दिनांक ४ जानेवारी २०११ रोजी होणारे काही व्यक्तीना भाग्यदायी ठरायची शक्यता आहे. यापैकी ज्यांना ते विशेष भाग्यदायी ठरेल त्यांच्या जन्मतारखा पुढे देत आहे.
खालील दिलेल्या कालवधीत जन्म झालेल्या व्यक्तीना जन्मपत्रिकेतिल गुरुशी ग्रहणाची अमावस्या युती अथवा नवपंचम योग करते, त्यामुळे ती काही ना काही प्रमाणात शुभ ठरण्याची शक्यता आहे. या व्यक्तींचा गुरु जर लग्नाशी किंवा दशमभाव आरंभ बिंदूशी युती तर ’लाईफ जिंगा लाला’ ठरण्याची शक्यता आहे...
२२ जाने ते १० फेब्रु १९३७, १५ जुलै ते ३१ ऑगस्ट १९४०, ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर १९४०
३ मार्च ते २४ मार्च १९४१,
१८ सप्टे ते ७ ऑक्टोबर १९४४
६ जाने ते २४ जाने १९४९
२० जून ते १२ जुलै १९५२, १० नोव्हे ते १६ डिसे १९५२
२५ जाने ते १ मार्च १९५३
२ सप्टे ते २१ सप्टे १९५६
२१ डिसे १९६० ते ७ जाने १९६१
३१ मे ते १९ जून १९६४
१८ ऑगस्ट ते ५ सप्टे १९६८
४ डिसे ते २२ डिसे १९७२
१४ मे ते १ जून १९७६
१ ऑगस्ट ते २० ऑगस्ट १९८०
१६ नोवे ते ६ डिसे १९८४
या शिवाय कोणत्याही वर्षात खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तीना ग्रहणाची अमावस्या शुभ अथवा लाभदायक ठरेल...
२ जाने ते ७ जाने
१ मे ते ७ मे
४ सप्टे ते ८ सप्टे
या शिवाय सायन वृषभ रास १० अंश ते १६ अंश, सायन कन्या रास १० अंश ते १६ अंश यात कोणतेही ग्रह असल्यास त्यांनी जन्मपत्रिकेत केलेल्या योगानुसार ग्रहणाची शुभ फले मिळतील.
टीप - -आपल्या पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल (upadhye.rajeev@gmail.com)वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल.
ज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहे, त्यांनी या (http://yuyutsu.webs.com/Sample%20Report.pdf) लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.
प्रतिक्रिया
24 Dec 2010 - 11:36 am | अवलिया
छ्या ! हा अन्याय आहे !!
मागच्या अशुभ मधे पण आमची तारिख नाही.. या शुभमधे पण तारिख नाही
आमचं नशीबच खत्रुड असण्याची शक्यता नाकारता येत नाहि.
24 Dec 2010 - 12:48 pm | कानडाऊ योगेशु
लगता है पूरी कायनात ने आपको नजर अंदाज करने की साजिश की है!
- टारूख्खान
24 Dec 2010 - 11:38 am | सुहास..
छ्या ! हा अन्याय आहे !!
मागच्या अशुभ मधे पण आमची तारिख नाही.. या शुभमधे पण तारिख नाही >>>
नान्याशी प्रंचड सहमत !!!
हे काय चाल्लय ?
24 Dec 2010 - 11:40 am | सहज
ग्रहण उधळून लावा! :-)
24 Dec 2010 - 7:52 pm | असुर
हे काय चाललंय?? आमचीही तारीख नाही! त्यामुळे या असल्या ग्रहणांना आमचा जाहीर विरोध आहे.
हे ग्रहण रद्द करता येऊ शकेल काय? पुढच्या वेळी आमच्या तारखा 'शुभ' विभागात असणारे ग्रहण भरवणे कितपत शक्य आहे? कृपया ग्रहण आयोजकांनी खुलासा करावा!!!
--असुर
24 Dec 2010 - 8:10 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
आमची जन्मतारीख शुभ यादीत का नाही याची जेपीसी मार्फत चौकशी करायला हवी. सरकार नक्कीच काहीतरी लपवत आहे.
जेपीसी नेमली जात नाही तोपर्यंत आम्ही कुठलेच ग्रहण होऊ देणार नाही. :)
24 Dec 2010 - 8:15 pm | नरेशकुमार
आपलि जेपीसी मागनि मन्जुर झालेलि आहे, लवकरच दहा वर्शात अहवाल सादर करु,
तोपर्यन्त सहकार्य करावे.
ग्रहनाला असे थांबवु नये, अमेरिका नाराज होते.
24 Dec 2010 - 11:46 am | kamalakant samant
महराष्ट्रात हे ग्रहण जर दिसणार नसेल तरी
त्याची शुभाशुभ फले वरीलप्रमाणेच समजावीत का?
का फक्त जिथे ग्रहण दिसते त्याच भागापुरते हे स॑ब॑धीत आहे?
24 Dec 2010 - 11:48 am | युयुत्सु
उत्तर हो असे आहे.
24 Dec 2010 - 12:36 pm | प्रचेतस
आमच्या मते ४ जानेवारी २०११ चे सूर्यग्रहण ज्यांना कुणाला याची देही याची डोळा पाहावयास मिळेल त्यांचे पुढील समस्त जीवन एक नयनरम्य अतिदुर्मिळ खगोलीय अविष्कार पाहाण्याच्या आनंदात जाईल.
24 Dec 2010 - 12:54 pm | टारझन
धाग्याचा सारांश : विषिष्ठ सुविधांसाठी युयुत्सु शुल्क स्विकारतात =))
24 Dec 2010 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार
मिपाची कुंडली बनवता येईल काय हो ? साला आमच्या मिपाला आजकाल रोजच ग्रहण लागायला लागलय.
24 Dec 2010 - 6:57 pm | नरेशकुमार
आम्हि सुर्या वर राहतो,
आमाला कोन्ते ग्रहन लागु होते ?
किव्वा
आम्हि कोनाला ग्रहन म्हनुन लागतो ?
मुक्काम पोस्ट : सुर्य (वेस्ट).
24 Dec 2010 - 7:44 pm | नावातकायआहे
सुर्यनरेश...वेस्ट ला कुट?
24 Dec 2010 - 7:57 pm | नरेशकुमार
ते नाय का तिकडं,
तिथुन डाव्या बाजुनि गेलो कि उजव्या बाजुचा शेवटचा बन्गला.
तिकडे आलात कि कोन्त्याहि शेम्ब्ड्या पोराला इचारा, (पोरग शेम्बडं असन आवश्यक आहे बरकां)
25 Dec 2010 - 5:27 am | राजेश घासकडवी
मागच्या वेळच्या एका चंद्रग्रहणाच्या अशुभ यादीत व या सूर्यग्रहणाच्या शुभ यादीत दोन्हीमध्ये माझी तारीख बघून बरं वाटलं.
राबट, चंद्रग्रहण इसे जीने नही देगा, और सूर्यग्रहण इसे मरने नही देगा.