भटक्या कुत्र्या॑मुळे आरोग्याची समस्या दिवसे॑दिवस बिकट होत चालली आहे.कोर्ट अश्या कुत्र्या॑ना मारण्याची परवानगी देत नाही आणि सरकार कि॑वा महानगर पालिका त्या॑चा ब॑दोबस्त करण्यास असमर्थ आहे मग अशा परिस्थितीत सामान्य माणसाने करावे काय??...
मु॑बई महानगर पालीकेच्या आकडेवारी प्रमाणे मागील ५ वर्षात २.८४ लोका॑चा भटक्या कुत्र्या॑नी चावा घेतला आहे तर फक्त २००९ या वर्षी ७७००० हजार लोका॑ना चावा आणि १८ लोका॑चा म्रुत्यू झाला आहे.अशी ही परीस्थीती चि॑ताजनक नाही का? रात्री उशीरा कामावरुन घरी जाणे म्हणजे जीव मुठीत धरुन जावे लागते.महानगर पालिका भटक्या कुत्र्या॑च्या निगराणीवर आणि इ॑जक्शनवर वर्षाकाठी करोडो रुपये खर्च करते पण उपयोग शून्य.....(या पैश्यामध्ये अजुन एक घोटाळा सापडायला काहीच हरकत नाही.)
या कुत्र्या॑चा काही ब॑दोबस्त व्हावा कि॑वा या॑वर काही उपाय योजना व्हावी असे आपणास वाटत नाही काय?
हा प्रश्न सामाजीक नाही काय?
या सर्व प्रश्ना॑वर आपण सारे मिळून चर्चा नक्कीच करु शकतो असे मला वाटते.
भट्के कुत्रे आणि आरोग्य
गाभा:
प्रतिक्रिया
12 Dec 2010 - 8:11 pm | टारझन
खरंच ही अतिशय चिंताजणक बाब आहे . मी स्वतः कुत्र्यांच्या बाबतीत खुप जागृक आहे . आमच्या कॉलनीतल्या कुत्र्या फार चावक्या आहेत आणि कधी वस्स्स्कन अंगावर येतील सांगता येत नाही. आमच्या लेन मधली एक कुत्री फारंच भुंकत असते . ती चावत नाही असे लोकं म्हणत असले तरी तिचं तोंड इतकं घाणेरडं आहे की तो स्पर्ष देखील किळसवाणा वाटावा. गेल्याच आठवड्यात जिम वरुन घरी येताना ती कुत्री माझ्या गाडीचा पाठलाग करु लागली. थँक गॉड माझ्या गाडीला साईड मिरर होते,.. त्यात मला ती कुत्री माझ्याकडे झेपावताना दिसली . आता अधिक पळुन किंवा दुर्लक्ष करुन चालणार नाही हे लक्षात आल्यावर मी कच्च्कन मागचा ब्रेक दाबला तशी गाडी ९० अंशात स्किड होउन आडवी झाली . डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच मी गाडी साईड स्टँड ला पार्क करुन पटकन एक दगड उचलला. आणि लवलेलं पातं उघडतं ना उघडतं तोच तो दगड मी त्या कुत्रीच्या डोक्यात रप्पकन् मारला.... तशी ती कुत्री "क्याअ...आआअ.अ..अ..ऊऊऊऊऊऊउ हुजुर .. तेरा तेरा तेरा सुरुर "म्हणत पळाली. =)) आता ती मला पाहिलं की लांबुन च यु टर्ण मारते. मी मस्त ऐटित रात्री अपरात्री कॉलनीत फिरतो .
तात्पर्य : आता कुत्र्यांच्या प्रश्नावरही प्रशासन काही करेल ह्या आशेवर रहाल तर कुत्रे चावणारंच ... तुम्ही स्वतः बंदोबस्त करा. कायम एखादा दगड खिशात ठेवत चला... घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने लगेच धर्मांतर होत नाही .
टारझन आयडी द्वारा राष्ट्रीय जनहितार्थ जारी.
-( कुत्र्यांना चावुन पिसाळवणारा ) टॉबरमॅण
12 Dec 2010 - 9:47 pm | पंगा
हा भाग कळला नाही.
कृपया खुलासा होऊ शकेल काय?
12 Dec 2010 - 10:07 pm | टारझन
सुज्ञास सांगणे ण लगे !
