गाभा:
कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला.
डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला. त्यांच्या विषयी आधीक येथे.
हा माहीतीपट त्यांनी का काढला हे त्यांच्याच शब्दात.
३४ मिनिटे २५ सेकंदाचा हा माहीतीपट
Krishna: History or Myth from Saraswati Films on Vimeo.
जाणकारांचे यावर काय म्हणणे आहे ऐकण्यास उत्सुक!
प्रतिक्रिया
1 Sep 2010 - 4:21 pm | मृत्युन्जय
मूठभर शक्तीशाली लोकांसाठी अयोग्य नव्हती म्हणून गुलामांची मतंच नव्हती का?
मी असे अजिबात म्हणत नाही आहे. मते असणे किंवा नसणे हा आपल्या चर्चेचा विषयच नाही आहे. त्यावेळेस ती गोष्ट समाजमान्य होती. त्यामुळे त्या काळातील लोकांना त्या गोष्टीबद्दल वेठीस धरणे योग्य होणार नाही.
स्त्रीशिक्षण, विधवापुनर्विवाह, सतीबंदी ज्या काळात अयोग्य समजले जात होते त्या काळातही त्यासाठी लढणारे लोकं होते ते चुकीचे होते का?
तुम्ही खुप अलीकडच्या काळाबद्दल बोलत आहात मॅडम. ५०० वर्षांपुर्वी किमान भारतात तरी नव्हती.
>> आज गांधर्वविवाह समाजाला मान्य नाही महाभारत काळात होता. <<
माझ्या माहितीत आजकाल त्याला लिव्ह इन म्हणतात. किंवा गांधर्वविवाह करणारी जोडपी फक्त समाज या घटकाचा उपद्रव होऊ नये आणि/किंवा इतरांना आपल्या व्यक्तीगत आयुष्यात डोकावू देण्याची गरज नाही म्हणून ही माहिती लपवून ठेवतात.
>> आज तो केवळ मान्य नाही म्हणुन अर्जुनाला बलात्कारी म्हणायचे का?<<
राक्षसविवाह करणार्यांना आजकाल बलात्कारी म्हणतात, असा माझा समज आहे. चुभूदेघे.
माझी चुक. मला राक्षसविवाहच म्हणायचे होते. अर्जुनाचा राक्षसविवाह होता. गांधर्वविवाह नाही. आता सांग त्याला बलात्कारी आणि खलनायक म्हणायचे का?
1 Sep 2010 - 3:56 pm | बिपिन कार्यकर्ते
"एक राणी होती; तिला दोन राजे होते, एक आवडता, एक नावडता"
या वाक्याचं अजून एक आधुनिक व्हर्शन काही दिवसांपूर्वीच ऐकलं...
"एक राजा होता; त्याला दोन राजे होते, एक आवडता, एक नावडता"
1 Sep 2010 - 4:22 pm | मृत्युन्जय
काय कल्पना नाही याची मला!
पण मुळात फाऊल होता का नाही? पुढे सीतेने रामाशी का लग्नं केलं हा तिचा व्यक्तीगत प्रश्न आहे/होता. फाऊलचा मुद्दा टेक्निकल आहे.
पण यात रामाने शेंडी कशी लावली बुवा?
1 Sep 2010 - 3:40 pm | Nile
तुम्ही म्हणता
वरती मनीषा म्हणतात
नक्की काय ते ठरवा ब्वॉ!
1 Sep 2010 - 3:46 pm | मृत्युन्जय
तुम्हाला उत्तर मनीषा कडुन हवे की माझ्याकडुन ते ठरवा आधी.
1 Sep 2010 - 3:56 pm | Nile
मी उत्तर मागितलं का? मी दोन वेगळ्या समजुती दाखवल्या. आता कुठली बरोबरं ते ठरवा इतकंच सुचवलं.
(दोन परस्पर विरोधी मुद्द्यांना धरुन महाभारतातील एकाच घटनेचे समर्थन करता आले यातच सगळी गंमत आहे, हे दाखवुन द्यायचे होते. पाहु किती लोकांना कळते ही गंमत ते)
1 Sep 2010 - 4:00 pm | मृत्युन्जय
मी आणि मनिषा वेगवेगळ्या मुद्द्यांवर लिहीत होतो असे नाही का वाटत तुम्हाला?
