तथास्तु !!

अनुप्रिया's picture
अनुप्रिया in जे न देखे रवी...
18 Sep 2010 - 11:02 pm

थांब नराधमा !! तुला माफी नाही

हे जग कदाचित तुला माफ करेलही
पण माझ्याकडून माफी नाही ॥

कोवळ्या जिवांना, उमलत्या कळ्यांना
उखडणारा तू......

भावनांचा, मनाचा
चोळामोळा करणारा तू......

पूजा करावी अशी प्रतिमा जिची
तिला पोते-यासारखा वापरणारा तू....

नात्याचा गैरवापर करून
डोळ्यात धूळ फेकणारा असा तू.........

हातात विश्वासाने दिलेला हात
त्या हातालाच तोडून, फायदा घेणारा तू........

कळीकाळ ही सोडणार नाही तुला
ध्यानी धर नराधमा........

तू हात लावलायस
एका लखलखत्या ज्वालेला

दिव्या तेजाने तळपणा-या तलवारीला
त्या परमेशाच्या लाडक्या लेकीला

आता भोग पापाची फळे तू
माझ्या शापापेक्षा उ:शाप भयंकर

तोच तू भोग आता........तोच तू भोग आता

कविता

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

18 Sep 2010 - 11:09 pm | पुष्करिणी

कविता चांगली आहे. रिअलिस्टिक आहे..

पण असे नराधम असूच नयेत असं वाटत !

देव-दानवंचं युद्ध झालं त्यात देवीनी ज्या राक्षसांना मारलं त्यांनाही मोक्ष मिळाला का तर देवीचा, तिच्या शस्त्रांचा, क्रोधाचा स्पर्श झाला होता.
पण या कवितेत वर्णन केलेले नराधाम त्या राक्षसांहूनही हीन हीन पातळीवरचे. अशांचे हाल हाल करण्यासाठीच शंकर भूत प्रेत आणि गण, देवचर पाळत असावेत. कारण अशा हीन आत्म्यांना देवाचा क्रोधही लाभू नये. अशांचे हाल कुत्राही खाऊ नये.
असो.
कविता आवडली पेक्षा ..... जाळत गेली.

प्रीत-मोहर's picture

19 Sep 2010 - 9:03 am | प्रीत-मोहर

अग्दि अस्सच म्हण्ते.......

शेखर's picture

19 Sep 2010 - 4:01 am | शेखर

तथास्तु

अवलिया's picture

19 Sep 2010 - 2:19 pm | अवलिया

तथास्तु !

सहज's picture

19 Sep 2010 - 2:46 pm | सहज

तथास्तु

पैसा's picture

19 Sep 2010 - 2:54 pm | पैसा

तुजी भास तलवारीसारखी तळपतां. महानंद प्रकरणाची याद आयली.

स्पंदना's picture

20 Sep 2010 - 8:30 am | स्पंदना

तथास्तु ग अनुप्रिया!!
तथास्तु!