सिंगल अ‍ॅन्ड रेडी टु मिंगल.. ;)

इंटरनेटस्नेही's picture
इंटरनेटस्नेही in काथ्याकूट
4 Dec 2010 - 10:26 am
गाभा: 

नमसाकर मित्रांनो/मैत्रीणींनो..

बरेच दिवस म्हणजे खरंतर मिपाचा सदस्य झालो, तेव्हापासुन हा विषय मनात घोळत होता; आज म्हणलं लिहुन टाकु..

साधारणपणे वय वर्षे १४-१६ पासुन आपल्या मनात किशोरसुलभ भावना यायला सुरवात होते, म्हणजे ते साहित्यीक वगैरे जे शब्द वापरतात ना, मोरपंखी इ. तश्या. पण आपण नक्की ठरवु शकत नाही की आपल्याला नेमकं कोण आवडतंय ते.. म्हणजे त्या वेळेला सर्वच भिन्नलिंगी (आणि समवयस्क) लोकसंख्या आपल्याला आवडत असते अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दर १५ दिवसांनी आपण प्रेमात पडत असतो.. पण सहसा ते फक्त आर्कषण असतं.

पण जस जसे आपण मोठे व्हायला लागतो तेव्हा आपल्या भावना, स्वत: आणि इतरांबद्दलची जाणीव तीव्र होते. तारुण्याचे गुलाबी रंग देखील आपल्या मनात फुलत असततात, ज्याला शास्त्रज्ञ मंडळी संप्रेरक म्हणतात. सहसा आपण आपल्या सामाजिक व मानसिक पात्रतेला शोभुन दिसेल अशी व्यक्ती साथीदार (पार्टनर) म्हणुन निवडतो.

पण प्रेमाची ही प्रोसेस दरवेळेला अशी मुद्देसुद असेलच असं नाही, म्हणुन काही प्रश्न आपल्या समोर उभे राहतात:

१.किती तरी असे लोक असतात त्यांची एकंदर बौद्धिक/मानसिक पात्रता, अवस्था पाहिली तर तारुण्यसुलभ भावना वगरे तर दुरच राहिलं, साधी आपुलकी पण आपल्याला वाटत नाही. पण ते कमिटेड असतात.
अतिसामान्य मुलांना गर्लफ्रेंडस कश्या मिळतात? अतिसामान्य मुलींना बॉयफ्रेंडस कसे मिळतात?

२. या उलट कितीतरी लोक इअतके हुशार, चारित्र्यसंप्पन्न असतात की त्यांच्यांत नाव ठेवायला जागा शोधुन सापडत नाही. पण बिच्यार्यांना तसं कोणी भेटतंच नाही.. शेवटी मग कांदेपोहे नामक सण किमान २-३ वेळा तरी साजरा करणे यांच्या नशीबी येते.
इतके ऑलराऊंडर लोकं का सिंगल राहतात?

३. यशस्वी प्रेम प्रकरण म्हणजे काय?

४. ज्या दुर्दैवी जीवांचा कधी ब्रेक ऑफ होतो, त्यांना खाजगीत 'कॅरेक्टरलेस' हे लेबल का लावले जाते?

५. माननीय मिपाबांधवांचे या बाबतीत काय अनुभव आहेत? आयुष्याचा जोडीदार कांदेपोहे खाऊन ठरवणे योग्य की स्वत: ठरवुन?

वरील मुद्द्यांना अनुसरुन चर्चा करण्याची मी विनंती करतो.

प्रतिक्रिया

सिंगल रहाण्यामागे २ कारणं पाहाण्यात आलेली आहेत - (१) अति चिकीत्सा (२) कमीटमेन्ट फोबीया
माझ्या २ मैत्रीणी तरी अति चिकीत्सक होत्या. कपडे घ्यायला तासन तास लावतील, नाक मुरडतील. मुलगा पाहून आल्या की, उणीदुणीच काढत बसतील. कोणी आदर्श असतं का? तडजोड ही करावीच लागते.
_____

कांदापोहे अथवा प्रेम करून कसही लग्न करा, शेवटी तडजोड आहेच. मग काय फरक पडतो? बोथ आर सेम वेज.
_____
यशस्वी प्रेम म्हणजे अथवा नातं म्हणजे त्या नात्यामध्ये दोघांचीही वाढ होते. जे नातं परस्पर पूरक आणि पोषक ठरते ते.
____
>>सामान्य मुलामुलींना जोडीदार कसा मिळतो?>> ..... त्यांच्या अपेक्षाच आटोक्यात असतील. आवाक्याबाहेर फुगलेल्या नसतील बहुधा.

