Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रियाली on Sat, 10/06/2007 - 17:55
  • Log in or register to post comments
  • 36870 views

प्रतिक्रिया

Submitted by विसोबा खेचर on Sat, 10/06/2007 - 18:03

Permalink

मानाचा मुजरा!

अगदी जिवंत वाटावं असं शिल्प! क्या बात है... मिसळपाव ग्रामपंचायतीतर्फे थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by लबाड बोका on Sat, 10/06/2007 - 18:55

In reply to मानाचा मुजरा! by विसोबा खेचर

Permalink

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Sat, 10/06/2007 - 18:51

Permalink

आधी लगिन कोंढाण्याचं (?)

वा वा..मस्तच आहे शिल्प ! मी प्रत्यक्ष पाहिले नाही. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments

Submitted by अण्णा हजारे on Sat, 10/06/2007 - 20:03

Permalink

तेथील तर नव्हे ना....

उत्तम शिल्प !!! दादर च्या भगव्या महालामधील तर नाही ना ? भगव्या सदर्‍यातील पाठमोरी व्यक्ति पाहून विचार आला.. राळेगणचा अण्णा
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sat, 10/06/2007 - 20:16

Permalink

पाहिले आहे

पण मला वाटते प्रकाशचित्र म्हणूनच. कारण कुठे ते आठवत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 10/06/2007 - 20:20

Permalink

खरेच जिवंत

एक अवांतर प्रश्न पडला. विडा उचलण्याची प्रथा कशी सुरू झाली? अजून महाराष्ट्रात कुठल्या समारंभात रीत म्हणून खराच "विडा उचलतात" का? अवांतर अवांतर : "सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 10/06/2007 - 20:26

In reply to खरेच जिवंत by धनंजय

Permalink

हं

हे शोधायची सुपारी घेता का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 10/07/2007 - 01:24

In reply to खरेच जिवंत by धनंजय

Permalink

विडा उचलणे/देणे - सुपारी देणे

सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे? हो तशी रीत आहे. फक्त सुपारीचीच नाही तर त्या आधी विडा देण्याची रीत होती. महत्त्वाची कामगिरी फत्ते करण्यासाठी विड्याचे पान शासकातर्फे सर्वांसमोर ठेवले जात असे. त्यास विडा देणे/ ठेवणे म्हणतात. जो ते पान उचलेल तो कामगिरीस तयार म्हणजेच त्याने विडा उचलला. हे केल्यावर शासक त्यास त्या कामगिरीची सुपारी देई. ही प्रथा हिंदू-मुसलमान दोघांत होती. (अफज़ल खानने सिवा को खत्म करने का बिडा उठाया था|) पाहुण्याला आदर सत्काराकरता पान-सुपारी दिली जात असे/ देतात. ते देणे म्हणजे समोरच्याचा आदर राखणे, मान देणे, सत्कार करणे. विडा स्वीकारणे म्हणजे यजमानाचा मान राखणे. या सर्वातूनच ही प्रथा आली असावी. पानसुपारी सहसा एकत्र दिली जाते पण या सत्काराला समोरचा पात्र आहे का हे ठरवण्यासाठी पान फिरवले जाई. जो उचलेल त्याच्या पानावर सुपारी ठेवून त्याचा सत्कार केला जाई. पैजेचा विडा हा शब्दप्रयोग याच संदर्भातला. आपल्याकडे तर प्रत्येक धार्मिक कार्यात पानसुपारीला मानाचे स्थान आहेत. मुसलमानांत असे काही वेगळे स्थान आहे का त्याची विशेष कल्पना नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Sat, 10/06/2007 - 20:26

Permalink

अप्रतिम...

अप्रतिम शिल्प. जणू काही समोरच आहेत सर्व. जर नैसर्गिक रंगसंगती वापरली असती तर इतकाच प्रभाव पडला असता का असा विचार येतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 10/06/2007 - 20:34

Permalink

एकदम आवडले

एकदम आवडले! कुठेतरी पाहीले आहे पण ते लक्षात येत नाही पुण्यात की मुंबईत ते! कळल्यास सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 10/06/2007 - 20:35

Permalink

कोकणात!

