(...देहात माझ्या ! )

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
11 Oct 2007 - 7:36 pm

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता...देहात माझ्या !

...देहात माझ्या !

लालसर हे फोड काही उपटले देहात माझ्या !
खाजण्याचे एक वादळ उसळले देहात माझ्या...!

नजर मजला लागली ही सांग रे आता कुणाची...
केवढ्या वेगात झाली वाढ देही पुटकुळ्यांची !
कांजिणे खाजाळलेले उगवले देहात माझ्या...!

फोड झाले एवढे की लपवण्या उरले न काही...
पाठ नाही राहिली अन् सोडले तोंडास नाही...
हे असे फोडत्व सारे पसरले देहात माझ्या !

प्रार्थनेने थांबलेना,ना दाद देई औषधाला...
खाजवूनी लाल केले मी अता साऱ्या तनाला
वेदनेचे कैक सागर उसळले देहात माझ्या !

गार कपड्याची घडी तू लावली हळुवार जेव्हा
कळ सुखाची गारशी रे लहरली गात्रात तेव्हा
स्पर्श सारे गार आता उतरले देहात माझ्या...!

- केशवसुमार

रचनाकाल ः ११ ऑक्टोबर २००७

विडंबन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

11 Oct 2007 - 9:14 pm | लिखाळ

जबरा... चांदण्याचे कांजिणे फार जोरात.
--लिखाळ.
तो क वी डा ल डा वि क तो
(. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

सर्किट's picture

11 Oct 2007 - 10:39 pm | सर्किट (not verified)

फोड झाले एवढे की लपवण्या उरले न काही...
पाठ नाही राहिली अन् सोडले तोंडास नाही...
हे असे फोडत्व सारे पसरले देहात माझ्या !

फोडत्व ! काय सुंदर शब्द !!

वा !

- सर्किट

विसोबा खेचर's picture

13 Oct 2007 - 7:47 am | विसोबा खेचर

गार कपड्याची घडी तू लावली हळुवार जेव्हा
कळ सुखाची गारशी रे लहरली गात्रात तेव्हा
स्पर्श सारे गार आता उतरले देहात माझ्या...!

वा केशवा, सुंदर विडंबन केले आहेस. 'फोडत्व' हा शब्द लय भारी....

कांजिणे खाजाळलेले उगवले देहात माझ्या...!

ही ओळ तर खासच!...

असो,

थांबविण्या खाज सुटलेली देहास सार्‍या
लाव तू अता सपट लोशन देहास सार्‍या! :)

तात्या.

धोंडोपंत's picture

14 Oct 2007 - 2:30 pm | धोंडोपंत

वा वा वा वा वा,

केशवा,

फार सुंदर विडंबन झाले आहे रे. हल्ली तुला कच्चा मालही चांगला मिळायला लागलाय.

आपला,
(चाहता) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवा तू इथेही गुल खिलवतो आहेस तर! शाब्बास!!

मूळ कविताही मी वाचलेली नव्हती. मात्र तुझे फोडत्व आकर्षून गेले.