हाय! का नाही कळाले, वाट होती रोखलेली,
पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता?
सोबती ज्या मानले, पाठीत केला वार त्याने,
दंश ज्याचा धर्म तो, का मानला मी साव होता! >>>
व्वा !!
लेखणीत ऊतरले भाव ,की हा केवळ सराव होता?
असा हा अंत असहाय्यतेचा,जणु नशीबाचाच अटकाव होता ?
पाठीत वार नाही; मराठीत पाठीवर वार असतो, असे वाटते; चू. भू. द्या. घ्या. पाठीत वार जरासे हिंदाळलेले आहे (पीठ में छुरा भोंकना चे मराठीकरण?)
आता माझाही गोंधळ झाला! हिंदाळलेले की कसे कल्पना नाही, कारण हिंदीत विचार करुन त्याचे मराठी करण करुन मी लिहित नाही किंवा माझे हिंदी वाचनही शून्यच आहे, पण पाठीत खंजिर खुपसला/ खंजिराचा वार केला, अशी वाक्ये वाचली आहेत, त्याचा संदर्भ असावा.
मला पाठीत/ पाठीवर दोन्ही बरोबर वाटते खरे सांगायचे तर, माझे चुकतही असेल. कोणी जाणकार सांगेल का? नंदन?
'पाठीवर वार' हे लाक्षणिक अर्थाने - म्हणजे कृतघ्नता, विश्वासघात इ. दर्शवण्यासाठी अधिक बरोबर आहे, असं मला वाटतं. मात्र शब्दशः असेल उदा. गुद्दा, धपाटा, खंजिराचा वार इ. तर पाठीत. तेव्हा या ठिकाणी दोन्ही चालून जावे. (वृत्ताचा तोल अर्थहानी न होता सांभाळला जात असल्यामुळे.) इलाही जमादारांच्या गाजलेल्या गजलेच्या (एका आवृत्तीत/पाठभेदात*) असा शेर आहे -
छाती खुली तरीही पाठीत वार केला, दिलदार यार माझा लाजला असावा.
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा.
[*पाठभेद म्हणण्याचं कारण की, जालावर १-२ ठिकाणी वाचलं त्यात हा शेर नव्हता.]
कविता कुठली गझल कुठली हे आपल्याला बिलकुल कळत नाही. मात्र वर हे जे काय पद्य लिहिले आहे ते एकदम आवडून गेले :)
हलकट अवांतर :-
भासली शाबासकी, की घातलेला घाव होता?
ह्या ओळीवरुन आम्हाला दिसामाजी मनात येईल ते खरडणार्या एका सदस्येच्या लेखनावर येणार्या प्रतिक्रीयांची आठवण झाली. (त्यातल्या ९८% त्यांच्या स्वतःच्याच असतात हा भाग वेगळा) त्या प्रतिक्रीया म्हणजे शाबासकी आहे का धपाटा हे वाचताना कळतच नाही.
>>शेवटचं कडवं मात्र संपूर्ण गझलच्या भावनेशी विसंगत वाटतं >>
नाही खरं तर. संपूर्ण गझलेमधे एक कैफियत मांडायचा प्रयत्न आहे. आजूबाजूला काय सुरु आहे ह्याबद्दल, आणि तोंडावर गोड बोलणारे, पण मागून छुपे वार करणारे म्हणा, स्वतःच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन इतरांना त्रास देणारे व तत्सम ह्यांबद्दल. आणि कैफियत मांडता मांडता हे लक्षात आलेलं आहे की निवडलेल्या मार्गात जरी अडचणी आलेल्या असल्या, पुढेही येणार असल्या आणि एकूणातच जरी उद्वेगजन्य, मानसिकदृष्ट्या थकवणारा प्रवास असला तरीही हरकत नाही. कारण आतूनच जर समाधान असेल, तर प्रत्येक मुष्कील सरआंखोंपर!
म्हणून, -चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या...
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 4:42 pm | श्रावण मोडक
क्या बात है! प्रत्येक द्विपदी भावली!!!
22 Sep 2010 - 4:44 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
छान जमलिये...!
22 Sep 2010 - 4:46 pm | बिपिन कार्यकर्ते
छान आहे. तांत्रिक बाबी कळत नाहीत, पण भावार्थ आवडला.
22 Sep 2010 - 4:46 pm | पुष्करिणी
मस्त जमलीय, आवडली
22 Sep 2010 - 4:52 pm | मेघवेडा
__/\__
आवल्डीच!
22 Sep 2010 - 4:58 pm | निखिल देशपांडे
मस्त जमलिए गझल
सर्व द्विपदी आवडल्या...
22 Sep 2010 - 4:58 pm | चेतन
गझलेच माहित नाही पण प्रत्येक ओळ मस्त जमलेय
शेवटची ओळ छान जमलेय (पण पहिल्या सगळ्या ओळींसारखी प्रश्नार्थक नाहि आहे )
चेतन
22 Sep 2010 - 5:14 pm | मितान
शेवटच्या दोन ओळी खासच !ब
पूर्ण गजल वाचताना उन्हाचा भास होतो आणि या दोन ओळीत सावलीचा गारवा ! खूप छान :)
22 Sep 2010 - 5:27 pm | यशोधरा
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार.
