अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश : भारत

गांधीवादी's picture
गांधीवादी in काथ्याकूट
21 Dec 2010 - 7:37 pm
गाभा: 

जर्मन बेकरी बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा हिमायत बेग याला येरवडा कारागृहात वाचण्यासाठी कुराण, वर्तमानपत्र द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश उषा ठाकरे यांनी दिला.

१३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका बॉम्ब स्फोटाने १७ निष्पापांचा जीव घेतला आणि ५०-६० लोकांना जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग याला (७ महिन्यांनी) अखेर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने पुणे येथून अटक केली.

पुढे येरवड्यातील न्यायालीन कोठडीत असताना ह्या अतिरेक्याने हळूहळू आपल्या मागण्या सांगायला सुरुवात केल्या. अगोदर वर्तमानपत्र, नंतर कपडे, आता तर त्याला वाचायला कुराण हवे आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व मंजूर झाले. आज पुण्यात येरावाड्यापासून कोथरूडला जाण्यास जितका जीव धोक्यात घालावा लागतो त्याच्या कितीतरी कमी जीव धोक्यात घालून, यांनी बॉम्ब हल्ला करून आता तुरुंगात ऐश-आरामात जीवन जगत आहेत.

मला एक समजत नाही, कुराण हा एक पवित्र ग्रंथ आहे. १७ जणांचे जीव घेतलेल्या नराधमाला सरकार असे कसे काय कोणता धार्मिक ग्रंथ सोपवू शकते ? कुराण वाचून त्या 'बेग' मध्ये असा काय बदल घडणार आहे ? तो काय सगळ्या अतिरेकी कारवाया सोडून धार्मिक मार्गाला लागणार, कि अजून काही त्या ग्रंथातून भलते-सलते अर्थ काढून पुन्हा काही अघटीत करायचा विचार करणार ?

एखाद्या अतिरेक्याचे स्वातंत्र्य जपायचा हा अट्टाहास कशासाठी चाललेला आहे ? याने अतिरेक्यांना उत्तेजनच मिळणार नाहीतर अजून काय. अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज चलो एक बम डालेंगे, मरे तो जन्नत, बचे तो मजे कि जिंदगी'

हळूहळू असे अतिरेकी वाढत गेले कि हा देश म्हणजे 'अतिरेक्यांना पोसण्याचाच एक देश' बनून राहील असे वाटते. हा भारत देश सामान्यांना जगण्यासाठी आहे कि अतिरेक्यांना पोसण्यासाठी ?

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

21 Dec 2010 - 8:11 pm | डावखुरा

आपली संस्कृतीच आहे ती..
आणि हा देश गांधींचा आहे...(दुसरा गाल पुढे करणारा..)
प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे..

मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग , अजमल कसाब , अफजल गुरु ह्या परमात्म्यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेऊन अनेक जण आता असे महान कार्य करायला आणि आपले आदरतिथ्य स्वीकारायला तयार आहेत..

आपणही मागे न हटता त्यांच्यासाठी चांगल्या कारागृहांची व्यवस्था करुन ठेवायला हवी..
(तशी शिफारस कर्णारे पत्र पंतप्रधान/राष्ट्रपतींना पाठ्वीन म्हणतो..सवडीने)

तसेच सामान्य करदात्यांनीही अजिबात दिरंगाई न करता जे अनेक कर सरकारने लादले आहेत ते सर्व भरावेत..आणि अजुन लादले तरी काकु करु नये कारण ते आपल्या शाही पाहुण्यावरच खर्च होणार आहेत ना शेवटी आपली संस्कृती काय म्हणते "अतिथी देवो भव"

मुर्ख लोक आहेत जे संतापुन त्यांना चौकात आणुन फासावर देण्याच्या गोष्टी करतात .... अहो त्यांच्या आदरातिथ्याने आपल्या संस्कृतीचा,परंपरेचा डंका चहुकडे नाहीए का पसरत..