1 Sep 2010 - 4:07 pm | Nile
नाही. उद्धरणे द्रोपदीच्या लग्नाबद्दलची आहेत. तुमचे आणि मनीषा यांचे परस्पर विरोधी आहे.
26 Oct 2013 - 5:27 pm | उद्दाम
तेच तर .. अंधारात पाणी पिणारा जीव माणूस की पशू हे न पाहताच बाण मारुन श्रावणाचा एन्काउंटर करणारा राजा महान कसा?
1 Sep 2010 - 1:17 pm | कवितानागेश
आदर्श जीवनपद्ध्ती वगरै अशी कोणीच ठरवू शकत नसते.
प्रत्येकानी रामासारखे, सीतेसारखे वागावे हे अन्यय्कारक आहे
...शिवाय कालबाह्यही आहे.
त्यामूळे जुने तेच सग्गळे योग्य असा अट्टहास आपल्याच समाजाला बुडवत आहे.
कारण, प्रत्येकाची संवेदनशीलता वेगळी असते, त्यामुळे नियम बदलतात.
...उदाहरणार्थ, 'प्रत्येकानीच' आपली पोळी घेउन पळून जाणार्या एखाद्या 'कुत्र्याच्या' मागे तूप घेवुन जावे, असे म्हणने योग्य नाही. प्रत्येकालाच कुठळ्याही 'कुत्र्याची' भूक सहानुभूतीनी पहाणे शक्य नसते,
...ज्याला जमते... तो संत ठरतो!
निदान सध्याच्या काळात,
...अजून ५० वर्षाने हिच क्रुती करणारा 'मूर्खही' ठरु शकेल.
त्यामूळे उदात्तीकरण कशाचेही करण्यात अर्थ नाही.
पन एखदी गोष्ट पटत नाही, कळत नाही, आवडत नाही,....
....म्हण्जे ती अस्तित्वातच नाही , असे म्हणणे योग्य नाही.
महाभारत युद्ध हे ' इतिहास' म्हणूनच लिहिले गेले आहे, त्याबद्दल शन्का का घेतात हेच मला कळत नाही.
इथे सम्पूर्ण महाभारत वाचलेले कुणी अहे का?
महर्षी व्यासानी कुठेही पाण्डवांचा 'उदो उदो' केला आहे असे मला वाटले नाही.
त्यांनी त्रयस्थपणेच 'फॅक्ट्स' लिहिली आहेत.
'क्रुष्ण' खरोखरच होता, म्हणून त्यानी तसच लिहिले...
ते 'खोट्टेच' आहे असे आपण अता कसे काय ठरवू शकतो??
पण 'अविश्वास' हा सध्याचा मनुष्याचा स्थायीभाव झाला आहे,
त्यामूलळे काही काळानी जर मी माझ्या नातवंडाना सन्गितले, की माझी आजी एका वेळेस एकटी यंत्रांशिवाय ५० जणांचा स्वैपाक करु शकायची,
तर ते नक्कीच माझ्यावर 'अंधश्रध्दा' पसरवण्याबद्दल खटला भरतील!
जय हिंद,
जय महाराष्ट्र.
1 Sep 2010 - 1:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो पण त्या शूर्पणखेला दिलेली वागणूक कोणत्या काळात न्याय्य, आदर्श होती?
1 Sep 2010 - 1:29 pm | शिल्पा ब
आता संगोपसांगी असे म्हणतात कि ती सीतेला मारायला (खायला) तिच्या अंगावर धावून गेली म्हणून राम रागावला...आता तेव्हा मी तिथे नव्हते म्हणून काही सांगू शकत नाही.
1 Sep 2010 - 2:42 pm | llपुण्याचे पेशवेll
अगदी आताच्या काळात सुधा.
