गाभा:
एका मित्राने मुंबईतून काही भित्तीशिल्पांचे फोटो पाठवले होते. ते बहुधा मुंबई-पुण्यातच तयार केले आहेत. फोटोंसोबत अधिक माहिती नव्हती. सध्या फ्लिकरही गंडलेले आहे त्यामुळे कसाबसा एक फोटो चढवता आला. मिसळपावकरांना नक्की आवडेल असे वाटल्याने येथे देत आहे. कोणी ही शिल्पे प्रत्यक्ष पाहिली आहेत का?
प्रतिक्रिया
6 Oct 2007 - 6:03 pm | विसोबा खेचर
अगदी जिवंत वाटावं असं शिल्प! क्या बात है...
मिसळपाव ग्रामपंचायतीतर्फे थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा...
तात्या.
6 Oct 2007 - 6:55 pm | लबाड बोका
सहमत
6 Oct 2007 - 6:51 pm | लिखाळ
वा वा..मस्तच आहे शिल्प ! मी प्रत्यक्ष पाहिले नाही.
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
6 Oct 2007 - 8:03 pm | अण्णा हजारे
उत्तम शिल्प !!!
दादर च्या भगव्या महालामधील तर नाही ना ? भगव्या सदर्यातील पाठमोरी व्यक्ति पाहून विचार आला..
राळेगणचा अण्णा
6 Oct 2007 - 8:16 pm | चित्रा
पण मला वाटते प्रकाशचित्र म्हणूनच. कारण कुठे ते आठवत नाही.
6 Oct 2007 - 8:20 pm | धनंजय
एक अवांतर प्रश्न पडला.
विडा उचलण्याची प्रथा कशी सुरू झाली? अजून महाराष्ट्रात कुठल्या समारंभात रीत म्हणून खराच "विडा उचलतात" का?
अवांतर अवांतर : "सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे?
6 Oct 2007 - 8:26 pm | सहज
हे शोधायची सुपारी घेता का?
7 Oct 2007 - 1:24 am | प्रियाली
सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे?
हो तशी रीत आहे. फक्त सुपारीचीच नाही तर त्या आधी विडा देण्याची रीत होती. महत्त्वाची कामगिरी फत्ते करण्यासाठी विड्याचे पान शासकातर्फे सर्वांसमोर ठेवले जात असे. त्यास विडा देणे/ ठेवणे म्हणतात. जो ते पान उचलेल तो कामगिरीस तयार म्हणजेच त्याने विडा उचलला. हे केल्यावर शासक त्यास त्या कामगिरीची सुपारी देई.
ही प्रथा हिंदू-मुसलमान दोघांत होती. (अफज़ल खानने सिवा को खत्म करने का बिडा उठाया था|) पाहुण्याला आदर सत्काराकरता पान-सुपारी दिली जात असे/ देतात. ते देणे म्हणजे समोरच्याचा आदर राखणे, मान देणे, सत्कार करणे. विडा स्वीकारणे म्हणजे यजमानाचा मान राखणे. या सर्वातूनच ही प्रथा आली असावी. पानसुपारी सहसा एकत्र दिली जाते पण या सत्काराला समोरचा पात्र आहे का हे ठरवण्यासाठी पान फिरवले जाई. जो उचलेल त्याच्या पानावर सुपारी ठेवून त्याचा सत्कार केला जाई. पैजेचा विडा हा शब्दप्रयोग याच संदर्भातला.
आपल्याकडे तर प्रत्येक धार्मिक कार्यात पानसुपारीला मानाचे स्थान आहेत. मुसलमानांत असे काही वेगळे स्थान आहे का त्याची विशेष कल्पना नाही.
6 Oct 2007 - 8:26 pm | देवदत्त
अप्रतिम शिल्प. जणू काही समोरच आहेत सर्व.
जर नैसर्गिक रंगसंगती वापरली असती तर इतकाच प्रभाव पडला असता का असा विचार येतो. :)
6 Oct 2007 - 8:34 pm | विकास
एकदम आवडले!
कुठेतरी पाहीले आहे पण ते लक्षात येत नाही पुण्यात की मुंबईत ते! कळल्यास सांगा.
6 Oct 2007 - 8:35 pm | प्रमोद देव
मला आता नेमके गावाचे नाव आठवत नाहीये ; पण कोकणात एका गावी शिवशाहीतील अशा काही प्रसंगांचे शिल्पांच्या रुपात कायम स्वरूपी प्रदर्शन(म्युझियम म्हणा हवे तर) मांडलेले आहे असे वाचनात आले होते. आठवण्याचा प्रयत्न करतोय. बघू या ! आठवतेय का!
26 Mar 2008 - 6:40 pm | मनस्वी
असावे.
