बंद खिडक्या घट्ट बेड्या हालवून शिणले काही
अबोल सत्ता घालुनी माना केली मान्य त्यानी
पान मांडता वेगळे कोणी माती घेउन आले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
तस्त बिचारे बोलु लागले बाजु घेवोनि
लाडुसुध्धा मधेच डुलला फ़ुटता फ़ुटता फ़ुटूनी
पाठ राखण्या एकमेकांची सारे धडपडले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
जरा भाषा, शुद्धी जराशी ऐसे बेत शिजले
जो तो हाणी अशुध्धासी जणु यवन हे मातले
संस्कृत आम्हा नकोच म्हणोनी म्लेंछ हे धावले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
राळ उडवा, अरे शिंच्या, तसलाच तुही गड्या
उडले आमुचे जीव येथुनि जातो रे सौंगड्या
पाय निघेना म्हणोन करण्या काड्या हे रुतले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
प्रतिभा आमुची तिकडे दावु इकडे फ़क्त मळमळ
ईनो घ्यायचे सल्ले देउन म्हणती झाली जळजळ
बघता बघता प्रतिसाद हे सारे गरळ होवुन गेले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
प्रतिक्रिया
31 May 2008 - 12:53 pm | राजे (not verified)
जरा भाषा, शुद्धी जराशी ऐसे बेत शिजले
जो तो हाणी अशुध्धासी जणु यवन हे मातले
संस्कृत आम्हा नकोच म्हणोनी म्लेंछ हे धावले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
=)) >:)
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
31 May 2008 - 1:02 pm | विजुभाऊ
हाण तदमाताय
तस्त बिचारे बोलु लागले बाजु घेवोनि
लाडुसुध्धा मधेच डुलला फ़ुटता फ़ुटता फ़ुटूनी
=))
प्रतिभा आमुची तिकडे दावु इकडे फ़क्त मळमळ
ईनो घ्यायचे सल्ले देउन म्हणती झाली जळजळ
31 May 2008 - 1:14 pm | मदनबाण
जरा भाषा, शुद्धी जराशी ऐसे बेत शिजले
जो तो हाणी अशुध्धासी जणु यवन हे मातले
संस्कृत आम्हा नकोच म्हणोनी म्लेंछ हे धावले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
हे जबरा बर का.....
मदनबाण>>>>>
31 May 2008 - 1:30 pm | विसोबा खेचर
पान मांडता वेगळे कोणी माती घेउन आले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
उडले आमुचे जीव येथुनि जातो रे सौंगड्या
पाय निघेना म्हणोन करण्या काड्या हे रुतले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
प्रतिभा आमुची तिकडे दावु इकडे फ़क्त मळमळ
ईनो घ्यायचे सल्ले देउन म्हणती झाली जळजळ
हा हा हा! :)
आंबोळी, सुंदर लिहिलं आहेस...
जियो...! :)
तात्या.
एक पूर्ण असहमती -
तस्त बिचारे बोलु लागले बाजु घेवोनि
ह्या ओळीस माझा विरोध आहे!
माझ्या मते/माहितीप्रमाणे डांबिसने मुक्तरावाबाबत लिहिताना तस्ताचा उल्लेख केला होता तो संदर्भ इथे आहे. डांबिसाने डायरेक्ट तस्त घेऊन फिरण्याची उपमा देऊन मुक्तरावांचा अपमान केला आहे असंच माझं मत आहे. वास्तविक मुक्तरावाने मूळ 'आसपास'ला जो प्रतिसाद दिला होता तो मलाही पटला नव्हता परंतु तरीही मुक्तराव हा माणूस कुणा मागे तस्त घेऊन फिरणार्यातला नक्कीच नाही असंच मी प्रांजळपणे म्हणेन!
डांबिसाने केवळ 'तस्त घेऊन फिरणे' या शब्दांबाबत दोन शब्दांची दिलगिरी व्यक्त केली असती तर मला ते अधिक आवडलं असतं! कारण डांबिसाप्रमाणेच मुक्तराव हा माणूस देखील मिपावर प्रेमच करणारा आहे आणि कुणा बाहेरच्या लोकांमुळे दोन मिपाकरात वितुष्ट व कडवटपणा नको असंच मला प्रामाणिकपणे वाटतं!
असो! सगळ्याच गोष्टी काही माझ्या हातात नाहीत! पण दोन मिपाकरांतलं बाहेरच्या माणसामुळे आलेलं हे फुकटचं वितुष्ट मालकाच्या जागेवर बसून बघताना मला त्रास होतो एवढं मात्र खरं!
आपला,
(मुक्तराव व डांबिस, दोघांचाही मित्र!) तात्या.
