!जनावरांचे कळप चालत असतात कत्तलखान्याकडे
हाडांचे जणू सापळे सरकत असतात ह्या कत्तलखान्याकडे
लवथवते विक्राळपण ह्यांच्या डोळ्यातून पाझरत असते
तरी सरकत असतात गुरांचे कळप मुकाटपणे
नजरेत नसते कसली ओढ घरादाराची
तरी ओढली जातात अनामिक ओढीने ह्या जनावरांचे कळप
डोळे कोठे लागलेले असतात शून्यात कोठेतरी
त्याना येत असतो पाठीवर बसलेल्या काठीचा आवाज
नि बेचैन होऊन सरकत असतात झुंडीने अनामिक दिशेला
एखादे जनावर मुतते फदाफदा नि हगते जीव घाबरा झाल्यासारखा
एखादा कावळा बसतो त्यांच्या शिंगावर शहाजोगपणे
मजेने स्वताची हाउस घेत असतो पुरवून
जनावरांना नाही वाटत सुख, नाही फुलत रोमांच त्यांच्या कातडीवर
कसे होऊन जातात बधीर अनामिक भेसूर सावलीने
गरीब शेतकरी वांझोट्या शेतीची बघत असतो पडझड
दुष्काळाने झालेला असतो सुन्न बधीर केविलवाणा
चारा नसतो लेकराना खायला घालायला
त्यांच्या गळ्यातील घुग्रू वाजत असतात मृत्यूघंटेसारखे
पोटाच्या खळगीसाठी विकतो आपल्या लेकरांना
नि बघत बसतो शून्यपणे डोळे अंधारात
जनावरे सरकत असतात मोकळ्या गळ्यानी
छुमछन आवाज नसतो ऐकायला येत त्यांच्या कानांना
नसतो ताल चालण्यात गळत गोजिरवाणा
ते नग्नपणे चालत असतात पाठीवर नसतो मायेचा हात
ते झिडपिडत चालत असतात अनामिक गंधाने ती घाबरून जातात
हताशपणे पावले ढकलीत असतात अटल मृतुच्या भयाण वाटेकडे ....!!!
प्रतिक्रिया
2 Dec 2010 - 1:09 pm | गणेशा
२-३ दा वाचली कविता ..
विदारक चित्र खुप समर्थ पणे मांडलेले आहे.
शेवटचे २ कडवी तर मन अगदी सुन्न करतात ...
वांझोटी शेती, गळायातील मृत्यघंटा, प्राणी हे आपले लेकरुच हेशब्दप्रयोग एकदम योग्य वापरले आहेत ...
----------
आपल्याच लेकरांची ' मरण वरात' जेंव्हा शेतकरी पाहतो .. तेंव्हा त्याच्या मनाची अवस्था खुप केविलवाणी असते ...
गाडित कोंबलेली ..कधी काळी जीव लावलेली ती जणावरे आक्रोश करतात आणि शेतकर्याची स्तीथी खुप जबरदस्त पणे मांडलेली आहे ...
अप्रतिम कविता .. बस्स बाकी काहि बोलुच शकत नाहि ...
2 Dec 2010 - 4:00 pm | मदनबाण
विदारक कविता... वाचणे कठीण गेले अर्थात सत्य कटुच असते !!! :(
2 Dec 2010 - 9:58 pm | गवि
arey khoop great aahes..
Vegalyaach unchi varchya rachana karatoyas.
Khoop sharp..
Keep up..
3 Dec 2010 - 7:15 am | नगरीनिरंजन
विदारक चित्रण!
3 Dec 2010 - 8:31 am | शुचि
बाप रे!!
3 Dec 2010 - 10:53 am | पियुशा
सुन्न झाले वाचुन
8 Dec 2010 - 7:08 pm | स्वानन्द
तुमच्या कवितेचा विषय खूप चांगला आहे. मांडलाही आहे चांगला.
पण ती छंदोबद्ध असेल तर जास्त परीणामकारक होईल असे वाटते. अन्यथा ते एक मुक्तक वाटते ( क्रियापद उचलून मध्ये घातलेले ).
कृपया राग मानू नका. मला आपलं असं वाटलं म्हणून लिहीलं.
8 Dec 2010 - 7:23 pm | टारझन
कंठ दाटुन आला , गहिवरुन आले , करुणासागरात बुडाला , आणि डोळे पाणावले.
अवांतर : मुख्यपाणावर ५-६ कविता गाळणार्यांच्या यादीत आमच्या पाभेंनंतर तुम्हीच !
-(शोकाकुल) हंबीरराव गहिवरणे
8 Dec 2010 - 7:23 pm | टारझन
कंठ दाटुन आला , गहिवरुन आले , करुणासागरात बुडाला , आणि डोळे पाणावले.
अवांतर : मुख्यपाणावर ५-६ कविता गाळणार्यांच्या यादीत आमच्या पाभेंनंतर तुम्हीच !
-(शोकाकुल) हंबीरराव गहिवरणे