6 Oct 2007 - 8:38 pm | अण्णा हजारे
प्रमोदराव,
तुम्हाला डेरवण तर म्हणायचे नाहि ना..
डेरवण चा अण्णा..
6 Oct 2007 - 8:41 pm | प्रमोद देव
धन्यवाद अण्णासाहेब! चिपळूणजवळच्या 'डेरवण' गावात असे कायम स्वरूपी प्रदर्शन मांडलेले आहे.
हे चित्र बहुदा त्यातलेच असावे.
6 Oct 2007 - 8:49 pm | प्रियाली
हे चित्र मुंबई पुण्यातीलच असावे, काही अधिक चित्रे आहेत त्यात आजूबाजूच्या इमारती दिसतात. असो. आज इंटरनेट गंडलंय. वेळ झाला की चिकटवेन.
6 Oct 2007 - 8:57 pm | प्रमोद देव
मी आधी म्हणालो तसे हे चित्र डेरवणच्या शिवसृष्टी मधले नाही.क्षमा असावी
शिवसृष्टी खाली दिलेल्या दुव्यावर पाहता येईल.
http://www.swamisamarth.com/photogallery/shivshrusti/album0.html
7 Oct 2007 - 12:01 am | नंदन
खरंच देखणं शिल्प! प्रमाणबद्ध तर आहेच, पण प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्यावरील भावही अचूक टिपले आहेत.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
8 Oct 2007 - 4:30 pm | सर्किट (not verified)
पैज ? विडा उचलतो !
- सर्किट
8 Oct 2007 - 4:41 pm | जुना अभिजित
हे लाल महालात आहे असं तर म्हणायचं नाही ना तुम्हाला?
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
8 Oct 2007 - 9:35 pm | सर्किट (not verified)
मला तसं म्हणायचं नाहीये. हल्ली कसब्याबाहेरही लोकांची वस्ती आहे असे ऐकून आहे.
बालगंधर्व नाट्यमंदिराच्या जवळपास कुठेतरी आहे का ? ते मागचं दार खूप ओळखीचं वाटतं आहे.
- सर्किट
8 Oct 2007 - 9:58 pm | प्रियाली
उपक्रमावर चिकटवलेला फोटोही इथे लावते. त्यात इमारतींची नावेही दिसतात.
8 Oct 2007 - 10:11 pm | राजे (not verified)
त्या कलाकाराला माझा देखील मानाचा मुजरा...
जरा महाराजांच्या चेह-यावरील भाव व त्यांच्या हाताचा प्रश्न चिन्ह दाखवणारा अथवा काहीतरी विचारणारा भाव पाहा... व तो इंग्रज तो कीती लक्ष देऊन महाराजांचे बोलणे आपल्या कानामध्ये साठवून त्याचा अर्थ लावू पाहत आहे... क्या बात है .... जबरदस्त.... व तो महाराजांच्या पाठीमागे उभा असलेला मावळा त्यांच्या चेहरावर असे भाव आहेत जसे ईटी मध्ये त्या लहान मुलाचे भाव आहेत जेव्हा तो परग्रहावरील सजीव प्राणी पाहतो... जान डाल दी है... बस त्यांच्या डोळ्यांनीच.
एक चुक असावी अथवा काहीतरी प्रथा असावी जरा लक्ष देऊन पाहा व वरील चित्रातील एक चुक मला सांगा.
यनावाला स्टाइल मध्ये.... व्यं. नी. ने
[मी कोणी मोठा कलाकार नाही आहे पण माझ्या सामान्य नजरे मध्ये एक चुक आली आहे शक्यतो ती चुकच आहे असे समजून मी वरील प्रश्न विचारला आहे तेव्हा लागा कामाला]
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
9 Oct 2007 - 7:36 am | सहज
हे दुसर चित्र मला तितके आवडले नाही. सिंहासन जरा उंचीवर असते इथे एकदमच खाली आहे जणू बाहेर बागेत शामीयाना आहे व त्यात खुर्ची टाकून बसले आहेत. त्यामुळे महाराज एकदम कॉमनर वाटतात असे मला वाटते. मला वाटायचे की सगळ्यांपेक्षा उंचीवर महाराजांचे स्थान असते. म्हणजे आत्तापर्यंत जे काही सिनेमे, चित्र बघीतली आहेत त्यात राजेमंडळी वरच्या लेवल बाल्कनी सीट व बाकी आम्ही ड्रेस सर्कल.
ती सगळी मंडळी जरा जास्त जवळ उभी आहेत व हातवारे जास्त लाउड आहेत, तेवढ्या कमी अंतराकरता, पहील्या मावळ्याने महाराजांच्या दिशेने मुठ (गुद्दा) दाखवायलाच पाहीजे होता का? तसेच मागच्या मावळ्याने पणा मुठी वळल्या आहेत. (कदाचीत त्यात तलवार भाला बसणार असेल.) जर काही गंभीर प्रसंग असेल तर मागील अंगरक्षक किती निवांत आहे. पंखेवाला असेल तो बहूदा.
महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे.
असो. मे बी इट इज जस्ट मी.
9 Oct 2007 - 7:40 am | कोलबेर
>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का?
महाराजांच्या पायात चपला नाहीत आणि दोनही फिरंगी ते निरखुन बघत आहेत ह्याचा अर्थ मलाही कळला नव्हता.. एखाद्या ऐतिहासिक कथेचा संदर्भ आहे का ह्याला? पहिल्या चित्रातही त्या नव्हत्या पण त्या शिल्पातल्या कोणाच्याच पायात नसल्याने ही शंका आली नव्हती.
9 Oct 2007 - 7:47 am | सहज
फूट मसाज जस्ट संपला असेल किंवा सुरू होणार असेल. किंवा तो फिरंगी करणार असेल. आधी चीनला जाऊन काहीतरी शिकून आला असेल. महाराजांची गुढघादुखी ऐकली असेल, ऐक्युप्रेशर करणार असेल.
9 Oct 2007 - 7:47 am | विकास
>>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे.
यावर महाराजांचे आविर्भाव पाहील्यास ते वैतागून विचारत असल्यासारखे वाटते की, "कुठे गेल्या माझ्या चपला? कालपासून दुरूस्तीला दिल्या होत्या अजून कशा नाही झाल्या?"
9 Oct 2007 - 8:12 am | सर्किट (not verified)
टोपीकरांच्या तोफा, त्यांचे व्यवस्थापन ह्याविषयी महाराजांना आदरच होता. त्यामुळे ते टोपीकरांना आपल्या चपलांविष्हयी नाही, तर सिद्दीला तोफा पुरवताना तुमचा मैत्रीधर्म कुठे गेला होता, हे विचारताहेत हे (मला तरी) स्पष्ट दिसते आहे.
- सर्किट
9 Oct 2007 - 8:10 am | सर्किट (not verified)
महाराजांचे सिंहासन एकाच पातळीवर असल्याने हे ट्रॅडिशनल महाराज नाहीत, तुम्हा आम्हा सर्वाम्चे महाराज आहेत हे जाणवते.
चपला घातल्या नसतील कारण टोपिकरांन पकडून आणले म्हटल्यावर महाराज सईबाईंच्या महालातून तात्काळ उठून आले असतील.
- सर्किट पुरंदरे
9 Oct 2007 - 9:20 am | आजानुकर्ण
टोपीकर महाराष्ट्रदेशी चपलांचे व्यापारी म्हणोन आले होते हे स्पष्ट आहे. महाराजांना त्यांच्या मापाच्या चपला भेट देवोनि आपले हातपाय इथे पसरावे असा टोपीकराचा हेतू इथे लख्ख दिसतो. महाराजांच्या चपलांचे माप घेण्यासाठी टोपीकर निरखोन पाहत आहेत आणि महाराज "तुमचा टेप कुठे आहे" असा प्रश्न विचारत आहेत हे आम्ही पाहिले आहे.
- आजानुकर्णाची बखर.
9 Oct 2007 - 11:55 am | सर्किट (not verified)
समजा टोपीकर आम्हास चपला विकण्यास येतो, तर त्याने स्वतःने त्या का घातल्या नाहीत ? स्वतः मात्र मलेशियात निर्मीत नायकीचे पायताण घातलेले दिसते !
बखरकार, आमच्या महाराजांना काय समजलात ??
तुमच्या चिंचवडच्या मोरया गोसाव्याच्या वंशजांच्या कानाखाली लाल काय झाले ते अद्यापही त्यांना कळलेले नाही हो !!!
- (प्रौढ"प्रताप"पुरंदर) सर्किट
9 Oct 2007 - 12:33 pm | सर्किट (not verified)
बाय द वे,
तानाजीच्या वरील शिल्पांत देखील महाराजांनी पायताण घातलेले नाही, ह्याची नोंद घ्यावी.
(त्यावेळी, महाराजांना "तानाजी आला आहे, कोंढाण्याविषयी काहीतरी बोलतो आहे" असे म्हणून त्यांच्या राणिवशातून बोलवलेले इतिहासात नमूद आहे.)
- सर्किट मेहंदळे
9 Oct 2007 - 5:17 pm | धनंजय
लग्नातील कुठल्याशा कार्यासाठी बसायचे म्हणून तानाजी अनवाणी असेल. विडा उचलायला तसाच धावत धावत आला. मुलगाही अनवाणी आहे. भालदार-चोपदारही अनवाणी, असे वर कोणीतरी निरीक्षण दिलेले आहे. तेही अकस्मात बोलावलेल्या मीटिंगसाठी घरकाम सोडून चपला विसरून आले आहेत.
