आंतरजालीय अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेले संस्थळ : मिपा

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
24 Dec 2010 - 12:00 pm
गाभा: 

अवांतर लिखाण बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा टारायत बेग व मौला अवलिया यांना मिपा स्वगृहात वाचण्यासाठी लेखन, पाककृती विभाग द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश पशा टुकारे यांनी दिला.

१३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका अवांतर प्रतिसाद स्फोटाने १७ लेखांचा जीव घेतला आणि टुकार लेखनाने ५०-६० प्रतिसादक जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्झा टारायत बेग व मौला अवलिया यांना(७ महिन्यांनी) अखेर मिपाच्या दहशतवादविरोधी पथकाने काटाकिर्र येथून अटक केली.

पुढे मिपाबाहेर प्रतिबंधीत कोठडीत असताना ह्या अतिरेक्यांनी हळूहळू आपल्या मागण्या सांगायला सुरुवात केल्या. अगोदर वर्तमानपत्र, नंतर कपडे, आता तर त्यांना वाचायला खरडवही हवी आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व मंजूर झाले. आज मिपावर काथ्याकुटापासून पाककृतीपर्यंत जाण्यास जितका जीव धोक्यात घालावा लागतो त्याच्या कितीतरी कमी जीव धोक्यात घालून, यांनी अवांतर आणि टुकार हल्ला करून आता पुन्हा मिपावर ऐश-आरामात जीवन जगत आहेत.

मला एक समजत नाही, मिपा हे एक पवित्र संस्थळ आहे. १७ लेखांचे जीव घेतलेल्या नराधमांना मिपासरकार असे कसे काय पुन्हा प्रवेश देउ शकते ? मिपा वाचून त्या 'बेग' आणि 'मौला' मध्ये असा काय बदल घडणार आहे ? ते काय सगळ्या अवांतर कारवाया सोडून समयोचीत प्रतिसाद मार्गाला लागणार, कि अजून काही त्या लेखातून भलते-सलते अर्थ काढून पुन्हा काही अघटीत करायचा विचार करणार ?

एखाद्या आंतरजालीय अतिरेक्याचे स्वातंत्र्य जपायचा हा अट्टाहास कशासाठी चाललेला आहे ? याने अतिरेक्यांना उत्तेजनच मिळणार नाहीतर अजून काय. अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज चलो एक अवांतर डालेंगे, मरे तो मिसळप्रेमी, बचे तो मिपा कि जिंदगी'

हळूहळू असे अतिरेकी वाढत गेले कि हे संस्थळ म्हणजे 'टुकारांना पोसण्याचेच एक संस्थळ' बनून राहील असे वाटते. हे मिपा संस्थळ सामान्यांना वाचण्यासाठी आहे कि आंतरजालीय अतिरेक्यांना पोसण्यासाठी ?

अनेकांनी ह्या आंतरजालीय अतिरेक्यांच्या खोडसाळ आणि वैयक्तिक प्रतिसादाला दिलेली परखड उत्तरे संपादित झाली. मात्र त्यांनी केलेले एकांगी आरोप आणि अवांतर संपादित झाले नाही याचे आश्चर्य वाटते. मिपावर टुकार लेखन आल्याने काय तोटा होतो हे स्पष्ट करण्यास सांगितले तर या महाशयांनी स्वतःकडे मुद्दे नसल्याने 'अभ्यास वाढवा' असा चोमडेपणाचा सल्ला दिला. सदर आंतरजालीय अतिरेक्यांची सही आणि एकंदरीत सगळेच चाळे इथे का खपवून घेतले जातात ह्याचा खुलासा मिपासरकार करेल काय?

