मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी

रुपाली प्रा॑जळे · · पाककृती
८ ते १० कचोरी साठी साहित्य : १. हिरवी तुरीची दाणे २ वाट्या २. हिरवी मिर्ची ३ ते ४ ३. जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार) ४. तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार) ५. मैदा २५० ग्राम ६. खाण्याचा सोडा चिमुट्भर ७. तिळ १ टिस्पुन ८. तेल तळण्याकरीता कृती : १. हिरवी तुरीची दाणे व हिरवी मिर्ची मिक्सर मधुन बारीक करुन घ्यावीत. २. त्यामधे तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार) व जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार) घालुन मिक्स करा. ३. मैद्यात मिठ,चिमुट्भर खाण्याचा सोडा ,तिळ, २ टिस्पुन गरम तेल घालुन मळावे. ४. मैद्याचे छोटे गोळे करुन पुरीसारखे लाटुन घ्यावे. ५. त्या पुरीवर वरील मिश्रण पुरणपोळी प्रमाणे भरुण गोळे करावे व हलक्या हातानी त्याला पुरीसारखा आकार द्यावा. ६. कढईत तेल गरम करुन डिप फ्राय करावे. ७. गरमागरम चटणी, सौस, दहि सोबत सर्व्ह करावित. फोटो : Image removed.

वाचन 4357 प्रतिक्रिया 0