इतिहासाचे पुनर्लेखन

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
3 Sep 2010 - 3:26 pm
गाभा: 

आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच.

असो..

तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल.

आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :-

१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?

ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?

२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?

३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?

४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.

५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?

गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?

आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।

५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?

ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.

प्रतिक्रिया

तद्दन बिनडोक आणि बिनबुडाचा धागा.

लवकरच विस्तृत प्रतिसाद देत आहे. चुकीचे मत आहेत या कारणांनी संपादकांनी कृपया धागा अप्रकाशित करु नये.

मधल्या काळात बर्‍याच प्रश्नांचे यथायोग्य खंडन झाल्याने प्रतिसाद देवुन पुन्हा खंडन करायची गरज नाही.

पूढिल संशोधनास (!) हार्दिक शुभेच्छा !!

(मटेरीयल हवे असल्यास पुरवले जाईल. नमुना म्हणुन हे घ्या - ब्राह्मण गुढिपाडवा का साजरा करतात? उत्तरासाठी जिज्ञासुंनी व्यनी करावा)

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 7:22 pm | llपुण्याचे पेशवेll

हा १००वा प्रतिसाद. :)

मी_ओंकार's picture

3 Sep 2010 - 7:26 pm | मी_ओंकार

फास्टेस्ट सेंचूरी बद्दल !!

- ओंकार.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2010 - 1:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

***द्वेष्ट्या पर्‍याचा साफ निषेध!

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 1:02 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्या निषेधाला योग्या त्या ठिकाणी मारण्यात आले आहे. शेवटी आजवर तुम्ही आमचा निषेध आणि आमच्यावर अन्याय करण्या व्यतिरीक्त अजुन काय केले आहेत म्हणा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2010 - 1:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे पहा तुम्ही उगाच तुमची भांडणं व्यक्तीगत पातळीवर आणू नका. तुम्ही ***द्वेष्टे आहात हे स्पष्ट आहेच, पण आता तुम्ही उगाच माझ्या आयडीचा द्वेषही करता आहात.

*** आपल्याला जे लोकं आवडत असतील किंवा नसतील त्यांची कॅटॅगरी भरून टाका. मी ***च्या जागी मनुष्य असं वाचते.

पैसा's picture

4 Sep 2010 - 8:03 pm | पैसा

पण ते पुनर्लेखन सुरू कधी होणार आहे? त्यासाठी स्वतंत्र धागा (किंवा धाग्याचं बंडल) येणार आहे का?

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 8:11 pm | llपुण्याचे पेशवेll

त्यासाठी इतिहासपुनर्लेखण मंडळाचे अध्यक्ष परा यांच्याशी संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता
परा राजवाडे
इतिहासपुनर्लेखण मंडळ
मस्ताणी दर्वाज्याजवळची उजवीकडून ३री ओसरी,
बुधवार पेठ (बरोबर दरवाज्याबाहेर बुधवार पेठच येते)
पुणे २

पत्ता पण एकदम "ऐतिहासिक" आहे.

राजेश घासकडवी's picture

5 Sep 2010 - 7:57 am | राजेश घासकडवी

परा राजवाडे

हे मी चुकून परा जवाडे वाचलं आणि नको ते विचार मनात आले.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Sep 2010 - 8:00 am | llपुण्याचे पेशवेll

नेहेमीप्रमाणे गल्ली चुकलात इतकंच म्हणेन.

नरेश धाल's picture

5 Sep 2010 - 9:00 am | नरेश धाल

>>परा जवाडे
SmileyCentral.com

मनि वसे ते स्वप्नि दिसे.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2012 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा

>>परा जवाडे
SmileyCentral.com

मनि वसे ते स्वप्नि दिसे.

मिसळभोक्ता's picture

7 Sep 2010 - 10:07 pm | मिसळभोक्ता

साआळाआ ।आआ ड्।आआङाआ वाआच्।आणांआआटृआ ़आर्‍आआ र्‍अ‍ॅ !

(साला, हा धागा वाचनमात्र करा रे ! कॅप्स लॉक ऑन राहिले. धन्यवाद.)

पैसा's picture

6 Sep 2010 - 9:29 pm | पैसा

३०० होणार की नाय?

Nile's picture

3 Sep 2010 - 9:08 pm | Nile

मध्ये पहिल्यापानावर येण्याचा अगदी हीन प्रयत्न.

पर्‍यांसारख्यांनी इतिहासाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग केल्यानेच ही स्थिती आली आहे. असो.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 9:20 am | llपुण्याचे पेशवेll

जमलेच तर पुनर्लेखनासाठी मदत करावी. गांभीर्याने चर्चा करणार्‍यांचा हिरमोड त्यांची चेष्टा करु नये.

पर्‍यांसारख्यांनी इतिहासाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग केल्यानेच ही स्थिती आली आहे. असो.
याचा काही पुरावा आहे का बोला? त्याआधी पुरावा म्हणून काय देणार ते बोला नाहीतर द्याल तुमच्याच डायरीची पाने.

अवलिया's picture

4 Sep 2010 - 11:49 am | अवलिया

सहमत आहे.

Nile's picture

4 Sep 2010 - 2:23 pm | Nile

लै पुरावे आहेत, हे इथे समोर आहे ते ही दिसत नसेल तर काय करणार? घोड्याला पाण्याजवळ नेता येते, झोपलेल्याला उठवता येते.. वगैरे वगैरे.

बाकी आमच्या वक्तव्यावर धागा लेखकाचे मौन सर्वकाही सांगुन जाते.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 2:27 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत तुम्हाला पाण्याजवळ आणले आहे. :)

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी आमच्या वक्तव्यावर धागा लेखकाचे मौन सर्वकाही सांगुन जाते.

डुकराशी मारामारी केल्याने डुकरालाच मजा येते अशा काहीशा अर्थाचे एक वाक्य परवा कोणीसे इंग्रजीत लिहिले होते. त्यामुळे तुम्हाला मजा येउ नये ह्यासाठी आम्ही मौन बाळगुन आहोत ;)

डुकराशी मारामारी केल्याने डुकरालाच मजा येते अशा काहीशा अर्थाचे एक वाक्य परवा कोणीसे इंग्रजीत लिहिले होते.

स्वानुभव अश्या वाक्यांवर विश्वास ठेवायला मदत करतात असे ऐकले होते, तुमच्या उदाहरणावरुन त्याची खात्री पटु लागली आहे. खेदाने, सद्द्यस्थितीत आम्हाला मजा येणारच नाही, पण तुम्ही पुरेसे शोधलेले दिसतात. ;)

प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..
असे का होते याचा कधी विचार केला आहे का?
विचार करणाराला जे दिसते ते इतराना दिसत नाही

धमाल मुलगा's picture

9 Jun 2011 - 3:21 pm | धमाल मुलगा

'त्या' विचारवंत ह्या उल्लेखाचा संदर्भ 'विचारजंत' ह्या मुळ शब्दाशी आहे असे अंधूकसे स्मरते.

