✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इतिहासाचे पुनर्लेखन

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Fri, 09/03/2010 - 15:26  ·  लेख
लेख
आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच. असो.. तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल. आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :- १) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ? ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ? २) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ? ३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ? ४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही. ५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ? गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ? आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।। आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।। तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।। ५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ? ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
97043 वाचन

💬 प्रतिसाद (352)

प्रतिक्रिया

ओ ती ऑर्डर फक्त

llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/04/2010 - 14:43 नवीन
ओ ती ऑर्डर फक्त ज्ञानकर्मसंन्यास योगाची, फुल्टू १८ अध्यायांची नाही आहे. म्हणजे अध्याय नं ४ ची फक्त. याच अध्यायात यदा यदाही धर्मस्य सारखे सुप्रसिद्ध श्लोक आहेत. असे आहेत ते श्लोक इमं विवस्वते योगं प्रोक्तवाहनमव्ययम विवस्वान मनवेप्राह मनुरिक्ष्वाकवेब्रवीत एवम्परंपराप्राप्त मिमंराजर्षयोविदु: सकालेनेहमहता योगोनष्टःपरंतप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

काय फरक पडतो ??

अर्धवटराव
Tue, 09/07/2010 - 00:38 नवीन
१८ अध्यायी गीता एक आणि एकच आहे. पण तीत सांगीतलेले ज्ञान कालातीत आहे. (गीताभ्यासी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मी वाचले कि १८ वर्षाची एक गीता आहे. स्वारी.

नरेश धाल
Tue, 09/07/2010 - 13:22 नवीन
मी वाचले कि १८ वर्षाची एक गीता आहे आणि ती काल इत होती. स्वारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ढॅण्टॅढॅsssण...

पुष्करिणी
Fri, 09/03/2010 - 18:55 नवीन
ढॅण्टॅढॅsssण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश धाल

अरे वा, नविन

पुष्करिणी
Fri, 09/03/2010 - 18:32 नवीन
अरे वा, नविन माहिती... पूर्वीच्या इतिहासानुसार :) परशुराम हाही एक विष्णूचा अवतार होता...आता विष्णू स्वतःच्याच अवताराला मारायला वर कशाला देइल? काही संदर्भ देता येतील का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश धाल

छे छे अहो त्यांचे वाक्य हाच

अवलिया
Fri, 09/03/2010 - 18:33 नवीन
छे छे अहो त्यांचे वाक्य हाच पुरावा. उलट पुरावा तुम्हीच द्या परशुराम विष्णुचा अवतार कशावरुन? ऑ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

श्री परा यांचा धागा म्हणजे

पुष्करिणी
Fri, 09/03/2010 - 18:37 नवीन
श्री परा यांचा धागा म्हणजे एक्दम मोहिनी नॄत्य करता करता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतीय आणि ते बघून समोरची पार्टी पण ... धाल साहेब, माफ करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

परशुराम हि एक व्यक्ती नसून

नरेश धाल
Fri, 09/03/2010 - 18:36 नवीन
परशुराम हि एक व्यक्ती नसून ती एक पदवी आहे, जसे शंकराचार्य. एकूण १४ परशुराम होऊन गेले ह्या पराशुरामाबद्दल बरेचसे ऐकून आहे कि, जसे स्वताच्या आई चा वध देखील केला ह्यांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

आयला लै भारी! पुपेसाब, तुमको

मेघवेडा
Fri, 09/03/2010 - 18:33 नवीन
आयला लै भारी! पुपेसाब, तुमको कुच मालूमच नय.. तुम कुच भी बोलताय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश धाल

आणि नसला चुकून कली ब्राह्मण

नगरीनिरंजन
Tue, 09/07/2010 - 11:37 नवीन
आणि नसला चुकून कली ब्राह्मण तरी त्याचे पिताश्री ब्राह्मण होते असं नंतर पसरवलं जाईलच ;-) याला म्हणतात (भविष्यातल्या) इतिहासाचे पूर्वलेखन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ओ पेशवे.. कली का कल्की

अवलिया
Fri, 09/03/2010 - 15:57 नवीन
ओ पेशवे.. कली का कल्की ??? कृष्ण क्षत्रिय कसा? जन्माने यादव (गवळी) वैश्य होईल. कर्माने युद्ध केले क्षत्रिय.. गीता सांगितली ब्राह्मण.. रथ हाकला शुद्र होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

एक शंका - क्षत्रीय म्हणजे

अर्धवट
Fri, 09/03/2010 - 16:00 नवीन
एक शंका - क्षत्रीय म्हणजे आजचे नक्की कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

शोधा ! सापडेल !!

