली तरी आहे का?" असे अभिप्रायच जास्त येतील..) बाकीच्या गीतेत या युद्धातल्या डायलेमाशी संबंधित नसलेलेही खूप तत्वज्ञान आहे आणि त्याचा आदर आहेच.
सोयीचा उपाय ज्याला म्हणतात तो गळी उतरवणं? .. .. युद्धस्व .. ??!!
जे केलं ते योग्यच होतं.. पण त्याला मुत्सद्देगिरी म्हणणं योग्य..
त्याच्या बदल्यात अर्जुनाची बाजू पूर्ण झाकली गेली हेही खरंच.. त्याच्या बाजूच्या सर्व शक्यता वर आल्याच नाहीत..
३) राजीव साने यांनी त्यांच्या "युगांतर" मधे उल्लेखलेली लोकमान्य टिळकांची शाळेतली कथा आणि त्यावरची टिपणी:
"मी शेंगा खाल्ल्या नाहीत (टरफले सांडली नाहीत.) आणि मी चहाडी करणार नाही" असे बाणेदार उत्तर दिल्याची कथा ऐकून असं नाही वाटत की "टरफले वर्गात सांडून कचरा केला जाऊ नये" या नियमाच्या पालनासाठी / शिस्तीसाठी रेग्युलेशन करणारी शाळा (मास्तर) नावाची यंत्रणा कार्यरत असताना त्यांना मदत करणे सोडून इथे नुसताच बाणेदारपणा किंवा सत्यकथनच दाखवले गेले? कोणी टरफले सांडली हे माहीत असेल तर मास्तरांना दाखवून द्यायला नको?
या जागी म. गांधी असते तर "मी माझ्या वर्गमित्रांचे घाण न करण्याबद्दल किंवा सत्य बोलण्याबद्दल मतपरिवर्तन करु शकलो नाही म्हणून जणू मीच तो कचरा केला असे समजून आपल्या हातावर छड्या घेतल्या असत्या असे विचाराअंती वाटते.
वैचारिक गोंधळ असल्याची शंका येणार्या अजून काही अशा कथा आठवतात का? अशा कथा नवीन रेफरन्समधेही तयार होत असू शकतील की ज्या पुढच्या पिढ्यांना "इतिहासातल्या" म्हणून सांगितल्या जातील.
प्रतिक्रिया
आजून एक घ्या..
एकत्र का ठेवले असेल असा विचार
एक आख्याईका ऐकलि
पण वाईट लोकांचा फायदा
महाभारताबद्दल चर्चा करताना
विश्वनाथ मेहेंदळे
इतर काही लिहिण्यापूर्वी, मी
द्रौपदीने पांडवांशी लग्न
वस्त्रहरणापेक्षा द्युतात पणाला लावणे
एक प्रश्न माझा पण...
अशी लग्ने सर्रास होत नसत, हा
तात्पर्य .. कथा .. वगैरे
मला वाटते की या कथा म्हणजे..
महाभारतातली नाही, पण वाचुन
प्रयत्ने वाळुचे कण रगडीता
युयुत्सु धन्य्वाद ज्ञानात फर
अवश्य!
चला धर्म, संस्कृंती आणी
अगदी अगदी. अर्थात धाग्याचे
+१
हेहे..
पुनर्वाचन आणि पुनर्विचार यानंतर
'मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड
इरावती कर्वे ह्यान्च्या युगान्त
अमिता ताई युगांत च्या दुव्या
टरफले
१) द्रौपदी वस्त्रहरणाच्या
ग.वी. साहेब
लॉक किया जाये?
मला भोपळ्यातल्या म्हतारीची ती
होय तीने त्यांचे भक्ष बनायला हवे होते म्हणजे ते प्राणी
इतके टोकाचे मला अपेक्षित
:-)
:)
संकटकाळी प्रसंगावधान राखून
"चर्चासत्रात चेंगरलेली
जरुर वाचेन, आभारी आहे.
तात्पर्य
मी शेंगा खाल्ल्या नाहीत (आणि
agreed..न केलेल्या
मी शेंगा खाल्ल्या नाहीत
http://balsanskar.com/marathi
तुमचा मुद्दा (ज्याची चूक
लहानपणी पाठ्यपुस्तकात वगैरे
हे बाकी भारी होतं!!!!!!
हा हा! तुम्ही ती
गवि, तुमचा गीतेबद्दलचा शेवटचा
फर्मास
??
महाभारतातील सर्वात इनोदी कथा
Pagination