काही सूचना :-

  • सदर लेखन हे मौजमजा, विनोद ह्यासाठी केलेले एक विडंबन आहे. तेंव्हा उगाच 'मिपाचे नाव कशाला घातले ?' वगैरे भिकार शंका उपस्थीत करु नयेत.
  • लेखाशी संबंधीत व्यक्तींशी चर्चा करुनच त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या नावांचा लेखात समावेश केलेला आहे तेंव्हा उगाच आंतरजालीय पोलिस बनुन 'वैयक्तीक आरोपांचा धागा' वगैरे मुक्ताफळे उधळु नयेत.
  • मिपावर सर्वच सदस्य आमचे मित्र आहेत. त्यामुळे 'विशिष्ठ लोकांनी विशिष्ठ लोकांसाठी काढलेला हा धागा आहे' असा ज्यांचा समज होईल त्यांनी तातडीने चपला अडकवुन धाग्यावरुन निघुन गेल्यास अतिउत्तम.
  • 'आधी भन्नाट पुर्ण करा' वगैरे आपुलकींच्या सल्ल्यांसाठी कृपया व्यनी अथवा खरडीचा वापर करावा.

प्रतिक्रिया

अगोदर वर्तमानपत्र, नंतर कपडे, आता तर त्यांना वाचायला खरडवही हवी आहे.

तुंरुगात कैद्याना कपडे वापरायला परवानगी नसते?

नगरीनिरंजन's picture

24 Dec 2010 - 12:39 pm | नगरीनिरंजन

शक्यता नाकारता येत नाही.

इंटरनेटस्नेही's picture

24 Dec 2010 - 12:08 pm | इंटरनेटस्नेही

जबरदस्त.. प्रत्येक वाक्याला हशा आणि टाळ्या!

मिपावरचे सिद्ध्हस्त लेखक परा यांनी पुन्हा एकदा धमाल उडवुन दिली आहे!

अमोल केळकर's picture

24 Dec 2010 - 12:37 pm | अमोल केळकर

मस्त विडंबन :)

अमोल

अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज चलो एक अवांतर डालेंगे, मरे तो मिसळप्रेमी, बचे तो मिपा कि जिंदगी'

तुफान !! लोल लोल आणि लोल ..
आजकालच्या भिकारचोट आणि वांझोट्या विषयांमुळे डोक्याला जो षॉट लागला त्यामुळे आम्हाला गिहाद हे शश्त्र हाती घ्यावे लागले होते ... त्यात विना ट्रेणिंग बर्‍याच चिल्ल्या पिल्ल्या नागरिकांचं ब्रेणवॉशिंग अगदी फुकटात झालं .. आणि ते देखिल गिहादात षामिल झाले होते.

- मिर्झा टारायत बेग
मुख्य गिहादी , पळ-कायदा

आत्मशून्य's picture

24 Dec 2010 - 7:56 pm | आत्मशून्य

तूमच्या प्रतीसादातील "डोक्याला जो षॉट लागला त्यामूळे" हा वैयक्तीक भाग फार महत्वाचा ठरतो तो तूम्ही प्लीज गडद करायला हवा होता त्यामूळे लोकांना तूमेच्या गिहादाबद्दलच का तर प्रत्यक्ष तूमच्या बद्दलही सहानूभीती वाटायची शक्यता नाकारता येऊ शकली नसती.
- ढणाढण

आजकालच्या भिकारचोट आणि वांझोट्या विषयांमुळे....
म्हणून आपण तसल्याच प्रतीसादांची क्लूप्ती शोधून ह्यावर मार्ग काढायचा प्रयत्न केलात काय ? हे म्हणजे तर रोगापेक्षां औषध जहाल.. असेच ना ?

शक्यता नाकारता येत नाहि.

- आत्नशुन्य

आत्मशून्य's picture

24 Dec 2010 - 8:16 pm | आत्मशून्य

-टारूबाळू

मी आत्ता घटनास्थळावर जाऊन आलो तर काही शवं आणि जखमी तसेच पडलेले आहेत.
काही तर विव्हळतानाही दिसले.
शिवाय "शक्यतेच्या " मशीनगन मधून होणारा गोळीबारही राहून राहून कान किटवतोय. ;-)

ता.क. मुंबईत चार अतिरेकी शिरले आहेत या बातमीशी या प्रतिसादाचा काहीही संबंध नाही.

