लोकाग्रहास्तव पंचामृत

प्रभो's picture
प्रभो in पाककृती
9 Oct 2009 - 12:13 am

आज पेश करतोय लोकाग्रहास्तव (विशेषतः विशाल, गणपा, स्वाती राजेश , स्वाती २ यांच्या आग्रहास्तव ) गौरीच्या नैवेद्यातील माझा सर्वात आवडणारा पदार्थ पंचामृत

कच्चा मालः

१. एक-दीड ईंच लांबीचे खोबर्‍याचे पातळ काप (१५-२०)
२. भाजलेले शेंगादाणे (१५-२०)
३. हिरव्या मिरचीचे तुकडे (१५-२०)
४. कोथिंबीर
५. कडीपत्ता
६. भाजलेल्या तिळाचे कूट (अर्धी छोटी वाटी)
७. शेंगदाणा कूट (अर्धी छोटी वाटी)
८. मीठ
९. चिंच
१०.गुळ
११. जिरे
१२. मोहरी
१३. तिखट

स्टेप १: वाटीभर पाण्यात चिंच भिजवत ठेवणे..साधारण एक तास

स्टेप २: एका छोट्या पतेल्यात जिर्‍या मोहरीची फोडणी करावी.

स्टेप ३: फोडणीत कोथिंबीर, कडीपत्ता, खोबर्‍याचे पातळ काप, शेंगादाणे , हिरव्या मिरचीचे तुकडे, तिळाचे कूट, शेंगदाणा कूट घालून थोडा वेळ परतावे.

स्टेप ४: वरच्या मिश्रणात चवीनुसार मीठ आणी तिखट घालावे.

स्टेप ५: आता त्यात एक वाटी बनवलेला चिंचेचा कोळ टाकावा. अर्धा वाटी साधं पाणी पण टाकावं.

स्टेप ६: त्यात गुळाचा एक छोटा तुकडा घालावा. आणी त्यास १०-१५ मिनिटे उकळू द्यावे. (घट्टपणा कसा हवाय त्यानुसार)

तायार आहे नैवेद्याचे पंचामृत....वरील सामान घेऊन केलेलं पंचामृत तीन-चार जणांच्या नैवेद्यास पुरेल.

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

9 Oct 2009 - 12:27 am | बेसनलाडू

दिवाळीच्या जेवणासाठी करायचे ठरवले आहे.
(हौशी)बेसनलाडू

टारझन's picture

9 Oct 2009 - 1:16 am | टारझन

लपलपलपलप

वरील सामान घेऊन केलेलं पंचामृत तीन-चार जणांच्या नैवेद्यास पुरेल.

नक्की का ?

- टी

श्रावण मोडक's picture

9 Oct 2009 - 1:21 am | श्रावण मोडक

तुझ्यासारखे तीन-चार नव्हेत. माझ्यासारखे! तुला एकट्यालाही हे पुरेल की नाही सांगता येणार नाही... ;)

चित्रा's picture

9 Oct 2009 - 3:42 am | चित्रा

ह्याला नक्की अमृत का म्हणतात?!

पण लागते मात्र भन्नाट. फार आवडते.

लवंगी's picture

9 Oct 2009 - 3:43 am | लवंगी

आजपासून मिपाचा 'नवरा मुलगा' तू

अवलिया's picture

9 Oct 2009 - 6:56 am | अवलिया

!&*@&^@#(^@#^# !&^&!^!#_(#((@&&#@

असंच....
स्नेह वाढतो शिव्या दिल्याने...... :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज's picture

9 Oct 2009 - 7:09 am | सहज

पेरुच्या फोडी टाकून एकदा करुन पहा. अजुन मस्त लागते. नैवेद्याला चालतो की नाही माहीत नाही पण फळ म्हणुन पेरु चालावा.

चतुरंग's picture

9 Oct 2009 - 9:05 am | चतुरंग

वोईच बोलनेवाला था!
पेरुचे पंचामृत आवडणारा
(पोपट)चतुरंग

छोटा डॉन's picture

9 Oct 2009 - 12:09 pm | छोटा डॉन

आणि डाळिंब हो ?
पंचामॄतात डाळिंब असते ना ? ते उपासतापास वगैरे राहु दे पण "डाळिंब घातलेल्या पंचामॄतावर आमचा अंमळ जीव आहे" ...

------
(डाळिंबप्रेमी ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Oct 2009 - 12:12 pm | llपुण्याचे पेशवेll

पंचामृतात डाळिंब नाही डाळिंबाचे दाणे घालतात डानराव. डाळिंब घातले तर कडवट चव जास्त येईल. वाहवा पंचामृतात लालचूटूक डाळींबाचे दाणे.

