८ ते १० कचोरी साठी
साहित्य :
१. हिरवी तुरीची दाणे २ वाट्या
२. हिरवी मिर्ची ३ ते ४
३. जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार)
४. तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार)
५. मैदा २५० ग्राम
६. खाण्याचा सोडा चिमुट्भर
७. तिळ १ टिस्पुन
८. तेल तळण्याकरीता
कृती :
१. हिरवी तुरीची दाणे व हिरवी मिर्ची मिक्सर मधुन बारीक करुन घ्यावीत.
२. त्यामधे तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार) व जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार) घालुन मिक्स करा.
३. मैद्यात मिठ,चिमुट्भर खाण्याचा सोडा ,तिळ, २ टिस्पुन गरम तेल घालुन मळावे.
४. मैद्याचे छोटे गोळे करुन पुरीसारखे लाटुन घ्यावे.
५. त्या पुरीवर वरील मिश्रण पुरणपोळी प्रमाणे भरुण गोळे करावे व हलक्या हातानी त्याला पुरीसारखा आकार द्यावा.
६. कढईत तेल गरम करुन डिप फ्राय करावे.
७. गरमागरम चटणी, सौस, दहि सोबत सर्व्ह करावित.
फोटो :
प्रतिक्रिया
10 Jan 2011 - 5:11 pm | स्पा
तुरीची कचोरी कि क्यामेरा....?
10 Jan 2011 - 5:16 pm | पर्नल नेने मराठे
स्पा....तुझ्याकडुन असल्या .अचरटणाची. अपेक्शा नव्हती. नविन सदस्याना मार्गदर्शन करायचे सोडुन त्याचे लेग्ज कसले पुल करतोस.
10 Jan 2011 - 5:20 pm | गणपा
हॅ हॅ हॅ सध्या तो पास होऊन वरच्या वर्गात गेलाय. त्याच्या वर झालेल्या रॅगिंगचं उट्ट काढत असेल.
फोटो चढवण्यासाठी याचा काही उपयोग झाला तर पहा.
http://www.misalpav.com/node/13573
10 Jan 2011 - 5:46 pm | अवलिया
>>>नविन सदस्याना मार्गदर्शन करायचे सोडुन त्याचे लेग्ज कसले पुल करतोस.
आंग्लाळलेले मराठी पाहून वाईट वाटले.
10 Jan 2011 - 8:10 pm | कवितानागेश
हे सेन्टेन्स डिफेरंट्ली कोट करायचं,
तुझ्याकडून धिस टाईप ऑफ आचरटपणाची एक्सपेक्टेशन नव्हती.
न्यू मेंबर्सना गाईड करायचे स्किप करून त्यांचे लेग्ज कसले पुल करतोस.
-(इंग्लिश) ट्यूट्यू
10 Jan 2011 - 8:18 pm | प्राजु
माउ,
नॉट फेअर हं!! एव्हरी टाईम.. असं नाही टीज करायचं चुचु ला. :)
10 Jan 2011 - 8:38 pm | गणपा
हॅ हॅ हॅ तुझ्या कचोर्या आणि साँदेश झाले का ग करुन?
11 Jan 2011 - 9:08 am | स्पा
चुचू तै
11 Jan 2011 - 9:18 am | रुपाली प्रा॑जळे
11 Jan 2011 - 12:09 pm | पर्नल नेने मराठे
अगो बै सार्खे कल्से केम्रेर्चे फोतो तक्तेस
14 Jan 2011 - 8:19 pm | वेताळ
क्र्म्रा काय खायची गोस्ताअहे काय?
अच्तच आहे.
14 Jan 2011 - 8:00 pm | चिगो
फोटो बरोबर टाका हो...
बाकी ह्या कचोर्या म्हणजे आमच्या "जिव्हा"ळ्याचा विषय आहे..