भारत माझा देश आहे...........

संदीप परांजपे's picture
संदीप परांजपे in जे न देखे रवी...
5 Sep 2010 - 9:18 am

धन्य माझा भारत देश, आणि धन्य इथले लोक
दुसरयाला लावतात ठिगळं, पण स्वतःच्या खिशाला भोक

तूरडाळ भिडली गगनाला, सिमकार्ड फुकट गावतंय
ह्यांच्या बापसाची स्वप्नपूर्ती, पोरांचं उगाचंच फावतंय
ए.सी. शोरूममध्ये, पायीची वहाण ,बसली शेल्फावरी,
फळं आणि भाज्या, आजही बसलेत, विकत रस्त्यावरी.. कारण..

पिइझा पोचतोय वेळेत पण पोलिस येतात लेट
कारण त्यांचा कोणीच ठरवला नाही, वेळेत येण्याचा रेट
तंत्रद्यान पोचले घरोघरी, मोबाईलमध्ये टी.व्ही. अन नेट
घरच्यांसाठी वेळ नाही पण विसरत नाहीत क्रिकेट... कारण...

कार मिळते स्वस्तात, शिक्षणाच्या खर्चात होतो गार.
जाती जागा अडवतात, एडमिशनसाठी मारामार,
इथेच खाता,इथेच शिक्षण, परदेशाची नोकरी
इथेही परके , तिथेही परके, कायमची लाचारी... पण....

निम्मि जनता अर्धपोटी तरी, मंत्र्याच्या वाढदिवसाला नोटांच हार.
लोकशाहीचे दलाल सारे, खायला काळ आणि भुईला भार
यांनीच आधी झाडं तोडली, आता बघा यांचा शासकीय विचार
मग पुतळे झाले गल्लोगली, खरं आहे.. साली आपल्या देशात कबुतरंच फार... पण...

सगळं माहीत आहे जगाला, आंधळी आमची न्यायदेवता,
दीड वर्षं, कित्येक कोटी, अतिरेकी तो, कीड पोसता
दिसूनसुद्धा आंधळे, बहिर्यांचे सुद्धा कानावर हात,
तोंड ठेवतात झाकून, साली तीन माकडांची जात

वळत तर काहीच नाही पण सगळच यांना कळतंय
ओरडून कोणी सांगत नाही, पण आत काहीतरी जळंतय....पण आत काहीतरी जळंतय....
पण तरीही......
धन्य माझा भारत देश, आणि धन्य इथले लोक
धन्य माझा भारत देश, आणि धन्य इथले लोक

कविता

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

5 Sep 2010 - 9:30 am | गांधीवादी

संदीप परांजपे जरा डोळे उघडून बाहेर या,
आणि बघा भारताने कित्ती कित्ती प्रगती केली आहे ते.

मागची सहा महिन्याची चर्चा वाचा आणि हि कविता पुन्हा नव्याने लिहा,
अगदी काल परवाचा हा एक प्रतिसाद वाचा.
http://www.mr.upakram.org/node/2795#comment-45363

अवांतर : मेरा भारत महान असे काही आम्ही मानत नाही. आम्हाला एकाच पटते,
माझी वसुंधरा महान.

काही दिवसांनी चीन माझा देश आहे असे म्हणावे लागेले नाही तर नशिब समजायचे आपले.
का ?

चीन जमीन (लडाखचा बराचसा भाग) घेउन मोकळा झाला आहे. :(
मला कळत नाही आपल्या देशातल्या लोकांना या बाबतीत काहीच वाटत नाही का ? चीन इतक सैन्य घेउन पुढे सरकत आहे तरी आपण इतके शांत /गार कसे राहु शकतो ?

गांधीवादी's picture

5 Sep 2010 - 9:59 am | गांधीवादी

GOD KNOWS !!!!!!!!

एक स्वैर विचार : जर चीन इकडे आला तर तो मुंबईचे शांघाय करेल.

अप्पा जोगळेकर's picture

5 Sep 2010 - 11:15 am | अप्पा जोगळेकर

काही दिवसांनी चीन माझा देश आहे असे म्हणावे लागेले नाही तर नशिब समजायचे आपले.
का ?

अतिशयोक्तीची हद्द झाली ही. इंग्रजांचं जसं भारतावार राज्य आलं तसं चीन्यांचं येईल असं म्हणायचंय की काय?

अतिशयोक्तीची हद्द झाली ही. इंग्रजांचं जसं भारतावार राज्य आलं तसं चीन्यांचं येईल असं म्हणायचंय की काय?
जर लडाखच्या जागी मुंबईचा भाग कोणत्या दुसर्‍या देशाने व्याप्त केला असता तर काय झाले असते ?
देशाचा कुठलाही भाग असो त्यावर दुसरा देश हक्क सांगतोय शिवाय तो भाग बळकावुन मोकळा देखील झाला असताना आपण शांत आहोत. इंग्रज तर व्यापार करण्याच्या बहाण्याने आले होते,चीन तर सरळ सरळ देशाचा मिळेल तो भूभाग गिळंकृत करत चालला असताना, मला असे खेदानेच म्हणावे लागले.
मी आज ठाण्यात राहतो आहे,पण लडाख किंवा चीनने बळकावलेल्या इतर भूभागात माझे घर असते तर मी असाच गप्प राहिलो असतो का ?

विसोबा खेचर's picture

5 Sep 2010 - 12:20 pm | विसोबा खेचर

सहमत....

साले हे मिचमिच्या डोळ्यांचे चिक्कन चिल्ली जाम माजले आहेत साले.. बघून घेऊ..

तात्या.

नरेश धाल's picture

8 Sep 2010 - 12:28 pm | नरेश धाल

बघून घ्यायचा मंजी नक्की काय करायच तात्या ?

ज्या देशात कायदा आणि न्यायव्यवस्थेची योग्य अंमलबजावणी होत नसते, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही.

नरेश धाल's picture

8 Sep 2010 - 12:33 pm | नरेश धाल

शोर्ट मध्ये बोला ना कि भारत कधीच प्रगती करू शकत नाय ते

परिकथेतील राजकुमार's picture

8 Sep 2010 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावर सध्या चिनोफोबिया पसरला आहे.

नगरीनिरंजन's picture

8 Sep 2010 - 12:22 pm | नगरीनिरंजन

चिंता या शब्दाची व्युत्पत्ती थोडी थोडी कळतीये असं वाटतंय्.

नगरीनिरंजन's picture

8 Sep 2010 - 12:23 pm | नगरीनिरंजन

चिंता या शब्दाची व्युत्पत्ती थोडी थोडी कळतीये असं वाटतंय्.

नरेश धाल's picture

8 Sep 2010 - 1:02 pm | नरेश धाल

लवकरच गेट्स , वारेन , चीनला जाऊन आपली अर्धी संपत्ती दान करणार आहेत.

http://translate.google.com/translate?hl=en&sl=zh-CN&u=http://news.sctv....