अंधारलेला आसमंत
पाऊसही दाटून आलेला..
उदास उदासी सर्वत्र,
पण मी -
आनंदी, उत्साही, मजेत !
किती दिवस गुदमर ही
स्वतःबरोबर वागवणार ?
श्वास घेण्याचं सोंग,
किती - कसं वठवणार ?
मलाही तर मोकळं व्हायचंच होतं
मुक्त हसून बघायचं होतं
मनातलं मळभ माझ्या
आता विरळ झालंय,
कोसळत्या पावसात चिंब भिजायला..
खूप - खूप आतुरलंय..
म्हणुनच वाट पहातेय - दाटलेल्या पावसाची......
तो भरभरून पडेल तेंव्हा,
निथळेल माझ्या सर्वांगावरून
मनातील क्लेशांचा पूर त्याच्याशी एकरुप होऊन..
आणि मग चेहर्यावर फक्त उरेल ते -
एक शांत, निरागस, पण 'हुकमी' हसु !!!
प्रतिक्रिया
24 Sep 2010 - 11:22 am | काव्यवेडी
उत्तम !!!! मनातील क्लेशाचा पूर ...................
सुन्दर कल्पना !!!!