समजा मी माझ्या एका अंमळ भारी जीव असलेल्या स्त्रीयेबरोबर एकांतात बसलो आहे. तिथे एक कुरुप स्त्री फुल्ल्टू मेकअप वगैरे करून आली आणि म्हणो लागली की तू माझ्याबरोबर चल माझ्याशी लग्नं कर तर तिला मी शिव्या देऊन हाकलून देईन. अगदीच नाही ऐकली तर पोलिसांना बोलावेन. पण पोलिस हजर होण्याआधी जर ती म्हणू लागली मी तुझ्या बरोबरची स्त्री आहे तिला मारते मग तू माझ्याशी लग्नं कर. किंवा तसे करण्यासाठी त्या आमचा भारी जीव असलेल्या स्त्रीयेला दगड वगैरे मारू लागली तर मी सरळ सरळ एक खण्णकन मुस्कटात मारीन तिच्या, झालंच तर नाकावर क सणसणीत पंच मारेन. तिचे नाक आणि कान कापायला माझ्या खिशात कात्री , सुरी नसेल म्हणून नाक कान कापेन का नाही हे माहीत नाही. पण पंच मात्र नक्की मारेन.
तस्मात ते आजच्या काळातही लागू आहे....
1 Sep 2010 - 2:58 pm | सुहास..
सुरी नसेल म्हणून नाक कान कापेन का नाही हे माहीत नाही. पण पंच मात्र नक्की मारेन. >>
हाण तिच्या ..एक नंबर
तु एकापोरीला पंच मारण्याच चित्र समोर आल ना रे !!
1 Sep 2010 - 1:41 pm | Nile
"महाभारत" व्यासांनी लिहले आहे का?
1 Sep 2010 - 2:13 pm | मृत्युन्जय
नाही. गणपतीने लिहीले. व्यासांनी फक्त सांगितले.
1 Sep 2010 - 2:14 pm | Nile
"महाभारत" हे व्यासांनी सांगितलेही नाही असे मला वाटते.
1 Sep 2010 - 2:24 pm | मृत्युन्जय
चांगली गोष्ट आहे. तुम्हाला काहीही वाटु शकते. अर्थशास्त्र चाणक्याने लिहिलेले नाहीच मुळात असेही वाटु शकते. आम्ही कसे त्याला विरोध करणार ब्वॉ. चालु द्यात.
1 Sep 2010 - 2:25 pm | मृत्युन्जय
बाकी हा पण एक चांगला मुद्दा आहे. व्यासांनी जे सांगितले ते "जया" भारत होते म्हणे. त्यानंतर वैशंपायनांनी जे सांगितले त्यावरुन महाभारत तयार झाले म्हणतात.
1 Sep 2010 - 2:29 pm | Nile
आधीच प्रतिसाद अजुन संपादित केला नाहीत ते बरे. आता इतर लोक "म्हणतात" पण तुमचे मात्र खरे नाही का? :-)
1 Sep 2010 - 3:57 pm | मृत्युन्जय
आधीचा प्रतिसाद कशाला संपादित करु ब्वॉ?
मला तुमचे वाक्य नीटसे कळाले नाही. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा नीट स्पष्ट करुन सांगाल का? तुमचा आक्षेप "लोक म्हणतात" या शब्दाला आहे काय? असेल तर का? नसेल तर इतर कशाला आहे? की तुमचा कुठल्याच गोष्टीला आक्षेप नसुन मलाच उगाच तसे वाटते आहे?
1 Sep 2010 - 1:50 pm | कवितानागेश
कशावरून 'शूर्पणखा ' होती??
कशावरुन मरीच होता?
कशावरून परत अयोध्येचे राज्य मिळावे यासाठी लक्ष्मणानेच ही सगळी कथा रचली नसेल?,
जेणेकरुन,रामाचा पराक्रम दिसून येइल आणी अयोध्येतली ( बावळट!) जनता त्याचा उदो उदो करेल.
दंडकारण्यात आणी लम्केत काय झाले हे त्याना कुठे कळणार?
त्यावेळेस ट्रेन्स नव्हत्या...
टीव्ही देखिल नव्हता!
आणी, कशावरुन रावणानी सितेला पळवले?
कशावरुन रावण होता?
कशावरुन कुंभकर्ण होता? ( असे ६-६ महिने कोणी झोपते का?)
आणी ज्या गोष्टी होत्या की नव्हत्या हेच माहीत नाही, त्यावर वाद कशाला?
