मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुरमई शाम (मां.) आणि वाङ्मयीन संध्याकाळ (शा.)

गवि · · पाककृती
साहित्य : पीत असलात तर तीन पेग व्हिस्की (रॉयल च्यालेंज), पाव किलो मध्यम आकाराचा सुरमई, दोन मोठे चमचे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला, चार तेवढ्याच आकाराचे चमचे तेल, थोडा रवा, थोडा मैदा, दोन चिमटी मीठ,एक चांगली म्युझिक सिस्टीम, आणि घरात बायकोचा अभाव हे सगळं जमवा. दोन चमचे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला चार चमचे तेलात मिसळा. सुरमईच्या कापांना त्यात बुडवा. पूर्ण माखला की तसाच प्लेटमध्ये घालून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. मैदा रवा आणि मीठ मिक्स करून घ्या. मग माखलेली आणि थंडावलेली सुरमई फ्रीजबाहेर काढून ती रवा-मैदा-मीठ-मिक्स मध्ये घोळवा. तव्यावर सढळ हस्ते तेल सोडून त्यावर सुरमईची खमंगता अनिवार होईपर्यंत परता.. प्लेटमध्ये सुरमई ठेवा.. प्याला भरा.. खालीलपैकी कोणत्याही गझली घ्या.: गुलाम अलीची "आवारगी" इक्बाल बानोची "मैं नजर से पी रहा हूं.." तिचीच "ना गवाओ नावके नीमकश.." गझल सीडीयंत्रात चालू करा.. पुढची सगळी सुंदर सुरमई शाम तुमचीच आहे..एकट्याची.. .... शाकाहारी असाल, मासोळी वर्ज्य असेल तर सुरमई ऐवजी वांगे वापरून सुरमई शामचा शाकाहारी आल्टर्नेट "वाङ्मयीन संध्याकाळ" बनवू शकता. सर्व रेसिपी तशीच. फक्त सुरमईच्या कापांऐवजी वांग्याचे काप. हाही प्रकार अतिशय चट्टाक चाबूक बनतो. उंगलियां चाटते रह जाओगे... ..मात्र यासोबत गझल ऐवजी पुस्तक वाचायला घ्या. शाळा किंवा तत्सम पुस्तक. पुढची स्वर्गीय वाङ्मयीन संध्याकाळ आपलीच..!! ........ यांना अनुक्रमे सुरमई बेडेकरी आणि बेडेकरी वांगे असेही म्हणता येते. ........ (ता.क. तीनच्यावर प्याले नकोत..नाहीतर ता.क. पिऊन उतरवण्याची वेळ यायची..)

वाचने 6391 वाचनखूण प्रतिक्रिया 15

कच्ची कैरी गुरुवार, 11/18/2010 - 11:05
तुमच्या पा.क्रुतीमधील दोन गोष्टी बदलल्या तर आणखीच छान होइल एक म्हणजे बायकोचा अभाव आणि दुसरी म्हणजे ते तीन पेग. बाकी सुरमई छानच.

In reply to by कच्ची कैरी

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/18/2010 - 11:12
तुमच्या पा.क्रुतीमधील दोन गोष्टी बदलल्या तर आणखीच छान होइल एक म्हणजे बायकोचा अभाव आणि दुसरी म्हणजे ते तीन पेग.
ह्यातली पहिली गोष्ट बदलली तर दुसरी आपोआपच बदलेल.

In reply to by कच्ची कैरी

गवि गुरुवार, 11/18/2010 - 11:15
अहो कच्ची कैरीताई.. निदान या एका पाककृतीच्याकरिता बायकोचा अभाव हा इतका आवश्यक घटक आहे की क्या केहने. (कृपया मला सपोर्ट करा कोणीतरी.) महत्वाची नोंद. बायकोचा अभाव जमवता आला तर आर सी वगळून चालेल. अगदी खोलात शिरायचे तर बायकोचा अभाव हा एकमात्र खुमासदार घटक उपलब्ध केला तर संपूर्ण पाककृतीतले इतर सर्व घटक न वापरले तरी चालेल. बाकी.. ते पेग ऑप्शनल आहेत असं आधीच "साहित्य" मधे नोंदवलंय..

In reply to by गवि

छोटा डॉन गुरुवार, 11/18/2010 - 11:19
निदान या एका पाककृतीच्याकरिता बायकोचा अभाव हा इतका आवश्यक घटक आहे की क्या केहने. (कृपया मला सपोर्ट करा कोणीतरी.) महत्वाची नोंद. बायकोचा अभाव जमवता आला तर आर सी वगळून चालेल. अगदी खोलात शिरायचे तर बायकोचा अभाव हा एकमात्र खुमासदार घटक उपलब्ध केला तर संपूर्ण पाककृतीतले इतर सर्व घटक न वापरले तरी चालेल.
+१, सहमत . अ‍ॅक्युअली आम्हाला काय अनुभव नाही, पण आमचा एक लै भारी दोस्त आहे अ‍ॅडी जोशी नावाचा. त्या बिचार्‍याची लग्नानंतर अवस्था बघवत नाही. म्हणुन हे कारण पटण्यासारखे वाटले. गविराव, तुम्हाला बिनशर्त सपोर्ट हो !!! - छोटा डॉन

In reply to by लॉरी टांगटूंगकर

गवि गुरुवार, 11/18/2010 - 12:09
ते फक्त शाकाहारी असाल तरच... वांगेही अशा रितीने काप करून सुरमई, पाललेटच्या तोडीचे बनते बरं का..!! बघा तर ट्राय करून.. फोटो नाहीत काढलेले. पण खात्री बाळगा, करुन पाहिले आहे..झकास लागते.

गवि Tue, 11/23/2010 - 18:12
..आपण जो क्रमांक डायल करीत आहात तो सध्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे.