गाभा:
मी सध्या लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टम वर काम करू इच्छित आहे. त्या संदर्भात माझे ज्ञान शून्य आहे. त्या संदर्भातील शिक्षण मला ठाणे किंवा डोंबिवली मध्ये कोठे मिळू शकते? आणि साधारण त्यात खर्च , वेळ किती लागेल व कोणता नवा कोर्स आला आहे याची माहिती हवी आहे.
आपला चिपळूणकर.
प्रतिक्रिया
11 Jan 2011 - 3:28 pm | टारझन
यावर फक्त गगनबिहारींसारखे जाणकारंच प्रकाश टाकु शकतील.
तुम्ही त्यांना खरड करा , आणि हा फालतु धागा उडवा :)
- चिप्ळ्याधर
11 Jan 2011 - 4:10 pm | गवि
खरड टाकायला हरकत नाही. स्वागत आहेच.
पण आमची जाणकारी लिनक्स वगैरेमधे नाही.
धागा उडवण्याबद्दल टारझनभौंचे ऐकण्यास आमची हरकत नाही.
पण तरी सांगतो .. आम्हाला खात्री आहे की या विषयावर मदत करणारे अनेक मित्र इथे मिपावर मिळतील.
(बादवे. काढतो माहिती कुठूनतरी आणि मिळाली की व्यनि करतो..)
-नेस्ले बारवन
11 Jan 2011 - 4:11 pm | टारझन
बुच लावले आहे :)
- घट्बुचनलावी
11 Jan 2011 - 4:13 pm | गवि
वस्ताद आहात हो भाऊ..
:)
11 Jan 2011 - 3:32 pm | स्पा
यावर फक्त गगनबिहारींसारखे जाणकारंच प्रकाश टाकु शकतील.
--चीप्ळून्विहारी
11 Jan 2011 - 3:33 pm | परिकथेतील राजकुमार
अरे वा ! तुमच्याकडे संगणक आहे ?
चान चान.
मलापण मदत हवी आहे.
मी सध्या तकिला या अल्कोहोल सिस्टम वर काम करू इच्छित आहे. त्या संदर्भात माझे ज्ञान शून्य आहे. त्या संदर्भातील शिक्षण मला पुणे किंवा पिंपरी मध्ये कोठे मिळू शकते? आणि साधारण त्यात खर्च , वेळ किती लागेल व कोणता नवा कोर्स आला आहे याची माहिती हवी आहे.
आपला घसरूनपड.
11 Jan 2011 - 4:15 pm | यकु
खपलो!!!! आवरा!!!!
=)) =)) =))
11 Jan 2011 - 4:27 pm | विजुभाऊ
तकिला या सिस्तम चे जुने जाणिते धमाल म्हाराज तुम्हाला याबाबतीत सर्वतोपरी मदत करु शकतील त्यांचा अनुभव आणि ज्ञान या बाबतीक अथांग आहे. ते तुम्हाला भवसागर पार करवतील
11 Jan 2011 - 4:10 pm | नीलकांत
नमस्कार,
लिनक्स ही अतिशय चांगली , आणि सुरक्षीत अशी OS आहे. लिनक्स ही OS मोफत उपलब्ध आहे. लिनक्स मध्ये सर्वात पहिला गोंधळ उडतो तो कुठले वापरावे याचा.तर यावर उत्तर असे आहे की आपल्या कामाच्या स्वरूपावर आपली लिनक्स आवत्ती निवडावी. नेटवर्क आणि संगणक विषयात तज्ञ लोक फेडोरा वापरतात. तर घरगुती वापरासाठी उबंटू ही सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
लिनक्स वापरायला सुरूवात करायला ती इन्टॉलच केली पाहिजे असे काही नाही. फेडोरा किंवा उबंटू च्या डिव्हीडी वरून तुम्ही तुमचा संगणक सुरू करून (boot from DVD) तुम्ही उबंटू किंवा फेडोरा वापरू शकाल.
लिनक्स इन्टॉलेशन ही थोडी अवघड वाटणारी प्रक्रिया आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाहीये. येथे रूट, बुट, स्वॅप, होम आदी पार्टीशन लक्षात आले की मग ते सोपं होतं.
लिनक्स वापरायला सोपे आहे. इन्टरनेट असेल तर मग लिनक्ससारखं सोईचं जग नाही. मात्र नेट नसेल तर खूप अडचणी येतात. त्यावर मात करतांना कधी कधी चिडचिड होते. याला कारण आपल्याला विन्डोजची सवय असते आणि सर्व गोष्टी लिनक्स मध्ये सुध्दा अगदी विन्डोज सारख्या व्हाव्यात अशी आपली अपेक्षा असते.
तुम्ही लिनक्स वापरायला सुरूवात तर करा. काही अडचण आल्यास खालील संकेतस्थळांवर शोधा आणि येथे सुध्दा विचारू शकता.
