तू हात पुढे जो केला
मी दिला त्यास आधार
समजून फोड तळहाती
हळुवारपणे जपणार
वचनास पाळण्याचा
केला पक्का निर्धार
चाललीस सप्तपदी तू
मी कधी न अंतरणार
शंकेस कधी तो थारा
तू मनात ना देणार
जोडीची गोडि गुलाबी
ही सदैव दिसणार
तू कामावरून येता
तव स्वागत मी करणार
कप हाती गरम चहाचा
बिस्किटासवे देणार
तारीख एक ती येता
मी खूष अती होणार
तव पगार माझ्या हाती-
मी तुजभवती फिरणार
...स्वप्नातहि असले भलते
तू आणु नको कुविचार -
जा सांग तुझ्या बापाला
मी घरजावई ना होणार !
ती केबी-फोरची संधी
मी नाही दवडणार
करोडपती बनण्याची
मी स्वप्ने बघणार !!
प्रतिक्रिया
19 Sep 2010 - 2:07 pm | मनीषा
तारीख एक ती येता
मी खूष अती होणार
तव पगार माझ्या हाती-
मी तुजभवती फिरणार
----- वा ! चांगली स्वप्ने आहेत .
19 Sep 2010 - 6:06 pm | चिरोटा
छान कविता.
हे असे करुन घरजावई व्हायचा चान्स जास्त आहे.!!
19 Sep 2010 - 6:29 pm | दत्ता काळे
...स्वप्नातहि असले भलते
तू आणु नको कुविचार -
जा सांग तुझ्या बापाला
मी घरजावई ना होणार !
.. पण बापच घरजावई असेल तर ?
19 Sep 2010 - 6:37 pm | पैसा
मजा आली.