आनंदयात्री's picture

9 Jun 2011 - 3:39 pm | आनंदयात्री

हा हा हा करेक्ट ..
नीलकांताने काय जंतांचे डीडीटी फवारलेकी काय मिपावर ? बरेच दिवसात जंताळ अ‍ॅक्टीव्हिटी दिसली नाही .. किंवा कोणी जंतग्रस्त झाले नाही ;)

नाना चेंगट's picture

10 Sep 2012 - 6:14 pm | नाना चेंगट

कुठवर आले लेखनाचे काम?

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 3:32 pm | llपुण्याचे पेशवेll

रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का?
दाखवले नाही म्हणजे घालत नव्हते किंवा तसे नव्हते असे नाही. रावंण ब्राम्हण होता व दुष्ट होता. रावणाने निर्माण केलेली वेदगायनाची एक पद्धत ज्याला जटापाठ म्हणतात ती अजूनही अस्तित्वात आहे. अजूनही वापरली जाते. मूळ संहिता पाठ झाली की प्रत्येक श्लोकाची पदं म्हणायची, मग क्रम म्हणायचं, मग जटा आणि मग घनं. अजूनही घनपाठी हा अनवट उल्लेख पेपरांमधल्या बातम्यांत दिसतो.
राज्याभिषेकाआधी शिवरायांची मुंज लावली होती असे उल्लेख सापडतात. बाकी देवदवतांनी सगळ्या कुळांत अवतार घेतले आहेत. जास्तीकरून ब्राम्हण आणि क्षत्रिय. त्यातही दशावतारांपैकी २ ब्राम्हण (परशुराम, वामन) ४ क्षत्रिय (राम, कृष्ण, बुद्धं, पृथू(अंशावतार)), ४ पशू /अर्धपशू(मत्स्य,कूर्म,वराह,नरसिंह) असे माझ्या माहीतीप्रमाणे आहेत. कली अवतार म्हणजे प्रत्यक्ष आम्हीच आहोत.
अजूनही अनेक मराठा मित्र आमच्याबरोबर श्रावण शु. पंचमीच्या (ऋग्वेदी श्रावणीला) दिवशी श्रावणीला असतात. त्यांचीही रितसर मुंज झाली आहे. वैश्यवाणी असलेली विचारे, हेगीष्टे इ मंडळीही मी ऋग्वेदी श्रावणिला पाहीली आहेत.
बाकी चालूद्या.
(ओसरीचा योग्य उपयोग होतो आहे हे पाहून आनंदीत होत आहे) :)

>> कली अवतार म्हणजे प्रत्यक्ष आम्हीच आहोत.

अरेच्या! इतक्यातच सांगून टाकलेत! आता काय उरले चर्चा करण्यासारखे!

मृत्युन्जय's picture

3 Sep 2010 - 3:36 pm | मृत्युन्जय

कलीदेखील ब्राह्मणच असणार आहे. त्याला अश्वत्थामा सहाय करणार म्हणजे परत एकदा ब्राह्मण. त्याला वेद व्यास धर्म शिकवणार म्हणजे परत ब्राह्मणच. आणि युद्धकला परशुराम शिकवणार म्हणजे ब्राह्मणच.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार

कलीदेखील ब्राह्मणच असणार आहे. त्याला अश्वत्थामा सहाय करणार म्हणजे परत एकदा ब्राह्मण. त्याला वेद व्यास धर्म शिकवणार म्हणजे परत ब्राह्मणच. आणि युद्धकला परशुराम शिकवणार म्हणजे ब्राह्मणच.

हेच बोल्तो. सगळीकडे 'आम्ही लै भारी' हेच दाखवायचे प्रयत्न.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 3:48 pm | llपुण्याचे पेशवेll

हेच बोल्तो. सगळीकडे 'आम्ही लै भारी' हेच दाखवायचे प्रयत्न.
प्रयत्न ?? आहोतच आम्ही भारी. ;) असो.
अरे पण लढणारे तर क्षत्रिय होते ना. मग त्यांचे युद्धकौशल्य लिहायलाही ब्राम्हणच पुढे झाले ना! व्यास म्हणा, शिवभारत लिहीणारे कवींद्र परमानंद म्हणा, भृगू म्हणा सगळे ब्राम्हण. अरे शेवटी आपले पूर्वज आहेत ते. मग इतिहास ब्राम्हणाने लिहीला काय किंवा क्षत्रियाने, शूद्राने लिहीला काय. योग्य ते लिहीले गेले हे महत्वाचे.
बाकि मनुस्मृतीवरून ब्राम्हणांना धारेवर धरणार्‍यांना हे माहीत आहे का कि मनू हा ब्राम्हण नव्हे क्षत्रिय होता. मनु हा प्रजापालक राजा म्हणजेच क्षत्रिय होता.

अवलिया's picture

3 Sep 2010 - 3:53 pm | अवलिया

बाकि मनुस्मृतीवरून ब्राम्हणांना धारेवर धरणार्‍यांना हे माहीत आहे का कि मनू हा ब्राम्हण नव्हे क्षत्रिय होता. मनु हा प्रजापालक राजा म्हणजेच क्षत्रिय होता.

किंचित सुधारणा. मनुस्मृतीवरून नव्हे तर त्यातला काही श्लोकांवरुन.. (ज्यातले अनेक प्रक्षिप्त असल्याचे संशोधक मानतात) ..

बर. मनुस्मृती कधीही कुठेही संपूर्ण भारतात लागु होती याचा पुरावा द्या म्हटले तर चुप्प.
मनुस्मृती नावाच्या किती स्मृती विचारले तर चुप्प.
अहो इतकेच काय मनुस्मृतीतला श्लोक देउन अर्थ विचारला तरिही...चुप्पच !
पण रस्त्यावर उतरुन बोम्ब मारायला पुढे.
असो. ज्याची त्याची जाण समज..

