साहित्य : पीत असलात तर तीन पेग व्हिस्की (रॉयल च्यालेंज), पाव किलो मध्यम आकाराचा सुरमई, दोन मोठे चमचे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला, चार तेवढ्याच आकाराचे चमचे तेल, थोडा रवा, थोडा मैदा, दोन चिमटी मीठ,एक चांगली म्युझिक सिस्टीम, आणि घरात बायकोचा अभाव हे सगळं जमवा.
दोन चमचे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला चार चमचे तेलात मिसळा. सुरमईच्या कापांना त्यात बुडवा. पूर्ण माखला की तसाच प्लेटमध्ये घालून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा.
मैदा रवा आणि मीठ मिक्स करून घ्या. मग माखलेली आणि थंडावलेली सुरमई फ्रीजबाहेर काढून ती रवा-मैदा-मीठ-मिक्स मध्ये घोळवा.
तव्यावर सढळ हस्ते तेल सोडून त्यावर सुरमईची खमंगता अनिवार होईपर्यंत परता..
प्लेटमध्ये सुरमई ठेवा.. प्याला भरा..
खालीलपैकी कोणत्याही गझली घ्या.:
गुलाम अलीची "आवारगी"
इक्बाल बानोची "मैं नजर से पी रहा हूं.."
तिचीच "ना गवाओ नावके नीमकश.."
गझल सीडीयंत्रात चालू करा..
पुढची सगळी सुंदर सुरमई शाम तुमचीच आहे..एकट्याची..
....
शाकाहारी असाल, मासोळी वर्ज्य असेल तर सुरमई ऐवजी वांगे वापरून सुरमई शामचा शाकाहारी आल्टर्नेट "वाङ्मयीन संध्याकाळ" बनवू शकता.
सर्व रेसिपी तशीच. फक्त सुरमईच्या कापांऐवजी वांग्याचे काप. हाही प्रकार अतिशय चट्टाक चाबूक बनतो. उंगलियां चाटते रह जाओगे...
..मात्र यासोबत गझल ऐवजी पुस्तक वाचायला घ्या.
शाळा किंवा तत्सम पुस्तक.
पुढची स्वर्गीय वाङ्मयीन संध्याकाळ आपलीच..!!
........
यांना अनुक्रमे सुरमई बेडेकरी आणि बेडेकरी वांगे असेही म्हणता येते.
........
(ता.क. तीनच्यावर प्याले नकोत..नाहीतर ता.क. पिऊन उतरवण्याची वेळ यायची..)
प्रतिक्रिया
18 Nov 2010 - 11:02 am | विलासराव
चालेल. आरसी ही चालेल. वाङ्मयीन संध्याकाळ नको.
कधी बसायचं?
18 Nov 2010 - 11:05 am | कच्ची कैरी
तुमच्या पा.क्रुतीमधील दोन गोष्टी बदलल्या तर आणखीच छान होइल
एक म्हणजे बायकोचा अभाव आणि दुसरी म्हणजे ते तीन पेग.
बाकी सुरमई छानच.
18 Nov 2010 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार
ह्यातली पहिली गोष्ट बदलली तर दुसरी आपोआपच बदलेल.
18 Nov 2010 - 11:15 am | गवि
अहो कच्ची कैरीताई..
निदान या एका पाककृतीच्याकरिता बायकोचा अभाव हा इतका आवश्यक घटक आहे की क्या केहने. (कृपया मला सपोर्ट करा कोणीतरी.)
महत्वाची नोंद. बायकोचा अभाव जमवता आला तर आर सी वगळून चालेल.
अगदी खोलात शिरायचे तर बायकोचा अभाव हा एकमात्र खुमासदार घटक उपलब्ध केला तर संपूर्ण पाककृतीतले इतर सर्व घटक न वापरले तरी चालेल.
बाकी.. ते पेग ऑप्शनल आहेत असं आधीच "साहित्य" मधे नोंदवलंय..
18 Nov 2010 - 11:19 am | छोटा डॉन
+१, सहमत .
अॅक्युअली आम्हाला काय अनुभव नाही, पण आमचा एक लै भारी दोस्त आहे अॅडी जोशी नावाचा.
त्या बिचार्याची लग्नानंतर अवस्था बघवत नाही. म्हणुन हे कारण पटण्यासारखे वाटले.
गविराव, तुम्हाला बिनशर्त सपोर्ट हो !!!
- छोटा डॉन
23 Nov 2010 - 7:20 pm | धमाल मुलगा
आम्ही उतरावं का सपोर्टासाठी?
18 Nov 2010 - 11:18 am | नगरीनिरंजन
काय?
म्हणजे प्रोग्रॅम सुरु व्हायच्या आधीच गुंडाळायचा? मुकी बायको असेल तर हरकत नाही म्हणा.
18 Nov 2010 - 12:03 pm | लॉरी टांगटूंगकर
सुरमईच्या कापांऐवजी वांग्याचे काप.
वान्ग्याचे फोटु टाका. वांगी आवडत नाहीत फोटू बघून तरी इच्छा होते का बघु .
18 Nov 2010 - 12:09 pm | गवि
ते फक्त शाकाहारी असाल तरच...
वांगेही अशा रितीने काप करून सुरमई, पाललेटच्या तोडीचे बनते बरं का..!!
बघा तर ट्राय करून..
फोटो नाहीत काढलेले. पण खात्री बाळगा, करुन पाहिले आहे..झकास लागते.
21 Nov 2010 - 6:20 pm | स्वाती२
अरेरे! सुरमयी शाम + बायकोचा अभाव ही परिस्थीती सुखावह वाटावी? च्च!च्च! च्च!
डोळे पाणावले!
21 Nov 2010 - 6:50 pm | गवि
correction....
बायकोचा अभाव = सुरमयी शाम = सुखावह परिस्थीती
:-)
23 Nov 2010 - 6:00 pm | कच्ची कैरी
जरा फोन नंबर द्या बरं तुमच्या बायकोचा.
23 Nov 2010 - 6:12 pm | गवि
..आपण जो क्रमांक डायल करीत आहात तो सध्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे.
23 Nov 2010 - 6:16 pm | परिकथेतील राजकुमार
प्रकाटाआ
23 Nov 2010 - 7:17 pm | सुनील
छान!