1 Sep 2010 - 2:18 pm | मृत्युन्जय
अहो ट्रेन्स आणि टीवी तर राणा प्रताप आणि अकबराच्या काळातही नव्हता. शिवाजी महाराजांच्या आणि औरंग्याच्या काळातही नव्हता. शिवाजी महाराजांचा देखील एकही फोटो उपलब्ध नाही आज. म्हणजे त्यांच्याबद्दल लिहिलेले पण सगळे असत्य का? इतिहास काय ट्रेन आणि टीव्हीचा शोध लागल्यानंतरच सुरु झाला काय? त्याआधीच्या सगळ्या फक्ता भाकडकथा का?
1 Sep 2010 - 5:41 pm | कवितानागेश
हे अजून लक्षात आले नाही का तुमच्या.
मला मजा येतेय असे निरर्थक प्रश्न विचारायला........
जाउ दे.
अजून १०० वर्षानी कोण शिवाजी हा प्रश्न नक्किच येइल,
त्याला उत्तरे द्यायची तयारी करा! (त्यासाठी तुम्ही रोज च्यवन्प्राश खा)
बाय द वे, च्यवन कोण? कशावरून ते अनेक वर्षे जगले?
...........
चावरी माउ!
1 Sep 2010 - 6:01 pm | मृत्युन्जय
बाय द वे, च्यवन कोण? कशावरून ते अनेक वर्षे जगले?
सगळे थोतांड हो. डाबर नावाच्या कंपनीने उगाच स्वतःचे कसलेतरी काले लोकांच्या माथी मारण्यासाठी चरक नावाच्या माणसाला सुपारी दिली. त्यानेही आयती प्रसिद्धी मिळती आहे तर वाहत्या गंगेत हात धुवुन घ्या या उद्देशाने च्यवन नावाच्या ब्राह्मणाच्या नावावर रेसिपी खपवली चक्क. बाकी कसले च्यवन आणि कसले यवन. असे कोणी नव्हतेच.
बाय द वे हा शिवाजी कोण? कोणी पालिटेशन हाय का?
1 Sep 2010 - 2:20 pm | मृत्युन्जय
झाले. १०० प्रतिसाद झाले. आता धागा फ्रीझ करावा काय? की २३३ पर्यंत थांबावे? ;)
1 Sep 2010 - 2:25 pm | अवलिया
१०० प्रतिसादी धागा लिहिल्याबद्दल सहजरावांचे अभिनंदन.. अभिनंदन.. अभिनंदन
1 Sep 2010 - 2:42 pm | मृत्युन्जय
डॉ. मनिष पंडीतांचे देखील अभिनंदन.
1 Sep 2010 - 2:57 pm | निखिल देशपांडे
सहजराव यु टु????
तुम्हाला सुद्धा हाच विषय निवडावा लागला मिपा टॉप २५ मधे यायला????
असो या आणि अशा विषयावर इतक्या वेळा मतप्रदर्शन करुन झाले आहे की आता लिहिण्या सारखे काहीच उरले नाहीए.
कसे काय बुवा दोन्ही बाजुची लोक आपले तेच तेच मत मांडत रटाळ चर्चा करत राहतात कळत नाही,
असो देव असणे नसणे??? कृष्ण देव होता का माणुस??? या प्रश्नांनी काय फरक पडतो तेच कळत नाही.
असो चालुद्या अजुन एखादा शब्द घेउन त्यावर किस पाडत बसा.
1 Sep 2010 - 3:16 pm | सहज
आता कृष्ण होता की नव्हता हे सोड रे. तो मुद्दाच नाहीये हे सुज्ञांच्या एव्हाना लक्षात यायला हवे आहे.
मानवाचा इतिहास नेमका जतन तरी कसा करायचा? पुढे २५०० वर्षांनी महाराष्ट्राचा उद्धार करणारे शिवाजी राजे तसेच आपले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे खरेच होउन गेले की असेच कथेतले नायक हा मुद्दा चर्चेत आला तर त्याला सबळ पुरावा काय? तो कसा जतन करायचा?
जर आज चमत्कार, अविश्वसनीय भाकडकथा, रिती यामुळे एकंदर आजवर चालत आलेल्या आपल्या ऐतिहासीक ठेवा की इतिहासाला संशयात बघीतले जाते. तर किमान सश्रद्धांनी कमीत कमी दैवी घटना घालून आपल्या ह्या तीन महामानवांची प्रतिमा जपली पाहीजे अन्यथा आज सगळे मानतात की हे तिघे नक्की भूतलावर होउन गेले ते उद्या त्यांची चरित्र अतिरंजीत झाल्याने कोणाला खरे वाटले नाही तर?