सामान्य मुलामुलींना जोडीदार कसा मिळतो? हा प्रश्न नाही ग त्याने विचारला
अतिसामान्य मुलांना गर्लफ्रेंडस कश्या मिळतात? अतिसामान्य मुलींना बॉयफ्रेंडस कसे मिळतात?
हा प्रश्न आहे.
गर्लफ्रेंडस / बॉयफ्रेंडस आयुष्यभर जोडीदार म्हणून साथ निभावतीलच असे नाही
असे असते तर दिपिका पदूकोन ला एवढे बॉयफ्रेंडस मिळाले नसते ;-)

अवांतर : इंट्या आजकल तुम्हारा पढाई में दिल नहीं लग रहा हैं क्या ?
या किसी की दिलकश आंखोंकी पढाई कर रहे हो ??
या तुम इस काबिल बनना चाहते हो कोई तुम्हारे प्यार में डूब जाए
इंटरनेटस्नेही Gonna Be Dr.Cupid (Phd. in Loveology )
(क्यूं बच्चू, किताबोंमें खत आने जाने लगे ?? ;-) )
listen to this
http://www.youtube.com/watch?v=IDaL2WKVluE
(Chris Brown-Gone Be My Girl )

Women fall in love by what they hear.
Men fall in love by what they see.
that's why women wear make up. that's why men lie. ;-)

बद्दु's picture

5 Dec 2010 - 4:07 pm | बद्दु

Women fall in love by what they hear.
Men fall in love by what they see.
that's why women wear make up. that's why men lie"

वाह ! वाह ! वाहिदा!..

परिकथेतील राजकुमार's picture

4 Dec 2010 - 11:00 am | परिकथेतील राजकुमार

इंट्या धागा वाचला रे मित्रा. छान लिहिले आहेस.

प्रेम, कॅरेक्टर, ब्रेक अप हे असले शब्द असणार्‍या धाग्यांपासून आम्ही कायम दूरच राहतो रे. त्यामुळे अधिक काही प्रतिक्रीयेत लिहिलेले नाही.

अवलिया's picture

4 Dec 2010 - 6:10 pm | अवलिया

+१

टारझन's picture

5 Dec 2010 - 10:44 am | टारझन

हार्मोन्स आर रियल अँड अ‍ॅक्चुअल डेविल्स

शैलेन्द्र's picture

5 Dec 2010 - 4:31 pm | शैलेन्द्र

हार्मोन्स्चं सोड, बट, डेविल इस बॅक, अ‍ॅन्ड आय लाइक इट..

स्पा's picture

4 Dec 2010 - 11:07 am | स्पा

छान रे इंत्या .....
एकदम ज्वलंत ( काश्मीर सारखाच) विषय मांडला आहेस.....

अनुभवी सदस्य काय म्हन्तायेत ते वाचायला आवडेल

अनुभवी सदस्य म्हणजे काय?
जे बरीच वर्षे सिंगल राहीलेत की बरीच वर्षे झाली त्यांचे सिंगलत्व संपलय असे

सिंगलत्व... जोरदार शब्द.. मटा वाचता वाटतं हल्ली विजूभौ :-)))))

जे बरीच वर्षे सिंगल राहीलेत की बरीच वर्षे झाली त्यांचे सिंगलत्व संपलय असे

कसंही.....

प्रेमाची प्रोसेस?

प्रत्येक गोष्ट एक प्रोसेस असते?

तुम्ही म्हणताय ते अतिसामान्य निदान मला तरी कधी नाही भेटले हो? मुळात सामान्य अन आति सामान्य अशी व्याख्या कशी करायची? दिसण सामान्य म्हणुन ? रहाणी सामान्य म्हणुन? की खटके बाज बोलता येत नाही म्हणुन?

यशस्वी प्रेम

म्हणजे लग्न होणे. अर्थात एकमेकाशी.
पुढ? पुढच सार पण मग यशस्वी होत का? माझ्या पहाण्यातली चार यशस्वी प्रेम कथा नायक अन नायिका भांडत अगदी एकमेकाच्या उरावर बसायला माग पुढे पहात नाहित . प्रेमा मुळ एकमेकाकडुन इतक्या अपेक्षा वाढलेल्या असतात की आमच्या सारखे अयशस्वी तिथ काही म्हणजे काही बोलु शकत नाहीत!

