पापलेट फ्राय,पापलेट करी आणि फ्राय प्रॉन
समस्त मिपाकर मायबाप,
लेखनाचा पहिलाच प्रयास आहे,कृपया सांभाळून घेणे.
साहित्य:
१. स्वछ तुकडे पापलेटाचे हवे असतील तितके.
२. लसूण आवडीनुसार.
३. आले आवडीनुसार.
४. लाल तीखट आवडीनुसार.
५. हळद चीमुटभर.
६. लिंबू.
७. गरम मसाला आवडीनुसार.
८. पिठ तांदळाचे लागेल तेवढे
९. तेल तळन्या पुरते.
१०.मीठ चवीप्रामाणे.
कृती:
प्रथम मासा धुऊन घेणे. मग त्याला साहित्यातिल सगळे(तांदळाचे पिठ सोडुन) ईतर सगळे चोळून ठेवणे १०-१५ मीनिटस.
मग तांदळाचे पिठ एका ताटात घ्या आणि त्यात पीसेस घोळवून तव्यात तळुन घेणे.
फीश करी.
साहित्य:
१. नारळ १/२
२. लसुण ३-४ पाकळी.
३. आले थोडेसे.
४. चिंच थोडीशी.
५. गरम मसाला.
६. लाल तीखट
७. मीठ चवीप्रामाणे.
कृती:
प्रथम नारळ,आले,लसुण व गरम पाण्यात भीजवलेली चिंच,थोडेसे पाणी घालुन,मिक्सर मधुन वाटून घेणे.
कढई मध्ये थोडेसे तेल घालुन मग त्यात वरील वाटलेला मासाला, चवी नुसार मीठ,तीखट,गरम मसाला व हळद घालुन छान उकळी आल्यावर त्यात मासे हलकेच सोडावे.२-३ मि शिजवावे.
मासे जास्ती वेळ शिजवू नयेत.
फ्राय प्रॉन
साहित्य:
फिश फ्राय प्रमाणे फक्त चाट मसाला चवीनुसार.
कृती:
प्रॉन साफ करुन घेणे. मग सगळा मसाला लावुन वरुन तांदळाचे पिठ भुरभुरावे आणी तव्यावर १-२ मि तळावे. जास्ती वेळ तळल्यास रबरी लागते.
आता गरम गरम भाता बरोबर ताव मारणे.
फोटो आहेत पण दिसत नाहीत काय करावे?
:)
प्रतिक्रिया
9 Jan 2011 - 12:50 pm | अवलिया
फटू?
आम्ही पाककृती कशी आहे हे फक्त फटु पाहुनच ठरवतो.
9 Jan 2011 - 12:50 pm | दीविरा
फ्लिकर व पिकासा वर फोटो अपलोड झाले पण ईथे दिसत नाहीत :(
9 Jan 2011 - 1:05 pm | दीविरा
"
9 Jan 2011 - 1:06 pm | दीविरा
"
9 Jan 2011 - 1:07 pm | दीविरा
"
9 Jan 2011 - 1:09 pm | दीविरा
"
27 Feb 2011 - 7:48 pm | दीविरा
"
9 Jan 2011 - 1:10 pm | दीविरा
"
9 Jan 2011 - 1:11 pm | दीविरा
"
9 Jan 2011 - 1:13 pm | नंदन
जेवण झालेलं असूनही फोटो पाहून परत भूक लागली :). दुसरा, तिसरा आणि शेवटचा तर ख ल्ला स!
9 Jan 2011 - 1:32 pm | Nile
सहमत. जवळपास राहता का हो तुम्ही?
10 Jan 2011 - 3:23 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
9 Jan 2011 - 1:13 pm | दीविरा
"
9 Jan 2011 - 3:22 pm | विंजिनेर
अरे वा! छान!
अवांतरः तुम्ही पिढीजात श्रीमंत दिसता आहात - पानात २-२ प्रकारचे कांदे दिसता आहेत :)
9 Jan 2011 - 3:26 pm | यशोधरा
>> पानात २-२ प्रकारचे कांदे दिसता आहेत >> =))
छान फोटो.
9 Jan 2011 - 5:25 pm | गणपा
पानासमोर बसण्याचा मोह अनावर होतोय :)
9 Jan 2011 - 1:17 pm | अवलिया
मेलो ! मेलो ! ठार मेलो !!