मला आता नेमके गावाचे नाव आठवत नाहीये ; पण कोकणात एका गावी शिवशाहीतील अशा काही प्रसंगांचे शिल्पांच्या रुपात कायम स्वरूपी प्रदर्शन(म्युझियम म्हणा हवे तर) मांडलेले आहे असे वाचनात आले होते. आठवण्याचा प्रयत्न करतोय. बघू या ! आठवतेय का!
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 03/26/2008 - 18:40

In reply to कोकणात! by प्रमोद देव

Permalink

डेरवण

असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अण्णा हजारे on Sat, 10/06/2007 - 20:38

Permalink

डेरवण ?

प्रमोदराव, तुम्हाला डेरवण तर म्हणायचे नाहि ना.. डेरवण चा अण्णा..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 10/06/2007 - 20:41

Permalink

अगदी बरोबर!

धन्यवाद अण्णासाहेब! चिपळूणजवळच्या 'डेरवण' गावात असे कायम स्वरूपी प्रदर्शन मांडलेले आहे. हे चित्र बहुदा त्यातलेच असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sat, 10/06/2007 - 20:49

In reply to अगदी बरोबर! by प्रमोद देव

Permalink

नसावे

हे चित्र मुंबई पुण्यातीलच असावे, काही अधिक चित्रे आहेत त्यात आजूबाजूच्या इमारती दिसतात. असो. आज इंटरनेट गंडलंय. वेळ झाला की चिकटवेन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 10/06/2007 - 20:57

Permalink

हे चित्र त्यातले नव्हे!

मी आधी म्हणालो तसे हे चित्र डेरवणच्या शिवसृष्टी मधले नाही.क्षमा असावी शिवसृष्टी खाली दिलेल्या दुव्यावर पाहता येईल. http://www.swamisamarth.com/photogallery/shivshrusti/album0.html
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sun, 10/07/2007 - 00:01

Permalink

देखणं

खरंच देखणं शिल्प! प्रमाणबद्ध तर आहेच, पण प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्‍यावरील भावही अचूक टिपले आहेत. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 10/08/2007 - 16:30

Permalink

नक्की पुण्यातलं आहे

पैज ? विडा उचलतो ! - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on Mon, 10/08/2007 - 16:41

In reply to नक्की पुण्यातलं आहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

लाल महाल?

हे लाल महालात आहे असं तर म्हणायचं नाही ना तुम्हाला? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 10/08/2007 - 21:35

In reply to लाल महाल? by जुना अभिजित

Permalink

नाही

मला तसं म्हणायचं नाहीये. हल्ली कसब्याबाहेरही लोकांची वस्ती आहे असे ऐकून आहे. बालगंधर्व नाट्यमंदिराच्या जवळपास कुठेतरी आहे का ? ते मागचं दार खूप ओळखीचं वाटतं आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Mon, 10/08/2007 - 21:58

In reply to नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हा फोटो पहा!

उपक्रमावर चिकटवलेला फोटोही इथे लावते. त्यात इमारतींची नावेही दिसतात. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by राजे (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 10/08/2007 - 22:11

In reply to हा फोटो पहा! by प्रियाली

Permalink

जबरा..

त्या कलाकाराला माझा देखील मानाचा मुजरा... जरा महाराजांच्या चेह-यावरील भाव व त्यांच्या हाताचा प्रश्न चिन्ह दाखवणारा अथवा काहीतरी विचारणारा भाव पाहा... व तो इंग्रज तो कीती लक्ष देऊन महाराजांचे बोलणे आपल्या कानामध्ये साठवून त्याचा अर्थ लावू पाहत आहे... क्या बात है .... जबरदस्त.... व तो महाराजांच्या पाठीमागे उभा असलेला मावळा त्यांच्या चेहरावर असे भाव आहेत जसे ईटी मध्ये त्या लहान मुलाचे भाव आहेत जेव्हा तो परग्रहावरील सजीव प्राणी पाहतो... जान डाल दी है... बस त्यांच्या डोळ्यांनीच. एक चुक असावी अथवा काहीतरी प्रथा असावी जरा लक्ष देऊन पाहा व वरील चित्रातील एक चुक मला सांगा. यनावाला स्टाइल मध्ये.... व्यं. नी. ने [मी कोणी मोठा कलाकार नाही आहे पण माझ्या सामान्य नजरे मध्ये एक चुक आली आहे शक्यतो ती चुकच आहे असे समजून मी वरील प्रश्न विचारला आहे तेव्हा लागा कामाला] राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 10/09/2007 - 07:36