अर्थाशी आम्हांला देणे घेणे नसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2010 - 7:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>मनुस्मृती कधीही कुठेही संपूर्ण भारतात लागु होती याचा पुरावा द्या म्हटले तर चुप्प.
राजे, महाराजांनी एखाद्या प्रश्नावर शास्त्रकारांना विचारले की, अशा अशा प्रसंगी धर्मशास्त्र काय म्हणते ? असे विचारल्यावर शास्त्रकार पटापट अमुक अमुक स्मृती असे असे म्हणते. धमुक-धमुक स्मृती तसे म्हणते, किंवा अशाच प्रसंगी अशाच एका राजाने अशाच एका प्रसंगी असा असा निर्णय घेतला होता. तेव्हा सदरील प्रश्न, प्रसंग पाहता अमुक-धमुक स्मृतीनुसार अशी योग्य कार्यवाही व्हावी असे शास्त्रकार म्हणत असतील ना ! जिथे जिथे असे धर्मशास्त्रावर राज्य चालत असतील तिथे तिथे हे उपद्याप होतेच तेव्हा भारतात कुठे असे होते असे पुरावे द्यायची गरज पडू नये असे वाटते.

>>>मनुस्मृती नावाच्या किती स्मृती विचारले तर चुप्प.
प्रश्न काय कळ्ळा नाय...! मनुस्मृतीची रचना करणार्‍याची दोन किंवा अधिक नावे आहेत आणि अशी रचना मूळ कोणाची याला काही आधार नाही. स्मृती यांची संख्या जवळपास शंभराच्यावर असावी. बाकी मनुच्या कोणकोणत्या रचना आहेत हेही सांगता येणार नाही. पण जी काही उपलब्द्ध मनुस्मृतीची म्हणून उपलब्ध रचना आहे, त्यावरुन बराच काथ्याकूट होऊ शकतो.

>>>मनुस्मृतीतला श्लोक देउन अर्थ विचारला तरिही...चुप्पच !पण रस्त्यावर उतरुन बोम्ब मारायला पुढे.
रस्त्यावर कोणी येऊ नये ही गोष्ट खरी असली तरी माणूसपण देणारे ग्रंथ देणारे ग्रंथ डोक्यावर घेऊन नक्कीच मिरवले पाहिजेत असे वाटते.

बाकी, मानवजातीचा मूळ पुरुष म्हणजे मनु असेल तर या महापुरुषाला जात असेल का हा मात्र संशोधनाचा विषय व्हावा. बाकी चालु द्या....! :)

-दिलीप बिरुटे

भारी समर्थ's picture

3 Sep 2010 - 10:31 pm | भारी समर्थ

अवांतर का काय ते.... धमुक्-धमुक लई ग्वाडंय राव!

भारी समर्थ

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 9:34 am | llपुण्याचे पेशवेll

बाकी, मानवजातीचा मूळ पुरुष म्हणजे मनु असेल तर या महापुरुषाला जात असेल का हा मात्र संशोधनाचा विषय व्हावा. बाकी चालु द्या....!
आता व्होल इंडियाचे नॅशनल फादर गांधीबाबांला पन जात होतीच ना! मग मनूमहाराजांनी काय घोडं मारलेनि?

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 9:34 am | llपुण्याचे पेशवेll

बाकी, मानवजातीचा मूळ पुरुष म्हणजे मनु असेल तर या महापुरुषाला जात असेल का हा मात्र संशोधनाचा विषय व्हावा. बाकी चालु द्या....!
आता व्होल इंडियाचे नॅशनल फादर गांधीबाबांला पन जात होतीच ना! मग मनूमहाराजांनी काय घोडं मारलेनि?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2010 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनू महाराजाच्या बाबतीत मला असे वाटते की, मनू महाराज कोणत्याच जातीचे नसावेत त्याचे कारण असे की, या चराचर सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव यांनी आपल्या शरीराचे दोन भाग केले अर्धा भाग पुरुषाचा तर अर्धा भाग स्त्रीचा आणि मग कोणत्या तरी चमत्काराने तिथे विराट नावाचा महापुरुषाची निर्मिती झाली.पुढे विराट नावाच्या या महापुरुषाने मोठी तपश्चर्या केली आणि मग या मनूची निर्मिती झाली. तेव्हा आगा न पिछा असलेल्या या मनूला कोणत्या जातीचा-धर्माचा कसे ठरवता येईल. असो, अशी काही त्यांच्या जन्माबद्दल कथा सांगितल्या जाते. या पेक्षा अन्य कोणती कथा तुम्हाला माहित असेल, किंवा अशा काही कथांमधून त्यांच्या जातीबद्दल-धर्माबद्दल काही माहिती कळणार असेल तर अशी कथा वाचण्यास मी उत्सूक आहे.

-दिलीप बिरुटे

>>>राजे, महाराजांनी एखाद्या प्रश्नावर शास्त्रकारांना विचारले की, अशा अशा प्रसंगी धर्मशास्त्र काय म्हणते ? असे विचारल्यावर शास्त्रकार पटापट अमुक अमुक स्मृती असे असे म्हणते. धमुक-धमुक स्मृती तसे म्हणते, किंवा अशाच प्रसंगी अशाच एका राजाने अशाच एका प्रसंगी असा असा निर्णय घेतला होता. तेव्हा सदरील प्रश्न, प्रसंग पाहता अमुक-धमुक स्मृतीनुसार अशी योग्य कार्यवाही व्हावी असे शास्त्रकार म्हणत असतील ना ! जिथे जिथे असे धर्मशास्त्रावर राज्य चालत असतील तिथे तिथे हे उपद्याप होतेच तेव्हा भारतात कुठे असे होते असे पुरावे द्यायची गरज पडू नये असे वाटते.

माझा मुद्दा केवळ मनुस्मृती होती का इतकाच होता. तुम्ही अमुक अमुक स्मृती म्हटले म्हणजेच मनुस्मृतीपेक्षा अन्य स्मृती वेगवेगळ्या भागात प्रचलित होत्या हे तुम्हाला मान्य आहे, असावे. स्मृतींमधे महाभारताची पण गणना होते. तसेच वेदांच्या संहिता भागाव्यतिरिक्त (मंत्र आणि आरण्यक, उपनिषदे वगळुन) जो भाग आहे त्याला सुद्धा स्मृती असे नाव आहे. म्हणजे स्मृतीनुसार असे जिथे असेल तिथे ते मनुस्मृतीच आहे असे मानणे सर्वथैव चूक आहे. असो.

>>>>प्रश्न काय कळ्ळा नाय...! मनुस्मृतीची रचना करणार्‍याची दोन किंवा अधिक नावे आहेत आणि अशी रचना मूळ कोणाची याला काही आधार नाही. स्मृती यांची संख्या जवळपास शंभराच्यावर असावी. बाकी मनुच्या कोणकोणत्या रचना आहेत हेही सांगता येणार नाही. पण जी काही उपलब्द्ध मनुस्मृतीची म्हणून उपलब्ध रचना आहे, त्यावरुन बराच काथ्याकूट होऊ शकतो.