(लालचूटूक डाळींबाच्या दाण्यांचा प्रेमी) लालोबा अनार

छोटा डॉन's picture

9 Oct 2009 - 12:18 pm | छोटा डॉन

>>पंचामृतात डाळिंब नाही डाळिंबाचे दाणे घालतात डानराव.
सहमत ...!
मला तेच म्हणायचे होते, आम्हाला वाटलं की "त" म्हणता "ताकभात" ओळखणारी जन्ता आहात, छ्या सगळं उलगडुन सांगावं लागतं बॉ तुम्हाला ...

------
(डाळिंब दाणे प्रेमी ) डाळिंबा दाणार
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

सहज's picture

9 Oct 2009 - 12:13 pm | सहज

डाळिंब व पेरू दोन्हीच्या बियांशी सामना नको म्हणून डाळिंब कटाप

केळ+डाळिंब दह्यात मिर्ची कोथिंबीर मीठ साखर

क्रान्ति's picture

9 Oct 2009 - 8:32 am | क्रान्ति

सुद्धा मस्त लागतं त्यात. कारल्याच्या बारीक फोडी करून तेलावर शिजवून घालायच्या.
फोटो पाहून जीव कासावीस झाला! आता दिवाळीत करायलाच हवंय!

क्रान्ति
अग्निसखा

विशाल कुलकर्णी's picture

9 Oct 2009 - 10:17 am | विशाल कुलकर्णी

धंकु रे !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

राधा१'s picture

9 Oct 2009 - 12:22 pm | राधा१

मी पेरुच्या पंचामृत/ पंचामृत ला मेथीची फोडणी घालते...तसेच थोडेसे तिळ सुद्धा...!! वरचा फोटो एकदम टेंम्पटींग आहे..करणार ह्या शनि-रवि मध्ये नक्की.. :-)

पंचामृतावर आपला फार जीव!

गणपा's picture

9 Oct 2009 - 12:48 pm | गणपा

लेका धन्यु. मी कधी हे पंचामृत चाखलपण नाही. :( ऐकुन होतो फक्त.
या विकांतला करतोच.

स्वाती राजेश's picture

9 Oct 2009 - 4:05 pm | स्वाती राजेश

आजच तयारीला लागते....पंचामृताच्या....ट्रायला बेसीसवर....
म्हणजे दिवाळीच्या पार्टीचा हा एक मेनू नक्की करता येईल..

स्वाती२'s picture

9 Oct 2009 - 5:26 pm | स्वाती२

मस्त रेसिपी. तत्परतेने टंकल्याबद्दल धन्यवाद. आता विकेंडला सर्व सामान आणून ठेवेन.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Oct 2009 - 5:59 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मलाही पंचामृत खुप आवडतं.पा.कृ.बद्दल धन्यु

प्रभो's picture

9 Oct 2009 - 7:28 pm | प्रभो

प्रतिक्रिया देणार्‍या आणी पा़कृ वाचणार्‍या सर्वांचे आभार...

--प्रभो

सखी's picture

9 Oct 2009 - 7:47 pm | सखी

बरेच दिवस या पा़कृ च्या शोधात होते, पंचामृत सहीच दिसतय. पा़कृ साठी धन्यवाद

प्राजु's picture

9 Oct 2009 - 9:22 pm | प्राजु

वरील सामान घेऊन केलेलं पंचामृत तीन-चार जणांच्या नैवेद्यास पुरेल.

म्हणजे ३-४ देवाना नैवेद्य दाखवण्यासाठी का? की ३-४ लोकांच्या जेवणासाठी? ;)

- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/

प्रभो's picture

24 Oct 2009 - 5:35 pm | प्रभो

>>म्हणजे ३-४ देवाना नैवेद्य दाखवण्यासाठी का? की ३-४ लोकांच्या जेवणासाठी?

३-४ लोकांच्या जेवणासाठी पुरायला हवं...आता कुणाला जरा जास्त लागत असेल तर पुरणार नाही
--प्रभो

शक्तिमान's picture

24 Oct 2009 - 6:19 pm | शक्तिमान

मी आत्तापर्यंत पांढरे पंचामृत पाहिले होते याप्रमाणे.. हा नवीनच प्रकार पाहत आहे...

प्रभो's picture

25 Oct 2009 - 12:22 pm | प्रभो

ते अभिषेक करायला वपरतात.
हे गौरीच्या नैवेद्यासाठी प्रसद म्हणून

--प्रभो

माझी दुनिया's picture

3 Nov 2009 - 1:59 pm | माझी दुनिया

हो अगदी बरोबर
____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

JAGOMOHANPYARE's picture

25 Oct 2009 - 12:03 pm | JAGOMOHANPYARE

याला कायरस म्हणतात का?
पेरु घातला तर पेरुचे कायरस म्हणतात बहुतेक...

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

प्रभो's picture

25 Oct 2009 - 12:24 pm | प्रभो

>>याला कायरस म्हणतात का?
आमच्या घरी पंचामृत म्हणतात असे माहित आहे..
मिपावरचे जाणकार अधीक प्रकश टाकू शकतील.

--प्रभो