कोणत्याच पद्धतिला मी नाव नाही ठेवणार. पण एक मात्र जरुर सुचवेन, स्वतः चांगल वागल तर दुसर्‍या कडुन अपेक्षा करावी चांगल्याची, अन भावनिक नात हे बर्‍याच वेळा शारिरीक पातळी वर ही समृद्ध दायक असेल तर जोपासत अँड वाईस वर्सा! अथवा प्रेम विवाह असो वा पोहे विवाह शेवटी त्याच रुपांतर दे दणादण मध्ये व्हायला फारसा वेळ लागत नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

4 Dec 2010 - 5:59 pm | अविनाशकुलकर्णी

खरे आहे..प्रेमाचे गणीत अवघड..काहि श्रिमंत मुली एखाद्या अमीर्[खान] ड्रायव्हर वर प्रेम करतात..
तर काहि देखणे पुरुष रुपाने सामान्य असलेल्या मुलिच्या गळात माळ घालतात..
कित्येक मादक ललनांना आपण टकलु नव्~या बरोबर पहातो..व केस उपटतो..
सगळ्या गाठी वर बांधलेल्या असतात..आहे ते बरे म्हणत संसार करायचा

नावातकायआहे's picture

4 Dec 2010 - 6:52 pm | नावातकायआहे

आयला जास्त विचार करायचा नाय भाऊ.
जिंदगीके साथ दखल अंदाजी नही करनेका. जो होता है हो देनेका!

सूर्यपुत्र's picture

4 Dec 2010 - 7:51 pm | सूर्यपुत्र

>>अतिसामान्य मुलांना गर्लफ्रेंडस कश्या मिळतात? अतिसामान्य मुलींना बॉयफ्रेंडस कसे मिळतात?...

अतिसामान्य लोकांना अश्याच प्रकारच्या किंवा तत्सम गोष्टी मिळत असाव्यात...
तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदेह स्वर्गाला गेले होते असे म्हणतात.

--------------------
>>या उलट कितीतरी लोक इअतके हुशार, चारित्र्यसंप्पन्न असतात की त्यांच्यांत नाव ठेवायला जागा शोधुन सापडत नाही. पण बिच्यार्यांना तसं कोणी भेटतंच नाही.. शेवटी मग कांदेपोहे नामक सण किमान २-३ वेळा तरी साजरा करणे यांच्या नशीबी येते.
इतके ऑलराऊंडर लोकं का सिंगल राहतात?

ही ऑलराऊंडर लोकं सिंगल राहतात; कारण ते आपल्यासारखेच, किंवा आपल्यापेक्षा ऑलराऊंडर व्यक्तींचा शोध घेत असावेत....
-------------------------
>>यशस्वी प्रेम प्रकरण म्हणजे काय?

आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात भले आपण पहिले नसू ( असलो तर बरंच आहे), पण शेवटचे मात्र असू..
-------------------------------
>>ज्या दुर्दैवी जीवांचा कधी ब्रेक ऑफ होतो, त्यांना खाजगीत 'कॅरेक्टरलेस' हे लेबल का लावले जाते?

कारण त्यांचे कॅरेक्टर मॅच होत नसावे..

(अल्पमती)

अल्पमती ध्येयहीन? कसं व्हायचं !! तुम्हलातरी एखादी गर्लफ्रेंड आहे का नाही? ;)

भोचक शिल्पा

सूर्यपुत्र's picture

5 Dec 2010 - 10:23 am | सूर्यपुत्र

१) मी अतिसामान्य नाही. त्यामुळे मला गर्लफ्रेंडस, बॉयफ्रेंडस नाहीयेत.
हा, माझ्या फ्रेंडस पैकी काही गर्लस सुद्धा आहेत. तेवढ्यावरून त्यांना गर्लफ्रेंडस म्हणावे काय?

२) मी अश्या इअतके हुशार, चारित्र्यसंप्पन्न लोकांपैकी आहे की ज्यांच्यांत नाव ठेवायला जागा शोधुन सापडत नाही. म्हणून मी अजूनही सिंगल आहे.
त्यामुळे यशस्वी आणि प्रेम आणि प्रकरण यांच्याशी संबंध नाही, त्यामुळे ब्रेक ऑफ पण नाही.

(लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट - चौदाव्यांदा झालेला)

विनायक प्रभू's picture

5 Dec 2010 - 8:32 am | विनायक प्रभू

इफ यू आर रेडी टू मिंगल ऑल्सो बी रेडी टू गेट मँगल्ड

पिवळा डांबिस's picture

5 Dec 2010 - 8:44 am | पिवळा डांबिस

प्रेम हे असं "आता प्रेम करतो" म्हणून जमत नाय हो....
ते सर्दीसारखं एकाद्या दिवशी अचानक फाटकन होतं!!!!:)
मग कळतं की आपण प्रेमात पडलोय (काय समर्पक शब्द आहे!!) म्हणून!!!!
प्रेमामुळे सिंगलत्व हरवलेला,
पिवळा डांबिस

धमाल मुलगा's picture

6 Dec 2010 - 4:39 pm | धमाल मुलगा

ह्याला म्हणतात सालं अनुभवशिध्द!

एका वाक्यात सगळं सार सांगून टाकलं.

बोला श्री श्री श्री १००८ पिवळा डांबिस महाराज की ज्जय!