- नंबरी गावगुंड
12 Dec 2010 - 11:24 pm | रेवती
अरे काय हे टार्या?
तुझ्या पहिल्या प्रतिसादापासून हसतिये.......
13 Dec 2010 - 10:26 am | नरेशकुमार
आमी सुज्ञ नाय, आमाला सविस्तर कळु द्या.
12 Dec 2010 - 10:43 pm | शाहरुख
दगड नव्हे तर विटेचा तुकडा म्हटले पाहिजे !
बाकी जयेशजींच्याशी सहमत आहे..च्यायला, आपण तर मनेका गांधी आणि इतर प्राणिमित्रांना जाहीर आव्हान देतोय की रात्री २ वाजता पुण्याच्या रस्त्यांवरुन टु-व्हिलर वरुन जाऊन दाखवा म्हणून ! अक्षरशः अंगावर उड्या मारतात कुत्री !
12 Dec 2010 - 11:03 pm | Nile
दगड विटा कशाला, खडुही चालतो म्हणतात.
-दंत्या गाववाले
13 Dec 2010 - 11:08 am | नंदन
>>> दगड विटा कशाला, खडुही चालतो म्हणतात.
--- नशीब, नाहीतर त्या व्यक्तीवर 'आय अॅम अॅट माय विट्स एन्ड' म्हणण्याची पाळी यायची ;)
13 Dec 2010 - 11:51 am | Nile
=)) =))
तु म्हणजे अगदी 'एन्ड्'चंच बोल्लास! ;-)
13 Dec 2010 - 12:42 pm | विजुभाऊ
दगड विटा कशाला, खडुही चालतो म्हणतात.
खडू........?
कुत्रे काय पाट्या वाच्तात काय?
एन वे.
भटके कुत्रे आणि समस्या या कुत्रेप्रेमींमुळे निर्माण होतात
कबुतरांमुळे काही समस्या निर्माण होतात.
काही धर्मीय कबूतराना किलोच्याकिलो ज्वारी खाऊ घालतात. कबुतरे माजतात आणि इतर लोकांच्या घरात घुसून शीटतात.
13 Dec 2010 - 3:08 pm | अप्पा जोगळेकर
कृपया खुलासा होऊ शकेल काय?
कुर्ला किंवा मुंब्रा येथील स्टेशनच्या स्वच्छतागॄहात जाऊन ५ मिण्टं उभे रहा म्हणजे कळेल आपोआप.
दगड ठेवला तर कुण्णाला डाउट न्है येणार. विटकूराचा तुकडा ठेवाल तर येउ शकतो.
आमच्या हितल्या बॅडमिंटन कोर्टपाशी पण कुत्र्यांचा भारी त्रास. एकदा मागे लागला म्हणून रॅकेट घातली टाळक्यात तर गटिंगच तुटलं. तेंव्हापासून सरळ लाथच मारतो.
13 Dec 2010 - 3:10 pm | अप्पा जोगळेकर
कृपया खुलासा होऊ शकेल काय?
कुर्ला किंवा मुंब्रा येथील स्टेशनच्या स्वच्छतागॄहात जाऊन ५ मिण्टं उभे रहा म्हणजे कळेल आपोआप.
दगड ठेवला तर कुण्णाला डाउट न्है येणार. विटकूराचा तुकडा ठेवाल तर येउ शकतो.
आमच्या हितल्या बॅडमिंटन कोर्टपाशी पण कुत्र्यांचा भारी त्रास. एकदा मागे लागला म्हणून रॅकेट घातली टाळक्यात तर गटिंगच तुटलं. तेंव्हापासून सरळ लाथच मारतो.
13 Dec 2010 - 8:46 am | अवलिया
टारजन इ़ज बॅक.
खिशात दगड... द बेस्ट !
माझ्याकडुन एक मस्तानी सप्रेम भेट. पर्याच्या कॅफेवर जाउन वसुली करुन घेणे.
13 Dec 2010 - 10:34 am | नरेशकुमार
ओ फुकट्यान्नो,
द्यायचि असेल तर सरल द्या ना, कायला इकडं तिकडं हिन्ड्वु र्हायले.
13 Dec 2010 - 10:43 am | नरेशकुमार
व्हिन्सक टार्याचा णीशेध.
