भ्रष्ट भारतीय पत्रकारिता

बेभान's picture
बेभान in काथ्याकूट
23 Dec 2010 - 7:26 pm
गाभा: 

नुकत्याच देशाला हादरवून ठेवलेल्या २जी घोटाळ्याबाबत मिसळपाववर उदासिनता ?
मला यावर बी.बी.सी.वरचा (http://www.bbc.co.uk/blogs/thereporters/soutikbiswas/2010/11/indian_medias_credibility_crisis.html) सौतिक बिस्वास यांचा हा लेख मिपाकरांबरोबर शेअर करण्यास आवडेल. त्यालेखावरील प्रतिसाद वाचण्यास विसरू नका.

भारतीय भ्रष्ट सरकारचे पत्रकारितेसोबत असलेले साटे-लोट्याचे संबंध यातून बाहेर आले. भारतीय मिडीयाच्या जागरूकतेबद्दल भारताबाहेर आधीच प्रश्नचिन्ह आहे पण ज्युलिअन असांजसारख्या व्यक्ती भारतीय मिडीयामध्ये असलेल्या सामर्थ्याबाबतीत आणि त्यांच्या भविष्याबाबतीत सकारात्मक आहेत (http://timesofindia.indiatimes.com/india/TOI-doing-good-work-Assange/art...) . २जी घोटाळा काय समोर आला कुठल्याही वृत्तवाहिनीवर्/वृत्तपत्रांमधे कॉमनवेल्थ घोटाळयाबद्दल बातम्या यायच्या बंद. हे असं का आहे? विकीलिक्ससारखी कल्पना तेहेलकाच्या तरूण तेजपालने भारतात आधी आणली होतीच की. तो ही गुन्ह्यांत अडकला /अडकवला.
तुमचं भारतीय पत्रकारितेवरचं काय मत आहे?
विषय जरी जुनाट असला तरी यावेळी नविन कलाटणी मिळण्याची दाट शक्यता आहे असे मला वाटते.
बाकी सुजाण मिपाकर यावर प्रकाश टाकतीलच.

अवांतरः शेखर कपूर भारतीय संविधानावर :18th day of Parliament deadlock. Guess what? we can do without them!

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

23 Dec 2010 - 7:30 pm | गांधीवादी

मी भारतीय संविधानावर :18th day of Parliament deadlock. Guess what? we can do much better without them!

टारझन's picture

23 Dec 2010 - 7:31 pm | टारझन

विषय जरी जुनाट असला तरी यावेळी नविन कलाटणी मिळण्याची दाट शक्यता आहे असे मला वाटते.

शक्यता नाकारता येत नाहि.

- भानिल

बंधो टारझन,

शक्यता नाकारता येत नाहि.

आपल्या विनयशील स्वभावाचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे! ;-)

लेख : भ्रष्ट भारतीय पत्रकारिता
लेखक : बेभान (कार्यकाल २ वर्षे ७ महिने.)
शब्द : अंदाजे १५०
ओळी : १३
विषय : ज्वलंत / टिआरपी खेचणारा / झाडावर मचाणांची संख्या वाढविणारा.

लेखाच्या सुरवातीच्या वाक्यातच लेखक मिसळपाववर येणार्‍या लिखाणामध्ये ए.राजा या मंत्र्याने,देशाला हादरवून ठेवलेल्या २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत मिसळपाव वरील लेखक उदासिन का आहेत असा प्रश्न विचारुन अवांतराला आंमत्रण देतात. लेखाचा विषय हा " भ्रष्ट भारतीय पत्रकारिता " असा असला तरी लेखकाने स्वताच दोन वर्तमानपत्रातील लिंका दिल्या आहेत व त्यावर पत्रकारिता याविषयावर चर्चा करावी असे सहेतुक कळविले आहे, त्यात हा विषय जुना जरी असला तरी नव्याने उघडल्याने त्यास कलाटणी मिळेल अशी आशा ही तो करतो.

' भारतीय पत्रकारिता भ्रष्ट असणे किंवा नसणे ' या चर्चेच्या प्रस्ताव दाखल करताना ,लेखकाने कोणे एके काळी गाजलेले ,स्टींग ऑपरेशनने भरपुर, 'तरुण तेजपाल'चे भाजपावर आग्यामोहोळ उठविणारे प्रकरण उदाहरणा दाखल दिले आहे (काल-परवा कोण्या एका मंत्र्याच्या मुलाखतीत भाजपाच्या मंत्र्याने याच प्रकरणापायी राजिनामे दिले नाहीत असे भर दुरचित्रवाणीच्या कुठल्याश्या वाहिनीसमोर सांगितले हा लेखकाच्या लेखन-विषयाशी असलेला निव्वळ योगायोग आहे असे समजावे.)