प्रकाश घाटपांडे's picture

5 Dec 2010 - 9:51 am | प्रकाश घाटपांडे

पण जस जसे आपण मोठे व्हायला लागतो तेव्हा आपल्या भावना, स्वत: आणि इतरांबद्दलची जाणीव तीव्र होते. तारुण्याचे गुलाबी रंग देखील आपल्या मनात फुलत असततात, ज्याला शास्त्रज्ञ मंडळी संप्रेरक म्हणतात.

अशा संप्रेरकांचे स्प्रे बी मिळत्यान म्हने हल्ली! त्यांचे परिनाम किती असत्यात काय म्हाईत नाई ब्वॉ!

स्पा's picture

5 Dec 2010 - 10:29 am | स्पा

एवढीच माहिती हवी आहे कि.....

स्त्रियांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात ?
पुरुषांमधले कुठले गुण स्त्रियांना आकर्षित करतात

पुरुषांना कुठल्या प्रकारच्या स्त्रिया आवडतात ?
स्त्रीयांमाध्ले कुठले गुण पुरुषांना आकर्षित करतात....

या प्रश्नांच्या उत्तराने बहुधा "इंट्या " समाधानी होईल

सूर्यपुत्र's picture

5 Dec 2010 - 10:39 am | सूर्यपुत्र

"Men are from Mars, Women are from Venus"

हे आणि अश्या प्रकारची पुस्तके वाचा.
नक्की वाचा..
आत्ता पडलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळतील..
पण, नंतर कुठून झक मारली, आणि हे पुस्तक वाचले असे होईल...

शिल्पा ब's picture

5 Dec 2010 - 11:01 am | शिल्पा ब

स्वतः सिंगल नसलेले लोक मिंगलायला लागले कि मग इतर सिंगलांना जोडीदार मिळत नाही याबद्दल काय मत आहे?

पैसा's picture

5 Dec 2010 - 1:17 pm | पैसा

सध्या असले विचार करण्यापेक्षा अभ्यासाकडे जास्त लक्ष दे. परीक्षाना २/३ महिने उरलेत. परीक्षेत आणि नोकरी मिळवण्यात यशस्वी झालास की चांगल्या मुली आपोआप तुझ्याकडे लक्ष द्यायला लागतील. त्यांच्यापेक्षा त्यांचे आई बाप जास्त लक्ष द्यायला लागतील.

प्रेम आयुष्यात सांगून/विचारून येत नाही. आलंच तर मोरपिसासारखं सांभाळून ठेव. पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. तोपर्यंत तुला मधुबालापासून गल्लीतल्या मंगलपर्यंत कोणीही आवडत राहील. दुसरी कोणीतरी दिसली की तिला विसरशील.

यशस्वी होण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. माझ्या दृष्टीने जो मिळालेल्या गोष्टीत समाधान पाहतो, आणि नेहमी आनंदी राहतो, तो यशस्वी.

तसंच, एखादं जोडपं केवळ सर्व वेळ भांडत असतं याचा अर्थ असा नाही की त्यांचं एकमेकावर प्रेम नसतं. याउलट संपूर्ण शांतता असलेल्या घरात नवरा बायको मनाने प्रचंड दूर गेलेले असू शकतात.

ब्रेक अप झालेल्या कोणाला लोक कॅरेक्टरलेस म्हणत असतील असं मला तरी वाटत नाही. त्याला दुसरी असंख्य कारणं असू शकतात. या जगात अति सामान्य अशी कोणी व्यक्ति नसते. त्याचवेळी वर वर असामान्य वाटणार्‍या व्यक्तींचे पाय मातीचे असतात हेही वेळप्रसंगी दिसून येतं.

माझ्या मते तात्पर्य काय, तर आईन्स्टाईन सांगून गेलाय, प्रत्येक गोष्ट सापेक्ष आहे!

सूर्यपुत्र's picture

5 Dec 2010 - 1:52 pm | सूर्यपुत्र

अनिच्च.... - गोएंका गुरुजी @ विपश्यना.

पर्नल नेने मराठे's picture

5 Dec 2010 - 3:58 pm | पर्नल नेने मराठे

तसंच, एखादं जोडपं केवळ सर्व वेळ भांडत असतं याचा अर्थ असा नाही की त्यांचं एकमेकावर प्रेम नसतं. याउलट संपूर्ण शांतता असलेल्या घरात नवरा बायको मनाने प्रचंड दूर गेलेले असू शकतात.

१००% सहमत

नक्किच काय्तरी डाळ शिजतीय्..मेलं कोंबडं कस्सयाला घाबरत नाही तवा तुमिबी फुडं व्हा..आन होउन जाउ द्या जोरात्..कसं? आवो प्रेम्प्रकर्ण म्हणतोय म्या...प्रस्न इचारुन पाप-पुन्याचा कसला झाडा घेताय?तुमचं लाइफ हाये तवा तुमीच काय ते निर्णय घ्या, त्यात एवढा काय इचार करायचा?प्रेम्विवाह करा कि पोहाविवाह करा, शेवटी निभावुन न्या म्हंजी झालं...त्या पोरीला रस्त्यात एकलं टाकु नका..