काथ्याकुट जरुर करा. पण जे उपलब्ध आहे त्यावर करा. मनचं काही घालु नका हेच सांगणं आहे.

बाकी चालु द्या.. इतिहासाचे पुनर्लेखन म्हणतो मी !! ;)

त्या परशुरामाचा वध अर्जुनाने केला होता, त्यासाठी त्याला एक हजार हाथ विष्णूनी प्रदान केले होते.

अवलिया's picture

3 Sep 2010 - 6:29 pm | अवलिया

हांग आश्शी !

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 6:37 pm | परिकथेतील राजकुमार

त्या परशुरामाचा वध अर्जुनाने केला होता, त्यासाठी त्याला एक हजार हाथ विष्णूनी प्रदान केले होते.


त्यांना बहुदा सहस्त्रार्जुन म्हणायचे असावे.

पण सहस्त्रार्जुनाचा "वध" केला होता ना परशुरामाने? (पुरावा मिळणार नाही)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 6:50 pm | परिकथेतील राजकुमार

हो तोच तो :) महिस्मती राज्याचा स्वामी सहस्त्रार्जुन उर्फ कार्तविर्य अर्जुन. त्याचाच नाही तर त्यांच्या संपुर्ण वंशाचाच परशुरामांनी विनाश केला.

पुष्करिणी's picture

3 Sep 2010 - 6:53 pm | पुष्करिणी

हे सगळं जुनं आणि खोटं आहे , खरा इतिहास जाणून घ्या आता.

नरेश धाल's picture

3 Sep 2010 - 7:06 pm | नरेश धाल

परशुराम विनाश करायला गेला होता खरा, पण मध्ये एक देवीने येऊन त्यांना वाचविले,
मी शोधत आहे त्या देवीचे नाव, थोडा वेळ द्या मी नक्कि सांगतो.

अवलिया's picture

4 Sep 2010 - 11:29 am | अवलिया

सापडली का देवी? हरकत नाही. सहस्त्रार्जुनाला मारले हा इतिहास खोटा आहे तर !

मृत्युन्जय's picture

4 Sep 2010 - 11:37 am | मृत्युन्जय

मग जमदग्नींना मारले हा इतिहासही खोटा म्हणायचा. म्हणजे २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली हे सुद्धा खोटे म्हणायचे. म्हणजे रक्ताची तळी सुद्धा खोटीच म्हणायची.

चला पराशेठला अपेक्षित असलेला नाहीतरी इतिहासाच्या थोड्या भागचे तरी पुनर्लेखन होणार म्हणायचे.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार

हाच लपवला गेलेला इतिहास बाहेर येणे हेच तर ह्या धाग्याचे ध्येय आहे.

श्रीमंत परादेव कोकाटे

अवलिया's picture

4 Sep 2010 - 11:51 am | अवलिया

अगदी असेच आणि हेच म्हणतो..

ना ना साळुंखे

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 2:28 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. सत्य बाहेर आलेच पाहीजे.
-पुपे गायकवाड

वेताळ's picture

4 Sep 2010 - 5:52 pm | वेताळ

श्री परशुरामाने आपल्या आईची हत्या कोणत्या कारणास्तव केली?

मृत्युन्जय's picture

4 Sep 2010 - 5:54 pm | मृत्युन्जय

पित्याच्या सांगण्यावरुन.

वेताळ's picture

4 Sep 2010 - 5:58 pm | वेताळ

निव्वळ पिता सांगतो म्हणुन आईची हत्या करणे हे हिंदु संस्कृतीत बसते का?

मृत्युन्जय's picture

4 Sep 2010 - 5:59 pm | मृत्युन्जय

हो.

वेताळ's picture

4 Sep 2010 - 6:02 pm | वेताळ

बाप रे.......मग स्त्रीं याना हीन वागणुक देणार्‍या मुस्लिम आणि हिंदु संस्कृतीत काय तो फरक राहिला?

सहमत आहे. जाणकार उत्तर देतील. तोपर्यंत प्रभुचे गुणगान करु या !

फादर डिकास्टा

मृत्युन्जय's picture

4 Sep 2010 - 7:40 pm | मृत्युन्जय

फरक हा की हिंदु संस्कृती काळानुरुप विकसित झाली.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 7:57 pm | llपुण्याचे पेशवेll

मुस्लिम संस्कृतीत मारलेल्या आईला जिवंत करणारे बाप आहेत का? हिंदू संस्कॄतीत आहेत बॉ. परशुरामाने आईला मारल्यावर नंतर बापाकडून वर मागून घेऊन परत आईला जिवंत करवीले होते. :)

आयीला सही ये,
मारामारी करायची आणि परत जिवंत करायचे, फुल tiimepass आहे राव.

परत जिवंतच करायचे होते तर मारले कशाला ?

क्लिंटन's picture

4 Sep 2010 - 1:47 pm | क्लिंटन

म्हणजे २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली हे सुद्धा खोटे म्हणायचे. म्हणजे रक्ताची तळी सुद्धा खोटीच म्हणायची.

बाकी या चर्चेत मला इंटरेस्ट नाही.तरी तुम्ही इथे परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली असे म्हटले आहेत आणि जेव्हा जेव्हा मी इतर कोणालाही हे विधान करताना ऐकतो तेव्हा तेव्हा मी त्या व्यक्तीला एक प्रश्न विचारतो तोच तुम्हाला पण विचारत आहे.

पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय कशी करता येईल? म्हणजे एकदा नि:क्षत्रिय केल्यानंतर सगळे क्षत्रिय संपलेच की! म्हणजे अर्थातच नवे क्षत्रिय जन्माला येणार नाहीत कारण जात/वर्ण जन्मावर अवलंबून असल्याने केवळ क्षत्रियाचाच मुलगा क्षत्रिय बनू शकेल! मुळात क्षत्रिय शिल्लक नसल्यामुळे त्यांची पुढची पिढी यायचा संबंधच नाही! मग दुसऱ्यांदा पृथ्वी नि:क्षत्रिय कशी करता येईल?

आमच्या घराण्याची ब्रम्हचर्याची उज्वल परंपरा आहे माझे पणजोबा ब्रम्हचारी, माझे अजोबा ब्रम्हचारी, माझे वडिल ब्रम्हचारी आणि मी पण ब्रम्हचारी, इतकेच काय तर माझी मुले आणि नातवंडे पण ब्रम्हचारीच असतील हे विधान आणि परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली हे विधान यात नक्की फरक काय?

