पापलेट फ्राय,पापलेट करी आणि फ्राय प्रॉन
पापलेट फ्राय,पापलेट करी आणि फ्राय प्रॉन
समस्त मिपाकर मायबाप,
लेखनाचा पहिलाच प्रयास आहे,कृपया सांभाळून घेणे.
साहित्य:
१. स्वछ तुकडे पापलेटाचे हवे असतील तितके.
२. लसूण आवडीनुसार.
३. आले आवडीनुसार.
४. लाल तीखट आवडीनुसार.
५. हळद चीमुटभर.
६. लिंबू.
७. गरम मसाला आवडीनुसार.
८. पिठ तांदळाचे लागेल तेवढे
९. तेल तळन्या पुरते.
१०.मीठ चवीप्रामाणे.
कृती:
प्रथम मासा धुऊन घेणे. मग त्याला साहित्यातिल सगळे(तांदळाचे पिठ सोडुन) ईतर सगळे चोळून ठेवणे १०-१५ मीनिटस.
मग तांदळाचे पिठ एका ताटात घ्या आणि त्यात पीसेस घोळवून तव्यात तळुन घेणे.
फीश करी.
साहित्य:
१. नारळ १/२
२. लसुण ३-४ पाकळी.
३. आले थोडेसे.
४. चिंच थोडीशी.
५. गरम मसाला.
६. लाल तीखट
७. मीठ चवीप्रामाणे.
कृती:
प्रथम नारळ,आले,लसुण व गरम पाण्यात भीजवलेली चिंच,थोडेसे पाणी घालुन,मिक्सर मधुन वाटून घेणे.
कढई मध्ये थोडेसे तेल घालुन मग त्यात वरील वाटलेला मासाला, चवी नुसार मीठ,तीखट,गरम मसाला व हळद घालुन छान उकळी आल्यावर त्यात मासे हलकेच सोडावे.२-३ मि शिजवावे.
मासे जास्ती वेळ शिजवू नयेत.
फ्राय प्रॉन
साहित्य:
फिश फ्राय प्रमाणे फक्त चाट मसाला चवीनुसार.
कृती:
प्रॉन साफ करुन घेणे. मग सगळा मसाला लावुन वरुन तांदळाचे पिठ भुरभुरावे आणी तव्यावर १-२ मि तळावे. जास्ती वेळ तळल्यास रबरी लागते.
आता गरम गरम भाता बरोबर ताव मारणे.
फोटो आहेत पण दिसत नाहीत काय करावे?
:)
वाचन
10584
प्रतिक्रिया
43