अवलिया
Fri, 09/03/2010 - 18:14 नवीन
शोधा ! सापडेल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

ओ तो जण्माणे गवळी नव्हता. तो

llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 18:16 नवीन
ओ तो जण्माणे गवळी नव्हता. तो वाढला गवळीया घरी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हॅ हॅ

योगी९००
Tue, 09/07/2010 - 21:58 नवीन
ओ तो जण्माणे गवळी नव्हता. तो वाढला गवळीया घरी. असो. चुकून तो वाढला अवलिया घरी. असे वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

चुकून तो वाढला अवलिया घरी.

विशाल कुलकर्णी
Fri, 09/10/2010 - 13:04 नवीन
चुकून तो वाढला अवलिया घरी. असे वाचले.>>>> तसेच असावे, नाहीतर एवढा मोठा कुटनितीज्ञ कसा काय झाला असता? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

सी के पी नक्की

शुचि
Sat, 09/04/2010 - 06:30 नवीन
सी के पी नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

जात...

पंगा
Sat, 02/12/2011 - 19:20 नवीन
...केवळ कुटुंबापुरतीच गेल्याचा हा उघडउघड दाखला म्हणावा काय? (म्हणजे कुटुंबाबाहेर चालते, वगैरे?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

>>ओ पेशवे.. कली का कल्की ???

यशोधरा
Fri, 09/03/2010 - 16:01 नवीन
>>ओ पेशवे.. कली का कल्की ??? >> कधी नव्हे ते खर्र सांगितलं असेल हो त्यांनी! ;) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हेच म्हण्ते, श्रीकॄष्ण यादव

पुष्करिणी
Fri, 09/03/2010 - 17:15 नवीन
हेच म्हण्ते, श्रीकॄष्ण यादव हे गवळी होते. त्यांची आत्या कुंती क्षत्रिय होती. त्यांने स्वतः सारथ्य करत करत गीता सांगितली आणि वर जानवं पण घालायचे ...नक्की काय चालू होतं तेंव्हा? देवकी /वसुदेव क्षत्रिय होते आणि नंद/यशोदा गवळी अशी भानगड आहे का ? ब्रम्हदेवांबद्दल विशेष माहिती नाही , शंकर स्मशानात चितेतली राख बिख अंगाला फासून भूतांबरोबर डान्स करायचा जानवं घालून इतकच माहिती आहे. डायरेक्ट विष्णूपेक्षा अवतार जास्त फेमस आहेत, ते सर्व वर्णांमधले आणि पशु अवतारात्ले पण आहेत. प्राण्यामधे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इ. असत का याची माहिती नाही. जानव म्हणके एक फॅशन आयट्म असावा असं वाटतय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हो आहेत कि, तुमास्नी माहित ना

नरेश धाल
Tue, 09/07/2010 - 13:27 नवीन
हो आहेत कि, तुमास्नी माहित ना का ? वाघ सिंह : क्षत्रिय डुक्कर, घुबडे, लांडगे : ब्राम्हण मोर, ससे, शेळी : शुद्र आणि कोण राहिले बरे, हा हत्ती, जिराफ : वैश्य (एक पुणेरी पाटी : पुरावे मागू नयेत, मागितल्यास अपमान करण्यात येईल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

अच्छा, म्हणजे वराह अवतार

पुष्करिणी
Tue, 09/07/2010 - 13:35 नवीन
अच्छा, म्हणजे वराह अवतार ब्राह्मणावतार होता तर्..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश धाल

बिनधास्त, सगळे अवतार

नरेश धाल
Tue, 09/07/2010 - 13:38 नवीन
बिनधास्त, सगळे अवतार ब्राम्हणांच्या नावावर करा, फुकटात, नो प्रोब्लेम, परा साहेबांना कळवा, आणि लिहून टाका. त्यांचं सध्या कडक झालेले आहे, धोरण हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

