मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अळूवडी

जागु · · पाककृती
लागणारे साहित्य: ८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन) बेसन २ वाट्या अर्धा वाटी तांदळाचे पिठ चिंचेचा कोळ गुळ मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या) मिठ आल लसुण पेस्ट कांदा चिरुन भाजुन सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन १ चमचा तिळ अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला तळ्यासाठी तेल पाककृती: अशी ताजी ताजी अळूची पाने घ्या. Image removed. पानाच्या पाठी देठ असतो थोडा जाडा Image removed. हे देठ सुरीने थोड तासुन घ्या म्हणजे उंडा/लोड करताना तो पोकळ होत नाही. जर पाने छोटी असतील तर गरज नाही. Image removed. वरील जिन्नसातील अळूची पाने आणि तेल वगळून सगळे बेसनमध्ये सगळे मिसळून घट्ट मिश्रण करावे.नंतर पाट किंवा मोठे ताट घेउन त्यावर अळूचे पान उलटे ठेउन त्यावर पिठाचे मिश्रण सारवायचे. Image removed. मग दुसरे पान उलटेच पण विरुद्ध दिशेन लावायचे आणि त्यावर मिश्रण सारवायचे. (३६ चा आकडा) Image removed. माझी छोटी सुगरण मला मदत (लुडबुड ) करत असते नेहमी. Image removed. अशीच उलटी पाने एकमेकांच्या विरुद्ध लावायची एका लोड साठी मोठी असतील तर ५-६ आणि छोटी असतील तर ७-८ पाने लावायची. मग लावलेल्या चारी पानांच्या कडेची बाजु थोडी आत मोडून त्याचे लोड करायचे किंवा आधी गुंडाळून मग कडा आत घुसवायच्या Image removed. Image removed. आता उकडीच्या भांड्यात वाफेवर हे लोड ठेउन २० ते ३० मिनीटे हे लोड वाफवण्यासाठी ठेवावेत. एक लोड भांड्यात बसत नव्हता म्हणून धारदार सुरीने कापुन ठेवला आहे. Image removed. आता धिर धरण्याचे काम करा. झाकण उघडून लोड थोडे थंड होउ द्या. Image removed. थंड झाल्यावर लोडच्या सुरीने वड्या पाडा . तवा चांगला तापवुन त्यावर थोडे तेल पसरवुन त्यात अळूवड्या मंद गॅसवर खरपुस तळा. तो.पा.सु. टाईपतानाच. Image removed. ह्या आहेत तळलेल्या गरमागरम वड्या. Image removed. अधिक टिपा: आल लसुण पेस्ट तसेच कांदा खोबर न टाकताही प्लेन करता येतात. पण ह्यातील खोबर खाताना खुसखुशीत लागत. करुन बघाच. कांदा खोबर्‍याची पेस्ट आजिबात करु नका चांगली नाही लागत तसाच चिरलेला तळून कांदा आणि किसुन भाजलेले खोबरे थोडे कुस्करुन टाका. तळताना आवडत असल्याच मोहरीची फोडणी आणि वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकु शकता. गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही थोडा थोडा टाकला तरी चांगला लागतो. अशीच अळूवडी अळूची पाने चिरुनही करता येते. ज्यांना पाने लावण्याचे काम कटकटीचे वाटते त्यांने पाने चिरुन मिश्रणात मिसळुन लोड करुन वाफवायचे. कोथिंबीर किंवा कोबीच्या वड्यांप्रमाणे. पण इसमे मजा नही.

वाचन 16900 प्रतिक्रिया 0