शिवाय , कळमारी...माफ करा..कलमाडीचे कॉमन-वेल्थ प्रकरण देखील दाखल्यावानगी लेखकाने समोर आणले आहे. त्या भ्रष्टाचारा-प्रकरणी त्या प्रकरणाच्या बातम्या अचानक गायब व्हायचे काय कारण आहे असेही लेखक म्हणतो. सध्या ते प्रकरण न्याय -प्रविष्ट आहे (आदर्श प्रकरण ही. ) याचा लेखकास विसर पडला असावा. शिवाय ते प्रकरण ही मिडियानेच बाहेर काढले याचा ही लेखकास विसर पडलेला दिसत आहे. बेभान आपल्या नावाला जागत आहेत की काय अशी शंका दोन मिनीटे आल्याशिवाय रहात नाही.

अवांतर : अवांतरात दिलेली माहीती दोन आठवड्यांपुर्वीची आहे. ती दाढीतल्या दाढीत हसणार्‍या शेखर कपुरांची टिप्पणी हास्यास्पद जरी असली तरी लेखकाने ती इथे देण्याचा संदर्भ समजला नाही याची नोंद घ्यावी. मिपाकर इग्रंजी वर्तमानपत्रे वाचत नाहीत असा लेखकाचा समज झालेला दिसतो आहे.

धन्यवाद !

चिंतामणी's picture

24 Dec 2010 - 12:55 am | चिंतामणी

विषय : ज्वलंत / टिआरपी खेचणारा / झाडावर मचाणांची संख्या वाढविणारा.

ऐवजी विषय : ज्वलंत / टिआरपी खेचणारा / झाडावर मचाणांची संख्या आणि पॉपकॉर्नचा खप वाढविणारा धागा.

;)

शक्यता नाकारता येत नाहि.

- चुडामणी

बेभान's picture

24 Dec 2010 - 11:18 am | बेभान

सुहासराव टिप्पणीबद्दल धन्यवाद...!! आपला प्रतिसाद आमच्यासारख्या अतिसामान्य/टूकार लेखकासाठी खूप प्रेरणादायी आहे. लेख भरकटलेला असल्याचे कारणे बरीच आहेत. मुळात लेखनाचा आणि आमचा लांब-लांब पर्यंत संबंध नाही. हा पदार्थ कशाबरोबर खातात हेच मुळी आम्हाला माहीत नाही. तरीही ब-याच दिवसानंतर /महिन्यानंतर असले धाडस केले (मनात कुठेतरी भीती होतीच आपल्यासारख्या व्यक्तींना मिपावर हे अतिक्रमण आवडणार नाही म्हणून) . मला जर माहिती असते की इथे लेखकाच्या कार्यकालावर, त्याच्या लेखनाची शब्दसंख्या, ओळी इ. वर त्याचे प्रतिसाद अवलंबून असतात तर हे धाडस आमच्याकडून कधीच झाले नसते तरीही हा अनुभव आम्हाला शहाणपण देवून गेला असेच म्हणेन. आमच्या या लेखनामुळे आपल्या आयुष्यात आलेल्या निराशेच्या लाटेबद्दल क्षमस्व. आशा करतो की तुम्ही आम्हाला माफ कराल.
मिसळपाव हा पहिल्यापासून आमच्यासारख्यांसाठी एक माहितीचा उगम आहे. इथे आपल्यासारख्या प्रतिभाशाली व्यक्तींकडून काहीतरी शहाणपण शिकावे, माहीती मिळावी एवढीच (आमच्यासारख्यांची) अपेक्षा असते. आमचा हेतू ज्वलंत / टिआरपी खेचण्यासाठी / झाडावर मचाणांची संख्या वाढविण्यासाठी अजिबात नव्हता. असो मिपा हे फक्त आपल्यासारख्या प्रतिभावंत, लेखनशैलीची जाण असलेल्या लोकंसाठीच आहे हे पुन्हा लक्षात आले. हो पण निर्धास्त रहा आपल्याला यापुढे असले भिकार लेख (किमान आमच्याकडून तरीही) इथे पहायला मिळणार नाहीत याची काळजी घेवू.
_/\_

बाकी अंसाजेशी सहमत आहेच.

विकि's picture

24 Dec 2010 - 12:19 am | विकि

भ्रष्ट भारतीय पत्रकारिता हे जे लिहीले आहे तेच चुकीचे आहे. पत्रकारिता भ्रष्ट नाही होऊ शकत तर पत्रकार भ्रष्ट्राचारी होऊ शकतात. सग़ळ्यांना एका मापात तोलू नका. बेभान रावांना भारतीय पत्रकारांच्या कोणत्या प्रकाराबद्दल माहिती हवी आहे,. कारण पत्रकारांचे बरेच प्रकार असतात. प्रसारमाध्यमे होती म्हणूनच आतापर्यंत कितीतरी प्रकरणे बाहेर आली. तेव्हा दहा , पंधरा जणांमुळे अख्खी पत्रकारीता भ्रष्ट झाली असे तुम्ही म्हणू नाही शकत. पण पत्रकारितेत थोडे व्यावहारीकपण आले आहे. ते कसे ते पहा ? सर्व वृत्तपत्रे कोणाच्या हातात आहेत . मालकांच्या , मालक कोण ? भांडवलदार , राज्यकर्ता. इथे पत्रकार आपली भूमिका मांडणार कसा? जाहिरांतीचा जमाना आहे.,पण एक आहे , आज नव्या पिढीत चांगला पत्रकार दिसत नाही. कारण लोकांनाच बौध्दीक वाचन आवडत नाही.
तसेच , आज जनतेच्या हातात " माहितीचा अधिकार " यासारखे शस्त्र आहे. त्याचा वापर करून कितीतरी गोपनिय माहीती मिळवता येत आहे.
आता बेभान राव मी थोडक्यात म्हणणे मांडले ,तुम्हाला काही वाटल्यास विचारा.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 11:47 am | llपुण्याचे पेशवेll