कवितानागेश's picture

5 Dec 2010 - 4:30 pm | कवितानागेश

ज्यांना जोडीदार मिळतो, ते सामान्य्/ अतीसामान्य/ विशेष हे कुणी कसे काय ठरवायचे?

रेवती's picture

5 Dec 2010 - 10:24 pm | रेवती

१.अतिसामान्य मुलांना गर्लफ्रेंडस कश्या मिळतात? अतिसामान्य मुलींना बॉयफ्रेंडस कसे मिळतात?
आपल्याला अतिसामान्य वाटणारे लोक कोणालातरी ग्रेट वाटतात तेंव्हा त्यांना जोडीदार मिळतो.
२. या उलट कितीतरी लोक इअतके हुशार, चारित्र्यसंप्पन्न असतात की त्यांच्यांत नाव ठेवायला जागा शोधुन सापडत नाही. पण बिच्यार्यांना तसं कोणी भेटतंच नाही.. शेवटी मग कांदेपोहे नामक सण किमान २-३ वेळा तरी साजरा करणे यांच्या नशीबी येते. इतके ऑलराऊंडर लोकं का सिंगल राहतात?
आपण ऑलराऊंडर आहोत असे वाटल्याने त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्याने त्यांना मनाजोगा जोडीदार मिळत नसावा आणि कांदेपोहे प्रकरण आजकाल वाटते तसे निरस नसावे. घरी जाऊन कांदेपोहे खाणे काय किंवा कोणत्यातरी हाटेलात जाऊन चहा कॉफी घेणे सारखेच. उलट घरी गेल्याने बर्‍याच बाकिच्या गोष्टी, आवडी निवडी कळण्याची शक्यता जास्त.
३. यशस्वी प्रेम प्रकरण म्हणजे काय?
याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असेल कदाचित पण अडीअडचणीच्यावेळेस 'याने' तिला किंवा 'तिने' त्याला सोडून न जाता मदत करणे म्हणजे प्रेम असावे.

४. ज्या दुर्दैवी जीवांचा कधी ब्रेक ऑफ होतो, त्यांना खाजगीत 'कॅरेक्टरलेस' हे लेबल का लावले जाते?
ब्रेक अप कोणत्या पायरीनंतर झालाय तेही बघायला हवे. ;) पूर्वी साखरपुड्यानंतर लग्न मोडले कि पुन्हा मुलीचे लग्न जमणे जिकिरिचे असे. त्याकाळी त्या मुलीला कदाचित कॅरॅक्टरलेस म्हणत असतीलही आजकाल लग्नाआधी सगळे अनुभव छप्पनवेळा (वेगवेगळ्यांबरोबर) घेउनही कोणाशी का होइना लग्न करून आपली मुले संसाराला लागली यातच आईवडीलांना समाधान वाटत असेल. कॅरॅक्टर म्हणजे काय याचीही व्याख्या काय आहे हे पाहणे गरजेचे....काळाबरोबर अनेक गोष्टी बदललेल्या दिसतील.
५. माननीय मिपाबांधवांचे या बाबतीत काय अनुभव आहेत? आयुष्याचा जोडीदार कांदेपोहे खाऊन ठरवणे योग्य की स्वत: ठरवुन?
याबाबतीत सांगणे अवघड.

स्वैर परी's picture

6 Dec 2010 - 7:30 pm | स्वैर परी

रेवती ताईशी १०० % सहमत आहे!

sneharani's picture

6 Dec 2010 - 10:34 am | sneharani

प्रत्येकाची व्याख्यावेगळी...वेगवेगळे मत! मग निर्णयही वेगळे येतात.
तेव्हा योग्य निर्णय घ्या....!

इन्द्र्राज पवार's picture

6 Dec 2010 - 12:15 pm | इन्द्र्राज पवार

श्री.इंटरनेटस्नेही यांचे या विषयावरील मुद्दे अगदी कालातीत असेच असून प्रत्येक (स्त्री/पुरुष) व्यक्तीला यातील किमान काही क्रमांकाना तोंड देतेच....काही प्रतिसाद तर फारच सुंदर आणि रोखठोक आहेत.