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 4:43 pm | नरेशकुमार

शक्यता नाकरता येत नाही.

स्पा's picture

24 Dec 2010 - 12:44 pm | स्पा

कडक विडंबन

सामान्य मिपाकरांच्या भावना छान शब्दात मांडल्या आहेत.....
अनेक वाचक.. काहीतरी वाचायला मिळेल म्हणून येतात..
पण ते या एकमेकांवरच चाललेल्या चर्चा बघून कंटाळतात....

अनेक जेष्ट सभासद हल्ली धाग्यांचा वापर , खरडवही असल्यागत करू लागले आहेत, त्याला सुद्धा आळा बसायला हवा........

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 5:04 pm | अरुण मनोहर

काहीतरी वाचायला आपण येथे येतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न! (शक्यता नाकारता येत नाही)

अरे तुम्ही परत आलात....?
चान चान

-- वरुन गरोदर

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Dec 2010 - 12:52 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! ... =))

आणि हो, आधी भन्नाट पूर्ण कर. ;)

अवलिया's picture

24 Dec 2010 - 1:25 pm | अवलिया

हेच म्हणतो :)

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 4:47 pm | नरेशकुमार

असेच बोल्तो

विजुभाऊ's picture

24 Dec 2010 - 12:54 pm | विजुभाऊ

अनेकांनी ह्या आंतरजालीय अतिरेक्यांच्या खोडसाळ आणि वैयक्तिक प्रतिसादाला दिलेली परखड उत्तरे संपादित झाली. मात्र त्यांनी केलेले एकांगी आरोप आणि अवांतर संपादित झाले नाही याचे आश्चर्य वाटते. मिपावर टुकार लेखन आल्याने काय तोटा होतो हे स्पष्ट करण्यास सांगितले तर या महाशयांनी स्वतःकडे मुद्दे नसल्याने 'अभ्यास वाढवा' असा चोमडेपणाचा सल्ला दिला. सदर आंतरजालीय अतिरेक्यांची सही आणि एकंदरीत सगळेच चाळे इथे का खपवून घेतले जातात ह्याचा खुलासा मिपासरकार करेल काय?

आम्ही सर्कारात न्हाई तसंच इरोदात दिकुन न्हाई. पर य सरवसामाण्य णाग्रीक म्हून ज्ये काय वाट्तं त्ये लिवतो
डोके आणि कान लांब असतील तर जास्त ऐकू येते असा गैरसमज होऊ शकतो. अर्थात विधात्यानेच डोके रीकामी पाठवले नसेल याची विधात्याच्या क्यू ए डिपार्टमेन्ट ने काळजी घेतली असेल असा अनेकांचा गैरसमज असतो. त्याना नेहमीच वाटते की एखादी गोष्ट समजायला अभ्यासाची काय गरज. एकदा बारमतीच्या साहेबानी ( हो काना विसरलो नाहिय्ये) अण्णांबद्दल लिहिले होते की अण्णांच्या कडे ज्या तक्रारी येतात त्याना ते पुरावे समजतात.
तसेच काही लोक त्यांच्या डोक्यात जे विचार येतात तीच वस्तुस्थिती समजतात. त्यामुळे अभ्यास कशाचा करायचा हा त्याना प्रश्न पडतो.

१३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका अवांतर प्रतिसाद स्फोटाने १७ लेखांचा जीव घेतला आणि टुकार लेखनाने ५०-६० प्रतिसादक जखमी केले.

नेहमी होणार्‍या अशा विस्फोटात सर्वसामान्य सदस्यांचेच लेख बळी का जातात याचे आश्चर्य वाटते.
( जसे एन्काउन्टरमध्ये पोलीस कधीच जखमी होत नाहीत याचे आश्चर्य लोकाना वाटत असते. )

टारायत बेग ( म) यानी पूर्वी "यकनात बॉ" या णावाणे पासपोर्ट घेतला होता . त्या काळातील त्यानी दिलेली चांगल्या वर्तणूकीची हमी केंव्हा संपली याचिही चौकशी व्हावी

"यकनात बॉ"

ऑं????
विजुभाऊ ढिष्क्लेमर टाकायचं र्‍हायलं का?

