खूप दिवसांनंतर मिपा वर काही लेखन करत आहे, या आधीच्या भाषांतरानंतर मधे खुपच कालावधी गेला त्याबद्द्ल क्षमस्व!
नरसिंह सिवा है........
एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।
एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।
भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।
एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥
- कविराज भुषण
अर्थ :-
यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात. भूषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे. कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास रणांगणावरील सिंह म्हणतात. कोणी त्यास नरसिंहच समजतात (कारण ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तद्वतच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली. )
प्रतिक्रिया
30 Apr 2010 - 9:03 am | डॉ.प्रसाद दाढे
बहोत बढिया! और आने दो
अलि नवरंगजेब चंपा सिवराज हैं
30 Apr 2010 - 2:01 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
बिपिन कार्यकर्ते
17 Sep 2010 - 3:32 pm | गणपा
और भी आंदो...
30 Apr 2010 - 6:09 pm | प्रियाली
मस्त! अजून येऊ द्यात.
30 Apr 2010 - 6:35 pm | धमाल मुलगा
धन्यवाद श्री. करमरकर!
कवि भुषण ह्यांच्या शिवरायांवर रचलेल्या कवनांनी गोडी काही औरच.
छान! आणखीही येऊ द्या. :)
4 May 2010 - 11:13 am | विशाल कुलकर्णी
कविराज भुषण यांच्या आणखी काही रचना..
यांचा अर्थ समजावून सांगाल काय, तसा थोडा थोडा लागतोय पण काही शब्द अडतात.
पंडित रत्नाकर त्रिपाठी असे मुळ नाव असलेल्या या उत्तर भारतीय कविने सुरुवातीचा काही काळ औरंगजेबाकडेही चाकरी केली होती. पण तिथे केवळ बादशहाचे गुणगान करणारी काव्येच लिहीण्याची मुभा असल्याने या स्वाभिमानी कविने राजाश्रय नाकारला व पुढे तो शिवरायांची किर्ती ऐकुन तत्कालिन हिंदवी स्वराज्यात आला. केवळ व्यक्तीचे गुणगान करणार नाही म्हणुन औरंगजेबाचा आश्रय सोडलेला हा विलक्षण कवि शिवाजी महाराजांच्या दैवी व्यक्तिमत्वाने एवढा प्रभावीत झाला की त्याने राजांवर एक सोडुन दोन महाकाव्ये लिहीली.
"श्री सिवराज भुषण" आणि "शिव भवानी"
......................................................................................................
जै जयंति, जै आदि सकति, जै कालि कपर्दिनी
जै मधुकैटभ छलनी, देवि जै महिष बिमर्दिनी !!
दशरथ जु के राम, मै वसुदेव के गोपाल !
सोंई प्रगटे साहि के, श्री सिवराज भुपाल !!
सिव हि औरंग जीत सके, और न राजा राव !
हत्थिं मत्थ पर सिंह बिनु, और न घालै घाव !!
औरन को जो जनम है, सो याको यक रोज !
औरनको जो राज है सो, सिर सरजाको मौज !!
जीवन में नर लोग बडों, कवि भुषन भाषत पैज अडो है !
है नर लोगनमें राज बडों,सब राजनमे सिवराज बडों है !!
को दाता ? को रन चढो ? को जग पालनहार...!
कवि भुशन उत्तर दिखो, सिव नृप हरि अवतार..!!
तेरे तेज है सरजा दिनकरसो, दिनकर है तेरे तेज के निकटसो !
तेरो जस है सरजा हिमकरसो, हिमकर है तेरो जस के अकरसो !!
कुंद कहॊं, पयवृंद कहॊं, अरु चंद कहॊं
............................सरजा जस आगे !
बाज कहॊं, मृगराज कहॊं, गजराज कहॊं
........................ तेरे साहसके आगे !!
शिवाजी महाराजांच्या १४ गुणांचे वर्णन त्याने एका छंदामध्ये केले आहे.......
सुंदरता,गुरूता,प्रभुता,भनि भूषन होत है आदर जामे !
सज्जनाता औ,दयालुता,दिनता,कोमलता झलके प्रजामे !!
दान क्रुपानहु को करिबो,करिबो अभय दिननको बरजामे !
साहसनों रन ठेक,विवेक,इते गुन एक सिवा सरजा मे !!!!
हिंदू धर्म,हिंदू संस्क्रूती,कुळधर्म,कुळाचाराच्या आधारे चालणारी हिंदू परंपरा यांचे रक्षण आपल्या तलवारीच्या जोरावर केल्याचा उल्लेख एका कवनामध्ये करताना तो म्हणतो.....
वेद राखे विदित पुरान राखे सारयुत रामनाम राख्यो अति रसना सुधार मे !
हिंदून की चोटी राखी है सिपाहिनकी रोटी,कांधेमे जनेऊ राख्यो माला राखी गरमे !!
मिडी राखे मुगल मरोरि राखे पातसाह,वैरी पीसि राखे वरदा राख्यो करमे !
राजन की हद्द राखी तेग बल शिवराज,देवराखे देवल स्वधरम राख्यो घर मे !!!!
अर्थ --शिवजीराजाने आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे संरक्षण केले.सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते हिंदूंच्या जिव्हेवर कायम ठेवले.हिंदूंची शेंडी राखली आणि शिपायांची रोटी(ऊपजीविका)चालविली. खांध्यांवरील जानवी अन गळ्यातील माला सुरक्षित ठेवल्या.मोंगलांचे व्यवस्थित मर्दन केले अन बादशहास मुरगाळून टाकले.शत्रूंचे चूर्ण केले.इतके करुन आपल्या हाती वर देण्याचा अधिकार ठेवला.देवळात देव अन घरात कुलधर्म कुलाचार कायम ठेवले.
कवि सिवराज भुषण
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
16 Sep 2010 - 7:22 pm | मालोजीराव
विशाल ...काही दुरुस्ती सुचवू इच्छितो ! पंडित रत्नाकर त्रिपाठी हे कवी भूषण यांचे वडील होत. चिंतामणि, भूषण, मतिराम आणि जटाशंकर हि त्यांची मुले ....यातील चिंतामणि, भूषण, मतिराम यांनी हिंदी साहित्यात अफाट भर टाकली.
चित्रकुट राजा सोळंकी याने 'कविभूषण' पदवी प्रदान केली, तेव्हापासून ते भूषण म्हणून प्रसिद्ध पावले...इतिहासात त्यांची खर्या नावाची नोंद अजून सापडली नाही.
पण तुम्ही या कविराजांच्या रचना टाकून मिसळपाव कृतकृत्य केलेत त्याबद्दल धन्यवाद !
17 Sep 2010 - 10:53 am | विशाल कुलकर्णी
आभारी आहे ओंकारजी :)
3 May 2010 - 8:23 pm | स्मृती
कविराज भुषण! केवळ थोर!!
4 May 2010 - 10:08 am | फ्रॅक्चर बंड्या
मस्तच ...
binarybandya™
17 Sep 2010 - 2:37 am | प्राजु
व्वा!! येऊदे अजून.
17 Sep 2010 - 7:20 am | मदनबाण
हेच म्हणतो...
17 Sep 2010 - 3:34 pm | अवलिया
मस्त !!