जालावर उपयोगी पडणाऱ्या चौसष्ट कला-
भारतीय संस्कृतीमधे चौसष्ट कलांचा उल्लेख आहे.
दुवा- http://balsanskar.com/marathi/lekh/45.html
ह्यामधल्या अनेक आजच्या युगात कामी येत असल्या, तरी खास जालसंस्कृतीमधे उपयोगी अशा कोणत्या कला आहेत असा विचार मनात आला.
मिपावर अनेक सृजनशील सभासद आहेत. ६४च काय, शंभर देखील कलांची यादी नक्कीच होउ शकेल.
डिसक्लेमर-१- जालावर म्हणजे मिपावर असा आत्मकेंद्री अर्थ घेउ नये.
डिसक्लेमर-२ शेवटच्या वाक्याचा गर्भितार्थ शंभर प्रतिक्रीया असा नाही.
यादीची सुरवात मी करतो.
१) समय-प्रबंधन (ऑफ़ीसमधे कामाच्या वेळेत मिपा-मिपा खेळणे)
२) गटबंधन- (इथे असंतुष्ट आत्मे कंपुबाजी नावाने हेटाळतात.)
३) विचारजंतन- (ढंढाळ्या लागून जंत बाहेर येतील इतके गंभीर विवेचन)
४) मुखवटे-मर्दन (दुसऱ्याचे खरे-खोटे मुखवटे चुरगाळून नवी नावे तयार करणे, आणि त्याद्वारे विनोदाच्या नावाखाली हिनवणे)
५) कबड्डी (सीध्या साध्या लिखाळूला घेरून तोड-हड्डी खेळ खेळणे)
आणखी काही????????
प्रतिक्रिया
26 Dec 2010 - 11:45 am | विजुभाऊ
ओ काका.
मूळ मुद्द्यात नसलेले मुद्दे शोधून धागा भरकटवणे
उदा: आज हवा चांगली आहे असे कोणी म्हंटले की त्यावर उत्तर द्यायचे
हो ना कारण नाडी घट्टा बांधली आहे म्हणून
26 Dec 2010 - 1:00 pm | सूर्यपुत्र
सादरीकरण वेगळे. उदा. :
१. गीत रचणे (म्हणजे सुंदर कवितेचे विडंबन करणे)
२. वाद्य वाजवणे (एखाद्याच्या नावाने शंख करणे किंवा गटबंधनाद्वारे एखाद्याचा बेंड-बाजा वाजवणे)
३. नृत्य (आपल्या कॄत्याने इतरांना तसेच संपादकांना नाचवणे)
४. नाटय (नाटकं करणे)
५. ........
६. ......
बस्स आत्तातरी इतकेच. (ह.घ्या.)
(आता मरतोय, पळा पळा...)
26 Dec 2010 - 3:41 pm | अरुण मनोहर
अरेच्चा! इथल्या कला लुप्त झाल्या की काय!
(गुप्त ठेवायच्या असाव्यात!)
26 Dec 2010 - 9:15 pm | शुचि
मनोहर साहेब,
खर्याखुर्या ६४ कला http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=101... येथे वाचवयास मिळतील.
यापैकी काही कलांचे विडंबन पुढील प्रमाणे-
(१) खरा दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
जाल दुर्वाच योग - लेखातील विशिष्ठ शब्दांचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून लेखकाला कात्रीत सापडविणे. कवितांबाबतदेखील हे पहावयास मिळू लागले आहे.
(२) खरे आकर ज्ञान- खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
जाल आकर ज्ञान - लेखकामध्ये दडलेल्या विकृतींविषयी (??)सखोल ज्ञान असणे
(३) खरे वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
हे जसे च्या तसे जालावर लागू पडते
(४) खरा कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
जाल कौचुमार योग- सपक धाग्याला सुंदर प्रतिसादांनी आकर्षक बनविणे. ही मात्र खरी सकारात्मक कला आहे. :)
27 Dec 2010 - 1:33 pm | सूर्यपुत्र
गणपतीला अवगत असतात ना? मग या नवीन कला रिमिक्स आहेत का?
कारण :
पानक रस तथा रागासव योजना- मदिरा व पेय तयार करणे,
आकर ज्ञान- खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे,
यंत्रमातृका- विविध यंत्रांची निर्मिती करणे,
अशा उदाहरणादाखल दिलेल्या कलांचा आणि गणपतीचा काही मेळ लागत नाहीये...
27 Dec 2010 - 8:37 pm | शुचि
माफ करा पण ते लोकसत्तावाल्यांना विचारावे लागेल.
26 Dec 2010 - 9:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
५०. तौलनिक भाषा विज्ञान आणि ५५. तौलनिक भाषा विज्ञान
एक कला दोनदा आल्यामुळे बहुदा तिथली एक कला निसटली आहे.
असा प्रश्न तिकडे कोणीतरी विचारलाच आहे, तोच प्रश्न इथेही विचारतो. ती सुटलेली कला कोणती ?
-दिलीप बिरुटे
26 Dec 2010 - 10:15 pm | डावखुरा
एखाद्याच्या(माझ्या) शंकेचा धागा करण्याची कला.... ;) (ह.घ्या.)
27 Dec 2010 - 12:19 pm | अमोल केळकर
या धाग्याच्या निमित्याने, फार पुर्वी लिहिलेला आधुनीक ६४ कलांवरील लेख आठवला :)
अमोल केळ्कर
27 Dec 2010 - 2:19 pm | परिकथेतील राजकुमार
माफ करा काका पण ...
हे वाचुन हा धागा का काढला गेला असावा त्याचा लगेचच अंदाज आला :)
असो...
ज्याची त्याची इच्छा...
27 Dec 2010 - 2:20 pm | अवलिया
सहमत. असो.