अमेरिकेसारखा मुर्ख देश तर मी आजवर पाहीला नाही...
सद्दाम ला मुद्दाम पकडला त्याच्यावर घाईघाईत खटला भरला आणि दोशी ठरवुन फाशी पण दिली अरे आधी आमचा सल्ला तर घेत्ला असता..
येवढे हाताशी आलेले अतिथी सेवेचे पुण्य घालावले छ्या....

गांधीवादी's picture

22 Dec 2010 - 6:18 am | गांधीवादी

>>मुर्ख लोक आहेत जे संतापुन त्यांना चौकात आणुन फासावर देण्याच्या गोष्टी करतात ....
मूर्खच नव्हे तर आजकाल व्यवस्थेविरुद्ध ब्र देखील काढला कि लगेच 'हिंदू दहशतवादी' म्हणून नामकरण होईल.

नितिन थत्ते's picture

21 Dec 2010 - 9:19 pm | नितिन थत्ते

परवाच एका चर्चेत 'हिंदू दहशतवादी' हा विषय चालू असताना "सिद्ध कुठे झालेय?" अशा अर्थाचा प्रतिसाद वाचल्याची आठवण झाली.

असो. हा तर न्यायालयाचा आदेश आहे. (बोटचेप्या सरकारचा नाही).

छळण्यासाठी. बाकी कोणी इस्लामी दहशतवादावीरूध्द लढा देत असेल आणी तो धर्माने हिंदू असलाच तर त्याला हिंदू दहशतवादी कसे म्हणता येइल, भलेही तो कायदेशीर व्याखेत दहशत्वादी म्हणून अडकला तरी जोपर्यंत तो असे म्हणत नाही की मी रामाचे, श्रीक्क्रुष्णाचे राज्य संपूर्ण प्रूथ्वीतलावर नीर्माण व्हावे म्हणून हल्ले घडवत आहे ?

आणी समजा तसे म्हटलाच तर हिंदू त्याला अक्कलशून्य नाही का म्हणनार कारण रामाचे, श्रीक्क्रुष्णाचे राज्य जर प्रूथ्वीवर यायचे आहे तर ते स्वतः अवतार घेतील यूध्दात कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामील होतील. ऊगीच धर्मरक्षणाचा क्लेम करणारा कोणत्याही हल्लेखोर इसमास कशाला पूढे करतील ?

जय हो जय हो जय हो जय हो जय हो ..........

(सदरील प्रतीसाद उपहासात्मक असून गांभीर्याने घेऊ नये ही विनंती)

विकि's picture

22 Dec 2010 - 12:28 am | विकि

थत्ते काकांशी सहमत.

गांधीवादी's picture

22 Dec 2010 - 6:19 am | गांधीवादी

>>असो. हा तर न्यायालयाचा आदेश आहे. (बोटचेप्या सरकारचा नाही).
अफझल चे काय ?

सरकारवर हवी तेवढी टीका करता येते, पण न्यायालयावर? ना बाबा ना! लगेच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल "अंदर" करायचे. पण म्हणजे ते टीकापात्र नाहींत किंवा बोटचेपे नाहींत असे नाहीं पण असे बोलायची (या लोकशाहीतसुद्धा) चोरी!

लगेच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल "अंदर" करायचे.

शक्यता नाकारता येत नाहि.

- वकिल

"प्रिझनर्स राईट्स्/ह्युमन राईट्स" ह्या विषयावर काही लँड्मार्क निर्णय झालेले असू शकतील.
हाच अतिरेकी काही काळाने जर सुटला तर आत जाताना ज्या वाईट मानसिक अवस्थेत गेला होता कमीत कमी त्याच अवस्थेत बाहेर यावा, त्याहून वाईट अवस्थेत येऊ नये ही कोर्टाची धारणा या मागे असू शकते. "प्रिझनर्स रिफॉर्म" नावची देखील काही गोष्ट असते.
या गोष्टींचा साधक बाधक विचार होऊन - कुराण, वर्तमानपत्र आदि पुरविण्यात येत असावे.