लिनक्स विषयी सर्वकाही
लिनक्सच्या वेगवेगळ्या आवृत्या
फेडोरा लिनक्सचे संकेतस्थळ
फेडोराचे फोरम
उबंटू लिनक्सचे संकेतस्थळ
उबंटू फोरम
- नीलकांत
11 Jan 2011 - 5:48 pm | योगी९००
+१.
निलकांत तुमचे आभार..
काही शंका मुळधाग्याकर्त्यास..
मी सध्या लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टम वर काम करू इच्छित आहे. असे तुम्ही म्हणले आहे. त्यामध्ये तुम्हाला नक्की काय शिकायचे आहे ? कारण लिनक्स प्रणाली मध्ये system administration किंवा embedded or other development purpose किंवा normal desktop use असे बरेच काही करता येते. त्यामध्ये नक्की कशात तुम्हाला interest आहे?
मी सध्या Ubuntu linux संगणकावर वापरतो. तसेच Nokia N900 वापरतो. पण माझे क्षेत्र embedded system मध्ये आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला मदत करू शकेन.
12 Jan 2011 - 10:07 am | Pain
तुमच्य प्रतिसादातील फक्त शेवटून दुसरी लिंक उघडते. बाकीच्या लिंक्स पुन्हा दुरुस्त करून देता का ?
11 Jan 2011 - 6:32 pm | आदिजोशी
विंडोजशी तुलना करता लिनक्स वापरण्याचे फायदे काय आहेत?
(विंडोज इतक्या सहजपणे व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही ह्या व्यतिरीक्त.)
11 Jan 2011 - 6:35 pm | नरेशकुमार
काही मला माहीत आहे,
ते फुकट मिळते,
सारखे सारखे क्रॅश होत नाही.
12 Jan 2011 - 9:41 am | चिप्लुन्कर
नीलकांत आणि खादाड भाऊ आपण या विषयी खरडीतून बोलू
धागा कसा उडवावा .
मला शक्य नसल्यास कृपया संपादक मंडळास विनंती कि हा धागा उडवावा.
12 Jan 2011 - 10:03 am | वेताळ
कसे वापरु?
म्हणजे पार्टिशन करताना लिनॅक्स सेटअप होतो पण विन्डोज टाकताना गडबड होते.ह्याबद्दल पार्टिशन मॅजिक किंवा इतर पार्टिशन प्रणाली काम करत नाहीत. ह्याबद्दल कुणी मार्गदर्शन करेल काय?
12 Jan 2011 - 11:19 am | नन्दादीप
पार्टिशन टाकून दोन सिस्टम एका वेळी वापरता येतील......पण लिनक्स्/उबंटू "विंडोज" च्या सिस्टम फाईल्स उडवताअ..(मराठीत : करप्ट करतात) ....मग विंडोज ला प्रॉब्लेम येतो.....शक्यतो टाळता येईल तेवढे टाळावे....
अवांतर : "उबंटू" ची सॉफ्टवेअर सी.डी. फुकट मिळते ती ही वर्जीनळ....त्यांच्या वेब साईट वर एक फॉर्म भरावा लागतो..
12 Jan 2011 - 1:00 pm | चैतन्यकुलकर्णी
मी गेल्या एक वर्षापासून मुख्य संगणक प्रणाली म्हणून लिनक्स वापरत आहे. विंडोज बरोबरच लिनक्स वापरायची असेल तर, विंडोज आधी इन्स्टॉल करावी लागते. कारण जर लिनक्स नंतर विंडोज इन्स्टॉल केले तर विंडोज एमबीआर/पार्टिशन टेबल स्वतःच्या सोयीनुसार बदलते व आधीच्या सर्व एन्ट्री रद्द करते. त्यासाठी बूट लोडर पुन्हा इन्स्टॉल करावा लागतो किंवा दुरूस्त करावा लागतो.
पण लिनक्स वापरण्यासाठी सुरक्षित आहे. पण डेस्कटॉप विंडोज इतका वापरणार्यास सोयीचा नाही, पण बरेचसे आवश्यक (काही नवीनदेखील जे विंडोज मध्ये उपलब्ध नाहीत) फिचर्स त्यात समाविष्ट केलेले आहेत.
12 Jan 2011 - 1:52 pm | योगी९००
चैतन्य यांचे म्हणणे बरोबर..
मी असेच करतो. आधी विंडोज आणि नंतर लिनक्स..
12 Jan 2011 - 5:24 pm | स्वानन्द
सहमत
12 Jan 2011 - 11:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत.
नवीनतम उबुंटू/कुबुंटू वापरून पहा एकदा! माझ्या ४ वर्ष जुन्या आणि नवर्याच्या पाऊण वर्ष जुन्या लॅपटॉपवर अनुक्रमे कुबुंटू आणि उबुंटू अगदी आउट-ऑफ-द-बॉक्स चालत आहेत. कुबुंटू किंवा केडीईचा लुकसुद्धा बराचसा विण्डोजसारखा आहे. लॅपटॉप्समधे असलेलं हार्डवेअर, स्पेशल बटणंही काहीही कष्ट न घेता चालली; बाहेरून जोडलेला वेबकॅमही जसा विण्डोजमधे प्लग-अँड-प्ले आहे त्याप्रमाणे चालतो.
