चौकट

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
29 Sep 2010 - 1:20 pm

मळलेल्या वाटेवरुन मी जातो
बागेतल्या त्या कोपर्‍याकडे
गुलमोहोराखाली असलेल्या
लाकडी बाकाकडे
तिथे असतो गुलमोहोराच्या फुलांचा
पखरण ल्यायलेला जमीनतुकडा.

मला हे चित्र सुखदायी वाटतं
वाटतं करावंसं चौकटबध्द
मी चौकट टाकतो त्या चित्राभोवती.

आता लाकडी बाक, मागे बहरलेला गुलमोहोर
अन् त्याखालची लालरेशमी जमीन
... तरीही आजूबाजूस राहतेच उरलेली
अनाच्छादीत जमीन अन् लांब गेलेली फिकट वाट.

मग मी चौकट लहान करतो
लाल जमीनीच्या तुकड्यासाठी
ओबडधोबड जमीन आणि
वाट काढूनच टाकतो चित्रातून.

आता राहते फक्त लाल फुलांचीच जमीन
लाकडी बाक आणि मागचा गुलमोहोर.

मग मी प्रवेश करतो चौकटीत,
अन् जाऊन बसतो चित्रातल्या त्या लाकडी बाकावर . .
रम्य आठवणी काढायला
वाटेवर भेटलेल्या माणसांच्या . . .

मुक्तक

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

29 Sep 2010 - 5:17 pm | श्रावण मोडक

वा. हा प्रवास आवडला.

बेसनलाडू's picture

29 Sep 2010 - 11:24 pm | बेसनलाडू

फारच आवडली. चौकटीचे रूपक, गुलमोहर, बाकडे - सगळेच फार आवडले.
(प्रभावित)बेसनलाडू

केशवसुमार's picture

30 Sep 2010 - 11:50 am | केशवसुमार

कविता फारच आवडली..
(वाचक)केशवसुमार

चित्रा's picture

1 Oct 2010 - 1:40 am | चित्रा

फार छान कविता.

अथांग's picture

30 Sep 2010 - 1:30 am | अथांग

मस्तच !!! अगदी डोळ्यासमोर आले सगळॅ चित्र.

नंदन's picture

30 Sep 2010 - 11:24 am | नंदन

मुक्तक आवडले.

मग मी चौकट लहान करतो
लाल जमीनीच्या तुकड्यासाठी
ओबडधोबड जमीन आणि
वाट काढूनच टाकतो चित्रातून.

--- नॉस्टॅल्जिया/स्मृतिरंजनामागचं अचूक रहस्य.

सहज's picture

30 Sep 2010 - 11:35 am | सहज

या निमित्ताने कविचे मनोगतही येउ द्या.

बेसनलाडू's picture

30 Sep 2010 - 12:21 pm | बेसनलाडू

तुमची विनंती दिसताक्षणीच मान्य केली आहे :)
(सेवातत्पर)बेसनलाडू

यशोधरा's picture

30 Sep 2010 - 11:47 am | यशोधरा

सुरेख! आवडले मुक्तक.

राजेश घासकडवी's picture

30 Sep 2010 - 12:22 pm | राजेश घासकडवी

कलानिर्मितीच्या प्रक्रियेचं छोटेखानी पण नेटकं वर्णन आवडलं...

राघव's picture

1 Oct 2010 - 9:20 pm | राघव

खूप खूप आवडलं.
लिहिते रहा साहेब लिहिते रहा! :)

राघव

केवळ सुरेख!!!
खूप सुंदर आहे चौकट.. :)

धनंजय's picture

1 Oct 2010 - 10:42 pm | धनंजय

आवडली

बर्‍याच दिवसांनी..एका सुंदर कवितेसोबत...
खुपच छान...
पुलेशु...

चतुरंग's picture

2 Oct 2010 - 4:09 am | चतुरंग

कविता आवडली.
एकदम छान आणि वेगळा विचार.

चतुरंग