झटपट बटरवडॆ.......

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
20 Oct 2010 - 2:51 pm

From
साहित्य:- एक लिटर गोड दही, चार पाच हि. मिरच्या, एक छोटा आले तुकडा, लसूण पाकळ्या आठ-दहा, कोथिंबीर, जिरा बटर दोन पॅकेट, चवीनुसार मिठ, साखर, फ़ोडणीचे साहित्य.

कॄती :- प्रथम आले, लसुण, मिरची पेस्ट काढा, दही पाणी न घालता घुसळून घ्या,
From
त्याला मोहरी,जिरे, हिग, किचिंत हळद घालुन फ़ोडणी बनवा, यात आले, लसुण, मिरची पेस्ट परतून घ्या,
From
ती फ़ोडणी दह्यात घाला,
चवीनुसार मिठ, साखर घाला. कोथींबीर घाला व दहीवड्याला तयार करतो तसे दही तयार करुन घ्या.
From
आता थोडॆ पाणी कोमट करुन घ्या. त्यात बटर टाका व लगेच बाहेर काढा. व त्यातील पाणी कादून टाका.
ते एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर तयार केलेले दही घालून सर्व्ह करा.
From

वरील साहित्यात चार जणांना पुरेल एवढे वडे तयार होतात.

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

20 Oct 2010 - 3:20 pm | पर्नल नेने मराठे

चोकोन दिस्तायत क्रुतीत :(

निवेदिता-ताई's picture

20 Oct 2010 - 3:24 pm | निवेदिता-ताई

काय झालय कळत नाहीये.कोणी मार्गदर्शन करेल काय?????????

आणी एक्च पदार्थ दोन वेळा का आलाय तेही कळत नाहिये.

असुर's picture

20 Oct 2010 - 4:26 pm | असुर

>>> आणी एक्च पदार्थ दोन वेळा का आलाय तेही कळत नाहिये. <<<
दोन वेळा केला असेल! आणि एकदाही आमंत्रण नाही, मग असंच काहीतरी होतं!

-असुर

परिकथेतील राजकुमार's picture

20 Oct 2010 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार

एकट्याने असे काही खाल्ले की असेच होते.

गणपा's picture

20 Oct 2010 - 3:31 pm | गणपा

बटराँ बटराँ.....

हे काय झालाय रे ?
पहिलेच फटू दिसत नाही... आता कृती पण गायब?
खिचडी झालीये...
बटरवडे खिचडी.... त्यापेक्षा मस्त अदृश्य वडे ... ;-)