अळूवडी

जागु's picture
जागु in पाककृती
9 Dec 2010 - 3:38 pm

लागणारे साहित्य:
८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन)
बेसन २ वाट्या
अर्धा वाटी तांदळाचे पिठ
चिंचेचा कोळ
गुळ
मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या)
मिठ
आल लसुण पेस्ट
कांदा चिरुन भाजुन
सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन
१ चमचा तिळ
अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला
तळ्यासाठी तेल

पाककृती:
अशी ताजी ताजी अळूची पाने घ्या.

पानाच्या पाठी देठ असतो थोडा जाडा

हे देठ सुरीने थोड तासुन घ्या म्हणजे उंडा/लोड करताना तो पोकळ होत नाही. जर पाने छोटी असतील तर गरज नाही.

वरील जिन्नसातील अळूची पाने आणि तेल वगळून सगळे बेसनमध्ये सगळे मिसळून घट्ट मिश्रण करावे.नंतर पाट किंवा मोठे ताट घेउन त्यावर अळूचे पान उलटे ठेउन त्यावर पिठाचे मिश्रण सारवायचे.

मग दुसरे पान उलटेच पण विरुद्ध दिशेन लावायचे आणि त्यावर मिश्रण सारवायचे. (३६ चा आकडा)

माझी छोटी सुगरण मला मदत (लुडबुड ) करत असते नेहमी.

अशीच उलटी पाने एकमेकांच्या विरुद्ध लावायची एका लोड साठी मोठी असतील तर ५-६ आणि छोटी असतील तर ७-८ पाने लावायची. मग लावलेल्या चारी पानांच्या कडेची बाजु थोडी आत मोडून त्याचे लोड करायचे किंवा आधी गुंडाळून मग कडा आत घुसवायच्या

आता उकडीच्या भांड्यात वाफेवर हे लोड ठेउन २० ते ३० मिनीटे हे लोड वाफवण्यासाठी ठेवावेत. एक लोड भांड्यात बसत नव्हता म्हणून धारदार सुरीने कापुन ठेवला आहे.

आता धिर धरण्याचे काम करा. झाकण उघडून लोड थोडे थंड होउ द्या.

थंड झाल्यावर लोडच्या सुरीने वड्या पाडा . तवा चांगला तापवुन त्यावर थोडे तेल पसरवुन त्यात अळूवड्या मंद गॅसवर खरपुस तळा. तो.पा.सु. टाईपतानाच.

ह्या आहेत तळलेल्या गरमागरम वड्या.

अधिक टिपा:
आल लसुण पेस्ट तसेच कांदा खोबर न टाकताही प्लेन करता येतात. पण ह्यातील खोबर खाताना खुसखुशीत लागत. करुन बघाच.
कांदा खोबर्‍याची पेस्ट आजिबात करु नका चांगली नाही लागत तसाच चिरलेला तळून कांदा आणि किसुन भाजलेले खोबरे थोडे कुस्करुन टाका.

तळताना आवडत असल्याच मोहरीची फोडणी आणि वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकु शकता.
गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही थोडा थोडा टाकला तरी चांगला लागतो.

अशीच अळूवडी अळूची पाने चिरुनही करता येते. ज्यांना पाने लावण्याचे काम कटकटीचे वाटते त्यांने पाने चिरुन मिश्रणात मिसळुन लोड करुन वाफवायचे. कोथिंबीर किंवा कोबीच्या वड्यांप्रमाणे. पण इसमे मजा नही.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

9 Dec 2010 - 3:40 pm | अवलिया

मेलो !

मेघवेडा's picture

9 Dec 2010 - 3:41 pm | मेघवेडा

ठार मेलो!

गले मे खिचखिच होते ... म्हणुन आळुच्या वड्या आम्हाला आवडत नाही ... त्यामुळे जिवंत पण राहिलो (अजुन एक फायदा) :)

- (नवी पाकृ) टाळु च्या काड्या

मुलूखावेगळी's picture

9 Dec 2010 - 9:51 pm | मुलूखावेगळी

- (नवी पाकृ) टाळु च्या काड्या

टाळु च्या एवजी अळुच्या काड्यान्चि हरभरा डाळ घालुन चान्गली भाजी होते.

बर्याच जनाना माहित ही असेल.