१.अतिसामान्य मुलांना गर्लफ्रेंडस कश्या मिळतात? अतिसामान्य मुलींना बॉयफ्रेंडस कसे मिळतात?
(अ) अतिसामान्य मुलांबाबत ~ कॉलेज परिसरात मित्रमैत्रीण हे होतातच याबाबत दुमत नसावे. त्यातही विद्यापीठ आणि प्रोफेशनल कोर्सेसच्या ठिकाणी तर चटकन ग्रुप फॉर्मेशन होत असते. ही स्थळे रद्दड हिंदी चित्रपटात दाखवितात त्याप्रमाणे केवळ Boy Meets Girl अशीच असतात असे नव्हे तर एखाद्या मुलाच्या बाह्यरूपापेक्षा (धागाकर्त्याने 'अतिसामान्य' हे विशेषण वापरले आहे ते मी रूपासाठी असावे असे गृहीत धरले आहे) अन्य गुणधर्मामुळेही काही देखण्या मुली त्याच्याशी मैत्री करताना पाहिले आहे. उदा.एक अबक मुलगा, त्यातही ग्रामीण भागातून आल्याने कॉलेजवर्गात पोषाखाच्याबाबतीतही तो फारसा जागरूक नसायचा. पण पुढे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धातून तो जसजसा चमकू लागला आणि त्याने कॉलेजसाठी आणलेली शिल्ड्स जेव्हा आवारात झळकू लागली त्यावेळी त्याच्याशी मैत्री करायला एक नाही चांगल्या डझनभर झिंटाज् पुढे सरसावल्या. त्यातील एकीबरोबरची (अगदी रविना टंडनच होती) त्याची मैत्री चांगलीच फुलत गेली व त्या परीसम मुलीनेच त्याच्या वाक्पटुत्व गुणामुळे पदवीनंतर "लॉ" करायला लावले व आज तो अबक अल्पावधीतच कोल्हापुरातील एक नामवंत वकील झाला आहे....लग्नही त्याच सुंदरीशी झाले हे अर्थातच.

(ब) अतिसामान्य मुलीबाबत ~ परत तीच सायकॉलॉजी. इथे एका सिलेब्रेटीचे उदाहरण द्यावेसे वाटते. 'आमिर खान'. त्याच्या दुसर्‍या पत्नी (किरण राव) समवेत त्याचे फोटोज् पाहिले की कित्येकाना वाटते की, 'आमीर' सारख्या ग्रीक देवतेसम भासणार्‍या देखण्या पुरुषाने किरणमध्ये नेमके काय पाहिले असावे? त्याला दुसरेपणावर का होईना, प्रिती, कॅटरिना सारखी त्याच्या बरोबरीची (सौंदर्याच्या दृष्टीने...) मिळाली नसती का? पण नाही....काहीतरे अलौकिक गुण किरणमध्ये त्याने हेरले असणारच....जे त्याला रुपापेक्षा जास्त भावले आहेत.

२. या उलट कितीतरी लोक इतके हुशार, चारित्र्यसंप्पन्न असतात की त्यांच्यांत नाव ठेवायला जागा शोधुन सापडत नाही. पण बिच्यार्यांना तसं कोणी भेटतंच नाही.. शेवटी मग कांदेपोहे नामक सण किमान २-३ वेळा तरी साजरा करणे यांच्या नशीबी येते. इतके ऑलराऊंडर लोकं का सिंगल राहतात?

~ इथे चारित्र्यसंपन्न मुद्दा थोडासा धाडसाचा आहे, कारण हे सर्व मानण्यावर असते. सकाळसंध्याकाळ देवघरात ३३ कोटी देवांना भजणारा, कडक सोवळेओवळे पाळणारा आणि गावाचे कौतुक स्वीकारणारा प्रत्यक्षात रात्रीच्या अंधारात बावणखणीच्या पायर्‍या चढणारा असतो, तर आयुष्यभर 'सुधाकर' असलेला एखादा आपल्या आजारी 'सिंधू' च्या औषधपाण्यासाठी स्वतःच्या किडन्या विकून डॉक्टरांचे बिल देणारा असतो. त्यामुळे चारित्र्यसंपन्न व्यक्ती ही कल्पना सापेक्ष आहे...ज्याला भासेल तशी. मात्र "हुशारी" ही कागदोपत्री सिद्ध होत असलेली बाब असल्याने तीबद्दल दुमत नसावे. मग यांच्यासाठी २-३ वेळा (प्रसंगी त्यापेक्षा अधिक) कांदेपोहे खाणे का यावे, असे विचारले असता नको तितकी चिकित्सता (दोन्ही पक्षी). 'अरेंज्ड मॅरेज' ही एक कौटुंबिक घटना असते जिथे मुलामुलीची पसंती जरी प्रामुख्याने घेतली जात असली तरी अन्य कित्येक बाबी असतात ज्यासाठी ज्येष्ठांचे (मान खाली घालून का होईना...पण) ऐकावे लागते. मुलगा किंवा मुलगी काहीशी बंडखोर वृत्तीची असेल तर दुसर्‍या कांदापोह्यानंतर तिसर्‍यासाठी ते न जाता स्वयंनिर्णय घेऊ शकतात, पण कित्येक 'स्कॉलर्स' हे करीत नसावेत....मग एक वेळ अशीही येते की, येईल ते फूल चाफ्याचे म्हणत संसारशकटाला जुंपून घ्यायचे....अर्थात अशीही लग्ने यशस्वी होतातच.