बाकी चालू द्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 2:37 pm | llपुण्याचे पेशवेll

आमच्या घराण्याची ब्रम्हचर्याची उज्वल परंपरा आहे माझे पणजोबा ब्रम्हचारी, माझे अजोबा ब्रम्हचारी, माझे वडिल ब्रम्हचारी आणि मी पण ब्रम्हचारी, इतकेच काय तर माझी मुले आणि नातवंडे पण ब्रम्हचारीच असतील हे विधान आणि परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली हे विधान यात नक्की फरक काय?

थोडासा विचार केला तर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार बायका युध्दात सैन्यात लढत नसत. पृथ्वी नि:क्षत्रिय केली याचा अर्थ सर्व क्षत्रिय लढवय्ये पुरुष मारले असा आहे. बायकाना ठार मारायचीही पद्धत नव्हती. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत स्त्रिया, मुले, म्हातारे याना मारले आहे. लहान मुले, म्हातारे यांना ठार करायची पद्धत मुसुलमानी आक्रमणानंतर आली. महाभारतातील युध्दाचे नियम वाचले तर याची कल्पना करता येईल. म्हणजे क्ष या वेळेला जगात अस्तित्वात असणारे सर्व लढवय्ये क्षत्रिय सैन्य मारून टाकले. त्यावेळेला त्यांच्या बायका गर्भार असतील, मुले लहान असतील ती मोठी झाल्यावर परत पृथ्वी नि:क्षत्रिय केली असे. शिंपल लॉजिक.
बाकी ब्रम्हचारी लॉजिक मी तरी पाहीलेले नाही बॉ.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 2:40 pm | परिकथेतील राजकुमार

पुपे,
उत्तर बरेचसे पटण्यासारखे आहे, पण एक शंका म्हणजे त्यावेळी मग परशुरामांच्या तडाख्यातुन दशरथ तसेच जनक वगैरे राजे कसे काय वाचले ?

असे म्हणतात की काही वृद्ध पुरुष, स्त्रिया, लहान मुले कश्यप ऋषींच्या आश्रयाला गेल्यावर त्यांनी परशुरामाचा क्रोध शांत केला. आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊन परशुराम जिंकलेली सर्व भूमी कश्यपाला दान देऊन दक्षिणेकडे म्हणजेच कोकणात येऊन राहिला. कश्यपाने मिळालेली भूमी त्याच्या आश्रयास असलेल्या क्षत्रियांना देऊन पुन्हा राज्य, धर्मव्यवस्था थोडक्यात समाजाची बिघडलेली घडी परत वसवली.

वरिल गोष्टीला "पुरावा नाही" हे सांगणे नलगे.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 5:19 pm | परिकथेतील राजकुमार

धन्स रे नानुस :)

पण ह्या प्रतिसादातुन पुन्हा एकदा क्षत्रीयांच्या मदतीला कश्यप म्हणजे ब्राम्हण माणुस धावला असा सुर कोणी लावला तर ?

मृत्युन्जय's picture

4 Sep 2010 - 5:38 pm | मृत्युन्जय

दशरथादी राजे राणीवशात लपुन बसले त्यामुळे वाचले. जे जीव वाचवण्यासाठी पळुन गेले किंवा स्त्रीवेश धारण करुन जनानखान्यात जाउन लपले त्यांचे क्षात्रतेज नष्ट आले आहे असे मानुन "निक्षत्रीय" ही संज्ञा आली.

दुसरी गोष्ट म्हणजे २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली म्हणजे २१ वेळा क्षत्रियांचा नि:पात करण्यासाठी पृथ्वीप्रदक्षिणा केली. त्यातुनही जे वरील कारणांमुळे वाचले ते नशीबवान.

त्यातही ज्यांचा निर्वंश झाला त्यांच्याकडेही नियोगाचे हत्यार होतेच. म्हणजे परत क्षत्रिय जन्म घेत राहिलेच. फक्त क्षत्रियांचा उन्मत्तपणा नष्ट झाला.

अवांतरः आता बोला की ब्राह्मणांचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी रचलेले कुंभांड आहे हे म्हणुन.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 5:42 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्हीच बघा म्हणजे झाले.

म्हणजे थोडक्यात पृथ्वी नि:क्षत्रिय झालीच नाही.

बोंबला, आमाला आता पतूर हेच वाटत होतं.

नरेश धाल's picture

4 Sep 2010 - 6:14 pm | नरेश धाल

सापडले देवीचे नाव.
हिंग्लाजी माता.

जरा विस्तृत माहिती द्या या देवी बद्दल. वेगवेगळी स्थानं आणि मंदीरांचा फटु टाकता आला तर द्या !

नरेश धाल's picture

4 Sep 2010 - 6:53 pm | नरेश धाल

http://en.wikipedia.org/wiki/Hinglaj_Mata
http://www.shaktipeethas.org/hinglaj-darshan-t180.html
http://bhavsarsamaj.com/history/
एक मंदिर महाराष्ट्रात सुद्धा आहे , पण नक्की ते कुठे आहे ते माहित नाही. नाशिक का कुठे तरी आहे.

धन्यवाद. अतिशय बहुमोल माहिती आपण पुरवली आहे.

वाचुन काही शंका असल्यास आपल्यास विचारेन :)

नरेश धाल's picture

3 Sep 2010 - 6:51 pm | नरेश धाल

सहस्त्रार्जुनाचा वध परशुरामाने केला नाही, सहस्त्रार्जुनाने समाधी घेतली. त्यांना शेवटी दत्तांनी दृष्टांत दिला आणि सर्वप्रथम गीता सांगितली.

अवलिया's picture

3 Sep 2010 - 6:52 pm | अवलिया

म्हणजे कृष्णाने अर्जुनाला नाही सांगितली ना !

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 6:55 pm | परिकथेतील राजकुमार

बघा बघा... खरा इतिहास बाहेर यायला लागला आता.

अर्धवटराव's picture

3 Sep 2010 - 10:41 pm | अर्धवटराव

अहो गीता म्हणजे "सांगणे"/अर्थबोध करणे... गुरु गीता, गणेश गीता, हंस गीता, यम गीता, शिव गीता, राम गीता... अश्या अनेक गीता आहेत. श्रीकृष्णाने सांगितली तिला भगवत्गीता म्हणतात...

हि माहिती तुम्हाला नव्याने कळणे म्हणजे इतिहास बाहेर येणे ??

(इतिहास प्रेमी) अर्धवटराव

कृष्णाने अर्जुनाला सांगितली, पण ती पहिली वेळ नव्हती.

अवलिया's picture

3 Sep 2010 - 6:58 pm | अवलिया

अशी किती वेळा गीता कुणी कुणाला सांगुन झालेली आहे?

आमच्या सरमळकर सरांनी एकदा मला सांगितली होती मागे.. इतिहासाचं पुनर्लेखन करताना हा मुद्दा ध्यानात ठेवा परासेठ..