अजून एक शेवटचं -
ही कविता आणि आता हिला येणारे प्रतिसाद इतपत ठीक आहे परंतु आता या विषयावर नव्याने पुन्हा कुणी काही लिहू नये असं मला वाटतं! जनरल डायर ते लेखन ठेवतील असं वाटत नाही! एक तमासगीर माणसाचंच हे संस्थळ असल्यामुळे मिपाला तमाश्यांचं तसं विशेष काही वाटत नाही, कारण तमाशाही काही वेळकरता बरा वाटतो. परंतु इथे फक्त सतत तमाशाच व्हावा, याला मात्र जनरल डायर यांचा तीव्र विरोध असेल. प्रत्येक गोष्ट तारतम्याने करावी, त्यातच गंमत असते.
कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशी कळकळीचे विनंती!
तात्या.
31 May 2008 - 1:38 pm | अमोल केळकर
प्रत्येक गोष्ट तारतम्याने करावी, त्यातच गंमत असते.
१०० % सहमत
(चांगले तेच शिकणारा) केळकर
31 May 2008 - 1:44 pm | प्रभाकर पेठकर
प्रत्येक गोष्ट तारतम्याने करावी, त्यातच गंमत असते.
सहमत तात्या, फक्त तुमच्याकडून हा सल्ला बर्राच उशीरा आला. तारतम्य सोडून सगळ्यांचे बोलून/लिहून झाले आहे असे दिसते आहे.
31 May 2008 - 1:51 pm | विसोबा खेचर
तारतम्य सोडून सगळ्यांचे बोलून/लिहून झाले आहे असे दिसते आहे.
हम्म! कबूल..!
पुढच्या वेळेला काळजी घेऊ!
आपला,
(प्रगतीशील) तात्या.
:)
31 May 2008 - 2:03 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद तात्या.
पुढच्या वेळेला काळजी घेऊ!
कठीण दिसते आहे. पण 'पाऊले वंदण्याची' संधी द्यावी ही नम्र विनंती.
31 May 2008 - 1:54 pm | आंबोळी
डांबिसाच्या प्रतिसादातील तस्त हा शब्द आम्ही कवितेत वापरला. पण त्यामुळे मिसळपाववर जर गावकर्यांच्यात वितुष्ट येत आसेल तर ही कविता कुठली ही पुर्व सुचना न देता उडवल्यास माझी कसलीही हरकत नाही.
हा शब्द वापरला म्हणून मी मुक्तरावान्ची जाहीर माफी मागत आहे. आजुनही कोणास खटकले/लागले आसेल तर मी त्यांची ही माफी मागतो.
ज्.डायरयानी ही कविता उडवल्यास आमचा पाठिंबा.
--आंबोळी
31 May 2008 - 2:07 pm | विसोबा खेचर
आंबोळी,
पेल्यातलं एक वादळ माजवू पाहणार्या एका कवितेला एक उत्तर म्हणून तुझी ही कविता चांगलीच आहे, फक्त त्यातला एक संदर्भ मला चुकीचा वाटला तेवढा बोलून दाखवला! बाकी, कविता उडवायची गरज नाही! :)
हा शब्द वापरला म्हणून मी मुक्तरावान्ची जाहीर माफी मागत आहे.
बस! बात खतम..! :)
आपला,
(मिपा एक परिवार आहे असं मानणारा!) तात्या.
31 May 2008 - 2:11 pm | आजानुकर्ण
दुसर्याचे अनुकरण करण्याइतपत तरी प्रतिभा आहे कवीची.
आपला,
(स्वयंभू) आजानुकर्ण
31 May 2008 - 2:32 pm | अभिज्ञ
प्रतिभा आमुची तिकडे दावु इकडे फ़क्त मळमळ
आंबोळिशेठ, खरे बोललात.
(बालबुद्धि प्रजेतिल अनभिज्ञ बालक)
अभिज्ञ
31 May 2008 - 2:23 pm | मन
आंबोळ्या,
झकास जमलय.
ज्याला ज्या भाषेत कळ्तं त्याच भाषेत उत्तर दिलस.
आपलाच,
मनोबा
1 Jun 2008 - 1:24 pm | अरुण मनोहर
आता हा घोळ चवीबाहेर आंबलाय. जरूरीपेक्षा जास्त फरमेन्ट झाली तर एरवी चवदार लागणारी आंबोळी देखील खावीशी वाटत नाही. तात्याराव, आंबोळीचे नाही म्हणत मी, पण मिसळपाव खाता खाता या आधी बरेच (रबरा सारखे लागणारे) मटनाचे तुकडे व हाडे पण तोंडात गेली. तेव्हा चटकदार पदार्थच तेवढे चालू ठेवून हटेलाची शान कायम ठेवा.
---- खवय्या.
प्रेषक विसोबा खेचर ( शनी, 05/31/2008 - 16:21) .
तारतम्य सोडून सगळ्यांचे बोलून/लिहून झाले आहे असे दिसते आहे.