बहादुर शाह जफर के कुछ आखरी अशार...

अश्फाक's picture
अश्फाक in जे न देखे रवी...
20 Dec 2010 - 9:46 pm

१८५७ च्या उठावा नंतर इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले , तेव्हा तिथल्या वातावरणात ही गजल लिहिली होती ( आज ही लाल किल्ल्यात स्मरण म्हणुन गजल लिहिली आहे)

लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में ! ( दिल्लिला उजड़े दयार म्हटले आहे )
किस की बनी है आलम-ए-नापायेदार में !! ( जगच्या नश्वरते वर भाष्य )

कह दो इन हसरतों से कहीं और जा बसें !
( हसरत = ईछ्चा )
इतनी जगह कहाँ है दिल-ए-दाग़दार में !! ( दिल-ए-दाग़दार = दुखाने पुर्ण भरलेले )

उम्र-ए-दराज़ माँग कर लाये थे चार दिन ! ( उम्र-ए-दराज़ = लांब आयुश्य )
दो आरजु में कट गये दो इन्तज़ार में !!

कितना है बदनसीब "ज़फ़र" दफ़्न के लिये ! ( म्रुत्यु ची चाहुल लागली )
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में !! ( पण दुख याचे की स्वत च्या देशात जिथे राज्य केले तिथे दफन पुरती जागा मिळु नये)

आजही जफर रंगुन मधेच अस्वस्थ आराम करत आहे , आपल्या कबरीत................

करुणगझल

प्रतिक्रिया

>> उम्र-ए-दराज़ माँग कर लाये थे चार दिन ! ( उम्र-ए-दराज़ = लांब आयुश्य )
दो आरजु में कट गये दो इन्तज़ार में !! >>हा शेर चटका लावून जाणारा.

बहादुर शाह जफर यांची ही गझल लहानपणी त्यांच्यावरच्या दूरदर्शनवरील मालीकेत ऐकली आहे. आर्त स्वरातील ही गझल विसरू म्हटलं तरी विसरता येणं शक्य नव्हतं. सायंकाळच्या उदास वातावरणात, लाल महालाच्या पार्श्वभूमीवर, उन्हं कललेली असताना , वृद्ध बादशहा आणि या गझलेचे कोण्या आर्त रागातील सूर ...... फार उदास करणारं शीर्षक संगीत होतं त्या मालीकेचं.

सुनील's picture

20 Dec 2010 - 9:56 pm | सुनील

गझल चांगली पण अपूर्ण असावी. संपूर्ण गझल दिल्यास चांगले.

दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले
भयानक! ही माहिती नवीन आहे!

>>दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले..<<

१८५७च्या लढ्यात भारतीय सैनिकांचे नेतृत्व (नाईलाजाने का होईना) स्विकारल्याची सजा होती ती.. मागे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलामांनी बहादुर शहा जफरच्या रंगूनमधल्या कबरेवर दिल्लीतून नेलेली चादर चढवली होती..

लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में
किस की बनी है आलम-ए-ना-पायेदार में

बुलबुल को बाग़बां से न सैय्याद से गिला
क़िस्मत में क़ैद थी लिखी फ़सल-ए-बहार में

उम्र-ए-दराज़ माँग के लाये थे चार दिन
दो आरज़ू में कट गये, दो इंतज़ार में

कह दो इन हसरतों से कहीं और जा बसें
इतनी जगह कहाँ है दिल-ए-दाग़दार में

है कितन बदनसीब ज़फ़र दफ़्न के लिये
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरती दिलेल्या गझलमधे चौथे कडवे नव्हते.

बहादूर शाह जफर यांची अजून एक सुंदर गझल

बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी
जैसी अब है तेरी महफ़िल कभी ऐसी तो न थी

पा-ए-कूबाँ कोई ज़िंदाँ में नया है मजनू
आती आवाज़ से लासिर? कभी ऐसी तो न थी

ले गया लूट के कौन आज तेरा सब्र-ओ-क़रार
बेक़रारी तुझे ऐ दिल कभी ऐसी तो न थी

उनकी आँखों ने ख़ुदा जाने किया क्या जादू
के तबीयत मेरी माइल कभी ऐसी तो न थी

चश्म-ए-क़ातिल मेरी दुश्मन थी हमेशा लेकिन
जैसी अब हो गई क़ातिल कभी ऐसी तो न थी

क्या सबब तू जो बिगड़ता है 'ज़रर' से हर बार
कूँ तेरी हूर-ए-शिमागिल कभी ऐसी तो न थी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी पूर्ण गजल आधी खाली टंकली आहे अन ती ही पूर्ण आहे. त्यात ७ अशार आहेत तुम्ही दिलेल्या गजलीत फक्त ५च आहेत.

