कंटाळून गेलेय ...!!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
27 Dec 2010 - 8:51 am

किती वर्ष झाली
किती काळ गेला
कुठे अपेक्षा संपतात नवरोबाच्या
पोरांच्या नातेवाईकांच्या
संसाराचे ओझे ..!
कर्तव्याचे ओझे ..!!
ह्याच्या पुढे कर
त्याच्या पुढे कर
करण्याचे ओझे
हु...श्श ..!!
कंटाळून गेलेय आता .
ह्या सुखी {?} संसाराला

प्रत्येकाची तर्हा निराळी
पोरांच्या , पोरींच्या
छान केलेय म्हणत.....
सतत फटकारत ,
कधी कुरवाळत
नि बळजबरीने
मुद्दाम उत्साहाचे सलाईन....
थकून गेलेय्रे आता ..
गोड शब्दाचे
पेग घशात ढकलायचे
नि उत्साह आणायचा
ओढून ताणून.....
कोठे राहिलेय आपलेपण [?]
डोक्यावर घेतात नि केव्हाही आपटून देतात
कंटाळून गेलेय
ह्या गोड शब्दांनी
सतत फसून जाते
फसवली जातेय
असे सतत घडतेय
कितीतरी वर्षापासून
असेच घडतेय माझ्याबाबतीत
शप्पत...!!
तुमच्याबाबतीत असेच घडतेय काहो ...??
सांगाल का तुमच्या मनातले हितगुज ....????

करुणमुक्तक

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

27 Dec 2010 - 9:57 am | नगरीनिरंजन

सतत फटकारत ,
कधी कुरवाळत
नि बळजबरीने
मुद्दाम उत्साहाचे सलाईन....

छान. बर्‍याचदा चाकोरीतलं चित्र जपण्यासाठी असली सलाईनं लावून घेऊन माणूस धडपड करत राहतो. घरासाठी धडपडणार्‍या आणि तरीही उपेक्षित राहिलेल्या स्त्रिया ही तर फार जुनी समस्या.

अवलिया's picture

27 Dec 2010 - 3:54 pm | अवलिया

छान !

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2010 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर कविता.

किती वर्ष झाली
किती काळ गेला
कुठे अपेक्षा संपतात नवरोबाच्या
पोरांच्या नातेवाईकांच्या
संसाराचे ओझे ..!
कर्तव्याचे ओझे ..!!
ह्याच्या पुढे कर
त्याच्या पुढे कर
करण्याचे ओझे
हु...श्श ..!!
कंटाळून गेलेय आता .
ह्या सुखी {?} संसाराला

ह्या कडव्या वरुन एक खत्तरनाक विनोद आठवला. इच्छुकांनी व्यनी करावा.

>> तुमच्याबाबतीत असेच घडतेय काहो ...??
>> सांगाल का तुमच्या मनातले हितगुज ....????

मनातले हितगुज .. ?
आत ते तरी कोठे माझे राहिलेय .. ?
त्यालाही साठीची काठी लागते चालायला ..
म्हणा कोण चालु देतय आता त्याला ?

ती होती तेंव्हा हक्काचे कोणी तरी होते ..
थरथरत्या मनाला थरथरत्या हाताचेच बंध होते ..
चष्मा ही दुभंगलाय आता, कदाचीत त्यामुळेच
जीवनाचे चित्र ही दुभंगलेलेच वाटतय मला

"माझे जग" नाव असलेल्या माझ्या घरात
ही गॅलरीच ती काय आपलेपनाने साथ देतेय फक्त..
लाकडाच्या मोडकळीस आलेल्या खुडचीपलीकडील जग
मन केंव्हाच विसरले आहे ..

ती फसवली गेली कायम .. आणि मी ?
मी विसरलो गेलो कायम .. आनंदाच्या क्षणातून ..
नात्यातून.. घरातून .. मनातून ...

आताशा .. मी ही विसरत चाललोय..
घरातल्या अस्तित्वाबरोबरच त्याबाहेरील रस्ते ..
नात्यांचे ओझे .. आणि त्याखाली गुदमरलेले मनाचे घरटे..
पुसटशे आठवते आहे फक्त तीचे आपुलकीचे दोन शब्द ..
लवकर या ...........................................

---- शब्दमेघ... २७ /१२/२०१०