मुलूखावेगळी's picture

9 Dec 2010 - 9:51 pm | मुलूखावेगळी

- (नवी पाकृ) टाळु च्या काड्या

टाळु च्या एवजी अळुच्या काड्यान्चि हरभरा डाळ घालुन चान्गली भाजी होते.

बर्याच जनाना माहित ही असेल.

सूड's picture

9 Dec 2010 - 3:45 pm | सूड

तों पा सु

स्मिता.'s picture

9 Dec 2010 - 4:40 pm | स्मिता.

हे पाककृती टाकणारे एक तर अश्या छान पाकृ लिहितात आणि सोबतीला असे मोहात पाडणारे फोटो टाकतात!!
हापिसात बसून हे असं वाचयलाच नको. उगाच तों पा सु :(

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 4:42 pm | परिकथेतील राजकुमार

ख ल्ला स !!
मार डाला....

आजकाल बाजारात हे उंडे आयते मिळतात. घरी आणुन मस्त कापायचे आणि गरम करुन वड्या खायच्या.

प्रियाली's picture

9 Dec 2010 - 4:46 pm | प्रियाली

आमच्याकडे अळूची पाने मिळत नाहीत त्यामुळे (दुर्दैवाने) फ्रोझन अळूवड्या खाव्या लागतात. माझा फ्रीझर पॅकेट्सने भरलेला असतो.

असो.

जागु, पुढल्यावेळी अळूवडी कराल त्यात करंदी टाका. भन्नाट लागते. खूप वर्षे होऊन गेली खाल्ल्याला. :(

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 4:51 pm | परिकथेतील राजकुमार

जागु, पुढल्यावेळी अळूवडी कराल त्यात करंदी टाका. भन्नाट लागते.

सामान्य माणसाला कळेल असे बोला की हो रामसे चान तै ;) करंदी म्हणजे ?

प्रियाली's picture

9 Dec 2010 - 6:26 pm | प्रियाली

करंदी म्हणजे जवळा आणि कोलंबीच्या मधल्या साईझची पांढरी शुभ्र कोलंबीची बहीण. ;)

जागुतै पुढली रेशीपी करंदीची हवी.

sneharani's picture

9 Dec 2010 - 4:48 pm | sneharani

मस्तच आळूच्या वड्या!

चिंतामणी's picture

9 Dec 2010 - 5:16 pm | चिंतामणी

फोटु आणि पाकृ मस्तच आहे.

पण एक शंका आहे. आळु खाजरा आहे की नाही हे कसे ओळखायचे?

बाकी छोटी सुगरण मदत छान करीत असावे असे दिसते.

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 5:50 pm | पर्नल नेने मराठे

चिण्ट्स्...वडिचा अळु काळपट असतो.... भाजिचा हिरवागार असतो.
चिरताना हाताला खाज आली कि खाजरा समजावा =))

चिंतामणी's picture

11 Dec 2010 - 8:04 am | चिंतामणी

धन्यु.

परन्तु "जागु "च्या फोटोतील आळु हिरवागार दिसत आहे.

सुनील's picture

10 Dec 2010 - 1:51 am | सुनील

पण एक शंका आहे. आळु खाजरा आहे की नाही हे कसे ओळखायचे?
सोप्पय!! अळू खाऊन बघायचा. घशाला खाज आली तर समजायचे की अळू खाजरा आहे. नाहीतर नाही!

@जागूतै
पाकृ बाकी झक्कास!

गणपा's picture

9 Dec 2010 - 5:24 pm | गणपा

वॉव.. झक्कास.
तळलेल्या अंळुवड्यां इतक्याच नारळाच्या दुधात आटवुन केलेल्या अळुवड्या पण ब्येष्ट.
(इथे साध भाजीच अळु मिळत नाही वडीच कुठुन आणायच ?) :(

स्पंदना's picture

9 Dec 2010 - 5:45 pm | स्पंदना

नारळाच्या दुधात आटवुन केलेल्या अळुवड्या ???? पहिल्यांदा ऐकतेय.

गणपा भाउ रेसिपी. ताबडतोब.

जागुताई खा खा लेकीच्या हातच्या वड्या खा ! धाट्या मोट्या व्हा!
ही पद्धत मला नविन आहे , पण मस्त दिसते आहे. करुन पाहिन .