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 7:02 pm | परिकथेतील राजकुमार

पण ती गीता म्हणजे हीच गीता होती कशावरुन ?

कारण ही ती नाही म्हणुन ती ही नाही म्हणुन ही ही आहे ती ती आहे.

चतुरंग's picture

3 Sep 2010 - 7:07 pm | चतुरंग

प रा राजवाडे तुमचा अभ्यास कमी पडतोय! बासनात गुंडाळून ठेवलेल्या खवह्या बाहेर काढा! ;)

यशोधरा's picture

3 Sep 2010 - 7:09 pm | यशोधरा

गीता सांगायच्या काळात पंख्यांचा शोध लागला होता असे दिसतेय!
तो कोणी लावला होता?

अहो विमानेसुद्धा होती तर काय; तशाच एका विमानाचा पंखा काढून लावलाय वरल्या चित्रात! ;)

नरेश धाल's picture

7 Sep 2010 - 1:15 pm | नरेश धाल

वेड्यात काढू नका,
तो विमानाचा पंखा नाहीये, तो घरातला हवा घेण्याचा पंखा आहे.
विमानाचा पंख असा असतो.

कधि कधि दोन पन असत्यात

एका विमानाच्या पंख्याच्या बजेट मध्ये एक हिंदी चित्रपट होऊ शकतो.

अवांतर : बिनापंख्याचे विमान कोणी बघितले आहे काय ?

अवलिया's picture

3 Sep 2010 - 7:11 pm | अवलिया

पंखे अपौरुषेय आहेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 7:12 pm | llपुण्याचे पेशवेll

अरेरे.. इतक्या सिरीयस धाग्यांवर संपादकांनी असे अवांतर करावे याचे वाईट वाटले.

-दो-तीन भत्ते

ते मघाशी संपादक म्हणून हा धागा वाचत होते, त्यामुले त्यांना धाग्यावर करडी नजर ठेवणे भाग होते.
आता सद्ध्या ते फक्त सभासद म्हणून आलेत, सबब धुमाकूळ घालायला मोकळे आहेत.
त्यांच्याकडील असलेल्यागीतेच्या नियमावलीत हेच सांगितले आहे! :)

नरेश धाल's picture

7 Sep 2010 - 1:17 pm | नरेश धाल

त्यांच्याकडील असलेल्यागीतेच्या नियमावलीत हेच सांगितले आहे
मला हि गीता पाठवा ना. लई उपकार व्ह्तील

चतुरंग's picture

3 Sep 2010 - 7:15 pm | चतुरंग

आम्हाला नेहेमीच संपादक ह्या भूमिकेतून बघून आमचे सदस्यरुपी लेखन हळू हळू संपुष्टात आणण्याच्या पुपे ह्यांच्या सुप्त डावाचा निषेध असो! ;)

-रंगा

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 7:18 pm | परिकथेतील राजकुमार

पण मुळ मुद्दा बाजुलाच राहिला. खरी गीता कोणती हे कसे ओळखायचे ?

यशोधरा's picture

3 Sep 2010 - 7:22 pm | यशोधरा

पण मुद्द्याला धरुन चर्चा करायची असा काय नियम आहे का? आहे का सांगा!
असला तर पुरावा द्या बघू!

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 7:28 pm | llपुण्याचे पेशवेll

पुनर्लेखनाच्या कामात तुम्ही अडथळा आणीत आहात.

यशोधरा's picture

3 Sep 2010 - 7:31 pm | यशोधरा

आमाला सुपारी मिळाली आहे. खंडाने.
आमी आमचं नेहमीचं जमणारं काम करतोय.

नरेश धाल's picture

7 Sep 2010 - 1:18 pm | नरेश धाल

मला नारळ मिळालाय

मृत्युन्जय's picture

3 Sep 2010 - 7:40 pm | मृत्युन्जय

गीता रामाने सांगितली, शिवानेदेखील सांगितली. त्यातली सर्वात जास्त प्रसिद्ध कृष्णाची गीता.

पुष्करिणी's picture

3 Sep 2010 - 7:47 pm | पुष्करिणी

अष्टावक्रानंही सांगितली

अवलिया's picture

4 Sep 2010 - 11:31 am | अवलिया

तशी तर आम्हीही गीता सांगितलेली आहे.. वाचा इथे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2010 - 2:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवतीताईला गीतापठणाबद्दल बरीच माहिती आहे असं नंदन पेशव्याला सांगत होता असं धमू मकीला सांगताना बिकाने ऐकल्याचं सहजकाकांनी मला व्यनीतून सांगितलं.

अर्धवटराव's picture

4 Sep 2010 - 4:32 am | अर्धवटराव

भगवत्गीतेत श्रीकृष्णाने सूर्य-मनु-विवस्वान (असाच काहिसा ऑर्डर आहे.. मला नक्की आठवत नाहि) अशी गीता ज्ञानाची परंपरा सांगितली आहे. आणि मुख्य म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत नवीन-जुने, पहिला-शेवटचा.. असं काहि नसतं हो. माणसाच्या पिढया बदलतात, संदर्भ बदलतात, साधनं, दृष्टीकोन बदलतो.. ज्ञान तेच राहतं.

(अज्ञानी) अर्धवटराव

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 2:43 pm | llपुण्याचे पेशवेll

ओ ती ऑर्डर फक्त ज्ञानकर्मसंन्यास योगाची, फुल्टू १८ अध्यायांची नाही आहे. म्हणजे अध्याय नं ४ ची फक्त. याच अध्यायात यदा यदाही धर्मस्य सारखे सुप्रसिद्ध श्लोक आहेत.
असे आहेत ते श्लोक

इमं विवस्वते योगं प्रोक्तवाहनमव्ययम
विवस्वान मनवेप्राह मनुरिक्ष्वाकवेब्रवीत

एवम्परंपराप्राप्त मिमंराजर्षयोविदु:
सकालेनेहमहता योगोनष्टःपरंतप

अर्धवटराव's picture

7 Sep 2010 - 12:38 am | अर्धवटराव

१८ अध्यायी गीता एक आणि एकच आहे. पण तीत सांगीतलेले ज्ञान कालातीत आहे.

(गीताभ्यासी) अर्धवटराव

मी वाचले कि १८ वर्षाची एक गीता आहे आणि ती काल इत होती.
स्वारी.

पुष्करिणी's picture

3 Sep 2010 - 6:55 pm | पुष्करिणी

ढॅण्टॅढॅsssण...

पुष्करिणी's picture

3 Sep 2010 - 6:32 pm | पुष्करिणी

अरे वा, नविन माहिती...

