प्रेमाचा आयकर
मिसळपाव पाव टाकलेल्या आधीच्या धाग्यामुळे .... बऱ्याच जणांचा टिंगल करण्याचा विषय बनलो....
पण जे माझ्याबरोबर घडलं ते ... माहित नसल्याने हि प्रतिक्रिया अपेक्षित होती......
एकदा मिळालेल्या या चटक्याने.... पूर्ण कोलमडून गेलो होतो ...
असो ... त्यावेळी असाच काहीतरी सुचलं ...
कविता नाही म्हणून शकत... कारण मी कवी नाही... पण तरीही असंच मांडावस वाटतंय....
समजून घ्या .....
धाड टाकून बघतो मिळतंय का काही....
धाड टाकून बघतो मिळतंय का काही....
कारण....कारण.... प्रेमाचा आयकर भरणं बंद केलायेस हल्ली
धाड टाकायची आहे मला तुझ्या प्रेमाच्या साठ्यावर......
कारण प्रेमाचा आयकर भरणं मारलं आहेस फाट्यावर ...
दिवाळखोर झाल्याचं तू सांगतेस सर्वांना .....
पण मला माहितेय कि आत खोल.... खूप खोल ..
लपवून ठेवलायस तू प्रेमाचा खजिना.........
आता याकडे जास्त दुर्लक्ष करून चालणार नाही .....
म्हणूनच .. आणि म्हणूनच धाड टाकून बघतो ,मिळतंय का काही...
आता सांगतेस मला कि प्रेम बीम सब झूट ...
अस काही नसतच.....
अस असताना बागेतल्या "कुत्र्याच्या पिल्लापासून" ते ...
"नव्वदी गाठलेल्या " आज्जी पर्यंत ....
सगळ्यांवर तुला प्रेमाची अशी "बेहिशोबी उधळण"
करणं मला आता सहन होत नाही ....
म्हणूनच .. आणि म्हणूनच धाड टाकून बघतो ,मिळतंय का काही...
पण मला आता हेही कळून चुकलंय.. जरी तुझं..
"लपलेलं प्रेम " बाहेर काढलं, तरी ते तू सहज ट्रान्स्फर करशील ....
दुसऱ्याच्या नावावर....
"Shares " ट्रान्स्फर करतात तसं.....
पण तरीही घेतलेलं काम थांबवता येणार नाही ..
"मनाच्या म्यानेजर" कडे दुर्लक्ष करून चालणार नाही...
म्हणूनच .. आणि म्हणूनच धाड टाकून बघतो ,मिळतंय का काही...
----------------------------------------------------------(खूप आठवण येतेय ग तुझी ........)
प्रतिक्रिया
4 Sep 2010 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार
काय उदात्त भावना आहेत हो.
कॉलींग प्रभुगुर्जी .. कॉलींग कॉलींग....
4 Sep 2010 - 5:53 pm | अवलिया
अवघड आहे.. गुर्जी ..ओ गुर्जी.. बघा जरा इकडे.
4 Sep 2010 - 5:56 pm | वेताळ
आयकर खात्याच्या त्रासाला एका कंटाळलेल्या आयकरदात्याची करुण कहानी आहे.
पण स्पा आता परत अर्थमंत्र्यानी आयकरात बरीच सुधारणा घडवुन आणली आहे.जरा त्याबद्दल माहिती घ्या.
4 Sep 2010 - 10:18 pm | मदनबाण
धाड टाकून बघतो मिळतंय का काही....
धाड टाकवल्यावर काही मिळाले तर सांगा हं, नाही तर समजायचं तुमच्या आधी कोणीतरी दुसराच धाड टाकुन गेला आहे !!! ;)
4 Sep 2010 - 10:33 pm | शिल्पा ब
तुम्ही वयाने बरेच लहान असावेत असा संशय येतोय..
5 Sep 2010 - 11:27 am | सूर्यपुत्र
तुम्हांला नक्की काय म्हणायचे ते न कळल्यामुळे पुनरावृत्ती होणे संभवते.....
5 Sep 2010 - 12:24 pm | मी-सौरभ
ही कविता आधी टाकून मग ....
आधीचा धागा टाकला असतात तर लोकांना त्या धाग्याचं कारण लगेच कळल असतं
पु, सु. आ.सा.शु.
15 Jul 2011 - 2:13 pm | प्रचेतस
चान चान
15 Jul 2011 - 2:19 pm | गवि
ही वाचलीच नव्हती.
टचिंग रे एकदम स्पावड्या.. :(
15 Jul 2011 - 2:27 pm | सूड
मी पण वाचली नव्हती !!
15 Jul 2011 - 11:32 pm | इंटरनेटस्नेही
अतिशय उत्तम कविता.
निम्नर्निदिष्ट ओळी विशेष आवडल्या:
=)) =)) =))
18 Jul 2011 - 9:51 am | नरेशकुमार
खत्राड