डोळ्याचं पातं हलवन्यापेक्शा "कुत्ते कमिने, मै तेरा खुन पि जाउन्गा" अशी आरोळी ठोकुन द्यायचि व्हती.
12 Dec 2010 - 9:15 pm | सूर्यपुत्र
>>या कुत्र्या॑चा काही ब॑दोबस्त व्हावा कि॑वा या॑वर काही उपाय योजना व्हावी असे आपणास वाटत नाही काय?
नकी वाटते. कुत्र्यांना फॅमिली प्लॅनींग करायला शिकवायला पाहिजे, त्यासाठी त्यांना उद्युक्त केले पाहिजे.
>>हा प्रश्न सामाजीक नाही काय?
आहेच. कुत्र्यांना भुंकणे, चावणे यांबाबतचे सामजिक नियम शिकवले पाहिजेत.
12 Dec 2010 - 9:59 pm | पंगा
नेमके कोणाचे सामाजिक नियम?
या बाबतीतले त्यांच्या समाजाचे नियम ते पाळतातच, असे वाटते.
यावर जर काही तोडगा काढायचा असेलच, तर तो 'टू-नेशन थियरी'च्या आधारावरच होऊ शकेल, असे आमचे ठाम मत आहे. ऑल इंडिया कॅनाइन लीगचे अध्वर्यू याकडे लक्ष देतील काय?
13 Dec 2010 - 6:26 pm | प्रदीप
तुम्ही कदाचित हे थट्टेने म्हटले असेल, पण नेमकी हीच उपाययोजना अनेक विकसीत देशात वापरली जाते. 'भटक्या कुत्र्यांना पकडा, त्यांचे न्यूटरींग (मराठी प्रतिशब्दः वंधीकरण?) करा व पुन्हा त्यांना सोडून द्या'.
13 Dec 2010 - 6:37 pm | वेताळ
इथे माणसांवर उपचार करताना सरकारच्या नाकी नउ येते मग कुत्र्याना शोधुन फॅमिली प्लनिंग कसे करणार?
13 Dec 2010 - 6:42 pm | नरेशकुमार
सरकार नाकाने फॅमिली प्लनिंग का करते, हाताने का करत नाय ?
13 Dec 2010 - 7:34 pm | प्रदीप
माणसांच्या जीवाची आता जिथे किंमत शून्य झालेली आहे, तिथे जनावरांचे काय?
पण मी सूचित केल्याप्रमाणे करायचे नसेल तर भटक्या कुत्र्यांना पकडून मारणे हा एकमेव उपाय रहातो ना?
14 Dec 2010 - 12:46 am | Nile
हे भारतातही केले जाते. म्युनिसीपाल्टीची लोक कुत्र्यांना पकडुन घेउन जाताना अन परत आणुन सोडताना पाहिले आहे. पण इंड्यात कुत्र्यांचे प्रसवणे म्युनिसीपाल्टीपेक्षा जास्त इफिशिंयट असल्याने प्राब्लेम आहे.
12 Dec 2010 - 9:44 pm | उपास
ह्या प्रश्नाची व्याप्ती दिसते त्यापलिकडे असावी.. रात्री अपरात्री गल्लीतल्या कुत्र्यांच्या भुंकण्या किंवा विव्हळण्यामुळे झोपमोड होऊन त्याचा लोकसंख्येवर परिणाम होत नसेल काय?
कुत्र्यांना भटके ठेवताच कामा नये.. एक तर मालक हवा नाहीतर पांजरपोळ.. पण विचार आणि कृती करणार कोण?
12 Dec 2010 - 9:48 pm | पंगा
नेमक्या कोणाच्या लोकसंख्येवर?
12 Dec 2010 - 10:00 pm | उपास
सुज्ञांस सांगणे न लगे :)
13 Dec 2010 - 10:28 am | नरेशकुमार
ज्या कुत्र्यांची झोपमोड होईल त्यांच्या लोकसंख्येवर परिणाम होत असेल.
12 Dec 2010 - 9:58 pm | वारा
ईशय बी जबर्या अनी पर्तिक्रीया बी जबर्या......
थ.न्डीत कुत्री चेकाळलीत खर. रात्र भर केकाटत्यात.. आवरा कोन तर त्याना..
12 Dec 2010 - 10:52 pm | रन्गराव
ती कुत्री इतकी अॅग्रेसिव्ह का होतात ह्याचा विचार केला आहे का? तुम्हाला कोणी जेवायलाच देत नसेल तर तुम्ही अन्न मिळवण्यासाठी प्रसंगी भांडणार नाही का ?