9 Jan 2011 - 6:50 pm | श्रावण मोडक
बरं होतं आधी फटू नव्हते ते. उगा आग्रह करून फटू मागवून घेतले, स्वतः मेला, दुसऱ्यांचीही पंचाईत करून टाकली. ;)
9 Jan 2011 - 3:40 pm | सहज
पहील्यावहील्या लेखाबद्दल व उच्च फोटोंबद्दल अभिनंदन!
बल्लवाचार्य श्री गणपा यांचा हा लेख - 'मदत -मिपावर फोटो चिकटवणे' आपल्याला उपयुक्त होईल.
अजुन पाकृ येउ द्यात!
9 Jan 2011 - 5:05 pm | दीविरा
अहो ते कांदे शेजार्याकडून फोटोपुरते उसने आणले होते, त्यांनी कार घेतली तर ४ कांदे फुकट मिळाले ;)
10 Jan 2011 - 5:35 am | रेवती
त्यांनी कार घेतली तर ४ कांदे
आजकाल आनंदाच्या प्रसंगी पेढ्यांच्या ऐवजी कांदे देण्याची प्रथा आवडली.;)
जुनी प्रथा मोडल्याचे श्रेय मिळाले ते वेगळेच!;)
9 Jan 2011 - 5:15 pm | चिंतामणी
फटु विषेतः केळीच्या पानावर वाढलेले पदार्थ बघुन भूकेचा डोंब उसळला आहे.
आता आज मासे खाल्ल्या शिवाय समाधान नाही होणार.
बाय दे वे. कुठे राहता हो? जरा पत्ता कळवा.
:-O
9 Jan 2011 - 5:55 pm | सुनील
जीवघेणे!!
9 Jan 2011 - 6:25 pm | प्रियाली
सकाळी सकाळी उठल्यावर हे असे काहीतरी. :(
9 Jan 2011 - 10:05 pm | रेवती
फोटो छानच आलेत.
9 Jan 2011 - 10:13 pm | दीविरा
मनापासून धन्यवाद !!!
:) :)
10 Jan 2011 - 2:11 am | चिंतामणी
कोरडे धन्यवाद काय देता.
निदान सगळ्या प्रतिक्रीया बघुन लोकभावनेचा आदर करा हो.
10 Jan 2011 - 2:07 am | प्राजु
जबरदस्त!!! मस्त फोटो.
10 Jan 2011 - 3:19 am | स्वाती२
आई ग! कसले जीवघेणे फोटो आहेत!
10 Jan 2011 - 10:29 am | स्वैर परी
प्रॉन्झ फ्राय - कातिल!
पापलेट फ्राय - जीवघेणे!
कधी बोलावत आहात जेवायला? :)
10 Jan 2011 - 10:36 am | गवि
खल्लास..
ए - वन...
10 Jan 2011 - 10:40 am | खादाड अमिता
बेस्ट! अजून अश्याच पाक्रु येऊ द्यात!!
10 Jan 2011 - 1:32 pm | विजुभाऊ
ह्या..... हे जीवघेणे फोटो बघायचे आणि नन्त॑र दाळभात खायचा.... असह्य होतय...... असह्य होतय
10 Jan 2011 - 1:32 pm | विजुभाऊ
ह्या..... हे जीवघेणे फोटो बघायचे आणि नन्त॑र दाळभात खायचा.... असह्य होतय...... असह्य होतय
10 Jan 2011 - 1:47 pm | गणपा
नानाचं मशिन उसन मागुन आणलत कि काय विजुभौ ;)
10 Jan 2011 - 3:17 pm | अवलिया
इनो घ्या !
10 Jan 2011 - 1:49 pm | वेताळ
..............
10 Jan 2011 - 3:27 pm | जागु
जबराट.
10 Jan 2011 - 6:18 pm | विसोबा खेचर
......!!!!!!!!
12 Jan 2011 - 8:19 pm | श्रीराम गावडे
तुकड्या पुरतिल पण एवढासा भात कसा पुरणार? मला काळजि लागुन राहिलिय.
13 Jan 2011 - 2:32 am | मितान
मस्त फोटो !!!!
13 Jan 2011 - 11:23 am | शिल्पा ब
वाह!!! मस्त... अजुन काय बोलु?
13 Jan 2011 - 11:35 am | sneharani
मस्त फोटो!