नारळी भात.....

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
3 Sep 2010 - 8:15 am

साहित्य :- २ वाट्या जुने तांदूळ, १ नारळाचा चव (खोवलेला नारळ) , २ वाट्या चिरलेला गुळ(पिवळा),

१/२ वाटी साजूक तूप, ५/७ लवंगा, ९/१० बदामाचे केलेले काप,काजूचे तुकडे १०-१२, वेलदोड्याची पुड १/२ चमचा,पाव वाटी बेदाणे.
कृती : तांदूळ धुऊन तासभर ठेवावेत. दोन चमचे तूप तापवून त्यात लवंगा टाकाव्या व त्यावर तांदूळ घालून परतावे.

नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी घालून मोकळा भात करून घ्यावा. शिजलेला भात परातीत पसरून

मोकळा करावा नंतर नारळाचे खोवलेले खोबरे व गूळ एकत्र शिजवून घ्यावे व त्यावर वरील भात घालून भात सारखा करावा. नंतर त्यात वेलदोडेपूड, बदामाचे काप,काजूचे तुकडे व बेदाणे घालून, वर तूप घालून भाताला चांगली वाफ आणावी. गरम गरम सर्व्ह करावा.
वरुन साजूक तूप घालावे.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

3 Sep 2010 - 10:22 am | विसोबा खेचर

फोटो?

आपला,
तात्या सराफ.

अजितजी's picture

6 Sep 2010 - 11:16 pm | अजितजी

फोटो ची काय जरुरी ? दर वेळेला फोटो चाच आग्रहका? एखाद्याला नाही होत शक्य तो काढणे

विसोबा खेचर's picture

7 Sep 2010 - 1:25 pm | विसोबा खेचर

फोटो ची काय जरुरी ?

कारण त्यामुळे पाकृची शोभा वाढते अशी माझी समजूत..

दर वेळेला फोटो चाच आग्रहका?

वाचक म्हणून ती माझी व्यक्तिगत अपेक्षा..

एखाद्याला नाही होत शक्य तो काढणे

कबूल..

तात्याजी.

पटले तुमचे विचार
हे ही मी बघत आहे की ज्या पाक्रु फोटो नसतो त्याना प्रतिक्रिया देखिल नसतात /कमी असतात --त्या देवु नयेत असा काही अ लिखित करार/ नियम आहे का ?

परिकथेतील राजकुमार's picture

7 Sep 2010 - 3:15 pm | परिकथेतील राजकुमार

निवेदितातै फोटु कुठे आहे ?
बाकी पाकृ झकासच.

मी शोधतच होते गं ही रेसिपी. ओल्या नारळाऐवजी सुक्या खोबर्‍याचा कीस चालेल का ?

गणेशा's picture

6 Oct 2010 - 5:21 pm | गणेशा

एकदम झकास