22 Sep 2010 - 5:47 pm | सागर
वा यशोधरा,
सुंदर गझल रचली आहेस
खास करुन या ओळी काळीज भेदून आरपार गेल्या
पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता?
सोबती ज्या मानले, पाठीत केला वार त्याने,
बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता?
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता..
जबरदस्त आणि बहोत बढीया
खूप दिवसांनी एका चांगल्या गजलेची कट्यार काळजात घुसली :)
मनापासून धन्यवाद
22 Sep 2010 - 8:32 pm | अनामिक
आवडली गझल! शेवटच्या दोन ओळी विशेष आवडल्या.
22 Sep 2010 - 8:46 pm | पैसा
वाहवा!
22 Sep 2010 - 8:49 pm | संदीप चित्रे
पण संपूर्ण गझलेत शेवटचा शेर विशेष आवडला
>> चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...
सुरेख कल्पना आहे ही .
22 Sep 2010 - 10:30 pm | चतुरंग
शेवटची द्विपदी अगदी सहज आली आहे आणि अर्थगर्भ आहे, सुंदर!
रंगा
22 Sep 2010 - 9:08 pm | सुहास..
हाय! का नाही कळाले, वाट होती रोखलेली,
पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता?
सोबती ज्या मानले, पाठीत केला वार त्याने,
दंश ज्याचा धर्म तो, का मानला मी साव होता! >>>
व्वा !!
लेखणीत ऊतरले भाव ,की हा केवळ सराव होता?
असा हा अंत असहाय्यतेचा,जणु नशीबाचाच अटकाव होता ?
22 Sep 2010 - 9:09 pm | प्रभो
क ड आणी क!!!!!
22 Sep 2010 - 10:27 pm | प्राजु
अप्रतिम!!
22 Sep 2010 - 10:36 pm | विदेश
खास करून पुढील ओळी-
सोबती ज्या मानले,पाठीत केला वार त्याने,
दंश ज्याचा धर्म तो,का मानला मी साव होता-
22 Sep 2010 - 11:34 pm | नंदन
--- मस्त.
--- क्लास! 'घरसे चलें थे हम तो खुशी की तलाशमें' मधल्या भावनेचा व्यत्यास म्हणण्याचा मोह व्हावा अशी द्विपदी.
23 Sep 2010 - 1:01 am | शुचि
सुंदर गझल
>> चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...>> :(
23 Sep 2010 - 1:43 am | बेसनलाडू
हाय! का नाही कळाले, वाट होती रोखलेली,
पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता?
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...
या दोन द्विपदी विशेष आवडल्या. एकंदर चांगली झाली आहे.
(वाचक)बेसनलाडू
पाठीत वार नाही; मराठीत पाठीवर वार असतो, असे वाटते; चू. भू. द्या. घ्या. पाठीत वार जरासे हिंदाळलेले आहे (पीठ में छुरा भोंकना चे मराठीकरण?)
(मराठी)बेसनलाडू
23 Sep 2010 - 12:16 pm | यशोधरा
पाठीत वार नाही; मराठीत पाठीवर वार असतो, असे वाटते; चू. भू. द्या. घ्या. पाठीत वार जरासे हिंदाळलेले आहे (पीठ में छुरा भोंकना चे मराठीकरण?)
आता माझाही गोंधळ झाला! हिंदाळलेले की कसे कल्पना नाही, कारण हिंदीत विचार करुन त्याचे मराठी करण करुन मी लिहित नाही किंवा माझे हिंदी वाचनही शून्यच आहे, पण पाठीत खंजिर खुपसला/ खंजिराचा वार केला, अशी वाक्ये वाचली आहेत, त्याचा संदर्भ असावा.
मला पाठीत/ पाठीवर दोन्ही बरोबर वाटते खरे सांगायचे तर, माझे चुकतही असेल. कोणी जाणकार सांगेल का? नंदन?
23 Sep 2010 - 12:34 pm | नंदन
'पाठीवर वार' हे लाक्षणिक अर्थाने - म्हणजे कृतघ्नता, विश्वासघात इ. दर्शवण्यासाठी अधिक बरोबर आहे, असं मला वाटतं. मात्र शब्दशः असेल उदा. गुद्दा, धपाटा, खंजिराचा वार इ. तर पाठीत. तेव्हा या ठिकाणी दोन्ही चालून जावे. (वृत्ताचा तोल अर्थहानी न होता सांभाळला जात असल्यामुळे.) इलाही जमादारांच्या गाजलेल्या गजलेच्या (एका आवृत्तीत/पाठभेदात*) असा शेर आहे -
छाती खुली तरीही पाठीत वार केला, दिलदार यार माझा लाजला असावा.
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा.
[*पाठभेद म्हणण्याचं कारण की, जालावर १-२ ठिकाणी वाचलं त्यात हा शेर नव्हता.]
23 Sep 2010 - 12:38 pm | यशोधरा
>>केलेत वार ज्याने तो मोगरा असावा >> आई गं! :)
धन्यवाद नंदन.
