परदेशात नुकत्याच जन्मलेल्या
माझ्या नातवाचं "तोंड" मला
फेसबूकवर दाखविण्यात आलं
तेव्हा माझ्या इतकच लक्षात आलं
कि माझ्या अंत्ययात्रेच्या वेळी
...माझ्या मुलाला यायची गरज नाही
अंत्यायात्रेची क्षणचित्रे त्याला
फेसबूकवर पाहता येतील...!
खरच या इन्टरनेट मुळे किती
जवळ आलो आहोत नाही आपण...?
अगदी सगळं "नेटनेटकं" झालय....!!
प्रतिक्रिया
6 Oct 2010 - 12:32 am | शुचि
:(
6 Oct 2010 - 2:19 am | अनामिक
बळंच काहीही... आनंदाने नेटवर फोटो दाखवलेत तर त्यातही खोच बघता?
6 Oct 2010 - 10:24 am | श्रावण मोडक
कविता वाचून हेच उद्गार आले. कारण कविता तशी आहे. पण कवितेतील भाव वेगळा. थोडा बधीर करणारा.
6 Oct 2010 - 2:05 pm | फ्रॅक्चर बंड्या
छान कविता आहे ..
6 Oct 2010 - 4:51 pm | प्रसाद_डी
नीश्बद....................................
6 Oct 2010 - 4:58 pm | विनायक प्रभू
काका काय चाल्लय?
6 Oct 2010 - 7:17 pm | इंटरनेटस्नेही
पण मी म्हणतो, अंत्ययात्रा करायची गरजंच काय.. ? उगाच नसता खर्च?
6 Oct 2010 - 7:19 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
??????
6 Oct 2010 - 8:32 pm | मदनबाण
:(
7 Oct 2010 - 4:19 am | धनंजय
शुभ बोल रे नार्या तर...
मोठा चक्रावून टाकणारा काळ आहे. माझा एक चुलता परदेशात गेला १९६० दशकात. टाकटूक बेताची परिस्थिती होती त्याची परदेशात. १२ वर्षे आईवडलांची भेट झाली नाही परदेशी गेल्यानंतर. त्याची मुले वगैरे आमच्या आजोबांनी बघितलीच नाहीत. आणि आजोबांचा अंत्यविधी त्या चुलत्याने बघितला नाही. येथे कमीतकमी फेसबुकावर पौत्रदर्शन तरी झाले.
आमच्या कुटुंबातील हा अनुभव आठवता, तुमच्या कवितेच्या शेवटच्या ओळीचा (तुम्हाला अभिप्रेत) उलटा अर्थ न घेता मी सुलटाच अर्थ घेतो आहे :-)
7 Oct 2010 - 11:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी असंच वाटलं.
साठाच्या दशकातच काय, माझा एक मित्र १९९४-९७ या काळात केंब्रिजमधे होता. आठवड्याला एक पत्र यापुढे घरच्यांशी संपर्क नाही. बरोब्बर दहा वर्षांनंतर तोच लंडनमधे होता तेव्हा घरी आठवड्याला किमान एक फोन असायचा.
7 Oct 2010 - 6:21 pm | चित्रा
असेच म्हणते.
इथे मुलगा परदेशात गेलेला आहे त्यामुळे असे "तुटणे" झाले आहे, मुलाने आईवडिलांकडे काहीशी पाठ फिरवली आहे, असे सुचवायचे आहे, असे वाटते आहे. पण त्यासाठी नेट जबाबदार नसावे. नेट नसते तरी असेच झालेच असते. मुलाला आता आपल्या मुलाचे तोंड आईवडिलांना दाखवल्याचे समाधान मिळते आहे, पण खरेतर नातवाचे तोंड दाखवून आईवडिलांच्या तोंडाला पाने पुसली आहेत अशी काहीतरी खंत दिसते आहे. म्हणजे परदेशी जाणे, मुलांचे तुटणे, नेटने केलेली मलमपट्टी, खरे तर आत खोल घाव अशी दुखरी भावना दिसते आहे. परदेशी जाणे आपल्याला नवीन नाही. आपल्याकडच्या जुन्या गाण्यांमध्ये परदेशाला प्रियकर का गेला यावरून बरीच काव्ये आहेत. उदा. का धरिला परदेस .. मध्ये परदेश म्हणजे अगदी महाराष्ट्रातून उठून सौराष्ट्रात जाणे असावे. ते काही अमेरिका, ब्रिटन असण्याचीही गरज नाही. तुटण्याचीही भावना होणे नवीन नाही. पण नेटने मलमपट्टी केल्याचे भासवणे ही भावना त्रास देणारी असेल हे खरे आहे.
पण असे आमच्या परदेशातील नातेवाईक/मित्रांनी केल्याचे स्मरत नाही. ज्यांना आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी आईवडिलांना आणता आले नाही, ते मित्र त्याबाबतीत आनंदी नव्हते, त्यांचे काही खरेच प्रश्न होते. आईवडिलांना व्हिसा न मिळणे हा मुख्य प्रश्न.
कविता आवडली, पण ती प्रातिनिधिक नाही.
7 Oct 2010 - 8:12 am | पाषाणभेद
खरोखर अशीच व्यथा पुढे समोर येणार आहे. जग जवळ येत चालले तरी मने दुर होताहेत.
7 Oct 2010 - 11:19 am | विसोबा खेचर
जबरा..!
7 Oct 2010 - 9:07 pm | चन्द्रशेखर गोखले
प्रतिक्रीया देण-या सर्वांचे आभार ! या निमित्ताने या विषयाच्या अनेक बाजु समोर आल्या.. मी हे केवळ भविष्यातील कल्पना चित्र मांडलं .. फेसबूक मधिल एका बातमिनं सुचलेली ही कविता.. यात चांगलं/ वाईट.. असं काही सांगण्याचा प्रयत्न नाही.
काळाच्या ओघात हे कदाचित खरच घडेल.. ते कदाचित अपरिहार्य ही असेल. पण आपण ..यांत्रिक होत चाललो तर नाहीना.. अशी शंका.. वाटते..!