प्राजु's picture

20 Dec 2010 - 10:13 pm | प्राजु

फार फार सुंदर!!

वाहीदा's picture

20 Dec 2010 - 11:03 pm | वाहीदा

लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में
किसकी बनी है आलमे-ना-पायदार में

बुलबुल को बाग़बां से न सय्याद से गिला
क़िस्मत में क़ैद थी लिखी फ़स्ले-बहार में

कहदो इन हसरतों से कहीं और जा बसें
इतनी जगह कहां है दिले दाग़दार में

एक शाख़े-गुल पे बैठ के बुलबुल है शादमां
कांटे बिछा दिए हैं दिले-लालज़ार में

उम्रे-दराज़ मांग के लाए थे चार दिन
दो आरज़ू में कट गए दो इंतिज़ार में

दिन ज़िंदगी के ख़त्म हुए शाम हो गई
फैला के पांव सोएंगे कुंजे मज़ार में

कितना है बदनसीब ज़फ़र दफ़्न के लिए
दो गज़ ज़मीं भी मिल न सकी कूए-यार में
--बहादुर शाह ज़फ़र

My heart has no repose in this despoiled land
Who has ever felt fulfilled in this futile world?

The nightingale complains about neither the sentinel nor the hunter
Fate had decreed imprisonment as the harvest of spring

Tell these longings to go dwell elsewhere
What space is there for them in this besmirched heart?

Sitting on a branch of flowers, the nightingale rejoices
I have strewn thorns in the garden of my heart

I asked for a long life, I received four days
Two passed in desire, two in waiting.

The days of life are over, evening has fallen
I shall sleep, legs outstretched, in my tomb

How unfortunate is "Zafar" ! For his burial
Not even two yards of land were to be had, in the land of his beloved

माझ्या सगळ्यात जास्त जिव्हारी लागते ती बहादूर शहा जफर यांची हि गजल

न किसी की आँख का नूर हूँ न किसी के दिल का क़रार हूँ
जो किसी के काम न आ सके मैं वो एक मुश्त-ए-ग़ुबार हूँ

न तो मैं किसी का हबीब हूँ, न तो मैं किसी का रक़ीब हूँ
जो बिगड़ गया वो नसीब हूँ, जो उजड़ गया वो दयार हूँ

मेरा रंग-रूप बिगड़ गया, मेरा यार मुझ से बिछड़ गया
जो चमन फ़िज़ाँ में उजड़ गया, मैं उसी की फ़स्ल-ए-बहार हूँ

पढें फ़ातेहा कोई आये क्यूँ, कोई चार फूल चढाये क्यूँ ?
कोई आके शम्मा जलाये क्यूँ ?मैं वो बेकसी का मज़ार हूँ

मैं नहीं हूँ नग़्मा-ए-जाँफ़िशाँ, मुझे सुन के कोई करेगा क्या ?
मैं बड़े बरोग की हूँ सदा, मैं बड़े दुख की पुकार हूँ .

--बहादुर शाह ज़फ़र

सुनील's picture

20 Dec 2010 - 11:11 pm | सुनील

धन्यवाद!

बाकी ब्रिटिशांनी नेहेमीच पराभूत राजांना त्यांच्या राज्यापासून दूर नेऊन ठेवायची सवय होती! नेपोलियनला पार सेन्ट हेलेना ह्या बेटावर ठेवले. ब्रह्मदेशाच्या राजाला (थिबा) रत्नागिरीत आणले आणि बहादुरशहाला रंगूनात!

वाहीदा's picture

20 Dec 2010 - 11:26 pm | वाहीदा

ब्रिटिशांनी काय अवस्था करुन टाकली या जांबाज बादशहाची ...