मानवी इतिहास विश्वसनीय ठेवणे ही सश्रद्ध व अश्रद्ध दोघांची जबाबदारी आहे.
1 Sep 2010 - 3:58 pm | निखिल देशपांडे
मानवाचा इतिहास नेमका जतन तरी कसा करायचा? पुढे २५०० वर्षांनी महाराष्ट्राचा उद्धार करणारे शिवाजी राजे तसेच आपले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे खरेच होउन गेले की असेच कथेतले नायक हा मुद्दा चर्चेत आला तर त्याला सबळ पुरावा काय? तो कसा जतन करायचा?
याविषयावर कृष्ण हे रुपक घेउन चर्चा होउ शकते असे जर तुम्ही समजत असाल तर तुमच्या पायाचा एक फोटो पाठवा आम्हाला.
आहो इथे देव या मुद्दावर कशा प्रकारच्या चर्चा चालतात हे आपण पाहिलेले आहेच त्यामुळे मुळ चर्चा विषयावर चर्चा घडणे अशक्य आहे,
आत तुम्ही कितिही पुरावे जतन करायचे ठरवले तरीही नेहमी त्या पुराव्यांकडे मॅन्युप्युलेटेड म्हणुन पाहाणारे लोक असणारच आहेत. तेव्हाही अशाच चर्चा घडत राहणार. त्यामुळे आता सुद्धा अशा गोष्टींवर चर्चा करणे म्हणजे आपला आणि लोकांचा वेळ वाया घालवणे एवढेच आहो.
असो आपले मत पटत नाहीएत त्यामुळे माझा हा शेवटचा प्रतिसाद
1 Sep 2010 - 4:40 pm | प्रसन्न केसकर
निखिलशी सर्वथा सहमत.
पुरावे देऊन सत्यता शाबित करणे सर्वथा अशक्य असते. फारतर पुराव्यांनी तार्किकता सिद्ध करता येऊ शकते. हाच रॅशनॅलिझमचा पॅरॅडॉक्स आहे आणि विज्ञान व रॅशनॅलिझमचा एकमेकांशी अजोड संबंध असल्याने तो सगळीकडेच लागु होतो.
बर्याच वर्षांपुर्वी महाविद्यालयात असताना फिलॉसॉफीच्या शिक्षकांनी रॅशनॅलिझम शिकवताना जे बजावले होते की रॅशनॅलिझम एका विशिष्ठ मर्यादेपलीकडे जाऊ दिला तर प्रगती होऊ शकत नाही. असा टोकाचा रॅशनॅलिझम नेहमीच प्रश्नचिन्हांमधे अडकलेला रहातो. त्यामुळेच विज्ञानात किंवा तर्कशास्त्रात काही मुलभुत गृहितकांची सत्यता न पडताळता ती स्वीकारावी लागतात. अशी गृहितके जर चुकीची ठरलीच तर त्यावर आधारीत अश्या पुढील सर्वच निष्कर्षांची सत्यता गडगडते. त्या अर्थे विज्ञानातही काही श्रद्धा (अंधश्रद्धा म्हणजे नक्की काय याबाबत अनेक मतमतांतरे असल्याने तो शद्ब वापरत नाही.) असतातच.
तर्कशास्त्र आणि विज्ञानातला हा घोळ ह्युमॅनिटीज मधे अजुनच वाढत जातो. याचे सरळ कारण म्हणजे ह्युमॅनिटीज मधे अभ्यासकांना सतत बदलणार्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. ह्युमॅनिटीज मधे कोणतीच गोष्ट सर्वकालीन चांगली अथवा वाईट, सत्य अथवा असत्य अशी नसते. किंबहुना ह्युमॅनिटीज मधे चांगले-वाईट, सत्य-असत्य असे फरक सरळसोट नसतातच. विज्ञान किंवा तर्कशास्त्रातली अभ्यासपद्धती त्यामुळेच ह्युमॅनिटीजमधे जशीच्या तशी वापरली जाऊ शकत नाही. विज्ञानात अथवा तर्कशास्त्रात आदर्श समजले जाणारे डिडक्टीव्ह लॉजिक ह्युमॅनिटीजच्या अभ्यासात निरुपयोगी ठरते. तिथे नेहमीच इंडक्टीव्ह लिप गृहित धरावी लागते.