डावखुरा's picture

21 Dec 2010 - 11:00 pm | डावखुरा

शुचि तै छान युक्तीवद आहे...
समजा तथाकथित हिंदु पाकिस्तानात पकडला गेला (आपले कोळी-मच्छिमार) तर त्याला पाकिस्तानात त्याच्या दैनंदिन गर्जेच्या निदान जगायला आवश्यक खाणेबल खाद्य तरी पुरवतात का?
की त्याचेच मारुन मारुन भरीत करुन टाकतात?
(कृपया व्यक्तिगत घेउ नये..)

शुचि ताईंचे हे म्हणणे मान्य..

पाकिस्तानसारखीच आपलीही वागणूक असणे हे काही फार आय एस ओ प्रमाणपत्र नाही.

हाल हाल करत ठेवावे असे नाही. पण अति चैनीचे लाईफही देऊ नये.

उपरिनिर्दिष्ट कोर्टाने दिलेल्या गोष्टींमधे अतिचैनीची गोष्ट आहे का हा सापेक्ष विचार झाला. मला तरी त्यात काही ऐष वाटत नाही.

लवकर निर्णय न देणे / फाशीचे एक्झेक्युशन न करणे या दुरित गोष्टीच आहेत.

पण त्याच्या बाजूला कैद्यांना पाकिस्तान छळात ठेवते अशा माहितीने आपणही काहीसे तसे करावे हे कुठले लॉजिक?

ही सूडबुद्धी झाली.

मग सरळ सूडगत न्याय आणावा..जो बळी पडलाय त्याला/ त्याच्या अफेक्टेड जवळच्यांना न्यायदानाच्या प्रक्रियेत अधिकार द्या.

अपूर्व कात्रे's picture

22 Dec 2010 - 11:01 am | अपूर्व कात्रे

"My Years in a Pakistani Prison" हे किशोरीलाल शर्मा यांचे पुस्तक वाचा. कुठे काय चालू असते ते लक्षात येईल.

आणि अतिरेक्यांना कसला आलाय प्रिझनर्स राईट?? निष्पाप लोकांच्या Right to Live शी खेळताना काही वाटले नाही का त्यांना?

आपले-आपले धर्मग्रंथ घेऊन कां नाहीं जात?

सुनील's picture

21 Dec 2010 - 11:34 pm | सुनील

सरबजीत सिंग गेली २१ वर्षे पाकिस्तानी तुरुंगात आहे. पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावून आणि त्याच्या दयेचा अर्ज फेटाळला जाऊन आता ५ वर्षे लोटली आहेत. पाकिस्तानी सरकारने त्याच्या कुटुंबियांना, त्याला भेटण्यासाठी, पाकिस्तानचा विसादेखिल उपलब्ध करून दिला होता.

थोडक्यात भारत एकमेव नाही!

बाकी चालू द्या..

गांधीवादी's picture

22 Dec 2010 - 6:22 am | गांधीवादी

गेल्या २१ वर्षात त्याचे कीही हाल केले असतील देव जाने. इकडे कसाब, अफजल, बेग (कधीतरी सुटण्याच्या आशेत सुद्धा) ऐश मध्ये राहातायेत.
असो, कारगिल विसरलात का ?
इथे अमेरिकेचा आदर्श का ठेऊ नये ?

अविनाशकुलकर्णी's picture

22 Dec 2010 - 12:07 am | अविनाशकुलकर्णी

भगव्या..हिरव्या ..पेक्षाहि भयानक आतंकवाद..म्हणजे निधर्मी आतंकवाद.

डावखुरा's picture

22 Dec 2010 - 12:41 am | डावखुरा

काका जरा उलगडुन सांगा की....

शेखर's picture

22 Dec 2010 - 12:44 am | शेखर

काही आयडी ना फॉलो करा म्हणजे समजेल :D

डावखुरा's picture

22 Dec 2010 - 12:48 am | डावखुरा

कोणत्या आयडीना?

