ही मी काढलेली दिवाळीतील रांगोळी आहे. ह्या रचनेसाठी शेवंती, झेंडू, त्याच्या पाकळ्या, गुलछडी गावठी गुलाबाच्या पाकळ्या, हिरवी पाने वापरली आहेत. जसे सुचले तशी रचत गेले फुल. गुलछडीच्या नैसर्गिक बाक आलेल्या देठांमुळे मला मध्ये गुलछडीचे चक्र करता आले आणि वर दोन फुले एकमेकांना फ्रिहॅन्डकरुन पाकळ्या करता आल्या.
प्रतिक्रिया
18 Dec 2010 - 3:20 pm | यशोधरा
छान आहे रांगोळी. तिसरा फोटो छान आहे.
18 Dec 2010 - 5:26 pm | रेवती
सहमत.
18 Dec 2010 - 3:24 pm | गणपा
छान आहे :)
18 Dec 2010 - 3:31 pm | sneharani
छान आलीये रांगोळी!
:)
18 Dec 2010 - 4:01 pm | जागु
यशोधरा, गणपा, स्नेहाराणी तुम्हाला धन्स धन्स धन्स.
18 Dec 2010 - 4:55 pm | सुहास..
सणावाराची अडचण च हाय !!
एकुलत्या एका बहिणीच लग्न झालं आणी सणावाराच्या दिवशी घर पोरकं वाटायला लागल.अर्थात,पहिल्या दिवाळीला ती माहेरी आली होती.पण त्यानंतरची दिवाळी मात्र मंगलमय असुनदेखील, उत्साहित वाटत नव्हती. ताई आणी मम्मी पुजेपासुन ते घरापुढे रांगोळी घालेपर्यंत सर्व काही करत असत.आम्ही तीन भाऊ बाहेरुन सगळ काही आणुन द्यायच काम करत असो.माझ्या घरात पुर्णतः पुरुषी वातावरण, आयुष्यात कधीही रांगोळीच साधं एक टिंब देखील काढलेले नाही. मम्मीला दिवाळ-सणासाठी माझे मामा घेऊन गेले. आता राहिलो आम्ही चौघे. आम्हाला सणासुदीच्या दिवशी टिवल्या-बावल्या करताना पाहुन तिर्थरुपांचा चेहरा 'घोस्ट रायडरच्या' निकोलस केज सारखा झालेला (जर शाळेत मला " माझे पपा " असा १००० शब्दांचा निबंध आला असता तर त्यात मी हजारवेळा फक्त 'जमदग्नी ' हा शब्द लिहीला असता.) मग म्हटल त्यांनी कानाखाली रांगोळी काढायच्या आधी आपणच दरवाज्यासमोर रांगोळी काढायला घ्या.भावाने पुजा मांडायल घेतलीच होती.
शेजारची 'प्रिया '(नावानेच बर का फक्त !)नऊवारी,नाकात नथ वगैरे घालुन छानपेंकी रांगोळीत रंग भरत होती.माझ्या हातात रांगोळीच्या पुड्या पाहुन तिच्या नाकातली नथ व्हायब्रेट झाली.आयला खुन्नस !! पण काय करु ? अगंठा आणि तर्जनीच्या चिमटीत पकडुन, जगातल्या, आट्यापाट्या,एका प्रकारे सर्वात रांगड्या खेळात प्राविण्य मिळविलेल्या, वाश्या ने ,रांगोळीचा पहिला ठिपका टाकला.पण ट्यांव !! ठिपका कुठाय ? चिमटीत पकडलेली रांगोळी, जमीनीपासुन चांगली एक फुट वर धरल्याने केव्हाच हवेत विरुन गेली. ते पाहुन आख्खी प्रिया व्हायब्रेट झाली.चिडलो, प्रचंड चिडलो. घराच्या किचन मध्ये गेलो.एक मोठी परात, दोन छोटी ताटं, एक वाटी, एका दिव्याच चित्र ऊचलुन आणल आणी खाली दिलेला अविष्कार घडवुन आणला. म्हणतात ना !
