आई ची स्पेशल- भेंडी ची भाजी

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in पाककृती
5 Jan 2011 - 11:36 am

हि भेंडी ची भाजी म्हणजे आमच्या आई ची 'स्पेशल' कॅटेगरी मधला पदार्थ. नेहमी ची भेंडी ची भाजी म्हणजे नुसतीच भेंडी परतून केलेली, स्पेशल भाजी म्हणजे - कांदा, टोमाटो, आलं आणि लांबट चिरलेली भेंडी. हि भाजी आईच्या खूप खूप मागे लागून मिळायची. आमची आई म्हणजे (अजून पण) केक, लाडू, बटाट्या चा कीस, साबुदाण्याचा चिवडा, करंजी इत्यादी पदार्थ आम्ही खूप हट्ट केला कि मगच करायची. आणि ते आम्ही म्हणायचो तेव्हा हमखास न करता अचानक कधी तरी करून आम्हाला सरप्राईज करायची. इथे भूतकाळ वापरण्या मागचे कारण हे कि आता ते सगळे पदार्थ आम्ही स्वताच आमच्या लहरी प्रमाणे करतो. :) पण तरी - आईच्या हातची भेंडी ची भाजी म्हणजे 'वाह! बढीया'.

सामग्री:
भेंडी- २५० ग्राम, लांबट चिरलेली
टोमाटो- ३, लांबट चिरलेला
कांदा- ३, लांबट चिरलेला
१ इंच आलं- लांबट चिरलेलं
१/२ चमचा- मोहरी
१ मोठा चमचा तेल
१/२ चमचा- साखर
लाल तिखट आणि मीठ चवीनुसार

कृती:
- एका नोन स्टिक कढईत तेल गरम करून, त्यात मोहरी आणि हळद घालून फोडणी करावी. मग त्यात आलं आणि कांदा चांगला गुलाबी होई पर्यंत परतावा.
- आता त्यात टोमाटो घालून परता आणि मग त्यात लाल तिखट आणि मीठ घालून नित मिक्स करा.
- मग भेंडी घालून, नित कालवून त्यावर १/२ मिनिट झाकण ठेवा (झाकण ह्याहून जास्त वेळ ठेवलं तर भाजी ला तार येईल).
- सगळ्यात शेवटी थोडी साखर घालून भेंडी शिजे पर्यंत परत आणि गरम गरम पोळ्या किंवा फुलक्या बरोबर वाढा.

प्रतिक्रिया

पियुशा's picture

5 Jan 2011 - 11:54 am | पियुशा

वोव मस्त ह ! भेन्डी फार आवड्ते यार मला

अमिता फोटो आणि रेसिपी खुपच छान.
सेम भाजी माझ्या वहीनी कडुन मी शिकले.

जिवाणू's picture

5 Jan 2011 - 12:23 pm | जिवाणू

अरे वा नविनच पद्धतिने केली आहे. मस्तच ........!

आजीच्या हातच्या खालील काही रेसिपीज खाल्लेल्या आणि कायम आठवणीत राहिलेल्या आहेत. त्या आता आजीनंतर केल्या जात नाहीत. मिळाल्या तर खूप आनंद होईल.

१) पंचामृत (ते दूध्,तूप्,मध वगैरे पूजेतले नव्हे).. एक तिखट-आंबट-गोड ग्रेव्हीसदृश खोबरे आणि दाणकूटयुक्त चविष्ट पदार्थ असायचा. खोबर्‍याचे कापही यायचे त्यात.
२) वांग्याचे गूळयुक्त भरीत
३) गोळ्यांचे सांबार
४) पातोळे (हळदीचे पान वापरून बहुधा)
५) आमटीतल्या पोळ्या.
६) गवारीच्या शेंगा तळलेल्या (पापड कुर्डयांप्रमाणे कुरकुरीत. किंचित कडसर पण खमंग)

येथील सुगरणी प्लीज यांपैकी काही पुनरुज्जिवीत करतील किंवा जुने दुवे असल्यास देतील अशी आशा.

(भुकेला) गवि.

ज्योति प्रकाश's picture

5 Jan 2011 - 11:59 pm | ज्योति प्रकाश

कमलाबाई ओगले यान्च्या "रुचिरा" भाग १ या पुस्त्कातील पान नम्बर ७९ वर पन्चामृताची पाक़कृती दिलेली आहे.
कृपया पुस्तक खरेदी करा व करुन पहा.

ज्योति प्रकाश's picture

6 Jan 2011 - 12:02 am | ज्योति प्रकाश

दोन्ही पाककृती वेगळ्या देत आहे त्या वाचुन केल्यावर आपली प्रतिक्रिया द्या.

गवि's picture

6 Jan 2011 - 12:13 am | गवि

Sure.... खूप थँक्स ज्योती

ह्या दोन पाक्रु माझ्या कडून डन! मिळ्णार !

