अट्टल चोरटा मी........!!
नभात हिंडतांना आणि तारे न्याहाळतांना
कळतच नाही मी कसा तल्लीन होवून जातो
ते दृष्य डोळ्यात मी पुरेपूर साठवून घेतो
आणि ते लुकलुकते लावण्य चोरण्याची
मी चोरी करून जातो .....!!
जीवनाचे विविधरंग उलगडणारे शब्द
कुणीतरी सहज बोलून जातो
अलगद पकडून ते शब्द मी तादात्म पावतो
आणि दिव्यत्वाचे चार शब्द चोरण्याची
मी चोरी करून जातो .....!!
ऐकतांना गुणगुण, पापण्या थबकतात
नजर स्थिर होवून मन डोलायला लागते
कुणीतरी मधूर तरंग हवेवर पेरून जातो
आणि ती नादब्रम्हाची लय चोरण्याची
मी चोरी करून जातो .....!!
चोरतो मी ज्ञानमार्ग विवेकाच्या वृद्धीसाठी
सद्गुणाची उचलेगिरी अंतराच्या शुद्धीसाठी
असा अभय भामटा मी
असा अट्टल चोरटा मी.......!!
गंगाधर मुटे
.......................................................
प्रतिक्रिया
8 Sep 2010 - 9:57 pm | पक्या
वेगळीच कल्पना.
8 Sep 2010 - 11:12 pm | शुचि
छान!
8 Sep 2010 - 11:36 pm | प्राजु
एकदम वेगळीच आहे कविता..
मस्त आहे.
9 Sep 2010 - 5:22 am | पिवळा डांबिस
उत्कट भव्य ते घ्यावे.....
आवडली कविता....
9 Sep 2010 - 9:05 am | मदनबाण
छान... :)
11 Sep 2010 - 1:49 pm | गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
11 Sep 2010 - 6:26 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तं.