छोटा डॉन's picture

24 Dec 2010 - 12:55 pm | छोटा डॉन

'आधी भन्नाट पुर्ण करा'

बाकी चालु द्यात ;)

- डॉन्या पाटील

सुहास..'s picture

24 Dec 2010 - 1:14 pm | सुहास..

विशिष्ठ लोकांनी विशिष्ठ लोकांसाठी काढलेला हा धागा असण्याची शक्यता नाकारता येत नाही .:)

अवांतर : पर्‍या मला नाही वाटत काही शेपट्या सऱळ होतील ते !! ;)

कालच याबाबत म्या एक कविता केली व्हती !! पण भितीपोटी टाकली नाय , आज टाकतो.

सकाळच्या रामपहारी मटावर
वाचुन परतल्यावर
मिपावर युवराजांचे
डोक्याला शॉट लावणारे
धागे काढताना
बघ तुला पर्‍या-टार्‍याची आठवण येते का ?

सोमवारच्या सकाळी-सकाळी
गुगलुन उत्तर मिळणारा
सोप्प्या प्रश्नाबद्दलचा मदतीचा
एकोळी धागा टाकताना
बघ तुला पर्‍या-टार्‍याची आठवण येते का ?

सावरकर-गांधी आणि सचिन
पुणे - मुंबई आणि अमेरिका
जकार्ता - काका आणि पाकिस्तान
गणपती - समर्थ आणि सनसनावळ
चावुन चोथा झालेल्या विषयावर,
काथ्याकुट करताना
बघ तुला पर्‍या टार्‍याची आठवण येते का ?

आपण दाढीचा कुठला शेव्हींग क्रीम वापरता ?
आपणास कुठला *न्डोम आवडतो ?
निलचित्रफिती कुठल्या चांगल्या ? विंग्लीश की मल्लु ?
असली *ट्ट उपट करणारी
कौल फोडताना
बघ तुला पर्‍या-टार्‍याची आठवण येते का ?

इंटरनेटस्नेही's picture

24 Dec 2010 - 1:28 pm | इंटरनेटस्नेही

आपण दाढीचा कुठला शेव्हींग क्रीम वापरता ?
आपणास कुठला *न्डोम आवडतो ?
निलचित्रफिती कुठल्या चांगल्या ? विंग्लीश की मल्लु ?
असली *ट्ट उपट करणारी
कौल फोडताना
बघ तुला पर्‍या-टार्‍याची आठवण येते का ?

जबरदस्त! आवडली कविता.. हे शेवटचे कडवे तर खासच...
-
(पर्‍या-टार्‍या आघडी सर्मथक) इंट्या-स्पावड्या आघाडी नेता, इंट्या.

गणपा's picture

24 Dec 2010 - 1:35 pm | गणपा

हा हा हा सुहाश्या विडंबन
एकदम जबरा रे

ह्या आधुनिक संताजी आणि धनाजींनी धागाकर्त्यांच्या मनात नक्कीच धडकी भरवली आहे ;)

मिसळप्रेमी X मिपा

याने अतिरेक्यांना उत्तेजनच मिळणार नाहीतर अजून काय. अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज चलो एक अवांतर डालेंगे, मरे तो मिसळप्रेमी, बचे तो मिपा कि जिंदगी'

हा ! हा! हा !
परा तुला साष्टांग नमस्कार !!

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 4:49 pm | नरेशकुमार

जिंदगी जिंदा-दिली का नाम हैं, मुर्दा दिल क्या खाक जिया करते हैं ??
याचा अर्थ काय हो बाई ?

आता घरुन बाबांची चिठ्ठी घेऊन ये मगच पुढच्या तासाला प्रवेश मिळेल
अन वरिल वाक्याचा अर्थ हि समजेल. ;-)
कसें ?