अनेक वैज्ञानिकांनी हे समजुन घेऊन ह्युमॅनिटीज मधे देखिल मोलाची भर टाकली. परंतु अनेक वैज्ञानिकांनी हे समजुन न घेता ह्युमॅनिटीज जोवर डिडक्टीव्ह लॉजिकच्या निकषांना उतरल्याखेरीज ते अमान्य करण्याचीही भुमीका घेतली. अश्या विज्ञानवाद्यांमधला व ह्युमॅनिटीजच्या अभ्यासकांमधला झगडा अनादी अनंत आहे. यातुन काहीच नवीन सिद्ध तर झालेले नाहीच परंतु समाजाची अनेकदा हानीच झालेली आहे.
1 Sep 2010 - 7:46 pm | सहज
हा वाद सनातन आहे व मानवाचा इतिहास कायम वादाच्या भोवर्यात असणार तर.
1 Sep 2010 - 3:37 pm | धमाल मुलगा
हे घ्या ..
आणि विंटरन्याशनल पायजे असेल तर हे घ्या :
1 Sep 2010 - 3:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ए श्श्श्श्स ....
धार्मिक लोकांना धर्म ही अफूची गोळी आहेच; आमच्यासारख्या पाखंडी लोकांसाठी "सोय" कर काहीतरी!
1 Sep 2010 - 4:24 pm | धमाल मुलगा
तीच तर केली आहे ना...
>>धार्मिक लोकांना धर्म ही अफूची गोळी आहेच
नक्की? धार्मिक हे नक्की? मुळात धार्मिक म्हणजे काय? धार्मिक आणी धर्म हे दोन शब्द काढून तिथं आणखी दुसरे शब्द घातले तरीही वाक्याचा गाभा तसाच कसा काय बुवा राहतो...असे मला प्रश्न पडले आणि मी मस्तपैकी सिगारेट शिलगाऊन धुरामध्ये हरवत गेलो!
उत्तरं न मिळाल्यासच उत्तम! मला त्यांची गरज नाही. ज्यानं त्यानं स्वतःलाच उत्तरं देऊन पडताळावं असं प्रांजळ मत.
असो!
खाजखाजवुन खरुज काढलेल्या भानगडीत न पडण्याचा निश्चय धुळीला मिळाला....आता पापक्षालनासाठी मानसरोवराला जाऊन श्रीरुद्राराधना करावी लागेल.
शुभं भवतु!
सच्चिदानंद..सच्चिदानंद!!
1 Sep 2010 - 4:28 pm | अवलिया
सच्चिदानंद..सच्चिदानंद!!
योग्य माणसाला मार्गदर्शक म्हणुन ने बरोबर. (थोडक्यात मी आहेच हे सांगायचे होते)
नीट पूजा कर.. मोक्ष मिळेल..
सच्चिदानंद..सच्चिदानंद!!
सच्चिदानंद..सच्चिदानंद!!
सच्चिदानंद..सच्चिदानंद!!
1 Sep 2010 - 3:44 pm | Nile
लावायला कोणी मुन्नी असेल तर लै बेस होईल बघा! ;-)
26 Oct 2013 - 5:30 pm | उद्दाम
काय लावायला? कुठे लावायला? कुणाला लावायला?
1 Sep 2010 - 3:46 pm | अवलिया
संपादक मंडळातील माननीय सदस्य
हा धागा आता भरकटत चालला आहे. वाचन मात्र करा किंवा अप्रकाशित करा.
1 Sep 2010 - 5:46 pm | कवितानागेश
.........
बाय द वे, कशावरून अष्टमीलाच जन्म झाला?
..........
...........
(मला बी-टेक्स नकोय...
मी फक्त वेडे वेडे प्रश्न विचारायचा सच्चि आनंद उपभोगतीये ....)
चावरी माउ
1 Sep 2010 - 6:07 pm | कवितानागेश
इथे काही इतिहासातल्या-जुन्या काव्यातल्या काही व्यक्तिंवर चिखलफेक करण्याचा अट्टहास सुरु आहे.