In reply to हा फोटो पहा! by प्रियाली

Permalink

हं

हे दुसर चित्र मला तितके आवडले नाही. सिंहासन जरा उंचीवर असते इथे एकदमच खाली आहे जणू बाहेर बागेत शामीयाना आहे व त्यात खुर्ची टाकून बसले आहेत. त्यामुळे महाराज एकदम कॉमनर वाटतात असे मला वाटते. मला वाटायचे की सगळ्यांपेक्षा उंचीवर महाराजांचे स्थान असते. म्हणजे आत्तापर्यंत जे काही सिनेमे, चित्र बघीतली आहेत त्यात राजेमंडळी वरच्या लेवल बाल्कनी सीट व बाकी आम्ही ड्रेस सर्कल. ती सगळी मंडळी जरा जास्त जवळ उभी आहेत व हातवारे जास्त लाउड आहेत, तेवढ्या कमी अंतराकरता, पहील्या मावळ्याने महाराजांच्या दिशेने मुठ (गुद्दा) दाखवायलाच पाहीजे होता का? तसेच मागच्या मावळ्याने पणा मुठी वळल्या आहेत. (कदाचीत त्यात तलवार भाला बसणार असेल.) जर काही गंभीर प्रसंग असेल तर मागील अंगरक्षक किती निवांत आहे. पंखेवाला असेल तो बहूदा. महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे. असो. मे बी इट इज जस्ट मी.
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Tue, 10/09/2007 - 07:40

In reply to हं by सहज

Permalink

>>महाराजांच

>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? महाराजांच्या पायात चपला नाहीत आणि दोनही फिरंगी ते निरखुन बघत आहेत ह्याचा अर्थ मलाही कळला नव्हता.. एखाद्या ऐतिहासिक कथेचा संदर्भ आहे का ह्याला? पहिल्या चित्रातही त्या नव्हत्या पण त्या शिल्पातल्या कोणाच्याच पायात नसल्याने ही शंका आली नव्हती.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 10/09/2007 - 07:47

In reply to >>महाराजांच by कोलबेर

Permalink

कदाचीत

फूट मसाज जस्ट संपला असेल किंवा सुरू होणार असेल. किंवा तो फिरंगी करणार असेल. आधी चीनला जाऊन काहीतरी शिकून आला असेल. महाराजांची गुढघादुखी ऐकली असेल, ऐक्युप्रेशर करणार असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 10/09/2007 - 07:47

In reply to हं by सहज

Permalink

कुठे गेल्या?

>>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे. यावर महाराजांचे आविर्भाव पाहील्यास ते वैतागून विचारत असल्यासारखे वाटते की, "कुठे गेल्या माझ्या चपला? कालपासून दुरूस्तीला दिल्या होत्या अजून कशा नाही झाल्या?"
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 10/09/2007 - 08:12

In reply to कुठे गेल्या? by विकास

Permalink

टोपीकर

टोपीकरांच्या तोफा, त्यांचे व्यवस्थापन ह्याविषयी महाराजांना आदरच होता. त्यामुळे ते टोपीकरांना आपल्या चपलांविष्हयी नाही, तर सिद्दीला तोफा पुरवताना तुमचा मैत्रीधर्म कुठे गेला होता, हे विचारताहेत हे (मला तरी) स्पष्ट दिसते आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 10/09/2007 - 08:10