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 6:40 pm | नरेशकुमार

बाबा म्हणाले, कि शाळंला जाउ नगस,
इथच मिपा मिपा खेळत बस, इतिहास, भुगोल, शास्त्र, राजकारन समदं शिकुन व्हैल (फुकटात)

थान्कु

आता घरुन बाबांची चिठ्ठी घेऊन ये मगच पुढच्या तासाला प्रवेश मिळेल

बाबा म्हणाले, कि शाळंला जाउ नगस,
इथच मिपा मिपा खेळत बस, इतिहास, भुगोल, शास्त्र, राजकारन समदं शिकुन व्हैल (फुकटात)


वरील दोन्ही वाक्यात "बाबा" या शब्दा ऐवजी " वडील" हा शब्द वापरता येईल का?

आणि आणि विडंबन.
पर्‍या तुला सांष्टांगदंडवत.
>=O०>

काही अतिरेकी आतूनच संस्थळ पोखरत असल्याची शक्यता किती?

अवलिया's picture

24 Dec 2010 - 1:26 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

छोटा डॉन's picture

24 Dec 2010 - 1:38 pm | छोटा डॉन

सहमत असण्याला समर्थन आहे.
आजकाल अतिरेकी कोणत्या रुपात येतील ते काय सांगता येते होय, समोरुन दंबुक घेऊन आला तर ओळखता तरी येईल, पण सभ्य कपड्यात सुटाबुटात बॉम्ब घेऊन आलेल्या अतिरेक्याचा धोका आहेच की ;)

- ( एटीसी )छोटा डॉन

यशोधरा's picture

24 Dec 2010 - 1:45 pm | यशोधरा

अगदी, अगदी. आणि त्यात व्यवस्था ढिसाळ असली किंवा सुटाबुटात असला म्हणून अतिरेक्याला अतिरेकी कसे म्हणायचे, अशी मानसिकता असली की असल्या अतिरेक्यांचे अजूनच फावू शकते - नव्हे फावताना दिसतच आहे.

पूर्वीचे हसते खेळते मिपा पुन्हा कधीतरी पहायला मिळेल का असे वाटते मात्र.

छोटा डॉन's picture

24 Dec 2010 - 1:49 pm | छोटा डॉन

व्यवस्थाच ठिसाळ आहे अशी कल्पना असल्यास स्वतःची जबाबदारी वाढते, उगाच कशाला व्यवस्थेवर विसंबुन रहायचे ? आपण एकदा सावध असलो की सुटाबुटातला किंवा दंबुक घेऊन, कसलाही अतिरेकी आला तर आपल्याला काय धोका ?
असुरक्षित स्थळी सावधपणे जाणेच योग्य, अन्यथा जाऊच नये.

- छोटा डॉन

अवलिया's picture

24 Dec 2010 - 1:52 pm | अवलिया

गेटवे ऑफ इंडीयावर अतिरेक्यांचा धोका असल्याने लोकांनी घरातच बसावे, तिथे जाऊच नये असे मुंबई पोलीसांनी सांगितल्यासारखे वाटले. ;)

दुर्दैवाने शमत, आणि थोडक्यात असे आहे ह्याची कबुलीही. :(
होपफुली, पाठींबा नसावा...
असो.

छोटा डॉन's picture

24 Dec 2010 - 2:00 pm | छोटा डॉन

चालायचेच नान्याबा, मुळ प्रतिसादातला 'सावध' हा शब्द पहा बरं जरा, त्याने अर्थ बदलतो की नाही ?

बाकी कसं आहे की अतिरेक्यांच्या धोका नाही अशी जागाच नाही. पण तरीही जगाचे रहाटगाडगे चालुच आहे, चालु रहणारही आहे, मात्र व्यवस्थेवर विश्वास हवा. तोच जर नसेल तर वाघा बॉर्डर काय आणि व्हाईट हाऊस काय, सगळेच सारखेच.
मनात असलेली 'असुरक्षिततेची भिती' हाच मोठ्ठा धोका आहे, बाकी अतिरेकी वगैरे संभाळायला संबंधित संस्था समर्थ असेलच की.
अहो कित्येकदा तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळतही नाही की मुंबई पोलिसांनी केवढा मोठ्ठा कट उधळुन लावला आणि शांतता कायम ठेवली, ते ही चालायचेच, सगळेच कसे ओपनली सांगता येईल, नै का ?