पाककृती काही खास वेगळी नाही.
फक्त तळण्या ऐवजी अळुवडीच्या तुकड्या (सधारण ३/४ इंच जाड्या) नारळाच्या दुधात बुडवुन मंद आचेवर दुध आटे पर्यंत शिजवाव्या.
(चित्र देता येत नाही. कारण मुदलातल अळुच गायब आहे :( )

या पाकृनंही "जीव घेतला"!
पण गणपासाहेब, तुम्ही जर परसात केळीचे खुंट वाढवू शकता तर अळू का नाही?
भारतीय ग्रोसरीत अळकुड्या मिळत असल्या तर आणून मातीत लावा.

>>भारतीय ग्रोसरीत अळकुड्या मिळत असल्या तर आणून मातीत लावा.
भारी आयडियाए.
एवढ शिंपल कस सुचल नाही मला ?
आता त्या अळकुड्यांचा शोध घेतला पाहिजे. अथवा जर कुणी इथे भारतातुन येणार असेल त्याच्या सोबत मागवल्या पहिजेत. :)

प्रियाली's picture

9 Dec 2010 - 7:30 pm | प्रियाली

अळूची पाने हाताच्या पंज्याच्या आकाराची आली. :(

त्यामुळे इंडियन स्टोरात मिळणार्‍या अळकुड्या आणि अळू (भाजीचा किंवा वडीचा) यांचे कंद एकच का असा प्रश्न पडला.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2010 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

अळूची पाने हाताच्या पंज्याच्या आकाराची आली.

तू काकडीच्या वड्या कर :P

करंदीच्या माहितीबद्दल धन्यवाद. पण पेशवाई थाटाच्या आळुवडीत करंदी काय अग ?

बहुतेक गावांत आळू हे परसात लावतात आणि त्याच्या आळ्यात घरातील खरकट्याचे पाणी जाऊ देतात, तसेच आळूच्या मुळाशीही घरातले खरकटे फेकतात. याचे कारण म्हणजे आळू खरकट्यावरच चांगला पोसला जातो.

पुण्यात हल्ली तयार आळूवड्या मिळतात. जोशी स्वीट्सच्या वड्या अप्रतिम. महाग पडतात, पण त्यांनी सर्व काळजी घेतलेली असते. खाजरा आळू नसतो. कोथिंबिरीच्या वड्या मात्र आमचे अर्धांग 'बेस्ट इन क्लास' करते. कोथिंबीर निवडण्याचे काम अर्थातच माझे.

पुण्यातील कार्यालयात लग्नात अळूची भाजी (फतफतं) असेल तर मी अनमान करत नाही. 'हाण सख्याहरी' म्हणून आडवा हात मारतो.

लेखन आवडले.

पुण्यातील कार्यालयात लग्नात अळूची भाजी
अगदी अगदी.
खरं तर लग्नाचा जुन्याकाळचा बेत मला अजूनही आवडतो.
जिलबी, मठ्ठा, अळूची भाजी, मसालेभात वगैरे.;)
आजकाल असा मेन्यु असला कि लोक नाक मुरडतात म्हणे (ऐकीव)!

अल्ला जीव घेतला!;)
फारफार आवडता प्रकार आहे.
सगळे फोटू मस्त! छोटी सुगरण आवडली.
मीही अश्याच करते फक्त एक बदल म्हणजे बेसनाचे प्रमाण थोडे कमी आणि त्याऐवजी कणिक घालायची.
आमच्या इथे चक्क अळूची पानं कधितरी मिळतात मग अळूची पातळ भाजी किंवा वड्या करते.
तरी फ्रोझन वड्या हा पर्याय आहेच.

मदनबाण's picture

9 Dec 2010 - 7:58 pm | मदनबाण

अहाहा... माझा आवडता खाद्य पदार्थ !!! :)
ठाण्याला खंडेलवालकडची अळुवडी यकदम ब्येस्ट लागते बघा. :)

(सुरळीच्या वड्यांचा प्रेमी)

प्राजु's picture

9 Dec 2010 - 8:57 pm | प्राजु

हाय हाय हाय!!! बापरे!!
अशक्य आहेत सगळे फोटो.
आणि तळलेला कांदा आणि खोबरे टाकून मी नव्हत्या केल्या कधी. आता भारतात गेले की करेन.
पटेल मध्ये आळू मिळते पण बर्‍याचदा खाजरे च असते.. त्यामुळे मी ही प्रियाली प्रमाणे फ्रोजनच आणते.. :)

प्रियाली's picture

9 Dec 2010 - 9:11 pm | प्रियाली

पटेलमध्ये अळू मिळते हा प्रवाद मी अमेरिकेत सर्वत्र ऐकला आहे पण प्रत्यक्षात शिकागो किंवा इंडी इथल्या पटेल्समध्ये मला कधीही अळू दिसले नाही. :( :(

गरवी गुजराथच्या फ्रोझन अळूवड्या फस्क्लास असतात असे वाटते.