३. यशस्वी प्रेम प्रकरण म्हणजे काय?
वर एका प्रतिसादात रेवती यानी म्हटल्याप्रमाणे "याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असेल". माझी व्याख्या अशी असेल की, प्रेमाच्या आणाभाका झाल्यानंतर त्याचे विवाहात रूपांतर झाले तर केवळ तेच 'यशस्वी प्रेम प्रकरण' असणार नाही. दोन्ही घटक जर मॅच्युअर असतील तर त्यांच्या प्रेमाच्या वाटचालीवर येणार्‍या अडचणी - केवळ घराण्याच्या नसून करीअरच्यादेखील - ते दूर करण्यास चांगल्या अर्थाने असमर्थ असतील तर त्यानी वेळीच बाजूला होणे फार गरजेचे असते....दोघांच्या सुखमय भवितव्यासाठी. उदा. माझ्या माहितीतील एक मुलगी विलक्षण बुद्धीमान....पीजी गोल्डमेडलीस्ट आणि नंतर तिच्या विषयात पीएच.डी...आता एका मोठ्या महाविद्यालयात फुल टाईम लेक्चररशिप....युजीसी फेलोशिप मिळवून येत्या जूनमधे ऑक्सफर्डला दोन वर्षासाठी जाणार हे नक्की. पण तिचा प्रियकर, ज्याने पदवीनंतर वडिलांच्या कारखान्यात भागिदारी सुरू केली व हीरो होंडाचे काम मिळाल्याने तिथे तो चांगलाच रमलाय शिवाय आवकही प्रभावी. पण आता व्यवसाय व प्रेयसीचे लक्षात भरणारे शैक्षणिक यश आणि तिची त्या क्षेत्रात होऊ घातलेली देदीप्यमान वाटचाल, हे त्याने (व तिनेही) वेळीच ओळखले व एका संध्याकाळी समजूतदारपणे निर्णय घेवून त्याना जवळून ओळखणार्‍या आमच्यासारख्या तीनचार मित्र-मैत्रीणीच्या साक्षीने त्या प्रकरणाचा गोड शेवट केला. आजही ते मित्र म्हणून सहजपणे वावरतात. इतरांनाही त्यांची आत्ताची मैत्री वावगी वाटत नाही. हे त्याच्या व तिच्याही भविष्यात होणार्‍या संसाराविषयी चांगलेच सिद्ध झाले. थोडक्यात 'लग्न झाले' म्हणजेच प्रेम प्रकरण यशस्वी असे ढोबळमानाने मानू नये.

४. ज्या दुर्दैवी जीवांचा कधी ब्रेक ऑफ होतो, त्यांना खाजगीत 'कॅरेक्टरलेस' हे लेबल का लावले जाते?
~ इकडे तुम्ही 'दुर्दैवी जीव' असे म्हणता आणि खाजगीत कॅरेक्टरलेस लेबल लावले जाते असे म्हणता, ही बाब तशी पचनी पडत नाही. कारण कॅरेक्टरलेस याची व्याख्या फार 'लो लेव्हल' ची असते ती सरसकट प्रेमिकांना कदापिही लावता येणार नाही. पु.ल.देशपांडे यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' मधील 'नंदा प्रधान' हे प्रकरण वाचा. त्यातील प्रेयसीचा बाप, कमावती मुलगी नंदाबरोबर प्रेमविवाह करणार म्हटल्याक्षणीच तिरिमिरीने आत झोपलेल्या तिच्या लहान भावंडांना खेचून आणून तिच्यासमोर आदळतो आणि त्यांच्या भविष्याबद्दल सवाल विचारल्यावर ती दुर्दैवी मुलगी "नाही रे, नंदा..." स्फुटत हुंदके देत आत घरात जाते. हा ब्रेक ऑफ डोळ्यात पाणी आणणारा असतो, ज्याची कारणे अनेक रुपड्यांची असू शकतात (हे आजही घडते). पण म्हणून या जीवांना खाजगीत वा खुल्यापणी जे कॅरेक्टरलेस लेबल लावतात, खरे तर त्यांच्याच कॅरेक्टरची तपासणी होणे गरजेचे असते.

५. माननीय मिपाबांधवांचे या बाबतीत काय अनुभव आहेत? आयुष्याचा जोडीदार कांदेपोहे खाऊन ठरवणे योग्य की स्वत: ठरवुन?
याला उत्तर देणे तसे काहीसे कठीण आहे (अजूनही मी 'कांदेपोहे' खाल्लेले नाहीत)...कारण मी म्हणतो तसेच माझ्याबाबतीत झाले नाही तर माझ्या मताशीच मी प्रामाणिक राहिलो नाही असे होईल. त्यामुळे याबाबतीत कपाळावर सटवाईने जे काही लिहिले असेल त्यापुढे मान तुकविणे हाच एक इष्ट मार्ग आहे....आयुष्यातील जोडीदाराबाबत...!!