असो, आमुचा राम राम घ्यावा :)

- छोटा डॉन

हांग आश्शी ! आता कसे डान्राव फार्मात आले ! लगे रहो ! आमचा तुम्हाला पाठिंबा आहे...

बाकी ते बोरुडे फरार झाले ते सापडले का? कारवाई चालुच असेल असे वाटते ;)

तरीही अतिरेकी राजरोस धुमाकूळ घालतात हे आश्चर्यच. काहीच चुकत नाही वा सर्व आलबेलच आहे, असेच असल्यास बोलणेच राहिले. असो.

अभिजीत , पता लगाव इस संस्थळ पे कोन कोन ऐसा है जो बिना लायसन्स गन लेके घुम रहा है .. दया , तुम ये डान्या का फर्ब्निचर तोड दो , खुद को एटीसी बोल रहा है ..

-एसिपी प्रद्युमन

अविनाशकुलकर्णी's picture

24 Dec 2010 - 1:31 pm | अविनाशकुलकर्णी

विकि लिक..... मिसळ लिक

एक मस्त धागा सुचला होता...
अंघोळ कुठल्या पाण्याने करता? गार कि गरम..

नाहि टाकत..कोण जिव धोक्यात घालणार?

सूर्यपुत्र's picture

24 Dec 2010 - 4:25 pm | सूर्यपुत्र

की हिवाळ्यात आंघोळ पाण्याने करता की बिन-पाण्याने असा धागा असेल...:)

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 4:51 pm | नरेशकुमार

हिवाळ्यात कोणा बरोबर आंघोळ करायला आवडते ?
असाहि चालु शकेल.

sneharani's picture

24 Dec 2010 - 1:39 pm | sneharani

मस्त विडंबन!

डावखुरा's picture

25 Dec 2010 - 12:08 am | डावखुरा

प्र.का.टा.आ.

नितिन थत्ते's picture

24 Dec 2010 - 1:58 pm | नितिन थत्ते

बडे बडे संस्थळोंपर ऐसी छोटी घटनाएं होती रहती हैं.

शमत है ! थत्तेमिया(वरीजीनल) को छोटे संस्थळ पर हुई बडी घटना का अणुभव होणे के कारन वो शही बोल रहे है !

टारझन's picture

24 Dec 2010 - 2:03 pm | टारझन

=)) =)) =))

योगी९००'s picture

24 Dec 2010 - 2:00 pm | योगी९००

भन्नाट...

एक सुचना राहिली वाटते...
मिर्झा टारायत बेग व मौला अवलिया ही नावे फक्त अतिरेक्याच्या नावाशी साधर्म्य म्हणून ठेवली आहेत..येथे कोठल्याही धर्माचा संबंध नाही.

एकाद्या विक्षिप्त साध्वी अतिरेकीणीचे नाव राहिले काय? (ह. घ्या)

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 4:53 pm | नरेशकुमार

जोडे मारायचे आनि वर परत ह. घ्या.

एकाद्या विक्षिप्त साध्वी अतिरेकीणीचे नाव राहिले काय? (ह. घ्या) >>>

तशी शक्यता नाकारता येत नाहि.

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 2:51 pm | धमाल मुलगा

मला हे मुद्दे पटतात.
अशा अतिरेक्यांना 'सहिष्णू' आणि 'सेक्युलर' सरकारच्या गरीबपणामुळे जास्त चेव चढतो.
पकडले गेलेले अतिरेकी आम्ही भरलेल्या करातून खरडबिर्याण्या आणि व्यनिरोट्या चापतात आणि आम्ही मात्र काही चूक नसताना एकदा धाग्यावर गेलो की परत जिवंत स्वगृही येऊ की नाही अशी धास्ती मनात घेऊनच वावरतो.

