“( अ ) द्वितिय ” प्रेम

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
31 Aug 2010 - 12:27 pm

“( अ ) द्वितिय ” प्रेम

प्रीतीत संगत तुझी,
मज कधी ना लाभली,
साथ संगत नव्हती कुणाची,
पण वेदनांनी मज दिली.

खेद नाही, राग नाही,
प्रेम तव जरी ला लाभले,
वेदनांशी “इश्क” माझे,
प्रेमांत तुझिया जाहले.

निरंजन वहाळेकर

करुणकविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

31 Aug 2010 - 5:53 pm | पाषाणभेद

प्रेम तव जरी ला लाभले,

हे 'प्रेम तव जरी ना लाभले,' असे पाहिजे होते का?

निरन्जन वहालेकर's picture

1 Sep 2010 - 8:36 am | निरन्जन वहालेकर

होय ! अगदी बरोबर ! !
" प्रेम तव जरी ना लाभले,' असेच लिहिले होते प्रकाशित करताना काहितरी घोटाळा झाला.
चूक निदर्शनास आणून दिली धन्यवाद पाषाणभेद साहेब. .

एक अनामी's picture

31 Aug 2010 - 8:25 pm | एक अनामी

सुंदर आहे...
अजून वाढवता येइल कविता...

विश्नापा's picture

31 Aug 2010 - 10:04 pm | विश्नापा

"वेदनांनी इश्क माझे प्रेमात तुझिया व्यापले ? चालेल का?
कवी 'सौमित्र" यांची गा़लिब वर लिहिलेली कविता कोणाकडे आहे काय?
कृपया पोष्ट करा.

निरन्जन वहालेकर's picture

1 Sep 2010 - 8:44 am | निरन्जन वहालेकर

" द्वितिय ” प्रेम हे शिर्शक मग योग्य ठरणार नाही.

फ्रॅक्चर बंड्या's picture

1 Sep 2010 - 11:02 am | फ्रॅक्चर बंड्या

वेदनांशी “इश्क” माझे,
प्रेमांत तुझिया जाहले.

फार आवडले ...