23 Sep 2010 - 2:48 am | धनंजय
छान!
23 Sep 2010 - 3:45 am | चित्रा
गझल कळली नाही. पण खूपच गेय वाटली.
23 Sep 2010 - 12:17 pm | यशोधरा
चित्राताई :)
23 Sep 2010 - 4:09 am | अथांग
आवडली.
23 Sep 2010 - 8:26 am | गंगाधर मुटे
मतला आणि मक्ता सुरेख.. :)
23 Sep 2010 - 10:24 am | ज्ञानेश...
चांदण्यांनी घेतलेला ठाव आवडला.
पुलेशु.
23 Sep 2010 - 11:14 am | अस्मी
सुंदर..
ही द्विपदी सगळ्यात आवडली :)
23 Sep 2010 - 11:41 am | मनीषा
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...
सुंदर !!
23 Sep 2010 - 11:49 am | अवलिया
!
23 Sep 2010 - 12:19 pm | यशोधरा
सर्वांचे मनापासून आभार! :)
23 Sep 2010 - 1:05 pm | llपुण्याचे पेशवेll
यशो,
खूपच सुंदर आहे गझल. आवडली.
23 Sep 2010 - 1:33 pm | सूड
गझल छान जमलीय.
23 Sep 2010 - 5:46 pm | धमाल मुलगा
झक्क्कास! :)
अवांतरः कसं काय बुवाएव्हढं एव्हढं छान लिहायलं सुचतं लोकांना ?
24 Sep 2010 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार
कविता कुठली गझल कुठली हे आपल्याला बिलकुल कळत नाही. मात्र वर हे जे काय पद्य लिहिले आहे ते एकदम आवडून गेले :)
हलकट अवांतर :-
ह्या ओळीवरुन आम्हाला दिसामाजी मनात येईल ते खरडणार्या एका सदस्येच्या लेखनावर येणार्या प्रतिक्रीयांची आठवण झाली. (त्यातल्या ९८% त्यांच्या स्वतःच्याच असतात हा भाग वेगळा) त्या प्रतिक्रीया म्हणजे शाबासकी आहे का धपाटा हे वाचताना कळतच नाही.
24 Sep 2010 - 2:03 pm | यशोधरा
पर्या, धन्यवाद, आणि सोप्पे केलेय की काम तसे! :)
बरे, तुझे अवांतर मला व्यनिमधून उलगडून सांग बरे! :)
आणि आता धागा वर आणून दिलाच आहेस, तर (थॅंक्यू! ;) ) तर, धम्या, पुपे आणि सुधांशू धन्यवाद. :)
24 Sep 2010 - 2:12 pm | विजुभाऊ
सोसलेल्या चेहर्यांचा, शापितांचा गाव होता..
गझलमधे सामावलेले पझल....
24 Sep 2010 - 2:32 pm | राजेश घासकडवी
मस्त जमली आहे गजल.
24 Sep 2010 - 9:12 pm | चन्द्रशेखर गोखले
सुंदर गझल , छान जमुन आली आहे !
(मी चारोळीकार चन्द्रशेखर गोखले नाही)
26 Sep 2010 - 7:27 am | राघव
घालता कोडे, जवाबाचे तुला का दु:ख झाले?
बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता?
हे खास आवडले.
शेवटचं कडवं मात्र संपूर्ण गझलच्या भावनेशी विसंगत वाटतं. चु.भु.द्या.घ्या.
27 Sep 2010 - 7:32 pm | यशोधरा
>>शेवटचं कडवं मात्र संपूर्ण गझलच्या भावनेशी विसंगत वाटतं >>
नाही खरं तर. संपूर्ण गझलेमधे एक कैफियत मांडायचा प्रयत्न आहे. आजूबाजूला काय सुरु आहे ह्याबद्दल, आणि तोंडावर गोड बोलणारे, पण मागून छुपे वार करणारे म्हणा, स्वतःच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन इतरांना त्रास देणारे व तत्सम ह्यांबद्दल. आणि कैफियत मांडता मांडता हे लक्षात आलेलं आहे की निवडलेल्या मार्गात जरी अडचणी आलेल्या असल्या, पुढेही येणार असल्या आणि एकूणातच जरी उद्वेगजन्य, मानसिकदृष्ट्या थकवणारा प्रवास असला तरीही हरकत नाही. कारण आतूनच जर समाधान असेल, तर प्रत्येक मुष्कील सरआंखोंपर!
म्हणून, -चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या...
तरीही हार मानलेली नाहीये, मानणार नाहीये, कारण, -चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...
अवांतरः - ही ओळ आधी अशी लिहिली होती.. चांदण्याचा ताजवा साथीस आहे, रात होता...
26 Sep 2010 - 11:34 am | पिवळा डांबिस
भावना व्यक्तिशः भावली नाही, पण गजल मात्र सुरेख!!!
जियो!
27 Sep 2010 - 7:34 pm | यशोधरा
कित्या हो काका भावली नाही? :)
26 Sep 2010 - 1:27 pm | नगरीनिरंजन
छान शब्दरचना!