प्रतिसादांचा अभ्यास वाढवा

स्पष्ट सांगायचे असल्यास व्यनि करा

चंद्रू's picture

22 Dec 2010 - 1:00 am | चंद्रू

आता सगळ्या आतंकवाद्यांचा बाप निधर्मि आतंकवाद जलमला हाय. . हिंदू झाले, मुस्लीम झाले, ख्रिश्चन (बोडो) झाले, नक्षली झाले. लयच आतंकवादी व्हायला लागलेत. सगळ्या जगातले आतंकवादी भारतातच कसे काय र्‍हायला आले? या सगळ्या आतंकवादी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी रामाने नायतर कृष्णानेच पुना जलम घ्यायाला हवा आहे. राम कुटे जलम घेणार? तेवा आता बाबरी मशीदीच्या जागी राम जलमस्थान बांधायला लवकर घ्यायाला हवं.

चंद्रु आधी मुस्लीम,बोडो झाले हिंदुंबद्दल अजुन कोर्टात मॅटर हाये समजलं का? तवा जरा सांभाळुन काय...
क्रम संपादित करा राव अजुन आपल्याला तो मान मिळायला कोर्टाच्या पायर्या झिजवाव्या लाग्ण्रे... ;)

>>>>राम कुटे जलम घेणार? तेवा आता बाबरी मशीदीच्या जागी राम जलमस्थान बांधायला लवकर घ्यायाला हवं. >>>>

(अवांतर : हा युक्तिवाद त्या रामलल्ला दावेदार पेक्षा भारी नाही का वाटत?)

मिपावर लिवलं जातं ते सगळच कोर्टात(खालच्या नव्हे सुप्रीम) सिद्ध् झालेलं असतंय असं थोड़ंच हाय? अजून रामाच्या जलमस्थाणाबद्दल पण काय पण सिद्ध झालं नाय ? म्हणून काय आपण गेली तीस वर्ष जो घोळ घातलाय तो काय फुकट गेला काय? रामलल्लाचा सखा, दोस्त तर कोर्टाने मान्य केला का नाय ? तसंच हे पण माण्य होऊन जाईल. आपण थांबायची गरज नाय. आपन हिंदू काय कमी हौत की काय? सादा दहशतवाद आपल्याला जमत नाय हे म्हजे कायतरीच हा !

गांधीवादी's picture

22 Dec 2010 - 6:29 am | गांधीवादी

आपण कदाचित उपहासाने लिहिले असेल पण इथे एक गंभीरपणे नमूद करतो.
सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा आता अंत जवळ आलेला आहे. कोणीही शिवाजी, राम, गांधी आता पुनर्जन्म घेणार नाही याची त्याला खात्री पटू लागली आहे. रोजचे मरण डोळ्यासमोर पाहून पाहून नाहीतरी त्याची दृष्टी सुन्न होतंच आहे.
एके दिवशी तोच काहीतरी करून पेटून उठेल. मग त्याला 'क्रांती' नाव द्या कि 'दहशतवाद'. त्याने काही फरक पडत नाही.

डावखुरा's picture

22 Dec 2010 - 11:03 am | डावखुरा

गांधीवादी मी उपहासाने बोललो...पण जे शक्य नाही त्यावर विचार करत बसण्यापेक्षा आपण स्वतःच का काहितरी करु नये असा विचार मनाला शिवतो...
आपण गांधीवादी नाव धारण करुन मिपावर असल्याने मी आपणाला सुरवातीला वेगळा समजलो होतो परंतु आपण थोडेतरीसमविचारी आहोत हे पाहुन आनंद वाटला..

अवांतरःवेन्स्डे करायचा का?

सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा आता अंत जवळ आलेला आहे
अशा प्रकारच्या वाक्याना इंग्रजीत प्लाटीट्यूड असे म्हणतात.
एके दिवशी तोच काहीतरी करून पेटून उठेल.
एकदा जोरदार टाळ्य होऊन जाउ देत या वाक्यावर.
गांधीवादी भारतातील लोकाना आतंकवाद किंवा सर्व तथाकथीत वादांवर एक जालीम हत्यार सापडले आहे.
त्याचे नाव " जब जब जो जो होना है तब तब सो सो होता है"

आत्मशून्य's picture

22 Dec 2010 - 3:47 pm | आत्मशून्य

सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा आता अंत जवळ आलेला आहे एके दिवशी तोच काहीतरी करून पेटून उठेल.