त्यांना उगाच मजा म्हणून दगड मारणार्यांचा बंदोबस्त कसा करायचा ह्याची चर्चा कधी करायची? आजकाल कुत्री सोडा, जंगातले हत्ती, बिबटे, लांडगेही मनुष्याच्या वस्तीवर हल्ले चढवू लागले आहेत. ह्या सगळ्या प्राण्यांचा बंदोबस्त करायला हवा का? आपण माणसांनी सगळी नैसर्गिक संसाधने संपवल्यावर हे प्राणी कुठं जाणार?
13 Dec 2010 - 10:30 am | नरेशकुमार
जनु मन्दिरा गान्धिच बोलु लागल्या
13 Dec 2010 - 10:38 am | चिंतामणी
जनु मन्दिरा गान्धिच बोलु लागल्या
तुम्हाला मनेका म्हणायचे आहे का? :(
13 Dec 2010 - 10:39 am | नरेशकुमार
तेच तेच
13 Dec 2010 - 12:55 am | इंटरनेटस्नेही
टारझन यांच्या प्रतिसादाशी अगदी सहमत. नाहीतरी आपण मोबाईल, पेन ड्राईव्ह, रुमाल, पाकिट, आणि 'पेन' आपल्यासोबत हरघडी बाळगतोच. मग एक दोन दगड स्वच्छ करुन आपल्या खिशात बाळगायला काहीच हरकत नाही.
आणि माझं पुर्णपणे व्यक्तिगत मत, हे सर्व प्राणिमित्र म्हणाजे मानवाधिकारवाल्या मंडळीं सारखे असतात. घरात बसुन आपल्या मतांची पिंक टाकणारे अहो कुत्रे रात्री अपरात्री बाईकचाच काय कारचा देखील पाठलाग करतात. आणी प्रत्येकच वेळी आपण काचा बंद केल्या असतील असे नाही.. अचानक त्यांचे आतल्या व्यक्तीला नख जरी लागले तरी इंजेक्शन घ्यावे लागते.
-
(भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत दयामाय न बाळगणारा यमराज) इंटेश.
13 Dec 2010 - 8:43 am | मदनबाण
प्रकटाआ...
13 Dec 2010 - 8:56 am | मदनबाण
या भटक्यां कुत्र्यांचा लयं त्रास हाय च्यायला...
यांची अनियंत्रीत प्रजा हेच या बिकट समस्येचे मूळ कारण असावे असे वाटते,च्यामारी पण त्याचा आपल्याला का त्रास ?
माझी तर या कुत्तरड्यांमुळे दररोज झोपमोड होते... रात्रीच यांना काय उत येतो कोणास ठावुक? पण माझ्या डोक्याची पार काशी-मथुरा होते त्याचे काय ? साउंड प्रुफ खिडक्या बसवाव्यात काय असा सुद्धा इचार करतोय...
साला दिवसभर खाउन जमा केलेल्या कॅलरीज रात्री भुंकुन भुंकुनच कमी करायच्या असतात असे कोणी या कुत्तरड्यांना शिकवुन ठेवले आहे काय ? साला भुंकुन भुंकुन यांची नरडी सुजत कशी नाहीत हेच मला काही केल्या समजत नाहीये !!!
कॉमन वेल्थ गेम्सच्यावेळी त्या परिसरातील कुत्री पकडण्यात आली व्हती म्हणे, तसं असेल तर तिच्यामारी माझ्या कॉलनीत असे खेळ भरवावे आणि कुत्तरड्यांचे काम तमाम करावे ,असे सरकारला सुचवावे काय ? असा विचार देखील करुन झालाय. ;)
काही झालं तरी मोकाट कुत्तरड्यांचा कायमचा बंदोवस्त झालाच पाहिजे.
13 Dec 2010 - 10:09 am | ईन्टरफेल
हित कुत्र्यांची चर्चा चालु हाय अन!
तुमि बीबट्याची लिंक देताय
आमच्या गावात दर महिन्याला
एक बीबट्या पकडला जातो!