In reply to हं by सहज

Permalink

महाराज

महाराजांचे सिंहासन एकाच पातळीवर असल्याने हे ट्रॅडिशनल महाराज नाहीत, तुम्हा आम्हा सर्वाम्चे महाराज आहेत हे जाणवते. चपला घातल्या नसतील कारण टोपिकरांन पकडून आणले म्हटल्यावर महाराज सईबाईंच्या महालातून तात्काळ उठून आले असतील. - सर्किट पुरंदरे
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 10/09/2007 - 09:20

In reply to महाराज by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

बखर

टोपीकर महाराष्ट्रदेशी चपलांचे व्यापारी म्हणोन आले होते हे स्पष्ट आहे. महाराजांना त्यांच्या मापाच्या चपला भेट देवोनि आपले हातपाय इथे पसरावे असा टोपीकराचा हेतू इथे लख्ख दिसतो. महाराजांच्या चपलांचे माप घेण्यासाठी टोपीकर निरखोन पाहत आहेत आणि महाराज "तुमचा टेप कुठे आहे" असा प्रश्न विचारत आहेत हे आम्ही पाहिले आहे. - आजानुकर्णाची बखर.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 10/09/2007 - 11:55

In reply to बखर by आजानुकर्ण

Permalink

महाराजांचे उत्तर

समजा टोपीकर आम्हास चपला विकण्यास येतो, तर त्याने स्वतःने त्या का घातल्या नाहीत ? स्वतः मात्र मलेशियात निर्मीत नायकीचे पायताण घातलेले दिसते ! बखरकार, आमच्या महाराजांना काय समजलात ?? तुमच्या चिंचवडच्या मोरया गोसाव्याच्या वंशजांच्या कानाखाली लाल काय झाले ते अद्यापही त्यांना कळलेले नाही हो !!! - (प्रौढ"प्रताप"पुरंदर) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 10/09/2007 - 12:33

In reply to महाराजांचे उत्तर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

बाय द वे

बाय द वे, तानाजीच्या वरील शिल्पांत देखील महाराजांनी पायताण घातलेले नाही, ह्याची नोंद घ्यावी. (त्यावेळी, महाराजांना "तानाजी आला आहे, कोंढाण्याविषयी काहीतरी बोलतो आहे" असे म्हणून त्यांच्या राणिवशातून बोलवलेले इतिहासात नमूद आहे.) - सर्किट मेहंदळे
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 10/09/2007 - 17:17

In reply to बाय द वे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

तानाजीही अनवाणीच

लग्नातील कुठल्याशा कार्यासाठी बसायचे म्हणून तानाजी अनवाणी असेल. विडा उचलायला तसाच धावत धावत आला. मुलगाही अनवाणी आहे. भालदार-चोपदारही अनवाणी, असे वर कोणीतरी निरीक्षण दिलेले आहे. तेही अकस्मात बोलावलेल्या मीटिंगसाठी घरकाम सोडून चपला विसरून आले आहेत. किंवा ही मीटिंग जिजाऊंच्या महलात आहे. तिथली "पादत्राणे बाहेर ठेवावी" अशी सूचना सर्वांनीच पाळलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Mon, 10/08/2007 - 16:48

Permalink

पुण्यातलं

१. तानाजी मालुसरे पुण्याचे २. शेलारमामा पुण्याचे ३. रायबा पुण्याचा ४. जिजाबाई पुण्यात वास्तव्याला होत्या ५. शिवाजी महाराज पण पुण्याचेच म्हणजे हे शिल्प पुण्यात असण्याचीच अधिक शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 03/19/2008 - 21:11

In reply to पुण्यातलं by आजानुकर्ण

Permalink

माझ्या माहीती नुसार

माझ्या माहीती नुसार तानाजी मालुसरे हे रायगड जिल्ह्यातील कोणत्यातरी गावचे होते. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 10/08/2007 - 20:22

Permalink

सह्ह्ही......