जर का एखादी कहाणी खोटीच ठरवायची असेल तर त्याबद्दल सगळ्या बाजूनी चर्चा व्हायला हवी.
एखाद्याचे चमत्कार आणी देवत्व खोटे ठरवायचे असेल (चमत्कार वगरै काहिही नसतात, फक्त आपण अत्ता ते अनुभवलेले नसते... म्हणून आपल्याला कळत नाही. मला शिवाजी राजांच्या काळातले ५ दिवस घोड्यावरुन दौडत जाणारे वीर 'चमत्कार'च वाटतात, किन्वा २ तलवारी घेवुन दिवसभर लढणारे बाजीप्रभू देखिल चमत्कारच वाटतात, कारण माझ्या आयुष्यात माझ्या डोळ्यानी मी ते पहिले नाहीएत!) ,
किंवा कोणाचे अस्तित्वच खोटे ठरवायचे असेल...
तर ज्या काळात या गोष्टी लिहिल्या त्या काळाचा अभ्यास व्हायला हवा....
जो इथे कुणाचाही नाही.
इथे फक्त अशा चमत्काराना आणी चांगल्या ठरवल्या गेलेल्या गोष्टीना 'खोट्या' होत्या असे प्रूव करण्याचा आग्रह दिसतोय, आणी 'वाईट' भासणार्या गोष्टींबद्दल जाब विचारला जातोय......
हा कुठला न्याय?!
अशी गाळणी कशाला लावायची खरेखोटे करायला?
एकतर सगळेच खरे माना नाहितर सगळेच खोटे!
आणी समजा उद्या कसलाही पुरावा मिळाला, तरी 'तो' पुरावा खरा आहे असे मानणारे किती निघतील?
1 Sep 2010 - 6:30 pm | पुष्करिणी
श्रीकॄष्ण पुराणकाळात होउन गेलेली खरी व्यक्ती असो वा कुणा प्रतिभावान कवीची कल्पना असो, तो माझ्याकरता ऑलटाइम हिरोच आहे.
राहता राहिला प्रश्न साक्षी-पुराव्यांचा , होमिओपॅथीसारखच आहे हे काही लोकांना येतो गुण पण वैज्ञानिकदृष्ट्या नाही सिद्ध करता येत. व्यक्तिगत पातळीवर मी जे पर्याय कायदेशीरपणे उपलब्ध आहेत त्या सर्व पर्यायांचा माझ्या प्रगती /सुख्/समाधान्/शांतीसाठी गरज पडल्यास उपयोग करून घेते/घेइन;
1 Sep 2010 - 8:07 pm | यशोधरा
रामायण आणि महाभारत वा इतर कोणतेही पौराणिक वगैरे ग्रंथ इ. केवळ कविकल्पनाच आहेत असे धरुन चालले तरीही, त्यात केवळ चुकीचे आणि वाईटच दिसते, हे अनाकलनीय आहे. किंवा कदाचित म्हणूनच ज्याची त्याची जाण, समज वगैरे म्हणतात का?
1 Sep 2010 - 8:12 pm | यशोधरा
प्रकाटाआ.
24 Oct 2013 - 7:10 pm | देशपांडे विनायक
अणुबॉम्ब टाकल्यानंतर झालेला संव्हार आईन्स्टाईला सांगितला तेंव्हा त्याने सांगितले म्हणे अणुस्फोटाने किती नाश होतो हे मला माहित होते
पुराव्याची गरज नव्हती
तेव्हापासून म्हणजे ते वाचल्यापासून [फार वर्षापूर्वी ते वाचले असल्याने त्याबद्दल पुरावा मी देऊ शकत नाही ] मी पुरावा मागितला नाही . भीती वाटते
24 Oct 2013 - 9:22 pm | मनिम्याऊ
सहमत...
24 Oct 2013 - 9:29 pm | मनिम्याऊ
सर्व चर्चा वाचून आज पुन्हा वि वा शिरवाडकर आठवले....
कुसुमाग्रजांचा काही कवितेतील ओळी इथे द्याव्याशा वाटतायत... (विषयांतर होत असल्यास प्रतिसाद खुशाल उडवावा...)
