भ्रष्ट भारतीय पत्रकारिता
नुकत्याच देशाला हादरवून ठेवलेल्या २जी घोटाळ्याबाबत मिसळपाववर उदासिनता ?
मला यावर बी.बी.सी.वरचा (http://www.bbc.co.uk/blogs/thereporters/soutikbiswas/2010/11/indian_medias_credibility_crisis.html) सौतिक बिस्वास यांचा हा लेख मिपाकरांबरोबर शेअर करण्यास आवडेल. त्यालेखावरील प्रतिसाद वाचण्यास विसरू नका.
भारतीय भ्रष्ट सरकारचे पत्रकारितेसोबत असलेले साटे-लोट्याचे संबंध यातून बाहेर आले. भारतीय मिडीयाच्या जागरूकतेबद्दल भारताबाहेर आधीच प्रश्नचिन्ह आहे पण ज्युलिअन असांजसारख्या व्यक्ती भारतीय मिडीयामध्ये असलेल्या सामर्थ्याबाबतीत आणि त्यांच्या भविष्याबाबतीत सकारात्मक आहेत (http://timesofindia.indiatimes.com/india/TOI-doing-good-work-Assange/articleshow/7142155.cms) . २जी घोटाळा काय समोर आला कुठल्याही वृत्तवाहिनीवर्/वृत्तपत्रांमधे कॉमनवेल्थ घोटाळयाबद्दल बातम्या यायच्या बंद. हे असं का आहे? विकीलिक्ससारखी कल्पना तेहेलकाच्या तरूण तेजपालने भारतात आधी आणली होतीच की. तो ही गुन्ह्यांत अडकला /अडकवला.
तुमचं भारतीय पत्रकारितेवरचं काय मत आहे?
विषय जरी जुनाट असला तरी यावेळी नविन कलाटणी मिळण्याची दाट शक्यता आहे असे मला वाटते.
बाकी सुजाण मिपाकर यावर प्रकाश टाकतीलच.
अवांतरः शेखर कपूर भारतीय संविधानावर :18th day of Parliament deadlock. Guess what? we can do without them!
वाचन
3347
प्रतिक्रिया
0