सिंगल अॅन्ड रेडी टु मिंगल.. ;)
नमसाकर मित्रांनो/मैत्रीणींनो..
बरेच दिवस म्हणजे खरंतर मिपाचा सदस्य झालो, तेव्हापासुन हा विषय मनात घोळत होता; आज म्हणलं लिहुन टाकु..
साधारणपणे वय वर्षे १४-१६ पासुन आपल्या मनात किशोरसुलभ भावना यायला सुरवात होते, म्हणजे ते साहित्यीक वगैरे जे शब्द वापरतात ना, मोरपंखी इ. तश्या. पण आपण नक्की ठरवु शकत नाही की आपल्याला नेमकं कोण आवडतंय ते.. म्हणजे त्या वेळेला सर्वच भिन्नलिंगी (आणि समवयस्क) लोकसंख्या आपल्याला आवडत असते अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दर १५ दिवसांनी आपण प्रेमात पडत असतो.. पण सहसा ते फक्त आर्कषण असतं.
पण जस जसे आपण मोठे व्हायला लागतो तेव्हा आपल्या भावना, स्वत: आणि इतरांबद्दलची जाणीव तीव्र होते. तारुण्याचे गुलाबी रंग देखील आपल्या मनात फुलत असततात, ज्याला शास्त्रज्ञ मंडळी संप्रेरक म्हणतात. सहसा आपण आपल्या सामाजिक व मानसिक पात्रतेला शोभुन दिसेल अशी व्यक्ती साथीदार (पार्टनर) म्हणुन निवडतो.
पण प्रेमाची ही प्रोसेस दरवेळेला अशी मुद्देसुद असेलच असं नाही, म्हणुन काही प्रश्न आपल्या समोर उभे राहतात:
१.किती तरी असे लोक असतात त्यांची एकंदर बौद्धिक/मानसिक पात्रता, अवस्था पाहिली तर तारुण्यसुलभ भावना वगरे तर दुरच राहिलं, साधी आपुलकी पण आपल्याला वाटत नाही. पण ते कमिटेड असतात.
अतिसामान्य मुलांना गर्लफ्रेंडस कश्या मिळतात? अतिसामान्य मुलींना बॉयफ्रेंडस कसे मिळतात?
२. या उलट कितीतरी लोक इअतके हुशार, चारित्र्यसंप्पन्न असतात की त्यांच्यांत नाव ठेवायला जागा शोधुन सापडत नाही. पण बिच्यार्यांना तसं कोणी भेटतंच नाही.. शेवटी मग कांदेपोहे नामक सण किमान २-३ वेळा तरी साजरा करणे यांच्या नशीबी येते.
इतके ऑलराऊंडर लोकं का सिंगल राहतात?
३. यशस्वी प्रेम प्रकरण म्हणजे काय?
४. ज्या दुर्दैवी जीवांचा कधी ब्रेक ऑफ होतो, त्यांना खाजगीत 'कॅरेक्टरलेस' हे लेबल का लावले जाते?
५. माननीय मिपाबांधवांचे या बाबतीत काय अनुभव आहेत? आयुष्याचा जोडीदार कांदेपोहे खाऊन ठरवणे योग्य की स्वत: ठरवुन?
वरील मुद्द्यांना अनुसरुन चर्चा करण्याची मी विनंती करतो.
वाचन
10760
प्रतिक्रिया
0