काहीबाही.. (२)

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
23 Dec 2010 - 10:41 pm

काहीबाही.. (१)

तु गेलीस तसे, रस्त्यावर, ते कागदाचे कपटे माझ्याभोवती फेर धरुन नाचतात, सरळ अंगावर येउन जर्राशी लगट करुन भुर्रकन उडून जातात. जग जणु मुके होते, काळ थांबतो आणि तलम प्रकाशाच्या पडद्यातुन आठवणी झिरपतात.

------------------------------------------------------------------------------------------------------------

अजुन रामप्रहर आहे, पहाटच्या अंधारात जुईची फुले म्हणजे .. जणु रातभर आकाशी विहरुन क्लांत झालेल्या तारका जमीनीवर विश्रांतीला उतरलेल्या असाव्यात. मी एकेकीला कवेत घेण्याचा प्रयत्न करतो तसे त्यांचे अश्रू माझे हात ओले करतात. मी त्यांना पहाटचे दव असावे म्हणुन विसरण्याचा यत्नात भिजुन जातो.

------------------------------------------------------------------------------------------------------------

भुरभुरते केस .. सुरावटींचे अविष्कार आणि गुलजार .

हसुन ती मला म्हणाली .. मी तुला आवडते का रे ? मी म्हणालो .. आवडते ?? तुझा सहवास म्हणजे काव्यानुभुती !!

तिला मी त्या दिवशी म्हटले आठवणी कधी चिरंतन असतात का ग ? मग मी का नेहमी तु समोर असतांना तुझ्या आठवणीत असतो ? शेवटी हा आठवणींचा अतार्किक आलेख गुंडाळुन मी तिला म्हटले,

कसे व्हावे जगणे अवघड
कश्या व्हाव्यात वाटा धुसर
कसा पडावा त्रैलोक्याचा विसर
आणि चालावा फक्त आठवणींचा जागर ..

वाङ्मय

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

23 Dec 2010 - 10:47 pm | सुहास..

टिपीकल आंद्या !!(आमच्या औ.बाद लोकच जरा शब्दापल्ल्याडची हैत , घ्या उंची दोन इंच वाढवुन ;) )

आणि शक्यापशक्यतेच्या पलीकडच लिखाण !!

आठवणींचा अतार्किक आलेख गुंडाळुन >>>

अतार्किक असण स्वाभाविक , पण मग गुंडाळुन का रे?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2010 - 10:59 pm | निनाद मुक्काम प...

यकदम ग्वाड

यकु's picture

23 Dec 2010 - 11:42 pm | यकु

व्वा आनंद्यात्रीजी!
नॉस्टॅल्जीक* की कायसं म्हणतात तसं व्हायला झालं :)

*इंग्रजीत असले विचित्र शब्द का आहेत?
ऍनेमिक, नॉस्टॅल्जीक शी..शी..शी..

प्राजु's picture

24 Dec 2010 - 1:23 am | प्राजु

बर्र!!
जे काही आहे ते अगदी खोल हृदयातून आलेले आहे.. बस्स!! जियो!!

विजुभाऊ's picture

24 Dec 2010 - 10:07 am | विजुभाऊ

हसुन ती मला म्हणाली .. मी तुला आवडते का रे ? मी म्हणालो .. आवडते ?? तुझा सहवास म्हणजे काव्यानुभुती !!

हे झाले काव्यनुभुतीचे.... विडंबनाचे काय?
अर्थात विडंबन हे सुद्धा एक काव्यच असते
( पळा आंद्या मारनार आता.......... )

आमोद शिंदे's picture

24 Dec 2010 - 11:02 am | आमोद शिंदे

कसे व्हावे लाटणे अवघड
कश्या व्हाव्यात चपात्या धुसर
कसा पडावा फोडणीचा विसर
आणि खावी लागावी फक्त कोरडी भाकर ..

ऋषिकेश's picture

24 Dec 2010 - 10:57 am | ऋषिकेश

वा!!! छान!
"काहीबाही" आणि 'आनंदयात्री' ही नावे एकत्र बघुन लगेचच धागा उघडला आणि अजिबात विरस झाला नाही.. मस्त लिहिलं आहेस

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Dec 2010 - 11:00 am | बिपिन कार्यकर्ते

.

अवलिया's picture

24 Dec 2010 - 11:01 am | अवलिया

..