‘देवाच्या दारी’ (१९३२ ते १९३९)
‘नाम तुझे गाती गाती थोर सान
दारी तुझ्या दीन दान घेती।।
चिखलात येता मूल माखोनिया
प्रेमे न्हाऊ तया घालतोसी।।
उधळीत आज भक्तीचीच फुले
डोळे तुझे ओले करीन मी।।’
‘चिमण्यांच्या घरा लावसी मशाल
केवढी विशाल दया तुझी?
तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे
गमती तराणे अर्थहीन’
भित्या भावनेला शोधायसी धीर
पाषाणास थोर मीच केले।।
माझ्या जीवनाचा मीच शिलेदार
व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी।।
आहेस की नाही आज नसे चिंता
दोहोंमध्ये आता भेद नुरे।।
‘जोगीण’
‘मला हवी आहे नास्तिकता,
पण सहस्र वर्षे
मनाला मिठी घालून बसलेली
ही आस्तिकता होत नाही दूर
माझ्यापासून..’
‘याच मातीतून’
‘पण याच, जागेवरच्या मातीतून, आता उगवतोय
एक लखलखित अंजिरी कोंब
नव्या ईश्वरतेचा,
जिचे पर्यायी नाव, नास्तिकताही असू शकेल.’
‘मार्जिन’
‘अचेतनाला करी सचेतन, शून्याला दे अर्थाचे धन
मन अपुल्या नजरेने जीवन सदा पाहते-
म्हणून माझ्या डोळ्यापुढती
किरीटधारी रूप प्रभुचे (मंदिरातले, तसबिरीतले)
उभे राहाते.
असो तसे पण-
ईश्वर नाही या प्रश्नावर- अपुले जमते.’
‘तो’
‘पण तरीही मला माहीत आहे
मला मानणाऱ्यांमध्ये तू अग्रेसर आहेस
फक्त तुझा दिवाणखाना
तुझ्या काळजापासून फार दूर आहे, इतकेच.’
परस्थ
‘तू हा विषय पाहण्याचा नाही, शोधण्याचाही नाही.
तो विषय आहे फक्त अनुभवण्याचा.
माझे पाहणे अनुभवापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तू मला परस्थच.
असून नसल्यासारखा. किंबहुना नसल्यामुळेच, नसल्यासारखा.’
‘नजर’
‘की या निरीश्वरवाद्यांनी, उत्तररात्री उठून
पाहिलेले नाही कधीही, चांदण्यांनी खचलेले
अपार धूसराने ओथंबलेले आकाश, माझ्या नजरेने.’
मनाच्या अंतर्चक्षूंना या दिव्यत्वाचे क्षणभर दर्शन होते-
‘आता आता, या मृत्यूयात्रेत मात्र,
जेव्हा माझ्या शून्यारलेल्या मनाला
तुझ्या अस्तित्वाची यादही नसते
तेव्हा, सर्वाकडून दुर्लक्षित असा तू,
माझ्या खांद्यावर हात ठेवून
माझ्याबरोबर अनामंत्रित चालत आहेस.’
(आणि माझी अत्यंत आवडती कवितापंक्ती...)
‘स्मित करून म्हणाल्या, मला चांदण्या काही,
तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे,
त्यांनाच पुससी तू, आहे की तो नाही!’
25 Oct 2013 - 5:17 pm | कवितानागेश
छान अहेत सगळ्या ओळी.
याच http://www.misalpav.com/node/25565 इथे पण लिहा. :)
24 Oct 2013 - 11:02 pm | रमाकाकू
माझ्या घरी मुस्लिम सुतार आला होता.गप्पावरून पैगंबर, राम,कृष्ण यांच्याबाबत म्हणाला की ते देव वगैरे नव्हते,तर ज्यादा पॉवरवाले आदमी थे!
1 Nov 2013 - 2:54 pm | म्हैस
घ्या आता आत्तापर्यंत भगवद्गीतेवर खलबतं करून झाली . आता चक्क श्री कृष्णांच्या अस्तित्वावर शंका .
मृत्युंजय सहेब. एकदम बरोबर आहे आपण म्हणताय ते .
ज्या गोष्टी पुराव्यांनिशी दाखवता येतात त्यांना पुरावे मागणं योग्य आहे . प्रत्येक शास्त्राचे नियम असतात . एका शास्त्राचा नियम दुसर्याला लावता आला नाही तर त्याचं अस्तित्वच नाकारण मूर्खपणा आहे .