काय सुंदर आहे हे शिल्प...! अप्रतिम.. मिसळप्रेमींनो... लवकर शोधून काढा पाहू हे चित्र कुठले आहे ते..! - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Tue, 10/09/2007 - 16:42

Permalink

आताच हाती आलेल्या बातमीनुसार

ही म्यूरल्स पुण्यातील आहेत असे कळते. ;-) वरील शिल्पात ज्या आसनावर महाराज बसले आहेत ते राजसिंहासन नाही. तानाजी लग्नाचे आमंत्रण देण्यास आला होता त्यामुळे तो राजमहाली गेला असावा आणि महाराज अनवाणी असावेत पण ब्रिटिशांच्या मुसक्या आवळून त्यांना राजमहालात (अंतःपुरी ;-)) नेण्यात आले नसावे. आमच्या मित्रमहाशयांच्या कोणा मित्रानेच ही शिल्पे घडवल्याचे कळते त्यांना शंकानिरसनाचा खलिता धाडण्याचा बेत आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सृष्टीलावण्या

Submitted by सृष्टीलावण्या on Wed, 03/19/2008 - 20:55

Permalink

हे

सुंदर, देखणे शिल्प बनविणार्‍या पुढे आपण नतमस्तक. वाटते जर मंत्र वैगरे म्हणून जीव ओतता आला असता तर हे लोक हाडामासाची माणसे वाटली असती (सासवण्याला अशीच अद्भूत शिल्प पाहिल्याचे आठवते). > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 03/19/2008 - 22:10

Permalink

हे पुण्यातीलच आहे

'राघव स्मृती' हे नाव मला नक्कीच वाचलेले आठवते पण नक्की जागा लक्षात येत नाहीये. दोन्हीही शिल्पे अप्रतिम आहेत. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Fri, 03/21/2008 - 18:54

Permalink

हे चित्र

हे चित्र डेरवणला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Sat, 03/22/2008 - 14:26

Permalink

बहुतेक

पहिल भित्ती चित्र हे अकलुज येथील शिवसृष्टीचे आहे. अशीच एक मेल आली होती त्यात लिहिल होत अस पुसटस आठवतय मला :) गुगलौन पाहिल की कळेल कदाचित.
  • Log in or register to post comments

Submitted by राजमुद्रा on Mon, 03/24/2008 - 11:32

Permalink

मला वाटते,

मला वाटते, हे शिवश्रुष्टीचे काम आहे, जे अकलूजला चालू आहे. हे काम शासकिय संग्रहालयासाठी चालू आहे. हे काम बाबासाहेब पुरंदरेच्या देखरेखीखाली चालू आहे, बहुधा हा तिथलाच फोटो असावा. राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 03/26/2008 - 19:04

Permalink

ही चित्रे डेरवणची नाहीत

डेरवणची चित्रे यापेक्षा वेगळी वाटतात. ही चित्रे पुण्याला तयार करून इमारतीच्या मोकळ्या जागेत नंतर कोठेतरी हलवण्यासाठी ठेवलेली आहेत हे स्पष्ट आहे, परंतु ती कोणत्यातरी व्यावसायिक हेतूने केलेली आहेत. चित्रपट, नाटक इ. साठी. ही शिवसृष्टीतील नाहीत हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 03/27/2008 - 21:45

Permalink

शिल्पे...

मला वाटतं हि शिल्पे 'मनोगता'वरील आहेत....
  • Log in or register to post comments

Submitted by विकेड बनी on गुरुवार, 03/27/2008 - 21:53

In reply to शिल्पे... by प्रभाकर पेठकर

Permalink

मनोगतावरील म्हणजे?

वेलणकर लेखांत चित्र घालून देतात हे माहित आहे आता कोरीवकामही करायला लागले का काय??
  • Log in or register to post comments

Submitted by उदय सप्रे on Fri, 03/28/2008 - 13:39

Permalink

नवीन शिवसृष्टी

ही नवीन शिवसृष्टी "अकलूज" येथे येत आहे..... यापेक्षाही सुंदर शिल्पे "डेअरवण" येथील "शिवसृष्टीत" आहेत !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com