भारताच्या ज्ञात इतिहासात हे फक्त ईग्रजां वीरूध्द घडले आहे ते सूध्दा हातात काठी पण न घेता, बाकी देश त्याने स्वतंत्र झालाय का हे एक संशोधन ठरेल. तेव्हां असल्या भ्रामक कल्पना बाळगू नका भारतीयांबाबत. नाही म्हणायला या वेळच्या बीहारच्या नीवडनूका तसा सूखद धक्काच ठरला पण ...

चैतन्यमहाराज अवसरीकर's picture

22 Dec 2010 - 10:48 am | चैतन्यमहाराज अवसरीकर

जरी मनाला पटत नसले तरी....
हिन्दू अथवा मुस्लीम कीन्वा भारतीय वा पाकीस्तानी यापेक्शा याकडे निरपेक्शपने पाह्ण्याची गरज आहे.पूर्वग्रहद्रूश्टीने न बघता हा फक्त एका कैद्याची कुराण, वर्तमानपत्राची मागणी मान्य
झाली असे बघावे व इतर कैद्यान्च्या बाबतीत दूजाभाव का हा एक प्रश्न होउ शकतो..

इन्द्र्राज पवार's picture

22 Dec 2010 - 10:53 am | इन्द्र्राज पवार

श्री.गांधीवादी.....
तुमच्या "देश आणि सरकार" या विषयावरील इथले (इथलेच) विविध लेख मी नेहमी वाचत असतो. विषयाचे सादरीकरण करत असताना तुम्ही ऑनलाईन वर्तमानपत्रातील 'तशा' संदर्भातील बातम्यांचा उपयोग करता. हे जरी स्तुत्य असले तरी त्या त्रोटक (किंवा कायद्याच्या भाषेत Curtailed Pieces) स्वरूपात देत असल्याने बहुतांशी वाचकांचे त्यामुळे ज्या व्यक्तीविषयी (इथे कोर्ट श्रीमती उषा ठाकरे) चटकन प्रतिकूल मत बनते. (तुमच्या अशा विषयांतील भावनांशी सहमती दाखवूनच हे लिहित आहे.)

"कुराण" द्यायला कोर्टाने सांगितले म्हणजे ठाकरे मॅडमनी फार मोठा गुन्हाच केला असे काहीसे धाग्यातील तुमच्या मांडणीने ध्वनीत होते. प्रत्यक्षात न्यायाधिश उषा ठाकरे यानी बेगच्या वकिलानी (श्री.रेहमान) केलेल्या मागणी अर्जावर 'दहशतवादविरोधी पथकाची हरकत आहे का?" असे विचारले असता त्या पथकाने तशी हरकत नसल्याचे म्हटले आहे. इतकेच काय येरवडा कारागृहाची त्या मागणीबाबत काही हरकत आहे का हेही विचारले गेल्यावर श्री.लटपटे (अधिक्षक) यानीही त्यास हरकत घेतली नाही. त्यामुळे मागणीचा तो अर्ज नामंजूर करण्याचे काही कारण न्यायाधिशांसमोर येतच नाही.....(त्यांना त्या खुर्चीवर बसल्यावर स्वतःचे मत नसते, जे काही चालते ते कायद्यातील तरतुदीनुसारच, हे तर तुम्ही मान्य कराल असे वाटते.)

बाकी 'कुराण' वाचून अतिरेक्याच्या मूळच्या मनोवृत्ती काही फरक पडेल वा ना पडेल, हा स्वतंत्र धाग्याचा विषय असल्याने त्याबाबत भाष्य करीत नाही.

इन्द्रा

चर्चा चावुन छाण करमणुक झाली :)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2010 - 11:05 am | परिकथेतील राजकुमार

गांधीवादी आता तुम्ही दर १२/१२ तासांनी असले वांझोटे विषय काढून आम्हा समस्त मिपाकरांचा जिव घेता. तरी आम्ही तुमचे लेखन वाचतो वर प्रतिसाद पण देतो का नाही ? तसेच आहे त्या हिमायतचे ;)

ह . घ्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Dec 2010 - 3:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ए पर्‍या, तुझ्याकडे डायर्‍या शिल्लक आहेत का? गांधीवादावर उपचार म्हणून वाट रे थोड्या!