पूर्वीच्या इतिहासानुसार :) परशुराम हाही एक विष्णूचा अवतार होता...आता विष्णू स्वतःच्याच अवताराला मारायला वर कशाला देइल?
काही संदर्भ देता येतील का ?

छे छे अहो त्यांचे वाक्य हाच पुरावा. उलट पुरावा तुम्हीच द्या परशुराम विष्णुचा अवतार कशावरुन? ऑ !

पुष्करिणी's picture

3 Sep 2010 - 6:37 pm | पुष्करिणी

श्री परा यांचा धागा म्हणजे एक्दम मोहिनी नॄत्य करता करता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतीय आणि ते बघून समोरची पार्टी पण ...

धाल साहेब, माफ करा.

परशुराम हि एक व्यक्ती नसून ती एक पदवी आहे, जसे शंकराचार्य. एकूण १४ परशुराम होऊन गेले
ह्या पराशुरामाबद्दल बरेचसे ऐकून आहे कि, जसे स्वताच्या आई चा वध देखील केला ह्यांनी.

आयला लै भारी! पुपेसाब, तुमको कुच मालूमच नय.. तुम कुच भी बोलताय..

नगरीनिरंजन's picture

7 Sep 2010 - 11:37 am | नगरीनिरंजन

आणि नसला चुकून कली ब्राह्मण तरी त्याचे पिताश्री ब्राह्मण होते असं नंतर पसरवलं जाईलच ;-)
याला म्हणतात (भविष्यातल्या) इतिहासाचे पूर्वलेखन!

अवलिया's picture

3 Sep 2010 - 3:57 pm | अवलिया

ओ पेशवे.. कली का कल्की ???

कृष्ण क्षत्रिय कसा?
जन्माने यादव (गवळी) वैश्य होईल.

कर्माने युद्ध केले क्षत्रिय.. गीता सांगितली ब्राह्मण.. रथ हाकला शुद्र होईल

अर्धवट's picture

3 Sep 2010 - 4:00 pm | अर्धवट

एक शंका - क्षत्रीय म्हणजे आजचे नक्की कोण?

अवलिया's picture

3 Sep 2010 - 6:14 pm | अवलिया

शोधा ! सापडेल !!

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 6:16 pm | llपुण्याचे पेशवेll

ओ तो जण्माणे गवळी नव्हता. तो वाढला गवळीया घरी. असो.

योगी९००'s picture

7 Sep 2010 - 9:58 pm | योगी९००

ओ तो जण्माणे गवळी नव्हता. तो वाढला गवळीया घरी. असो.

चुकून तो वाढला अवलिया घरी. असे वाचले.

विशाल कुलकर्णी's picture

10 Sep 2010 - 1:04 pm | विशाल कुलकर्णी

चुकून तो वाढला अवलिया घरी. असे वाचले.>>>>

तसेच असावे, नाहीतर एवढा मोठा कुटनितीज्ञ कसा काय झाला असता? ;)

शुचि's picture

4 Sep 2010 - 6:30 am | शुचि

सी के पी नक्की

पंगा's picture

12 Feb 2011 - 7:20 pm | पंगा

...केवळ कुटुंबापुरतीच गेल्याचा हा उघडउघड दाखला म्हणावा काय? (म्हणजे कुटुंबाबाहेर चालते, वगैरे?)

यशोधरा's picture

3 Sep 2010 - 4:01 pm | यशोधरा

>>ओ पेशवे.. कली का कल्की ??? >> कधी नव्हे ते खर्र सांगितलं असेल हो त्यांनी! ;) :D

पुष्करिणी's picture

3 Sep 2010 - 5:15 pm | पुष्करिणी

हेच म्हण्ते, श्रीकॄष्ण यादव हे गवळी होते. त्यांची आत्या कुंती क्षत्रिय होती. त्यांने स्वतः सारथ्य करत करत गीता सांगितली आणि वर जानवं पण घालायचे ...नक्की काय चालू होतं तेंव्हा?
देवकी /वसुदेव क्षत्रिय होते आणि नंद/यशोदा गवळी अशी भानगड आहे का ?

ब्रम्हदेवांबद्दल विशेष माहिती नाही , शंकर स्मशानात चितेतली राख बिख अंगाला फासून भूतांबरोबर डान्स करायचा जानवं घालून इतकच माहिती आहे. डायरेक्ट विष्णूपेक्षा अवतार जास्त फेमस आहेत, ते सर्व वर्णांमधले आणि पशु अवतारात्ले पण आहेत. प्राण्यामधे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इ. असत का याची माहिती नाही.

जानव म्हणके एक फॅशन आयट्म असावा असं वाटतय

हो आहेत कि, तुमास्नी माहित ना का ?
वाघ सिंह : क्षत्रिय
डुक्कर, घुबडे, लांडगे : ब्राम्हण
मोर, ससे, शेळी : शुद्र

आणि कोण राहिले बरे,
हा
हत्ती, जिराफ : वैश्य
(एक पुणेरी पाटी : पुरावे मागू नयेत, मागितल्यास अपमान करण्यात येईल )

पुष्करिणी's picture

7 Sep 2010 - 1:35 pm | पुष्करिणी

अच्छा, म्हणजे वराह अवतार ब्राह्मणावतार होता तर्..

नरेश धाल's picture

7 Sep 2010 - 1:38 pm | नरेश धाल

बिनधास्त, सगळे अवतार ब्राम्हणांच्या नावावर करा,
फुकटात, नो प्रोब्लेम,
परा साहेबांना कळवा, आणि लिहून टाका.
त्यांचं सध्या कडक झालेले आहे, धोरण हो.

मिसळभोक्ता's picture

3 Sep 2010 - 6:59 pm | मिसळभोक्ता

दाखवले नाही म्हणजे घालत नव्हते किंवा तसे नव्हते असे नाही. रावंण ब्राम्हण होता व दुष्ट होता.

गणेशपुराणात, रावण पिंड ठेवून लघुशंकेला गेला तेव्हा कानावर जानवे चढवले होते, असा स्पष्ट उल्लेख आहे.

रावणानेच रावणपिठल्याचा शोध लावला का?

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 7:08 pm | परिकथेतील राजकुमार

मला सिताफळा विषयी अशीच शंका आहे.

अवलिया's picture

3 Sep 2010 - 7:09 pm | अवलिया

रामफळाचे काय?

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 7:15 pm | llपुण्याचे पेशवेll

आणि कलिंगड?

मेघवेडा's picture

3 Sep 2010 - 7:18 pm | मेघवेडा

ते तुमचेच फळ असावे.