" AN IDEA CAN CHANGE YOUR LIFE "![](http://lh5.ggpht.com/_7Nuenc610k0/S08EW0mC9wI/AAAAAAAAAVU/Fswu86siD-o/s640/PICT0476.JPG)
18 Dec 2010 - 5:32 pm | गणपा
जबरा रे सुहाश्या..
18 Dec 2010 - 5:28 pm | मदनबाण
छान... :)
18 Dec 2010 - 7:17 pm | पर्नल नेने मराठे
मला गुलछडीचा केलेला उपयोग जास्त आवडला !!!
18 Dec 2010 - 8:58 pm | सूड
मस्तच रांगोळी जागुतै.
18 Dec 2010 - 9:12 pm | प्राजु
मस्तच!! फार सुंदर जमलीये रांगोळी.
गुलछ्डी म्हणजे निशिगंध ना?
@ सुहास : आयडीया खूप छान आहे. रांगोळी क्लास आहे.
21 Dec 2010 - 3:45 pm | सुहास..
@ सुहास : आयडीया खूप छान आहे. रांगोळी क्लास आहे. >>
धन्स ग तायडे !!
19 Dec 2010 - 2:29 am | राघव
मस्त!
मलाही प्राजु सारखाच प्रश्न पडलाय.. निशिगंधच ना?
राघव
19 Dec 2010 - 4:36 pm | अनिल आपटे
फुलांची रांगोळी आवडली
पण अजुन असत्या तर पहायला आवडल असत
अनिल आपटे
20 Dec 2010 - 1:23 pm | निवेदिता-ताई
खूप सुंदर....
20 Dec 2010 - 4:02 pm | प्राजक्ता पवार
जागु फुलांची रांगोळी आवडली.
सुहासची रांगोळी काढण्याची IDEA देखील भारीच :)
21 Dec 2010 - 11:04 am | जागु
प्राजु, राघव निशिगंधा म्हणजेच गुलछडी.
सुहास तुमची आयडीया एकदम भारी.
21 Dec 2010 - 3:36 pm | गणेशा
फोटो दिसले नसल्याने खुप निराशा झाली.
प्रतिक्रेया वाचुनच आनंद मानुन घेतला ..
21 Dec 2010 - 4:24 pm | मेघवेडा
सुंदर. विड्याच्या पानांचाही अतिशय कल्पक उपयोग केला आहे. मध्यभागी जास्वंदाचं, गुलाबाचं किंवा कुठलंही लाल फूल (तेरडा नको!) असल्यास मस्तपैकी उठून दिसतं!
आम्ही भटपणास गेलो की अशा फुलांच्या रांगोळ्या काढत असू. हल्ली फुलवाले तेरड्याची फुलं-पाकळ्या खपवतात लाल रंगाची - गणपतीला प्रिय - फुलं म्हणून. आणि (कदाचित स्वस्त असल्यामुळे असावं) लोकंही मोठ्या उत्साहाने हाऽऽ एवढा तेरडा घेऊन येतात. मग आम्ही यजमानाची ऐपत पाहून या तेरड्याच्या फुलांचा रांगोळी/सजावटीसाठी उपयोग करत असू. पण आमच्या रांगोळ्या बारक्या बारक्याच असायच्या. ही भारीच आहे गं जागुतै!
22 Dec 2010 - 9:29 pm | जागल्या
रांगोळी उत्तमच
गाय किंवा शेळी आली तर काय?
23 Dec 2010 - 2:59 pm | अवलिया
मस्त !
23 Dec 2010 - 4:49 pm | जागु
जागल्या, शुभ बोल नार्या.
23 Dec 2010 - 9:28 pm | पिंगू
जागुतायची रांगोळी क्लासच आहे.. त्यात सुहासने टाकलेली लहानशी भर सुखावली..
- (रांगोळीप्रेमी) पिंगू
29 Dec 2010 - 11:41 am | प्रकाश१११
छान रांगोळ्या .तिसरी नाजूक वाटली. म्हणून ती छान !!
29 Dec 2010 - 1:12 pm | जागु
पिंगु, प्रकाश धन्यवाद.
प्रकाश ती एकच रांगोळी आहे.