इन्द्रा

कानडाऊ योगेशु's picture

6 Dec 2010 - 12:22 pm | कानडाऊ योगेशु

Smart Man + Smart Woman = Romance

Smart Man + Dumb Woman = Pregnancy

Dumb Man + Smart Woman = Affair

Dumb Man + Dumb Woman = Marriage

(इंटरनेटवरुन साभार.)

(लग्नानंतर बायकोच्या प्रेमात पडलेला) योगेशु

रन्गराव's picture

6 Dec 2010 - 8:07 pm | रन्गराव

तुम्ही खरे ज्ञानी आहत, मग ते ज्ञान पुस्तकी का असेना ;)

इंद्राभौंनी इतकं नीट लिहीलंय, की पुढे काही लिहायची गरजच नाही.

इंटरनेटस्नेही's picture

7 Dec 2010 - 12:24 am | इंटरनेटस्नेही

माननीय मिपाकर शुचि, रेवती, पैसा, अपर्णा अक्षय, इंद्रराज पवार, कानडाऊ योगेशु, बद्दु, स्नेहाराणी, नावातकायआहे, पिवळा डांबिस, वाहीदा, विनायक प्रभू, या सर्वांचे समर्पक प्रतिसाद दिल्याबद्द्ल आभारी आहे. माझ्या बर्‍याच शंकांचे निरसन झाले, तसेच तुम्ही दिलेले प्रतिसाद व त्यातील काही वाक्ये जीवनात कायम मार्गदर्शक ठरावी अशीच आहेत. धन्यवाद. :)

=======================================================

माननीय मिपाकर लीमाउजेट, पर्नल नेने मराठे, ध्येयहीन, शिल्पा ब, स्पा, रन्गराव, प्रकाश घाटपांडे, धमाल मुलगा, परिकथेतील राजकुमार, अविनाशकुलकर्णी, उपास, विजुभाऊ, शैलेन्द्र, टारझन, अवलिया, सुधांशु देवरुखकर या सर्वांचे प्रतिसाद दिल्याबद्द्ल आभारी आहे, तुम्ही दिलेले असे धमाल मजा मस्ती व कधी कधी सिरीयस प्रतिसाद हाच मिपाचा खरा जीवनरस, असे म्हटले तर वावगे ठरु नये. धन्यवाद. :)
-
(आभारी) इंट्या.

सुधीर काळे's picture

23 Dec 2010 - 7:45 am | सुधीर काळे

इंटरनेटस्नेही,
तुमचा हा झकास लेख आताच वाचला व आवडला.
वाहीदाचे निरीक्षण बरोबर वाटते. ज्यांच्याकडे संभाषणचातुर्य (म्हणजेच Gift of the gab असते) अशी मुले मुलींशी झटपट मैत्री करण्यात यशस्वी होतात. लाजाळू, अबोल मुलांना कांदे-पोहे खावे लागतात!

भडकमकर मास्तर's picture

5 Jan 2011 - 1:38 pm | भडकमकर मास्तर

वावा.. साधकबाधक चर्चेमुळे आयुष्यात अजून मजा आली..

इंटरनेटस्नेही's picture

13 Jan 2011 - 2:37 am | इंटरनेटस्नेही

माझा अतिशय आवडता धागा!

नरेशकुमार's picture

13 Jan 2011 - 6:14 am | नरेशकुमार

५. माननीय मिपाबांधवांचे या बाबतीत काय अनुभव आहेत? आयुष्याचा जोडीदार कांदेपोहे खाऊन ठरवणे योग्य की स्वत: ठरवुन?

विचारलेच आहे तर सांगतो,
लग्ना अगोअदर काहीही विचार करायचा नाही, आई-वडील जिच्या गळ्यात माळ घालायला सांगतिल तिच्या गळ्यात माळ घालुन मोकळे व्हायचे. लग्नानंतर जि कोन आपलि बायको असेल त्या मुलिवर जिवापाड प्रेम करायचे.

माझे आजोबा नेहमि म्हनायचे, मि मानसाला जर का १०० मुलिंच्या प्रेमात पडायचि संधि मिळालि तर तो त्या सर्व मुलिंच्या प्रेमात पडेल. हे (लग्नाअगोदरचे, प्रियकर-प्रेयसि टाईप) प्रेम सगळे खोटे असते.

बायकोवर इतके प्रेम करा कि तिला जानिव झलि पाहिजे कि याच्या शिवाय आनि याच्या इतके प्रेम मला या जगात कोनिहि करु शकत नाही. मग बघा देव स्वतः सुखि मानसाचा सदरा घेउन तुमच्या दारी येइल.