अगदी बरोबर

मिसळभोक्ता
Fri, 09/03/2010 - 18:59 नवीन
दाखवले नाही म्हणजे घालत नव्हते किंवा तसे नव्हते असे नाही. रावंण ब्राम्हण होता व दुष्ट होता. गणेशपुराणात, रावण पिंड ठेवून लघुशंकेला गेला तेव्हा कानावर जानवे चढवले होते, असा स्पष्ट उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

रावणानेच रावणपिठल्याचा शोध

यशोधरा
Fri, 09/03/2010 - 19:06 नवीन
रावणानेच रावणपिठल्याचा शोध लावला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

मला सिताफळा विषयी अशीच शंका

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/03/2010 - 19:08 नवीन
मला सिताफळा विषयी अशीच शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

रामफळाचे काय?

अवलिया
Fri, 09/03/2010 - 19:09 नवीन
रामफळाचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आणि कलिंगड?

llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 19:15 नवीन
आणि कलिंगड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

ते तुमचेच फळ असावे.

मेघवेडा
Fri, 09/03/2010 - 19:18 नवीन
ते तुमचेच फळ असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

<<ते तुमचेच फळ असावे.>>> अहं,

विशाल कुलकर्णी
Fri, 09/10/2010 - 13:06 नवीन
<<ते तुमचेच फळ असावे.>>> अहं, तो पुपेंचा गड आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

कलिंगड

मिसळभोक्ता
Fri, 09/03/2010 - 19:26 नवीन
ह्या शब्दात "लिंग" असल्याने तो अश्लील मानला जावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मग केळ्याचं काय?

llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 19:30 नवीन
मग केळ्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

केळे ?

मिसळभोक्ता
Fri, 09/03/2010 - 19:34 नवीन
केळ्यात काय अश्लील आहे रे पुप्या ? केळ्याने होत आहे रे आधी केळेची पाहिजे, असे खुद्द समर्थ रामदार स्वामी म्हणून गेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

स्वामी

विनायक प्रभू
Sat, 09/04/2010 - 15:05 नवीन
स्वामींनी ल च म्हटले होते. ल चा ळ करायचा मान वेगळ्यालाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

हा हा

सूड
Fri, 09/03/2010 - 19:37 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

शब्द पहा हो !! आणि केळ्याची

सूड
Fri, 09/03/2010 - 19:36 नवीन
शब्द पहा हो !! आणि केळ्याची साल संपूर्ण काढता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

फ्यान

मिसळभोक्ता
Fri, 09/03/2010 - 19:38 नवीन
साला, ह्या सालीच्या प्वाईंटमुळे आपण ह्या देवरुखकराचा फ्यान झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लवफळ पण जोडा. हा लव कुशातला

मृत्युन्जय
Fri, 09/03/2010 - 19:22 नवीन
लवफळ पण जोडा. हा लव कुशातला लव बरं का. लव = प्रेम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मिपावर कुणीतरी लवफळाचा पण

सूड
Fri, 09/03/2010 - 19:25 नवीन
मिपावर कुणीतरी लवफळाचा पण फोटो दिला होता ना ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

जागुताई नी

शुचि
Sat, 09/04/2010 - 06:34 नवीन
जागुताई नी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रावणभात र्‍हायला.

सूड
Fri, 09/03/2010 - 19:51 नवीन
रावणभात र्‍हायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

कानिटकर , तुम्ही 'काना' च्या

पुष्करिणी
Fri, 09/03/2010 - 19:23 नवीन
कानिटकर , तुम्ही 'काना' च्या कौलात हा ऑप्शन नव्हता दिला बरंका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

घालताना आणि चढताना दाखवून करत

नरेश धाल
Tue, 09/07/2010 - 13:30 नवीन
घालताना आणि चढताना दाखवून करत नाही. ते गुपचूप करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

संभाजीराजे बदफैली होते असे

मृत्युन्जय
Fri, 09/03/2010 - 15:34 नवीन
संभाजीराजे बदफैली होते असे म्हणणे म्हणजे वायझेडपणाचा कळस आहे.
  • Log in or register to post comments