13 Dec 2010 - 10:43 am | मदनबाण
तुमि बीबट्याची लिंक देताय
ती बिबट्याची लिंक नसुन वाघाची आहे, ज्यांची संख्या वाढायला हवी त्यांची रोडावत चालली असुन... नको त्या प्राण्यांची संख्या दिन दुगनी रात रात चौगुनी वाढत आहे.
संजय गांधी उद्यानातुन बाहेर पडणारे अनेक बिबटे घोडबंदर रोडच्या वाहतुकीने मारले गेले आहेत, बिबट्यांना नैसर्गिक आहार मिळत नसावा, तसेच त्यांचे आरक्षित क्षेत्र मनुष्याने ग्रस्त होत असावे...मग भुकेला जीव मनुष्य वस्तीत येतो !!!
उपाय :--- आवारा कुत्र्यांना पकडुन अशा पार्कमधे सोडुन दिले पाहिजे,म्हणजे बिबळ्यांची पोट पुजेची सोय होइल आणि आपल्या शांत झोपेची सुद्धा. ;)
14 Dec 2010 - 4:09 pm | छत्रपती
काल आम्ला मन्त्र्यान्नी हग्या दम दिला. सुद्दलेकन सुदरवा नायत तुम्चा शिरच्छेद होइन मन्ले. तवा आमचे तेल्लाम्प पेतले आनी मनुन रातोरात अब्यास करुन कलफलक सोध्ला.
हा तर मदनब्बाण यान्नी बिबत्याचा उपाय सुचव्ला तो कास नामि हे. आम्च्या गावात एका रात्रे बिबट्या आला नि वेशीत झोपेल ३-४ कुत्र्यान्चा फदशा पादला. तेच्यानन्तर दुसर्या दिवसपासुन सगले कुत्रे घाबर्ले आनि घरान्च्या कवलान्वर जावोन लपोन बसु लाग्ले. बिबट्या सोघुन सोधुन कुत्रे फस्त करत राहला. गावतले सगले कुत्रे सन्प्ले. कुत्र्यान्ची लोक्सन्ख्या सम्प्ली पण मानसान्ची वाधली.
13 Dec 2010 - 9:14 am | मनीषा
खरच ..
ही तर दहशतवादा पेक्षा जास्त गंभीर समस्या आहे .
चौकशी साठी अनेक सदस्यीय समिती नेमावी ..
(त्याच बरोबर अमेरिकेची मदत मागावी काय ? ... या बद्दल विचार विनिमय करण्यासाठी वेगळी समिती नेमावी )
चर्चा करून, शांततामय मर्गाने सर्व प्रश्न सुटतातच, -- मग त्या साठी लागली जरा ५०-६० वर्षे तर काय हरकत आहे ?.
13 Dec 2010 - 4:32 pm | स्मिता.
मनीषाताई,
अहो, तुम्हाला या भटक्या कुत्र्यांचा (स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी) अनुभव दिसत नाही... म्हणूनच असा उपरोध सुचतोय. नशीबवान आहात.
मध्यरात्रीच या कुत्र्यांना काय चेव येतो देव जाणे. १५-२० कुत्री एकत्र येऊन चेकाळून भुंकत असतात. रोजची अशी झोपमोड होण्याचं कारण कुत्रे आहे हे वाचून अनुभव नसणार्यांना गंमत वाटते, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं हो!
लोकांना रात्री फिरताना तर गुंडांपेक्षा कुत्र्यांची भीती जास्त वाटते.
13 Dec 2010 - 5:37 pm | स्वानन्द
अहो ते उपरोधाने लिहीले आहे. :)
14 Dec 2010 - 10:20 am | स्मिता.
नाही हो स्वानंदराव, गल्ली नाही चुकले. ते उपरोधाने लिहिलेय हे कळले मला. पण दुखर्या नस वर बोट ठेवलं गेल्याने भावनेच्या भरात लिहिलं गेलं :)
14 Dec 2010 - 12:47 am | Nile
त्यांच्या प्रणयाराधनेत व्यत्यय आणल्यावर अजुन काय करतील कुत्रे?
14 Dec 2010 - 9:48 am | मनीषा
अरेरे !! देवा !
बुद्धीप्रामाण्यवाद की काय म्हणतात तो हाच का ?
आम्ही कुत्र्यांच्या भुंकण्यामागचा कार्यकारणभाव जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाही .
कुत्री भुंकायला लागली की त्यांचा आवाज बंद करायला पाहिजे एव्हढेच आम्हाला कळते ..
