माणूस म्हणून जगण्याची ही किंमत....

दशानन's picture
दशानन in जे न देखे रवी...
31 Aug 2010 - 11:17 pm

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत
नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती
अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे
शब्दांची लकीर खुप मोठी होती

घाव शब्दांचे चार छोटे होते
पण जख्म जरा मोठी होती
लपवावे काय आता येथे
व्रण चेहर्‍यावर पडले होते

नको नको म्हणत असताना
दर्द पदरी पडला होता
लवपावे काय व दाखवावे काय
आपल्यातच खोट दिसली होती

चार पुस्तके कमी शिकलो
त्यांची ही किंमत खुप वजनी होती
काय खरं व काय खोटं
नशीबाची थट्टाच थोरं होती

वाहत जावे असेल ठरवले तरी
जमीनीचे वळण खुप वेगळे होते
तडफडत जावे कोठे तरी येथे
आरसा दाखवणारे अनेक होते

माणूस म्हणून जगण्याची ही
किंमत जरा खरंच मोठी होती...
मेल्यावर तरी समाधान लाभेल
मुक्त होईन असे वाटले होते

पण राज्या नियतीची लेखणी
दुर्दवाने खुपच वाकडी होती
तुझ्या तिरडीला देखील गड्या
चार खांद्यांची वाणवा होती....

**

पुर्वप्रकाशित - http://www.mimarathi.net/node/3500

करुणमुक्तक

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2010 - 11:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण राज्या नियतीची लेखणी
दुर्दवाने खुपच वाकडी होती
तुझ्या तिरडीला देखील गड्या
चार खांद्यांची वाणवा होती....

शेवटच्या प्रवासाला चार आधाराचे खांदे मिळू नये इतकी बेक्कार नियती.
पण, असे कशामुळे [केवळ नशीब] वगैरे काही समजले नाही राव....!

बाकी लकीर, जख्म,दर्द,वजनी, अशा शब्दांनी राजेंचे लेखन ओळखू आले. [ह.घ्या]

-दिलीप बिरुटे

सहज's picture

1 Sep 2010 - 11:47 am | सहज

खांदे पाहीजेतच का? शववाहिकेतुन नेतात की सर्रास आता.

सरांशी सहमत!

माझ्या लेखन कलेचे जाणकार दोन व्यक्तींनी असे प्रतिसाद दिले पाहून दिल एकदम नर्व्हस झाले बॉ !

;)

अवलिया's picture

1 Sep 2010 - 11:56 am | अवलिया

तसलेच आहेत ते.. दोघेही जीमेलवर ठरवुन प्रतिसाद देतात
आपल्यासारख्या लेखकांनी असल्यांकडे दुर्लक्ष करावे ही हात जोडुन विनंती

लिहित रहा..

असुर's picture

31 Aug 2010 - 11:46 pm | असुर

कविता (खरेतर कवितेहूनही अधिक काहीतरी आहे त्यात) आवडली.

"तडफडत जावे कोठे तरी येथे
आरसा दाखवणारे अनेक होते"

हे विशेष!

--असुर

करुण आहे.
एका हमालाला ४ बुकं शिकायला मिळाली नाहीत म्हणून वनवास नशीबी आल्यागत वाटतया.
त्या दृष्टीकोनातून कविता आवडली.

निरन्जन वहालेकर's picture

1 Sep 2010 - 9:02 am | निरन्जन वहालेकर

आवडली कविता ! छान मांडणी ! ! !

मदनबाण's picture

1 Sep 2010 - 9:51 am | मदनबाण

कविता आवडली...

फ्रॅक्चर बंड्या's picture

1 Sep 2010 - 11:02 am | फ्रॅक्चर बंड्या

छान कविता...

मस्त !
बरेच दिवसांनी मिपावर लिहिलेस.. :)