गवि's picture

5 Jan 2011 - 3:04 pm | गवि

अत्यंत धन्यु..
म्हणजे अन्य एका धाग्यावर चालू असलेल्या ठेच्याच्या विविध कृती आणि हे भरीत असे कॉम्बिनेशन भाकरीसोबत बहार आणेल.

:)

सखी's picture

6 Jan 2011 - 12:13 am | सखी

प्रभो यांची पंचामृताची खमंग पा.कृ. इथे आहे.
http://misalpav.com/node/9668
गगनविहारी तुमच्या आठवणीमुळे माझ्याकडुनही केली जाईल असा संकल्प करावा म्हणते.

अमिता - भेंडीची भाजी मस्तच!

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jan 2011 - 1:04 pm | परिकथेतील राजकुमार

खल्लास !
मी अगदी अशीच भाजी करतो भेंडीची. तार येती आहे असे वाटले की १ आमसूल टाकुन देतो ;)

लतिका धुमाळे's picture

5 Jan 2011 - 3:23 pm | लतिका धुमाळे

आल्या ऐवजी मी मिरे पूड घालते, आणि तिखट हवे तेव्हढे.
लतिका धुमाळे

वाहीदा's picture

5 Jan 2011 - 7:14 pm | वाहीदा

पाहूनच भूक लागली!

चिकट भेंडी म्हणजे माझी जानी दुश्मन.. पण काय आजकाल ह्याच्याशी पण गळाभेट घ्यायला लागलोय..

- पिंगू

पंगा's picture

6 Jan 2011 - 9:04 am | पंगा

यालाच 'मसाला भेंडी' म्हणतात काय? पण काहीही म्हटले, तरी प्रकार छान होतो, हे निश्चित! म्हणजे निदान आमच्या घरी - आणि विशेष करून मला! - तरी आवडतो बुवा!

("खाण्याची आवडः रोज शिक्रण पाहिजे. कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" - 'दत्तात्रय वासुदेव आचमने' या जुन्या पिढीतल्या बाळबोध काल्पनिक ललितलेखकाच्या नवीन शैलीतल्या आत्मपरिचयातले समारोपाचे वाक्य. 'ललित आत्मपरिचय कसे लिहावे?: एक मार्गदर्शन' या पु.लं.च्या लेखातून साभार. संग्रहः 'अघळपघळ'.)

अवांतरः आमच्या बाजूला - म्हणजे जॉर्जियात, बरे का, आणि एकंदरच आमच्या बाजूच्या 'दाक्षिणात्य संस्कृती'त - ज्यातत्यात डुक्कर घालण्याची प्रथा आहे. म्हणजे महाराष्ट्रात ती चवळीची शाकाहारी उसळ बनवतात ना, अगदी तश्शीच 'ब्लॅक आइड पी'ची उसळ बनवतात, चव घेतलीत तर अगदी 'मराठी' म्हणून खपून जाईल अश्शी! पण मध्येच एखादा लाल कचकचीत तुकडा येतो. डुकराचा तुकडा! (बहुधा बेकन बिट्स.) आम्ही त्याला मराठीत 'चवळीची डुक्कर पेरून उसळ' म्हणतो.

किंवा मग एखादी अगदी मराठी पालेभाजीच्या जवळपास जाणारी पालेभाजी वाढून येते. पण पहावे तर त्यातसुद्धा पुन्हा डुकराचे तुकडे! ज्यातत्यात डुकराचे तुकडे. कश्शाकश्शाला म्हणून सोडत नाहीत. चैनच पडत नाही त्याशिवाय!

तर या मसाला भेंडीमध्येसुद्धा एकदा हे बेकन बिट्स की काय ते टाकून बघायला पाहिजेत, कसे लागतात ते. छानच लागतील बहुतेक. तर तुम्हीसुद्धा 'आमच्याकडच्या दाक्षिणात्य संस्कृती'चा मान राखून पुढल्या वेळी या मसाला भेंडीत डुकराचे तुकडे अवश्य घालून बघा हं!

सेरेपी's picture

6 Jan 2011 - 9:17 am | सेरेपी

बर्याचदा हॅम-हॉगस घालतात.
(आमच्या जवळचेच की तुम्ही :-) )

पंगा's picture

6 Jan 2011 - 9:26 am | पंगा

तरीच एवढे चिवट आणि कचकचीत लागतात! (डुक्करच, पण कदाचित बेकन नसावे अशी शंका होतीच मला.)

(अतिअवांतरः आता आमच्या जवळचे म्हटल्यावर, 'ग्रिट्स' या प्रकाराबद्दल काय वाटते आपल्याला? ;-))

सेरेपी's picture

7 Jan 2011 - 4:58 am | सेरेपी

हो. बरोबर आहे.

(अतिअतिअवांतर: ग्रिट्स कधी खाल्ले नाही, पण आवडणार नाहीतसे वाटते)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Jan 2011 - 4:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'चवळीची डुक्कर पेरून उसळ'

=)) =)) =))