अर्थात शक्य तेव्हढ्या शांततामय मार्गाने ... हे राम .......!
13 Dec 2010 - 10:29 am | गवि
कुत्र्यांना मारायला नाय पायजेल. रात्रीचे भटकू नये.
13 Dec 2010 - 10:33 am | नरेशकुमार
बरोबर हाय,
कुत्र्यासारखा विमानदार कोनच नाय.
13 Dec 2010 - 11:06 am | गवि
व्हय तर्..खरंच तर हाय..
विमानात बाँब ठिवलाय म्हून फोन आला की लागत्यात नं कुतरे वास काढायला सूं सूं करुन..
अवांतर : जेट एअरवेजवाले नरेश आपणच का?
13 Dec 2010 - 11:15 am | नरेशकुमार
आमि अशिच मज्जा केलि होति. क्शमस्व : करा
मि तो नव्हेच. मि असाच एक फुटकळ प्रतिसादक/वाचक आहे
13 Dec 2010 - 11:19 am | गवि
अरेरे.. ते तुम्ही नव्हेच ?
असू द्या.. असू द्या.
आमाला वाटले फुकट इमानाचं तिकिटगिकिट भेटंल तुमच्याकडनं..
13 Dec 2010 - 11:43 am | मितभाषी
नंगा
टारझनचा प्रतिसाद लै भारी.
एका ज्वलंत समस्येला वाचा फोडल्याबद्दल श्री जयेश माधव यांचे अभिनंदन.
या कुत्र्यांना (पुल्लींगी) खोडव्यात घेवुन बडवायला पाहीजे.
13 Dec 2010 - 11:48 am | टारझन
तुम्ही (स्त्रिलिंगी) कुत्र्यांन्ना सिंगल आउट करत आहात हे मला खटकलेले आहे. आमच्या कॉलनीतल्या डॉली ला नाव सांगायला पाहिजे तुमचं @#@
13 Dec 2010 - 5:34 pm | अवलिया
तुमच्या कॉलनीतली डॉली यंदाच्या भादव्याला बाहेरच्या कॉलनीत लै हिंडत होती आणि सध्या पण तिचा जीव बाहेरच्या कॉलनीतच आहे असं परा डान्रावाला सांगत होता.
13 Dec 2010 - 6:08 pm | टारझन
असेल बाबा :) आजकाल डॉली समस्त स्त्रीलिंगी प्राणिमात्रांचे उक्ते घेईन फिरते म्हणे =))
13 Dec 2010 - 1:51 pm | योगप्रभू
श्रीकांत सिनकर लिखित 'इन्स्पेक्टर वाकटकरांच्या चातुर्यकथा' या पुस्तकातील एक कथा आठवली. मुंबईत श्रीमंत व बंगलेवाल्यांच्या घरात चोर्यांचे सत्र सुरु झाल्याने आणि गुन्हेगार सापडत नसल्याने पोलिस हैराण झाले होते. या प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर विनायक वाकटकरांकडे आला. या घरफोड्या बारकाईने अभ्यासताना एक मुद्दा वाकटकरांच्या लक्षात आला, की या चोर्या बहुतेक रात्री एक ते पहाटे चार या तीन तासांतच झाल्या आहेत. त्यांनी याच काळात गस्त वाढवली आणि त्यातून 'राणा' नावाचा बुद्धिमान गुन्हेगार सापडला. त्याच्या चौकशीत अचंबित करणारी माहिती हाती लागली. बंगल्यांमध्ये चोर्यांचे तंत्र विकसित करण्यापूर्वी या राणाने माणसांच्या आणि कुत्र्यांच्या गाढ झोपण्याच्या वेळांचा अभ्यास केला होता. त्यामुळे तो बहुतेक चोर्या रात्री २ ते ३ या वेळात करत असे.