मी गेली सहा वर्ष लिनक्स वापरते आहे, विण्डोजचा वापर मायक्रोसॉफ्टचे काही गेम्स खेळण्यापुरताच मर्यादित आहे.
आधी लिनक्स नंतर विण्डोज इन्स्टॉल करण्यात एकच प्रॉब्लेम आधी दिलेला आहे तसाच, बूट पार्टीशनमधे विण्डोज फार दादागिरी करतं. अन्यथा काहीच प्रॉब्लेम नाही.
लिनक्स वापरण्यातला फायदा: फुकट आहे. चुकूनही तुम्ही चोरी केल्याचा आरोप लिनक्स वापरल्यामुळे येऊ शकत नाही. विण्डोज एकतर विकत घ्यावं लागतं नाहीतर चोरून वापरावं लागतं.
लिनक्सवर न चालणारी काही सॉफ्टवेअर्स वापरायची असतील तर गोष्ट वेगळी नाहीतर उबुंटू/कुबुंटू/झुबुंटू असताना विण्डोज का वापरावं?
नीलकांतने आधीच प्राथमिक पातळीवरची सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहेच.
12 Jan 2011 - 8:51 pm | लॉरी टांगटूंगकर
फुकट असण्या व्यतीरिक्त काहीही फायदे नाहीत.यां भिकार ओ एस मधून मला एक mp३ पण प्ले नाही करता आली . Install Uninstall जमले ,uninstall करताना grub lodder असा काहीतरी प्रकार डोके पकवतो .broadband पण नाही सेट करता आले .पार्टिशन मध्ये ८० जी.बी. फुकट घालवले होते
13 Jan 2011 - 9:39 am | satish kulkarni
windows Xp वर vmware वापरुन उबुन्टु install करा.
आणि एकदा सराव झाल्यावर विन्डोझ काढुन टाका,
अधिक माहिति साठि गुगला.
http://www.wikihow.com/Run-Multiple-Operating-Systems-Concurrently-Using...
सतिश
13 Jan 2011 - 2:37 pm | नाटक्या
VMWare इन्स्टॉल करा आणि Windows & Linux दोन्ही एकाच वेळेस वापरा. मी ऑफिस मध्ये वापरतो, घरी बरेच संगणक असल्याने हा प्रकार करावासा वाटला नाही. लिनक्स उत्तम आणि व्हायरसची लागण होण्याचा धोका जवळजवळ नाही. मी गेली १५ वर्षे लिनक्स/युनिक्स वापरतो आहे आणि गेली २० वर्षे Embedded Systems/Operating Systems मध्ये काम करतो आहे.
खादाडमाऊंनी वर म्हटल्या प्रमाणे लिनक्स मध्ये तुम्हाला नक्की काय शिकायचे आहे ? कारण लिनक्स प्रणाली मध्ये system administration किंवा embedded or other development purpose किंवा normal desktop use असे बरेच काही करता येते. त्यामध्ये नक्की कशात तुम्हाला interest आहे?
13 Jan 2011 - 2:39 pm | टारझन
त्यांचा इंटरेस्ट बहुदा जालसमुद्रात मासे पकडण्यात असावा. बरेच मासे घावलेत तसे चिप्लुन्करांना ;)
- टारु कोली
15 Jan 2011 - 7:18 am | नीलकांत
नमस्कार,
मला सुध्दा नवीन उबंटू टाकल्यावर mp3 किंवा अन्य व्यवसाईक मालकी असलेले codac चालत नाहीत. याबाबत वैताग वाटला होता.
मग त्याचा शोध घेतला असता असे लक्षात आले की ह्या लिनक्सच्या आवृत्ती ह्या लोकसहभागातून बनतात आणि त्या ज्या तत्वावर तयार केल्या जातात त्यात हा मालकी हक्काच्या कोडॅक देता येत नाहीत. यावर पहीला उपाय म्हणजे ते कोडॅक टाकून घेणे. एक कमांड उबंटू रिस्ट्रीक्टेड एक्स्ट्रा इन्टॉल करून देते आणि मग सर्व कोडॅक चालतात. अमेरिकेतील आवृत्तीमध्ये असे कोडॅक देता येत नाहीत मात्र बहुदा मॅन्ड्रीवा लिनक्स मध्ये ते आहेत.
यावर मला आवडलेला सर्वात चांगला उपाय म्हणजे सरळ उबंटूवर आधारीत मिन्ट लिनक्स ही आवृत्ती वापरणे. मिन्ट मध्ये सर्व काही तयार आहे. बस इसको लगा डाला तो लाईफ झिंगा लाला :)
असो, पुन्हा सांगतो लिनक्स हे लोकांनी लोकांसाठी बनवलेले आहे. त्यामुळे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बस शोधावे लागतात. तुम्हाला आलेल्या अडचणी आधीच इतरांना आलेल्या असतात. त्यामुळे शोधल्यास सर्वच सापडते. मी तरी असाच शिकतोय.
- नीलकांत