जालावरील चौसष्ट कला--
जालावर उपयोगी पडणाऱ्या चौसष्ट कला-
भारतीय संस्कृतीमधे चौसष्ट कलांचा उल्लेख आहे.
दुवा- http://balsanskar.com/marathi/lekh/45.html
ह्यामधल्या अनेक आजच्या युगात कामी येत असल्या, तरी खास जालसंस्कृतीमधे उपयोगी अशा कोणत्या कला आहेत असा विचार मनात आला.
मिपावर अनेक सृजनशील सभासद आहेत. ६४च काय, शंभर देखील कलांची यादी नक्कीच होउ शकेल.
डिसक्लेमर-१- जालावर म्हणजे मिपावर असा आत्मकेंद्री अर्थ घेउ नये.
डिसक्लेमर-२ शेवटच्या वाक्याचा गर्भितार्थ शंभर प्रतिक्रीया असा नाही.
यादीची सुरवात मी करतो.
१) समय-प्रबंधन (ऑफ़ीसमधे कामाच्या वेळेत मिपा-मिपा खेळणे)
२) गटबंधन- (इथे असंतुष्ट आत्मे कंपुबाजी नावाने हेटाळतात.)
३) विचारजंतन- (ढंढाळ्या लागून जंत बाहेर येतील इतके गंभीर विवेचन)
४) मुखवटे-मर्दन (दुसऱ्याचे खरे-खोटे मुखवटे चुरगाळून नवी नावे तयार करणे, आणि त्याद्वारे विनोदाच्या नावाखाली हिनवणे)
५) कबड्डी (सीध्या साध्या लिखाळूला घेरून तोड-हड्डी खेळ खेळणे)
आणखी काही????????
प्रतिक्रिया
ओ काका. मूळ मुद्द्यात नसलेले
कला त्याच पण...
अरेच्चा! इथल्या कला लुप्त
मनोहर साहेब,खर्याखुर्या ६४
६४ कला
माफ करा पण ते
तिकडचा प्रश्न इकडे...
एखाद्याच्या(माझ्या) शंकेचा
या धाग्याच्या निमित्याने, फार
माफ करा काका पण ... यादीची
सहमत. असो.