विशाल कुलकर्णी's picture

10 Sep 2010 - 1:06 pm | विशाल कुलकर्णी

<<ते तुमचेच फळ असावे.>>>

अहं, तो पुपेंचा गड आहे ;)

मिसळभोक्ता's picture

3 Sep 2010 - 7:26 pm | मिसळभोक्ता

ह्या शब्दात "लिंग" असल्याने तो अश्लील मानला जावा.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 7:30 pm | llपुण्याचे पेशवेll

मग केळ्याचं काय?

मिसळभोक्ता's picture

3 Sep 2010 - 7:34 pm | मिसळभोक्ता

केळ्यात काय अश्लील आहे रे पुप्या ?

केळ्याने होत आहे रे आधी केळेची पाहिजे, असे खुद्द समर्थ रामदार स्वामी म्हणून गेले आहेत.

विनायक प्रभू's picture

4 Sep 2010 - 3:05 pm | विनायक प्रभू

स्वामींनी ल च म्हटले होते.
ल चा ळ करायचा मान वेगळ्यालाच

सूड's picture

3 Sep 2010 - 7:37 pm | सूड

:)

शब्द पहा हो !! आणि केळ्याची साल संपूर्ण काढता येते.

मिसळभोक्ता's picture

3 Sep 2010 - 7:38 pm | मिसळभोक्ता

साला, ह्या सालीच्या प्वाईंटमुळे आपण ह्या देवरुखकराचा फ्यान झालो.

मृत्युन्जय's picture

3 Sep 2010 - 7:22 pm | मृत्युन्जय

लवफळ पण जोडा. हा लव कुशातला लव बरं का. लव = प्रेम नाही.

मिपावर कुणीतरी लवफळाचा पण फोटो दिला होता ना ??

शुचि's picture

4 Sep 2010 - 6:34 am | शुचि

जागुताई नी

सूड's picture

3 Sep 2010 - 7:51 pm | सूड

रावणभात र्‍हायला.

पुष्करिणी's picture

3 Sep 2010 - 7:23 pm | पुष्करिणी

कानिटकर , तुम्ही 'काना' च्या कौलात हा ऑप्शन नव्हता दिला बरंका...

घालताना आणि चढताना दाखवून करत नाही. ते गुपचूप करतात.

मृत्युन्जय's picture

3 Sep 2010 - 3:34 pm | मृत्युन्जय

संभाजीराजे बदफैली होते असे म्हणणे म्हणजे वायझेडपणाचा कळस आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 3:44 pm | llपुण्याचे पेशवेll

अंशतः सहमत आणि अंशतः असहमत .
१. असहमत अशासाठी की संभाजीमहाराजांनी बाया ठेवल्या असतील तर तसं म्हणण्यात वाईट काय आहे. डॉ. सदाशिव शिवदे लिखील ज्वलज्वलनतेजस या पुस्तकात येसूबाईंनी शंभूराजांच्या दासीपुत्रांचा औरंगजेबाच्या छावणीतून सुटका होईपर्यंत नीट सांभाळ केला होता असे म्हटले आहे. पुढे जाऊन राजाराम महाराजांनी येसूबाई व शाहू यांस सोडविण्यासाठी २० वेळा प्रयत्न केले व छावणीवर छापे घातले असाही उल्लेख आहे. मग तसं होतं तर तसं म्हणण्यास प्रत्यवाय का?

२. सहमत यासाठी की संभाजीराजांचा दाखला देऊन बाया ठेवण्याचं समर्थन करणार्‍यांनी आधी संभाजीराजांसारखा पराक्रम गाजवावा. इतक्या पराक्रमी माणसाच्या हातून असा बदफैली पणा झाला असेल तर तो समर्थनीय नाही पण क्षम्य नक्कीच ठरतो. म्हणजे त्यांचे गुण हे त्यांची थोरवी ठरवण्यास पुरेसे ठरतात आणि फक्त त्या अवगुणांमुळे थोरवी झाकोळली जात नाही. बाजीरावाच्या बाबतीतही असेच म्हणता येतील. थोडक्यात काय रावबाजी आणि संभाजी दोघे एका गाडीचे प्रवासी.

मृत्युन्जय's picture

3 Sep 2010 - 3:56 pm | मृत्युन्जय

हे बघा. त्या काळात अनेक लग्ने केली जायची. बाया ठेवल्या जायच्या. महाराजांच्याही ३ उपस्त्रिया होत्या म्हणतात. उपस्त्रिया म्हणजे काय ते जरा कोणी स्पष्ट करेल काय? जे त्या काळात योग्य होते त्याबद्दल उगाच कशाला मोठ्या माणसांना नावे ठेवायची.

आणि ते मोहित्यांची मंजुळा वगैरे प्रकरण तर उगाच हवेतल्या गोष्टी आहेत असे मला वाटते. संभाजी महाराजांनी जर खरेच असे काही केले असते तर शिवाजी महाराजांनी नक्कीच त्यांना शिक्षा केली असती. शिवाजी महाराज म्हणजे काही आजकालचे राजकारणे नव्हते की काहीही करुन पोटच्या पोराला पाठशी घालतील. शिवाय ती जी कोण होती ती कोण्या बड्या सरदाराची नातेवाइकच होती तो बरे ऐकुन घेइल हे सगळे.

ऋषिकेश's picture

3 Sep 2010 - 4:12 pm | ऋषिकेश

<झाडावरून उतरलोय.. मात्र रुमाल टाकलाय जागेवर>
तुम्ही आजच्या काळातले नीतीमत्तेचे नियम संभाजी राजआंना लाऊ शकत नाहीत. त्याकाळात अनेकबायका असणे, अनेक बायकांशी राजांचे संबंध असणे समाजसंमत व शिष्टसंमत होते. राजांनी मग त्यांना का शिक्षा केली असती?
<झाडावर परत चढलो :P>

मृत्युन्जय's picture

3 Sep 2010 - 4:17 pm | मृत्युन्जय

संभाजीराजांनी एका मुलीवर जबरदस्ती केली होती आणि एका विधवेला नादी लावले होते (जे त्या काळच्या प्रथेप्रमाणे अपराध होते) असा अपप्रचार केला जातो त्यांच्याबद्दल. त्याबद्दल बोलत होतो मी.

नरेश धाल's picture

7 Sep 2010 - 1:34 pm | नरेश धाल

नाही, हे खोटा आहे.
त्या मुलीनेच संभाजीराजां वर बळजबरी केली होती, त्या ऐतराज मधल्या प्रियांका वाणी.
आणि केला त्या विधवेचा थोडा उद्धार तर, काय बिघडले हो ?
(एक पुणेरी पाटी : पुरावे मागू नयेत, मागितल्यास अपमान करण्यात येईल )

एक छोटी चुक
रावबाजी हे दुसर्‍या बाजीरावाला म्हणायचे पहील्या नाही