पत्रकारिता भ्रष्ट नाही होऊ शकत तर पत्रकार भ्रष्ट्राचारी होऊ शकतात.
सैन्य भ्रष्ट होऊ शकत नाही सैनिक भ्रष्ट होऊ शकतात. पण बहुसंख्य सैनिक भ्रष्ट असतील तर सैन्य भ्रष्ट आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय असणार का ?
असो.

अवलिया's picture

24 Dec 2010 - 11:51 am | अवलिया

रोचक प्रतिसाद. यावर अनेक मान्यवरांचे प्रज्ञापूर्ण प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नाहि.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 1:01 pm | llपुण्याचे पेशवेll

खरे आहे. शक्यता नाकारता येत नाही.

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 6:59 pm | नरेशकुमार

चालु द्या

अनेक मान्यवरांचे प्रज्ञापूर्ण प्रतिसाद
चला माझि एक प्रतिक्रिया झालि. आता अजुन कोनाचि बाकि राहिलि ?

अवलिया's picture

24 Dec 2010 - 8:57 am | अवलिया

मला माहित असलेले बरेचसे पत्रकार हाडाचे* आणि वस्तुनिष्ट** आहेत.

* आणि ** जाणण्यासाठी व्यनी करा.

नगरीनिरंजन's picture

24 Dec 2010 - 9:00 am | नगरीनिरंजन

शक्यता नाकारता येत नाही.

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 7:01 pm | नरेशकुमार

सगळिच हाडाचि अस्तात. बिन हाडाचि कोन हैत इथं ?

चिरोटा's picture

24 Dec 2010 - 9:50 am | चिरोटा

तुमचं भारतीय पत्रकारितेवरचं काय मत आहे?

ईतर-पाश्चात्य देशांतल्या पत्रकारितेसारखीच आहे.प्रामाणिकपणे संशोधन करून राजकारण्यांना अडचणीत आणणारे अनेक पत्रकार आहेत.शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा खोलवर अभ्यास करुन सरकारला अडचणीत आणणारे (पी.साईनाथ) पत्रकार आहेत.
गेल्या काही वर्षात Investigative journalism भारतात रुजला आहे ही चांगली गोष्ट आहे.
ईतर क्षेत्रांप्रमाणे काही काळ्या बाजु आहेतच.

बातमी ही सनसनाटी असायला पाहिजे .. मग त्यात सत्यतेचा अंश असो /नसो हे आजकालच्या बहुसंख्य ( काही सन्माननीय अपवाद आहेत ) पत्रकारांचे मार्गदर्शक तत्व आहे .

पत्रकार हा निरपेक्ष असावा आणि त्याने बातमी आहे तशी लोकांपर्यंत पोहोचवावी त्यावर स्वतःचे मत काय आहे ? किंवा त्या बातमीचा त्याच्या दृष्टीकोनातून काय अर्थ आहे हे सांगणे अपेक्षित नाही . बातमीचे विष्लेशण करण्याचे काम अभ्यासकांवर किंवा त्या विषयातील तज्ञ व्यक्तींवर सोपवायला पाहिजे ..

कुठल्या बातमीला किती महत्व आणि स्थान द्यायचे याचे तारतम्य बाळगणे जरूरीचे आहे असे वाटते . तसेच आपल्या हाती पत्रकारितेचे शस्त्र आहे ते जबाबदारीने बापरणे जरूरीचे आहे . लोक चवीने वाचतात्/ऐकतात म्हणून तुम्ही एखाद्याच्या खाजगी आयुष्यावर किती अतिक्रमण करणार ?
मधे मी एका प्रसिद्ध पत्रकार/ संपादिकेची मुलाखत ऐकली -- त्या म्हणाल्या लोकांना मसाला हवा असतो आम्ही तो आमच्या बातम्यांमधे /लेखांमधे घातला नाही तर लोकं वाचणार नाहीत .. आणि म्हणे एकदा तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती झालात कि तुमचे खाजगी आयुष्य संपते , ती तुमच्या प्रसिद्धीची किंमत असते .. हे खरं आहे कि प्रसिद्ध व्यक्तिंबद्दल लोकांना उत्सुकता असते पण म्हणून त्यांच्या खाजगी आयुष्यात कोणी आणि किती ढवळाढवळ करायची , त्याला काहीच मर्यादा नाहीत का?