भटकी कुत्री ही कधीही धोकादायकच असतात. अलिकडच्या काळात तर अशा अनेक घटना वाचनात आल्या आहेत ज्यात या भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांचे लचके तोडून मांस ओरबाडून काढले आहे. भटकी कुत्री प्रामुख्याने कचराकुंडीतील खरकट्यांवर पोसली जातात. घरे व हॉटेलमधून कुंडीत फेकलेल्या पदार्थांत तेल व स्निग्धाचे (बटर, चीज) प्रमाण मुबलक असते शिवाय मांसातील हाडांचे तुकडेही कुत्र्यांसाठी मेजवानी असते. ते खाऊन भटकी कुत्री तापट स्वभावाची होतात. (पाळलेले कुत्रे चीडखोर होऊ नये यासाठी कुत्र्याला तेल न लावलेली पोळी खायला देण्याची काळजी मालकाला घ्यावी लागते.) या तापट कुत्र्यांचे दात शिवशिवायला लागतात. ती आपापसांत भांडताना इतर कुत्र्यांचे लचके तोडतात. पळत्या गाड्यांचा पाठलाग करणे, एकट्या पादचार्याच्या अंगावर जाणे, हे त्यांचे आवडते खेळ. यात एखाद्या कुत्र्याच्या शेपटावरुन किंवा पायावरुन गाडी गेल्यास ते कायम गाड्यांशी खुनशीने वागते. भटकी कुत्री पिसाळण्याचा धोका अधिक असतो.
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात भटकी कुत्री मलमूत्र विसर्जन करतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरते. कुत्र्याचे नीर्बीजीकरण करणे हा उपाय त्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी ठीक असला तरी दाताचे काय? कुत्र्याचा दात नुसता कातडीला लागला आणि व्रण उमटला तरी रेबीजची तीन इंजेक्शने आणि धनुर्वाताचे एक अशी चार इंजेक्शने घ्यावी लागतात.
मीपण भटक्या कुत्र्यांचा नायनाट व्हावा, या मताचा आहे.
13 Dec 2010 - 4:58 pm | छत्रपती
कुअतर दसल तअरे कल्जी नाय कराची.
पुरवीसारके बेम्बतात १४ सुया घेयाच गरज नाहे
दसुद्या त्यन्चे कमाच हे ते.
13 Dec 2010 - 5:40 pm | स्वानन्द
>>दसुद्या त्यन्चे कमाच हे ते
आयला... ही कुठली कुत्री? डसणारी... !!
13 Dec 2010 - 6:14 pm | नरेशकुमार
डसणारी कुत्री
माझ्या बालमनात भलतेसलते XXXXXXX इचार आले.
13 Dec 2010 - 10:00 pm | अविनाशकुलकर्णी
कुत्रा चाव्या मुळे जे विष अंगात भिनते ते उतरवण्या साठी साठी एक मंत्र आहे असे वाचले होते..
कुत्रा अंगावर आल्यास घाबरुन पळु नये..त्या मुळे कुत्रा अजुनच बिथरतो..आहे त्या जागी शांत उभे रहावे,,त्या मुळे श्वान पण शांत होतो..जरा वेळ तो थांबतो..व नंतर जातो...
जर हाणा मार्या करायच्या असतिल तर एक दगड उपयोगाचा नाहि ..कारण नेम चुकतो..मग गोची होते व कुत्रा डुख धरतो..चांगले १०-१२ दगड जवळ बाळगुन रहावे..म्हणजे नेम चुकला तरी भिति नसते....
डुख धरलेला कुत्रा कधि तरी वचपा काढतोच..
13 Dec 2010 - 10:09 pm | सूर्यपुत्र
>>कायम एखादा दगड खिशात ठेवत चला... घाबरु नका दगड खिशात ठेवल्याने लगेच धर्मांतर होत नाही .
आणि
>>चांगले १०-१२ दगड जवळ बाळगुन रहावे..म्हणजे नेम चुकला तरी भिति नसते....
?????????
13 Dec 2010 - 10:09 pm | गणपा
मोकाट कुत्री (कुत्र्यांच अनेक वचन) पकडुन ती चीनला एक्सपोर्ट करावी.
१) आपल्याला कुत्र्यांपासुन मुक्ती.
२) त्यांच्या जेवणाची सोय. (त्यांच्या म्हणजे चीन्यांच्या, कुत्र्यांच्या नव्हे)
३) उत्पंन्नाच नवीन साधन
13 Dec 2010 - 10:26 pm | नगरीनिरंजन
ज्वलंत विषय आणि सुंदर प्रतिसाद! कुत्रे कुत्र्यांच्याच मौतीने मेले पाहिजेत. प्रजा वाढवण्याचा हक्क फक्त माणसांना असताना त्यांची प्रजा वाढते हे कधीही सहन केले जाऊ नये. रस्त्यावरून जाणारी गाडी ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती गाडी आपल्या अंगावरून जाणे किंवा मोठ्या आवाजात किंचाळत जाणे हा त्या गाडीचा हक्कच आहे ही साधी गोष्ट त्यांना कळत नाही. भारतात दरवर्षी लाखाच्यावर बळी घेणार्या या गाड्यांविरूद्ध खुद्द माणूस ब्र काढत नसताना ही कुत्री गाडीवर भुंकतात, तिचा पाठलाग करतात म्हणजे काय? कुत्तरडे साले. मारा. ठेचा.