टारझन's picture

20 Dec 2010 - 11:48 pm | टारझन

मला वाटतं ही अवस्था म्हातारपणामुळे आली असावी . ब्रिटिश आर्थिक परिस्थिती बिकट करु शकले असतील :) तुमचा विनाकारण ब्रिटीशांना बदनाम करण्याचा डाव का आहे हे समजले नाही :)

वाहीदा's picture

21 Dec 2010 - 11:18 am | वाहीदा

तुम्ही बहुतेक ईतिहास वाचला नसावा, त्यामुळे तुम्हास माहीत नाही ब्रिटीशांनी जफर यांना कसे छळले ते,
कृपया तो वाचावा अन मग सांगावे 'ब्रिटीशांच्या' बध्द्ल चांगले असे काय लिहावे
त्यांनी फक्त आर्थिक परिस्थिती बिकट केली नाही तर मानसिक अन शारिरीक हाल ही केले .
वरिल एकच वाक्य बरेच काही सांगते
इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले
असो मला प्रतिसाद देण्याबद्धल धन्यवाद

इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले

आता सांगा , त्यांना श्रीदत्त दिसले का ? :) बाकी चित्रात जे दिसतं त्यावरुन मी अनुमान काढले होते . मला इतिहास वाचायला लै बोर होतं :)

असो मला प्रतिसाद देण्याबद्धल धन्यवाद

ईट्स माय प्लेजर , तुमच्या विनयशील स्वभावाचे मला कौतुक वाटते

चिंतामणी's picture

20 Dec 2010 - 11:49 pm | चिंतामणी

माझ्या सगळ्यात जास्त जिव्हारी लागते ती बहादूर शहा जफर यांची हि गजल

खरे आहे. महंमद रफी यांच्या आवाजीतल ही गझल ऐकल्यावर भरून येते.

प्रदीप's picture

21 Dec 2010 - 1:02 pm | प्रदीप

रफीसाहेबांच्या आवाजात इथे ऐका--

१. लगता नही है दिल मेरा...

http://www.youtube.com/watch?v=sstst3oOuFs

२. न किसी की आँख का नूर हूँ..

http://www.youtube.com/watch?v=pbl42EtvBZQ&feature=related

मैं कहाँ रहूँ मैं कहाँ बसूँ ना ये मुझसे ख़ुश ना वो मुझसे ख़ुश
मैं ज़मीं की पीठ का बोझ हूँ मैं फ़लक़ के दिल का ग़ुबार हूँ

वाहीदा's picture

21 Dec 2010 - 6:23 pm | वाहीदा

:-)

प्राजु's picture

20 Dec 2010 - 11:49 pm | प्राजु

वाह!! वाहिदा... हि गझल काळजाला हात घालते. सुंदर! धन्यवाद इथे दिल्याबद्दल.

मदनबाण's picture

21 Dec 2010 - 9:36 am | मदनबाण

अश्फाक बर्‍याच दिवसांनी आपण दिसलात... आपली शेरो-शायरीची सफर अशीच सुरु ठेवा. :)
लिहीत रहा...

अश्फाक-जी आणि वाहीदा,
धन्यवाद. फार दिवसांनी गझलियातांच्या प्रांतात पाऊल टाकले! (By the way, 'शेर' या शब्दाचे अनेकवचन 'अशयार' आहे कीं 'अशार'? कारण भजनसम्राट अनुप जलोटांनी गायलेली एक गझल "अशयार मेरे यूँ तो जमानेके लिये हैं" अशी सुरू होते!)
बहादुर शहा जाफर यांचे अनेक शेर "आईना-ए-गझल"मध्ये आहेत!
पुन्हा एकदा दोघांना धन्यवाद.....

काका,
आईना-ए-गझल या पुस्तकाचे नाव मी तुमच्या गजल्/शेरोशायरींच्या लेखात खुपवेळा वाचले आहे.
उत्सुकतेने मी ते खुपदा मिळविण्याचा प्रयत्न केला पण हे पुस्तक उप्लबध्द नाही.

अश्फाक's picture

21 Dec 2010 - 6:48 pm | अश्फाक

उर्दु मधे अ दोन प्रकारचे आहे ( अलिफ ) & ( ऐन ) अलिफ चा उच्चार जिभे तुन तर ऐन चा घश्यातुन होतो .
अलिफ ने आम म्हणजे आंबा तर ऐन ने आम म्हणजे सर्व् सामान्य ( आम आदमी ) ,

आता आपण अशार चे हिज्जे ( स्पेलिंग ) पाहु

अलिफ ( अ ) शिन ( श ) ऐन ( अ ) अलिफ ( अ ) & र ( र )

याचे बरोबर उच्चारन अशार असेच होते, पन लिहितांना काहे लोक अशयार असा अपभ्रंश करतात .

असो , सर्वांचे आभार..

गणेशा's picture

21 Dec 2010 - 4:33 pm | गणेशा

अश्फाक, प्रदीप आणि वहीदा,

मनपुर्वक आभार आपले..

सत्यजित...'s picture

14 Jul 2017 - 3:25 am | सत्यजित...

अतिशय सुंदर धागा!
यानंतर अाज काही वाचणे नाही अता!