एक गोष्ट मनापासून सांगतो, मिपा-स्पिरिट वगैरे काही नाही. रोजची पोट जाळायची..हे आपलं...वाचन करायची गरज आणि इच्छा ह्यापायी घटना घडून गेली तरी आम्ही मुर्दाड मनानं पुन्हा दुसर्‍या दिवशी सात अठ्ठावीसची फाष्ट लॉगिनलोकल पकडायला पुन्हा दादर्‍याखाली गर्दी करतोच....

सरकारने अशा अतिरेक्यांना त्यांच्याच पध्दतीने शिक्षा केली पाहिजे. भर चौकात बांधून गोळ्या मारल्या पाहिजेत..दगडांनी ठेचून काढलं पाहिजे.....
सरकारने अतिरेक्यांना जनतेच्या हवाली करावं....जनताच काय तो न्याय करेल.

जय हिंद जय महाराष्ट्र जय मिपा.

-सामान्य नागरिक.
मी मिपाचा, मिपा माझं.

सुरुवात डुपलिकेट आयड्यांच्या मुखवट्यांमागच्या 'एकूणएक' खर्‍या चेहर्‍यांची नावं जाहीर करुन होऊदे. कोणाचेही नाव दडवू नका.

अगदी अगदी!
हौन जाऊंदे! एकडाव तरी सर्कार्ने सामान्य जन्तेला विशवासात घिउन म्हायती ओपन करैला हविये. काळाचि गर्ज अहे ती! आज सर्कार्ने म्हाय्ती ओपनलि तर बराच है, नैतर पुढेमागे विकिलिक्सला दुसरा काय पन काम उरला नाय की ते ओपनतीलच! =)) =))

बाकी पंत आणि आत्याला आपला सप्पोर्ट हैच! ते जर आमरण उपोषण वगैरे करणार असतील तर आपणसुद्धा एकवेळचा चहा सोडायला तयार हौत!

--असुर

यशोधरा's picture

24 Dec 2010 - 5:03 pm | यशोधरा

मेल्या! =)) आयजीच्या जिवावर का रे मेल्या? =))
तूच बस उपोषणाला, त्येवढंच कमी खाशील मेल्या. नाय तर नव्या दमाचे कार्यकर्ते (बिपिन नव्हेत :D ) कशे तैय्यार व्हनार? आँ?

पर असं कायबी व्हनार न्हाय रं सोन्या.. गप पड आपला तू तिकडं. :(

बगा!! येवडा सप्पोर्ट दिला तरी लोक मनावर घ्येत नायत! कसं व्हायचं या देशाचं?
पायजेल तर मी आमच्या मंडळाचा सप्पोर्टपण झाईर करतो. कुनीतरी असलं कायतरी क्येल्याशिवाय खर्रीखर्री म्हायती भायेर येनार नै!! =)) =))

--असुर

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 5:23 pm | परिकथेतील राजकुमार

माहितीच्या अधिकाराखाली काय माहिती मिळते का बघ ;)

पराण्णा हजारे

असल्या अधिकारांच्या कश्या सुरनळ्या होतात हे तुम्हापेक्षा कुणास जास्त ठाउक असेल अण्णा?
याआधीच्या सुरनळ्या जपून ठेवल्या असतील तर उलगडून पहाव्यात. कचरापेटीहून अधिक मोल नाही त्यांचे अण्णा, हल्ली जमाना खरं बोलणार्‍यांचा र्‍हायला नाहीये म्हणे!

--असुर

यशोधरा's picture

24 Dec 2010 - 5:25 pm | यशोधरा

है का आत्ता! मग कर की, अगदी मरीस्तोवर उपाशी र्‍हा की लेका! ऑ?
हित्तं कोनाला काय फरक बिरक पडंल आस वाट्टय का तुला? येडंच हाय! अशी ही निस्ती हूल द्याची आसतीया. समाजलं का? खरच म्हायती भायीर यायची असती आनं खरच बंदोबस्त करायचा आस्ता तर त्यो कधीच झाला असता ल्येका! जा आता. आभ्यास वाढीव जरा, मंग समजंल आनि उमजंल.