आमच्या इथेही इंडीयन ग्रोसरीत कधीही अळू दिसायचा नाही पण चायनीज दुकानात असतो.
गरवी गुजराथची प्रॉडक्ट्स् गेल्या तीनचार महिन्यांपासून आमच्या इथे दिसायला लागलीत.
अळूवड्या मी भगवतीच्या आणते. गरवीच्या बघते मिळतात का.

अगं खरंच मिळतो अळू पटेलात. आणि अगदी ५-६ मोठी पाने असतात. (त्यातली २ तरी फाटकी असतात) पण आजपर्यंत जितक्या वेळेला आणला तितक्यांदा तो खाजराच निघाला. चिंच घालूनही खाज गेली नाही अळूची. ;)
आमच्याकडे फ्रोजन मध्ये दीप किंवा स्वाद च्या मिळतात पात्रा. अशोका च्या पाहिल्यात.
दीपच्या सगळ्यात आवडल्या या तिन्हीत. :)

इंडीयन ग्रोसरीच्या बाबतीत तुम्ही ब्वॉ लकी!
आम्ही आपले इनोवाले.;)

निवेदिता-ताई's picture

9 Dec 2010 - 9:14 pm | निवेदिता-ताई

॒पटेल मध्ये आळू मिळते पण बर्‍याचदा खाजरे च असते.. त्यामुळे मी ही प्रियाली प्रमाणे फ्रोजनच आणते..

अग आळू खाजरे असते म्हणुनच त्यात चिंच कोळ असतो...आळू घशात खाजत नाही.

अहाहा..............बाकी पाककॄती एकदम मस्त.

आज पहिला ह्या धाग्याचं दर्शन घेतलं. मन सुखावलं आणि जीभ चाळवली. बाकी माझा वीकांताचा हाच मेन्यू असल्याने चिंता नाही...

- (अळुवडी प्रेमी) पिंगू

विसोबा खेचर's picture

9 Dec 2010 - 10:04 pm | विसोबा खेचर

एक नंबर..!

भारतीय दुकानात अळू मिळाला नाही तरि टारो रूट्स आणी टारो लिव्हज चायनीज दुकानात मिळतात.

जे ठार मेले आहेत त्यांना पहीला अमृत. जिवंत व्हा.

जे वाचलेत त्यांनी एकदा खाउन बघाच.

प्रियाली बघेन करुन करंदीच्या अळूवड्या. खिम्याच्याही करतात.

योगप्रभु. माझी आई ह्या झाडांना चिंचेचा पाला खत म्हणून खालायची बुध्याभोवती. मी हल्ली ताक घालते. त्यामुळे पाण अगदी तजेलदार होतात. तसच ह्याला शेणखत घातल तर खाजरी होतात.

चिंतामणी, आळूची देठे बघा काळी असतात. इतर अळूंची हिरवी किंवा पांढरट असतात.

बाकी सगळ्या सगळ्यांचे खुप धन्यवाद.

आशिष सुर्वे's picture

11 Dec 2010 - 11:34 am | आशिष सुर्वे

सुंदर!!
अळूवडी मध्ये एक वेगळीच नजाकत आहे..
दिसायलाही सुंदर अन् चवीलाही स्वादिष्ट!!

भानस's picture

11 Dec 2010 - 10:06 pm | भानस

लगेच करायला हव्यात पण इतक्या स्नोमध्ये अळूची पाने कुठे मिळायची, :( . म्हणजे फ्रोजन आणून तात्पुरते समाधान करावे लागणार...

चिंतामणी's picture

12 Dec 2010 - 12:42 am | चिंतामणी

भौ/ताई (नावावरून आणि परीचयात काहिही लिहीलेले नाही म्हणून) समजले.

तुम्हाला काय म्हणायचे ते. ;)

त्या तै आहेत.
भाग्यश्री तै!

आशिष, भानस धन्यवाद.
चिंतामणी मी परिचय लिहीते.