फोडून बांध मनीचा - झालो जसा प्रवाही !
अश्रु बनुन गेला - मग शब्द अर्थवाही
तोडून तसबीरिला - ती एकसंध राही
ऐना कसा कळेना - जपतो तिला मला ही
मागुन ही सुखाला - आले न हाती काही
दुःख हेंच मजला - देते अजून ग्वाही
सांगुन ही कुणाला - कळले न गुज मनीचे
कुसुमास कागदी त्या - कुठला सुवास येई?
कळवून ही तुला - मी कळलो कधीच नाही
तोच उम्बरा अन - तीच ठेच पाई
छापून ही स्वतः ला - मी ऊमट्लोच नाही
शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई
जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दही
वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही
टाळुन ही मला तू - मी टळलोच नाही
जरी चन्द्र मी आता - मी सूर्य उद्याचा ही
माझी कविता ...मयुरेश साने...दि १६-औग-10
प्रतिक्रिया
29 Nov 2010 - 10:57 pm | प्राजु
फार सुंदर आहे कविता..
30 Nov 2010 - 6:38 am | नगरीनिरंजन
छान! आवडली!
30 Nov 2010 - 7:30 am | राघव
छान आहे. लिहित रहा. :)
30 Nov 2010 - 3:55 pm | फ्रॅक्चर बंड्या
छापून ही स्वतः ला - मी ऊमट्लोच नाही
शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई
आवडली कविता..
30 Nov 2010 - 4:02 pm | ज्ञानराम
लिहित राहा...... छान आहे....
जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दही
वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही
हि ओळ भावली.........
30 Nov 2010 - 4:47 pm | गणेशा
जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दाही
वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही
हे आवडले ..
लिहित रहा .. वाचत आहे ..
30 Nov 2010 - 5:01 pm | शैलेन्द्र
छान ... खुप आवडली
30 Nov 2010 - 5:20 pm | डावखुरा
रचना अतिशय भिडणारी आहे....
फोडून बांध मनीचा - झालो जसा प्रवाही !- पण हे खर्ंच कधी शक्य आहे का?
1 Dec 2010 - 8:38 am | स्पंदना
अतिशय सुन्दर रचना!
1 Dec 2010 - 9:03 am | मदनबाण
सुंदर... :)
1 Dec 2010 - 10:53 am | प्रीत-मोहर
अतिशय सुंदर रचना..
आवड्ली....
3 Dec 2010 - 2:43 pm | जयवी
खूप छान !!
मात्रामधे थोडेफार बदल केलेत तर सुरेख गझल होईल.
3 Dec 2010 - 3:15 pm | अविनाशकुलकर्णी
अतिशय सुन्दर रचना!
साने भाऊ लिहित रहा
3 Dec 2010 - 3:26 pm | जयवी
.
3 Dec 2010 - 10:58 pm | चन्द्रशेखर गोखले
सुंदर.. ग्रेट .. भावस्पर्शी रचना..!!!