Hosting व domain name ह्याबद्दल सर्व विचारायचे आहे.मराठी संस्थळ नाही काढायच.
माझे प्रश्न,
१.खर्च
२.ह्या दोन सुविधांपैकी कायम स्वरुपी म्हणजे एकदा पैसे द्या व मोकळे व्हा.आपणच मालक व ती ज्यात आपल्याला वर्षाचे कींवा महीन्याचे पैसे सारखे भरावे लागतात ती कोणती?
३.कोणती कंपनी सर्वात चांगली व कोणती सर्वात स्वस्त ते माहीती करायचे आहे.
४.खुपशी नसेल तरी चालेल पण वेबसाईटवर ब-यापैकी जागा असावी,म्हणजे हवे तेवढे content चढवु शकतो.
५.templates जास्त व स्वःता तयार करण्यासारखे असावेत.
कृपया फोन नंबर देणे टाळावे.
आपलाच....
....शानबा
प्रतिक्रिया
12 Sep 2010 - 2:24 pm | chipatakhdumdum
सकाळी ९.४६ ला हा धागा सुरू झाला. ८१ वाचने--मी धरून ८२, विषयानुरूप प्रतिसाद शून्य.
नामांकित सरावाचे प्रतिसादक कसा आणि कोणता कुजका प्रतिसाद देउ अशा विचारात बहुदा गढले असावेत.
(इन्द्रासारखे अपवाद वगळता)
12 Sep 2010 - 2:37 pm | बिपिन कार्यकर्ते
एवढं बोललात पण माहिती तुम्हीही दिली नाहीत.
12 Sep 2010 - 3:56 pm | शानबा५१२
तुमच्या रेशीपीत मी कधी मीठ नाही घातल हो,मग तुम्हाला कसला राग आला.
बाकी आमची लायकीच ही की आम्हाला सर्वांनी कुजका प्रतिसाद द्यावा,अजुन काय असल्यास तसे पण सांगा हो.
बीपीनदा 4net बद्दल विचार करतोय.
तरीही (माझ्यासाठी) आपलाच हो,
शानबा.
12 Sep 2010 - 5:27 pm | उग्रसेन
ह्यो दुवा घ्या. अजून काय मदद लागलं तर खरडीत इचारा.
राह्यलेल्या सवालासाठी नवा धागा काढू नगं
बाबुराव :)
12 Sep 2010 - 9:30 pm | शानबा५१२
बाबुराव्,धन्यवाद बर्का!
net4 ही भारतातली कंपनी लय झाक हाय.(4net यिदेशातली हाय)
चला येता का मी जिल्बी खायला जातुया,आज माझ्या यम्पीतुन मला जिल्बी यणार हाय्,नाय सान्गितल यासाठी की तुमी मानुस्की दावालीत त मी बी जरा इचारल.
चला येतो बाबुराव.
13 Sep 2010 - 2:26 pm | इंटरनेटस्नेही
षानभा५१२,
तुम्ही तुमचं खातं नीट सांभाळु शकत नाही, तर संस्थळ काय सांभाळणार?
(नामांकित)
इंटरनेटस्नेही
13 Sep 2010 - 9:21 pm | शानबा५१२
आताच कामाव्रुन आलो,काही मेल्स पाठवले व नंअत्र तुझा हा प्रतिसाद वाचला.धन्यवाद हा मित्रा.
बाकी तु नाव कस बदललस?
13 Sep 2010 - 9:15 pm | धमाल मुलगा
www.hostmonster.com
पेकेज्ड डिल्स मिळतील. भरवश्याची सेवा आहे.
13 Sep 2010 - 9:22 pm | शानबा५१२
धन्यवाद धमाल मुलगा.
पण ते $ मधे कीमती देल्या की भीती वाटते.
net4 बद्दल काय बोलशील?
13 Sep 2010 - 9:27 pm | धमाल मुलगा
$ किमती फार नाहीत. साधारणतः ४००० रुपये पर्यंत (डिस्काउंट कोड वापरुन.)
मी तरी शक्यतो भारतीय सेवाप्रदात्यांच्या विरोधात आहे. विक्रीपश्चात सेवेबद्दल लोकांचे बरेचसे अनुभव वाईट आहेत. छोट्या छोट्या अडचणींना तीन-तीन चार-चार दिवस लटकवुन ठेवलं जातं असे खूप अनुभव आहेत.
13 Sep 2010 - 9:32 pm | शानबा५१२
ह्त्त तिच्या!! बर झाल सांगितलस्,एका IT च्या मित्राने खुप स्तुती केली होती म्हणुन ह्या नावावर अडकुन होतो.
मी भीती वाटते बोललो कारण पैसे दीले की झाले छु!
पैसा माझा नसणार आहे,माझ्या एका कामातल्या मित्राचा आहे.साईट वर जागा भरण्यात माझा सहभाग असेल.अर्थात केमीस्ट्रीचे लिहणार.असो.
धन्यवाद.
13 Sep 2010 - 9:45 pm | धमाल मुलगा
बिन्धास्त होस्टमॉन्स्टरवर जाणे. ९९.९९% प्रॉब्लेम येत नाहीत. आलेच तर लवकरात लवकर सोडवले जातात. (पॅकेजमध्ये डोमेन नेमही आहे. त्यामुळे आणखी पैसे वाचतील.)