अजुन एक बातमी वाच . त्यात हनिफ ला ऑस्ट्रेलियाला किती नुकसान भरपाई द्यावी लागली ते कळेल. नाहक कुणालाही शिक्षा होवु नये. न्यायालये त्याची कामे व्यवस्थित करत आहेत असे मला वाटते.तुम्ही जर न्यायाधिश असता तर खुप केसेस सुनावणी अगोदरच निकालात निघाल्या असत्या असे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.
सगळे मुस्लिम दहशतवादी असतात व सर्व हिंदु निधर्मी असतात ही तुमची धारणा खुप चुकीची आहे.

हिंदू म्हनल्यावर तो निधर्मी कसा काय ? तो हिंदू धर्मिय नाय का ? तुमाला धर्मनिरपेक्ष म्हनायचं काय? पन धर्मनिर्पेक्ष हा शब्द लय बदनाम हाय (आडवानीना विचारा). कृपाकरून हिंदूंना धर्मनिरपेक्ष म्हनू नका? धर्मनिर्पेक्ष लोक लय डेंजर असतात.

तिमा's picture

22 Dec 2010 - 1:04 pm | तिमा

आणीबाणीत महाराष्ट्रातल्या तुरुंगात आरेसेसवाले एकादशीचा उपवास छानपैकी साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची भाजी खाऊन साजरी करत होते. सकाळ संध्याकाळ तुरुंगात शाखाही भरवण्यात येत असत म्हणे.

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 2:08 pm | आजानुकर्ण

:-)

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Dec 2010 - 2:05 pm | बिपिन कार्यकर्ते

ओ गांधीवादी, असले लेख थांबवा राव! कंटाळा यायला लागलाय. तुमच्या भावना काहीही असोत, आमच्या भावना काहीही असोत... एखादी असली बातमी घ्यायची आणि सारासार विचार न करता + थोडेसे अतिरंजित + किंचित भडक पद्धतीने लिहायचे.

तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की भारतात न्यायव्यवस्था नसावी?

सुविधांचा अतिरेक नसावा वगैरे ठीकच आहे. तुमचा सात्विक संताप असेल तर तेही समजू शकतो. पण जर का कायद्याप्रमाणे काही सुविधा सगळ्यांनाच दिल्या गेल्या असतील तर मग भेदभाव कसा करता येईल?

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 2:09 pm | आजानुकर्ण

सहमत आहे. काहीच्या काही धागे काढले आहेत गांधीवादी या आयडीने.

गांधीवादी's picture

22 Dec 2010 - 3:19 pm | गांधीवादी

आपण एक सदस्य म्हणून लिहित आहात असे मानून,

>>ओ गांधीवादी, असले लेख थांबवा राव!
हे असले म्हणजे कसले ? हे जरा स्पष्ट कराल काय.

>>कंटाळा यायला लागलाय.
मी काय करू शकतो ? लेख वाचणे/टाळणे आपल्या हातात आहे. मलासुद्धा इथल्या काही मान्यवरांचे लेख कंटाळवाणे वाटतात.

असो, कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे तत्वतः जरी खरे असले तरी 'या कायदा पालनातून अतिरेक्यांना काय संदेश जातो' हे जास्त महत्वाचे ठरत नाही का ? आणि ह्या अतिरेक्यांच्या बाबतीत असे टोकाचे कायदे पाळून, भले आपले काही मान्यवर जगभर ताठ मानेने फिरू शकत असले तरी शेवटी बळी सामान्यांचाच जातो, कारण हे असले उद्योग करून 'त्या' अतिरेक्यांना काय जरब बसते, हे मी काय सांगायला हवे.