जावंद्या. खरं बोलनारे वाईट असन्याचा जमाना है पोरा. आता गपचिप बस.

असुर's picture

24 Dec 2010 - 5:39 pm | असुर

खरं बोलनारे वाईट असन्याचा जमाना असल्याने गप पडलो आहे! खोटं बोलन्याची प्र्याक्टीस सुरु केल्येली आहे!!

--असुर

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Dec 2010 - 6:05 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!!

नव्या दमाचे कार्यकर्ते तय्यार आहेत...

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 3:18 pm | llपुण्याचे पेशवेll

खुलासा करणार नाही. ज्जा!

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 3:29 pm | नरेशकुमार

हम्म.....
याल म्हनत्यात 'जान जाय पर वचन न जाय'

प्राजक्ता पवार's picture

24 Dec 2010 - 4:01 pm | प्राजक्ता पवार

मस्तं !

ज्या गोडबोल्या अतिरेक्यांच्या यादीत नाहीत त्यांच्यावरही पार्ट २ होऊन जाऊ दे रे परा .. न्हाईत जळुन जळुन पावशेराचे आतपाव व्हत्याल =)) हे गोडबोले अतिरेकी हल्ली मराठीचं आणि जालसंस्कृतीचं उक्तं फक्त स्वत:च्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात वावरतात म्हणे :) आणि ते एकटेच मराठीचा उद्धार करत आहेत असं त्यांना वाटतं :)
त्यांच्या टिर्‍र्‍या ताशाच्या काड्यांनी शेकता येतील म्हणजे =))

- (गोडबोले द्वेष्टा) टारझन

सुहास..'s picture

24 Dec 2010 - 4:13 pm | सुहास..

हे गोडबोले अतिरेकी हल्ली मराठीचं आणि जालसंस्कृतीचं उक्तं फक्त स्वत:च्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात वावरतात म्हणे >>>>

=))

हेच लिहीत होतो पान भरुन , पण चार शब्दात लिहीलस !! धन्स

टारझन's picture

24 Dec 2010 - 4:20 pm | टारझन

खल्लास्स!
युव्वर थिंकिंग इज राईट ..आय से!

सुहाश्या , सुहाश्या , सुहाश्या.. (असं पण्णास वेळा म्हणायचं , ग्गोग्गो वाट्टं ) अरे तुझा हा प्रतिसाद येणारच हे माहित होतं रे वाचताना आपोआप डोळे पाणावले रे ..अंमळ बादल्या भरल्या रे ..

च्यायला, ह्याला म्हणतात ग्रेट पिपल थिंक अलाईक का काय ते =))

- गोडबोले

चिंतामणी's picture

24 Dec 2010 - 11:12 pm | चिंतामणी

म्हणजे (राजकाराणात) उजवे म्हणतात ते हेच का??????

अवलिया's picture

24 Dec 2010 - 5:34 pm | अवलिया

हे गोडबोले अतिरेकी हल्ली मराठीचं आणि जालसंस्कृतीचं उक्तं फक्त स्वत:च्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात वावरतात म्हणे >>>>

हेच अगदी असेच... च्यायला यांच्या टेर्‍या झोडल्या पाहिजेत चिंचेच्या फोकाने..

चिंतामणी's picture

24 Dec 2010 - 4:14 pm | चिंतामणी

ह.ह.पु.वा.

प्रीत-मोहर's picture

24 Dec 2010 - 5:04 pm | प्रीत-मोहर

___/\___

धन्य आहात परासाहेब

विजुभाऊ's picture

24 Dec 2010 - 5:33 pm | विजुभाऊ

अरेच्चा इथे मघाशी काही प्रतिसाद दिसत होते.
ते आत्ता का दिसत नाहीय्येत.
सरकारने त्याना पंख फोडले वाट्तं

अवलिया's picture

24 Dec 2010 - 5:35 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.