13 Dec 2010 - 10:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-)
13 Dec 2010 - 10:54 pm | शाहरुख
नैसर्गिक बैसर्गिक ठेवा बाजूला !! प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा !
13 Dec 2010 - 11:41 pm | नगरीनिरंजन
गल्लोगल्ली उकीरडे नसते तर त्यावर जगणारी भटकी कुत्रीही नसती. प्रश्न काय आहे ते ठरवा आधी. शहरात उकीरडे आहेत म्हणून कुत्री, माकडं वगैरे सहज मिळणार्या अन्नामुळे येतात. तुमची गल्ली स्वच्छ ठेवा. कुत्री येणार नाहीत. सगळं शहर स्वच्छ असेल तर अन्नाच्या शोधात ती बाहेर जातील. पण आपण स्वतः स्वच्छता करणे, आजूबाजूंच्या लोकांना स्वच्छता ठेवायला भाग पाडणे आणि भटके कुत्रे दिसल्यास लांब शहराबाहेर नेऊन सोडणे हे करण्यापेक्षा कुत्री मारणे सोपे, नाही का?
14 Dec 2010 - 12:19 am | शाहरुख
धिस मेक्स सम सेन्स :-)
14 Dec 2010 - 7:35 am | नगरीनिरंजन
हो ना? गुड. मग आता उगाचच चावू नका बरे.
13 Dec 2010 - 11:12 pm | पंकज
हि समस्या परप्रांतिय कुत्र्यांमुळे निर्माण झाली आहे. परप्रांतिय कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. भुमीपुत्रांवर अन्याय होता कामा नये.
14 Dec 2010 - 9:42 am | नरेशकुमार
मराठी कुत्रा आन बिहारि कुत्रा यान्च्या भुन्कन्यात काय फरक अस्तो.
14 Dec 2010 - 6:27 am | हुप्प्या
जर खाण्याकरता प्राणी मारलेले (कायद्याला) चालतात तर लेप्टोस्पायरोसिससारख्या जीवघेण्या रोगांपासून वाचण्याकरता प्राणी मारणे कायद्याने चूक कसे ठरवले? दोन्ही बाबतीत मनुष्य आपल्या फायद्याकरता दुसर्या प्राण्याचा जीव घेतो आहे.
डास, ढेकूण, झुरळे हे प्राणी उपद्रवकारक आहेत आणि त्यांना मारणे कायदा चूक समजत नाही. त्यांना मारण्याकरता राजेरोसपणे औषधे बनवली जातात, विविध कंपन्या फवारे मारायची कंत्राटे घेतात. तर मग कुत्र्याने काय घोडे मारले आहे? भटक्या कुत्र्यांना मारायला आडकाठी का असावी?
14 Dec 2010 - 10:07 am | नितिन थत्ते
म्युनिसीपालिटीला कुत्री मारण्यास कोणत्याही कायद्याने बंदी नसावी असे वाटते. हा प्रकार तथाकथित जनहित याचिकेमुळे झाला आहे. प्राणिमित्र कोर्टात गेले आणि कोर्टाने ऑर्डर काढली. मूळ याचिकेवर शासनाने स्वतःचा बचाव केला नाही कारण कुत्री पकडून मारणे या कामातून त्यांची सुटका होत होती. येथे सांगितलेला मेकॅनिझम वापरला गेला.
कोर्टाला कसलीच अकाउंटेबिलिटी नसल्याने कोर्टाने ऑर्डर का काढली असे कोर्टाला विचारण्याची सोय नाही म्हणून हे चालू राहिले आहे. खटल्याच्या वेळी प्राणिमित्र संस्थांनी कुत्र्यांची नसबंदी आम्ही करू (नसबंदीची पुरेशी यंत्रणा नसतानाही) असे सांगितले होते.