अ. भारतात अतिरेकीपणा केला कि आपल्याला भयंकर शिक्षा होऊ शकते,
ब. भारतात अतिरेकीपणा केला कि मग खेळा त्याच्याशी त्यांच्याच कायद्याच्या मुंडक्यावर बसून.
यातील कोणता पर्याय आपल्याला निवडावासा वाटेल. प्रामाणिकपणे मनोमन स्वतःला उत्तर द्या,

अवांतर : जे आमचे लेख वाचून सहन करतात, त्यांच्या सहनशक्तीची आम्ही प्रशंसा करतो.
असो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. 'संस्थळावर लेखांचा अतिरेक' आणि 'अतिरेक्यांशी दयाबुद्धीने (राजकारणाने) प्रेतीत होऊन वागण्याचा अतिरेक' मोजण्याचे काही प्रमाण असेल तर नक्की (व्यनितून) कळवावे.

तूर्तास ह्या चर्चेतून रजा घेत आहे.
प्रतिसाद दिलेल्या, न दिलेल्या सर्वांचे आभार

आजकाल माझे पेपर वाचायचे काम हेच करतात,मिपावर आल्या आल्या ताज्या बातम्या मला मिळतात.

अविनाश कदम's picture

24 Dec 2010 - 2:36 am | अविनाश कदम

दहशतवादाचा विषय दुर्लक्षून चालणार नाही तो आता कधीही तुमच्या दाराशी येऊन पोहचू शकतो.मुंबईत कालच काही दहशतवादी घुसल्याची बातमी आहे. या विषयाची टवाळकीने चर्चा करण्याऐवजी गांभिर्याने करावी नाहीतर करूच नये. मराठी मध्यमवर्गाला प्रत्येक विषयाच्या टवाळकीचं भारीच वेड लागलेलं आहे. त्याला ते विनोद म्हणतात.

टवाळा आवडे विनोद---इती समर्थ रामदास

गांधीवादी's picture

24 Dec 2010 - 5:26 am | गांधीवादी

सहमत आहे.

आज भारतात कोणताही सन उत्सव असो, त्यावर ह्या दहशतवादाची संकटछाया असतेच.
ताज, लोकल्स, शाळा, धार्मिक स्थळे, हॉटेल्स,वाहतुकीची ठिकाणे, हॉस्पिटल्स, मॉल्स, अश्या किती ठिकाणी आणि किती दिवस सुरक्षा ठेवणार. आज कुठेही बाहेर पडायची भीती कायम वाटत असते. कोणत्याही मंदिरात गेलो कि काय होईल सांगता येत नाही.

नव्या माहितीप्रमाणे ४ दहशतवादी सध्या मुंबई मध्ये फिरातेयेत.


मुंबई - मुंबईत घुसखोरी केलेल्या लष्करे तैयबाच्या चार दहशतवाद्यांपैकी वालिद जिना या दशतवाद्याचे छायाचित्र पोलिस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिले.

मनुष्य ह्या गोष्टींचा रोज रोज विचार करून कंटाळा करतो, आणि मग काही काळासाठी निर्धास्त होतो, हेच तर अतिरेक्यांना हवे आहे. कायमचा तोडगा कोणालाच नको का ?

अतिरेक्यांना भारतीय न्यायव्यवस्था अशी काही वागणूक देत आहे कि
ते अतिरेकी नसून आपले पाहुणे आहेत,
त्यांनी गुन्हे केले नसून त्यांनी भारतावर उपकार केलेले आहेत,
ते तुरुंगात शिक्षा भोगत नसून ते महान भारताच्या महान परंपरेची लज्जत लुटतायेत.

आणि अश्या बातम्या वारंवार प्रसिद्ध होत असतील आणि दुर्दैवाने त्या प्रसिद्ध होऊन त्याच अतिरेक्यांच्या कानावर पडत असतील तर किती मिश्कीलपणे हसत हसतील, याचा विचार कोणी केला आहे का ? आपण त्यांच्या देशात जातो, त्यांच्या लोकांना मारतो, त्यांच्याच कायद्याची थत्त उडवितो, ऐश मध्ये राहतो, वेळ आली कि सुटून सुद्धा येऊ शकतो.

हा खंड, आम्हा सामान्यांना जगण्यासाठी आहे कि अतिरेक्यांना पोसण्यासाठी आहे ?