किंवा ही मीटिंग जिजाऊंच्या महलात आहे. तिथली "पादत्राणे बाहेर ठेवावी" अशी सूचना सर्वांनीच पाळलेली आहे.
8 Oct 2007 - 4:48 pm | आजानुकर्ण
१. तानाजी मालुसरे पुण्याचे
२. शेलारमामा पुण्याचे
३. रायबा पुण्याचा
४. जिजाबाई पुण्यात वास्तव्याला होत्या
५. शिवाजी महाराज पण पुण्याचेच
म्हणजे हे शिल्प पुण्यात असण्याचीच अधिक शक्यता आहे.
19 Mar 2008 - 9:11 pm | llपुण्याचे पेशवेll
माझ्या माहीती नुसार तानाजी मालुसरे हे रायगड जिल्ह्यातील कोणत्यातरी गावचे होते.
पुण्याचे पेशवे
8 Oct 2007 - 8:22 pm | प्राजु
काय सुंदर आहे हे शिल्प...! अप्रतिम..
मिसळप्रेमींनो... लवकर शोधून काढा पाहू हे चित्र कुठले आहे ते..!
- प्राजु.
9 Oct 2007 - 4:42 pm | प्रियाली
ही म्यूरल्स पुण्यातील आहेत असे कळते. ;-) वरील शिल्पात ज्या आसनावर महाराज बसले आहेत ते राजसिंहासन नाही. तानाजी लग्नाचे आमंत्रण देण्यास आला होता त्यामुळे तो राजमहाली गेला असावा आणि महाराज अनवाणी असावेत पण ब्रिटिशांच्या मुसक्या आवळून त्यांना राजमहालात (अंतःपुरी ;-)) नेण्यात आले नसावे.
आमच्या मित्रमहाशयांच्या कोणा मित्रानेच ही शिल्पे घडवल्याचे कळते त्यांना शंकानिरसनाचा खलिता धाडण्याचा बेत आहे.
19 Mar 2008 - 8:55 pm | सृष्टीलावण्या
सुंदर, देखणे शिल्प बनविणार्या पुढे आपण नतमस्तक. वाटते जर मंत्र वैगरे म्हणून जीव ओतता आला असता तर हे लोक हाडामासाची माणसे वाटली असती (सासवण्याला अशीच अद्भूत शिल्प पाहिल्याचे आठवते).
>
>
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...
19 Mar 2008 - 10:10 pm | चतुरंग
'राघव स्मृती' हे नाव मला नक्कीच वाचलेले आठवते पण नक्की जागा लक्षात येत नाहीये.
दोन्हीही शिल्पे अप्रतिम आहेत.
चतुरंग
21 Mar 2008 - 6:54 pm | चेतन
हे चित्र डेरवणला आहे
22 Mar 2008 - 2:26 pm | झकासराव
पहिल भित्ती चित्र हे अकलुज येथील शिवसृष्टीचे आहे. अशीच एक मेल आली होती त्यात लिहिल होत अस पुसटस आठवतय मला :)
गुगलौन पाहिल की कळेल कदाचित.
24 Mar 2008 - 11:32 am | राजमुद्रा
मला वाटते, हे शिवश्रुष्टीचे काम आहे, जे अकलूजला चालू आहे. हे काम शासकिय संग्रहालयासाठी चालू आहे. हे काम बाबासाहेब पुरंदरेच्या देखरेखीखाली चालू आहे, बहुधा हा तिथलाच फोटो असावा.
राजमुद्रा :)
26 Mar 2008 - 7:04 pm | प्रियाली
डेरवणची चित्रे यापेक्षा वेगळी वाटतात. ही चित्रे पुण्याला तयार करून इमारतीच्या मोकळ्या जागेत नंतर कोठेतरी हलवण्यासाठी ठेवलेली आहेत हे स्पष्ट आहे, परंतु ती कोणत्यातरी व्यावसायिक हेतूने केलेली आहेत. चित्रपट, नाटक इ. साठी. ही शिवसृष्टीतील नाहीत हे नक्की.
27 Mar 2008 - 9:45 pm | प्रभाकर पेठकर
मला वाटतं हि शिल्पे 'मनोगता'वरील आहेत....
27 Mar 2008 - 9:53 pm | विकेड बनी
वेलणकर लेखांत चित्र घालून देतात हे माहित आहे आता कोरीवकामही करायला लागले का काय??
28 Mar 2008 - 1:39 pm | उदय सप्रे
ही नवीन शिवसृष्टी "अकलूज" येथे येत आहे.....
यापेक्षाही सुंदर शिल्पे "डेअरवण" येथील "शिवसृष्टीत" आहेत !