अंशतः सहमत आणि अंशतः असहमत

llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 15:44 नवीन
अंशतः सहमत आणि अंशतः असहमत . १. असहमत अशासाठी की संभाजीमहाराजांनी बाया ठेवल्या असतील तर तसं म्हणण्यात वाईट काय आहे. डॉ. सदाशिव शिवदे लिखील ज्वलज्वलनतेजस या पुस्तकात येसूबाईंनी शंभूराजांच्या दासीपुत्रांचा औरंगजेबाच्या छावणीतून सुटका होईपर्यंत नीट सांभाळ केला होता असे म्हटले आहे. पुढे जाऊन राजाराम महाराजांनी येसूबाई व शाहू यांस सोडविण्यासाठी २० वेळा प्रयत्न केले व छावणीवर छापे घातले असाही उल्लेख आहे. मग तसं होतं तर तसं म्हणण्यास प्रत्यवाय का? २. सहमत यासाठी की संभाजीराजांचा दाखला देऊन बाया ठेवण्याचं समर्थन करणार्‍यांनी आधी संभाजीराजांसारखा पराक्रम गाजवावा. इतक्या पराक्रमी माणसाच्या हातून असा बदफैली पणा झाला असेल तर तो समर्थनीय नाही पण क्षम्य नक्कीच ठरतो. म्हणजे त्यांचे गुण हे त्यांची थोरवी ठरवण्यास पुरेसे ठरतात आणि फक्त त्या अवगुणांमुळे थोरवी झाकोळली जात नाही. बाजीरावाच्या बाबतीतही असेच म्हणता येतील. थोडक्यात काय रावबाजी आणि संभाजी दोघे एका गाडीचे प्रवासी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हे बघा. त्या काळात अनेक लग्ने

मृत्युन्जय
Fri, 09/03/2010 - 15:56 नवीन
हे बघा. त्या काळात अनेक लग्ने केली जायची. बाया ठेवल्या जायच्या. महाराजांच्याही ३ उपस्त्रिया होत्या म्हणतात. उपस्त्रिया म्हणजे काय ते जरा कोणी स्पष्ट करेल काय? जे त्या काळात योग्य होते त्याबद्दल उगाच कशाला मोठ्या माणसांना नावे ठेवायची. आणि ते मोहित्यांची मंजुळा वगैरे प्रकरण तर उगाच हवेतल्या गोष्टी आहेत असे मला वाटते. संभाजी महाराजांनी जर खरेच असे काही केले असते तर शिवाजी महाराजांनी नक्कीच त्यांना शिक्षा केली असती. शिवाजी महाराज म्हणजे काही आजकालचे राजकारणे नव्हते की काहीही करुन पोटच्या पोराला पाठशी घालतील. शिवाय ती जी कोण होती ती कोण्या बड्या सरदाराची नातेवाइकच होती तो बरे ऐकुन घेइल हे सगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

काळ!

ऋषिकेश
Fri, 09/03/2010 - 16:12 नवीन
<झाडावरून उतरलोय.. मात्र रुमाल टाकलाय जागेवर> तुम्ही आजच्या काळातले नीतीमत्तेचे नियम संभाजी राजआंना लाऊ शकत नाहीत. त्याकाळात अनेकबायका असणे, अनेक बायकांशी राजांचे संबंध असणे समाजसंमत व शिष्टसंमत होते. राजांनी मग त्यांना का शिक्षा केली असती? <झाडावर परत चढलो :P>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

संभाजीराजांनी एका मुलीवर

मृत्युन्जय
Fri, 09/03/2010 - 16:17 नवीन
संभाजीराजांनी एका मुलीवर जबरदस्ती केली होती आणि एका विधवेला नादी लावले होते (जे त्या काळच्या प्रथेप्रमाणे अपराध होते) असा अपप्रचार केला जातो त्यांच्याबद्दल. त्याबद्दल बोलत होतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

नाही, हे खोटा आहे. त्या

नरेश धाल
Tue, 09/07/2010 - 13:34 नवीन
नाही, हे खोटा आहे. त्या मुलीनेच संभाजीराजां वर बळजबरी केली होती, त्या ऐतराज मधल्या प्रियांका वाणी. आणि केला त्या विधवेचा थोडा उद्धार तर, काय बिघडले हो ? (एक पुणेरी पाटी : पुरावे मागू नयेत, मागितल्यास अपमान करण्यात येईल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

एक छोटी चुक रावबाजी हे

Dipankar
Fri, 09/03/2010 - 16:25 नवीन
एक छोटी चुक रावबाजी हे दुसर्‍या बाजीरावाला म्हणायचे पहील्या नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा